■ देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या सभागृहात धान खरेदी पूर्व तयारी करिता सभेचे आयोजन.
देवरी,ता.०१: देवरी, नवेगावं/बांध व रामटेक उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणा-या सर्व आदिवासी सहकारी संस्थांनी पणन हंगाम २०२२-२३ मध्ये शेतक-यांचे धान खरेदी करतानी शासनाने दिलेल्या निर्देशनाचे पालन करूनच धान खरेदी करावे, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांनी केले.ते देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या सभागृहात सोमवार (दि.३१) रोजी पणन हंगाम २०२२-२३ मधील धान खरेदी पूर्व तयारी करिता प्रादेशिक कार्यालय भंडारा अंतर्गत येणा-या उपप्रादेशिक कार्यालय देवरी, नवेगाव/बांध व रामटेक मधील सर्व आदिवासी संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची संयुक्त सभेत अध्यक्षस्थावरून बोलत होते.
या सभेत भंडारा येथील प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे, देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक जी.एस.सावळे, विपणन विभाग प्रमुख विजयकुमार अटोटे, गोंदिया जिल्हा आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या संघाचे अध्यक्ष शंकर मडावी, मरामजोब संस्थेचे अध्यक्ष रमेश ताराम, बोरगाव/बाजार संस्थेचे अध्यक्ष वसंत पुराम, डवकी संस्थेचे उपाध्यक्ष भास्करभाऊ धरमशहारे, अंभोरा संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, चिचगड संस्थेचे सचिव एस.डी.मडावी, डोंगरगावं/डेपो संस्थेचे अध्यक्ष शामराव वट्टी, लोहारा संस्थेचे अध्यक्ष राजू राऊत, केशोरी संस्थेचे अध्यक्ष विनायक मरसकोल्हे, सालेकसा संस्थेचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांच्यासह सर्व आदिवासी संस्थेचे अध्यक्ष,सचिव व आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी, विपणन विभागाचे अधिकारी, निरीक्षक आणी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सभेत यावर्षी सुरू होणा-या पणन हंगामा बाबद आदिवासी संस्थेच्या विविध समस्यांविषयी चर्चा करून समस्यांचे निराकरण कसे करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
या सभेचे प्रास्ताविक उपप्रादेशिक व्यवस्थापक जी.एस.सावळे यांनी केले. संचालन आणि उपस्थितांचे आभार विपणन विभाग भंडाराचे एस. के. भगत यांनी मानले.
No comments:
Post a Comment