Tuesday 30 October 2018

राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारोप
श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन
मोझरी विकासासाठी ५८ कोटी निधी

अमरावती,दि.30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
यावेळी गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, गुरुदेव मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी आज गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून नव्हे” या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. राष्ट्रसंतांचे विचार समाजपरिवर्तनाचे आणि समाजाला सुसंस्कारित करणारे आहेत. समाजपरिवर्तनाची ताकद त्यांच्या विचारात होती. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून उर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. इंग्रजांच्या काळात देशबांधवांवर अत्याचार होत असताना त्यांनी त्याविरोध प्रखर लढा देऊन समाजाला एकजूट केले.

राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्याला दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान ही देखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडला. त्यातून त्यांनी शेवटच्या माणसाचा देखील विचार केला. आनंद हा पैश्यांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणुकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळाच्या श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
मोझरी विकासासाठी निधीची कमतरता नाही
मोझरी विकास आराखड्यात 58 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. या निधीतून मोझरी येथे अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याचप्रमाणे, इतर आवश्यक निधीसाठी तत्काळ प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोझरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ यांनी केली. उपस्थितांचे आभार गुरुदेव सेवा मंडळाच्या जनार्दनपंत बोथे यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातून आलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोणारेंच्या शेतातील धानाचे पुंजणे जळाले

अर्जुनी मोरगाव,दि.30ः- तालुक्यातील इटखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी आळो लोणारे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना आज घडली.लोणारे यांच्या 2 एकर शेतामधील कापलेल्या धानाचे पुंजणे मळणीसाठी तयार होते.परंतु त्या पुंजण्याला आग लागल्याने अंदाजे 75 हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याचे बोलले जात असून प्रशासनाने त्वरीत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Monday 29 October 2018

अटल आरोग्य महाशिबिरात एकाचा मृत्यू

नागपूर,दि.29 : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या अटल आरोग्य महाशिबिरात तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित या शिबिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. विजय रामदास कांबळे (वय 45, रा. जगदीशनगर) असे या युवकाचे नाव आहे. महाशिबिरात तज्ज्ञ डॉक्‍टर उपस्थित असताना त्यांच्यापर्यंत माहिती न पोहोचल्याने कुणीही त्याच्या मदतीसाठी येऊ शकले नाही.
विजयवर काही दिवसांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून तो शिबिरात तपासणीसाठी कॅथेटर लागलेल्या अवस्थेत आला होता. तपासणीसाठी आल्यानंतर तो एका खुर्चीत बसला. यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या हृदयाची क्रिया मंदावली. तो जागेवर कोसळताच परिसरातील काही डॉक्‍टरांनी छातीवर दाब देऊन त्याची हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पंधरा ते 20 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. शिबिराचे उद्‌घाटन करून मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर काहीच वेळात ही घटना घडली.
त्याला वाचविण्याची धडपड सुरू असताना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी फोन केला. एक रुग्णवाहिका आली, परंतु ती बंद पडली. बराच वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेतून विजयला मेडिकलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र, मेडिकलच्या मेडिसिन कॅज्युअल्टीमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी किंवा वाटेतच विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अटल आरोग्य महाशिबिरात राज्यभरातून हृदयरोगतज्ज्ञ आले. परंतु, कोणालाही या घटनेची खबरबात नव्हती. उपस्थित हृदयरोगतज्ज्ञांपर्यंत विजयच्या प्रकृतीची माहिती पोचली नाही. शिबिराच्या स्थळापासून जवळच मेडिट्रिना हॉस्पिटल आहे. तेथे त्याला का नेले नाही, अशीही चर्चा येथे होती.

Sunday 28 October 2018

92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे




यवतमाळ,दि.28(विशेष प्रतिनिधी)-ः92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. अ.भा.म. साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत आज सुरू झाली होती. या सभेत या वर्षी यवतमाळ येथे होणाऱ्या 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. महामंडळाची ही 18 सदस्यीय कार्यकारणी 26 ऑक्टोबरपासून यवतमाळमध्ये दाखल झालेली आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून संमेलनाचे पूर्वनियोजन, संमेलनाची तारीख ठरविणे, अध्यक्ष निवड करणे, ग्रंथप्रदर्शन, बैठक व्यवस्था, तसेच संमेलनासाठी नियोजनपूर्ण विषय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आली.
बैठकीत सर्वात महत्त्वाचा विषय होता अध्यक्ष निवडीचा. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये बंदद्वार चर्चा होऊन अध्यक्षपदावर एकमत झाले. संमेलनाच्या कार्यालयात महामंडळाच्या घटक संस्था असलेल्या मुंबई, पुणे, मराठवाडा, छत्तीसगड, इंदूर, कर्नाटक, गोवा, औरंगाबाद, बडोदा, नागपूर येथील 15 सदस्य व यवतमाळ येथील आयोजन समितीचे 3 सदस्य असे एकूण 18 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यातील प्रत्येक घटक संस्थांनी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली नावे सुचवली होती. यात अध्यक्षपदासाठी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर, नाटककार प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे यांच्यासह अन्य दोन ते तीन नावे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चेत होती. हे साहित्य संमेलन पोस्टर ग्राउंडवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे नियोजन महामंडळाने केले होते. त्यानुसार 11 ते 13 जानेवारी 2019 यादरम्यान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.

ओबीसींना मूलभूत अधिकारासाठी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही-बबलू कटरे

गोंदिया,दि.28- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्रीवार्ड शाखेच्यावतीने येथील वॉर्डातील डॉ. रुपसेन बघेले यांच्या निवासस्थानासमोर शरद पोर्णिमा उत्सव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (दि.२५) करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ओबीसी कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते.
मार्गदर्शक म्हणून महासचिव मनोज मेंढे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, प्रा. रामलाल गहाणे, शास्त्री वार्ड संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे, नगरसेविका मालती कापसे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सविता बेदरकर, एल.यू. खोब्रागडे, एस.यू. वंंजारी, डॉ. रुपसेन बघेले, सqवधान बचाव समितीचे अतुल सतदेवे, गुरमितqसह चावला, माजी नगरसेवक सुनिल भरणे, युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, प्रा.गजानन तरोणे, राध्येशाम करंजेकर, प्राचार्य बी.डब्लू.कटरे, गीता मदनकर, विमलताई कटरे, राजेश्वरी रहागंडाले, निर्मलाबाई बिसने, सौ.आशू रहागंडाले,राजेश कापसे, वाय.डी. पटले, पंकज गौतम, डॉ.पारधी, मोहसीन खान आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष बबलू कटरे म्हणाले की आम्ही आमच्या मूलभूत अधिकार ज्या राज्यघटनेपासून मिळाले त्या राज्यघटनेच्या रक्षणासाठी आणि आपल्या संविधानिक अधिकारासाठी लढण्यास तयार होण्याऐवजी फालतूच्या इतर गोष्टीत आपला वेळ वाया घालवू लागलो आहे.या देशातील मूठभर समाज आमच्या ओबीसी समाजातील महिला व युवकांच्या मेंदुला नासवण्याचे काम करीत त्यांना सqवंधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.जोपर्यंत आम्ही आपल्या अधिकार व हक्कासाठी जागृत होणार नाही, तोपर्यंत आपला विकास शक्य नाही.ओबीसीतील काही शिक्षित नोकरदार वर्ग मनुवाद्यांच्या विचारांना बळी पडत आर्थिक आरक्षणाची मागणी करीत आहेत, त्यांनी आर्थिक आरक्षणाची मागणी करण्यापुर्वी आपल्या नोकरीचे वेतन आणि एका व्यापाèयाला मासिक होत असलेल्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ बसवून घ्यावे.सोबतच आयकर विभागाकडे आपण किती कर भरतो आणि तो व्यापारी किती भरतो याचा अभ्यास केल्यानंतर आर्थिक आरक्षणावर बोलावे असे विचार मांडले.

भारतीय राज्यघटनेच्या मुळ गाभ्याला कुठलेही सरकार हात लावू शकत नाही.कारण ही राज्यघटनाच लोकशाहीवर आधारीत आहे.ज्यादिवशी या देशाची लोकशाही संपुष्ठात येईल त्याचदिवशी राज्यघटनेचा मूळ गाभा बदलू शकतो.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना ३४० व्या कलमानव्ये सामाजिक, शैक्षणिक व इतर मूलभूत अधिकार राज्यघटनेत दिले आहेत. परंतु त्या कलमाची अमलबजावणी गेल्या ७० वर्षात काँग्रेस असो की भाजप या कुठल्याही पक्षाने केलेले नाही हेच वास्तव्य आपणास विसरता येणार नाही, त्यामुळे ओबीसी समाजातील शिक्षितांनी आपला थोडा वेळ समाजाला जागृत करण्यासाठी सदपयोगी घालून कर्मकांडातून बाहेर येत मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सविताताई बेदरकर यांनी qहदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत मुलासारखेच मुलीलाही समान वागणूक देण्याचे आवाहन केले.प्रा.रामलाल गहाणे यांनी आम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी सकाळपासून तयारी करुन त्या कार्यक्रमात हजेरी लावतो फेटे घालून नाचतो. परंतु ज्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले त्या राज्यघटनेच्या अधिकारासाठी आम्हाला मात्र अशा कार्यक्रमात यायला वेळ राहत हीच खरी या समाजाची शोकांतिका असून महिलाच आपल्या मुलांच्या भविष्याचे वाटोळे मनुवाद्यांच्या सोबतीला जाऊन करीत असल्याचे विचार व्यक्त केले.मनोज मेंढे यांनीही ओबीसी समाजाच्या युवकांना संघटित होण्याचे आवाहन केले. सुनिल भरणे, डॉ.रुपसेन बघेले, खेमेंद्र कटरे यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व पत्रकार खेमेंद्र कटरे यांना ग.त्र्य. माडखोलकर पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष प्रा.सविताताई बेदरकर, डॉ.रुपसेन बघेले, गुरमितqसह चावला यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
प्रास्तविक प्रा.संजिव रहागंडाले यांनी केले. संचालन ओबीसी संघर्ष कृती समितीचे प्रसिध्दीप्रमुख सावन डोये यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष बंशीधर शहारे यांनी मानले.
आयोजनासाठी समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे, बहुजन युवा मंचचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर राहुल खोब्रागडे, संतोष वैद्य, प्रेम साठवने, केशरीचंद बिसने,संतोष चित्रीव,रुपसागर कुंभलकर,रामकृष्ण गौतम, प्रा.राणे,उमेश लांजेवार, रोहित चौधरी, ओमेंद्र पारधी, बंडू चौधरी, निलू यादव, सोनू पारधी, संजू पटले, राजू भोंगाडे, आशिष वंजारी, संदीप पाटील,रिना भोंगाडे, विना कापसे, आशा भांडारकर आqदनी केले आहे.

तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र

नाशिक,दि.28(विशेष प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु,  करु, अशी धमकी देणाऱ्या आशयाचे पत्र आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’वर  हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी पाठविले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे‘भुजबळ फार्म’वर  अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.
या पत्रात पुढे छगन भुजबळ यांना म्हटले आहे की, भुजबळ सातत्याने संभाजी भिडे यांच्याबद्दल तू चुकीची भाषा वापरत आहेस. तुला गुरुजींचे कार्य कधी कळणार, तुझी लायकी नाही गुरुजींबद्दल असे बोलायची. तू आम्हाला शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज नाही, आमचे गुरुजी जे सांगतील तोच आमच्यासाठी त्यांचा इतिहास असेल असेही या पत्रात म्हटले आहे. तू आताच मरता मरता वाचलास, राहिलेले थोडे दिवस व्यवस्थित जग. तुझ्या भुजात आता बळ राहिलेले नाही त्यामुळे शांत रहा असेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, या पत्रात जगात सर्वात श्रेष्ठ ग्रंथ हा मनुस्मृती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे आणि मनुस्मृती या श्रेष्ठ ग्रंथाचे नाव भुजबळांच्या तोंडातूनही निघणे अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फुले आणि आंबेडकर यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर, तुला संपवायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तर संभाजी भिडेंचे नाव तुझ्या तोंडून निघाले तर तुझाही दाभोळकर पानसरे झालाच समज अशी धमकी शेवटी या पत्रात देण्यात आली आहे.

बख्तरबंद गाड़ी को नक्सलियोंने बारूदी विस्फोट से उड़ाया,चार जवान शहीद


रायपूर(न्यूज एजंसी)28 अक्तुबंर. जिला मुख्यालय से करीब 45 किमी दूर बासागुड़ा से आवापल्ली आ रहे सीआरपीएफ जवानों की बख्तरबंद गाड़ी को नक्सलियों ने बारूदी विस्फोट से उड़ा दिया था। घटना शनिवार शाम करीब 4:30 बजे की है। विस्फोट इतना जबरदस्त था कि मौके पर ही गाड़ी में सवार चार जवान शहीद हो गए। इसके अलावा दो अन्य जवानों की हालत गंभीर है।
बीजापुर जिले के मुरदंडा में नक्सलियों ने जवानों की बख्तरबंद गाड़ी जिस सड़क पर उड़ाई है, वह सड़क पक्की डामर वाली थी। विस्फोट के बाद गाड़ी हवा में 5 फीट तक उछली। सड़क पर करीब 4 फीट का गड्‌ढा देखने के बाद अफसर कह रहे हैं कि विस्फोट के लिए कम से कम 50 किलो बारूद का इस्तेमाल किया गया होगा।खास बात यह है कि नक्सलियों ने मुरदंडा में सीआरपीएफ कैंप से मात्र एक किमी दूरी पर दुर्गा मंदिर के निकट विस्फोट किया है। बख्तरबंद गाड़ी 407 को मॉडिफाइड कर बनाया गया था।  एसपी मोहित गर्ग बताते हैं कि नक्सलियों ने 50 किलो से ज्यादा विस्फोटक सामग्री धमाके के लिए प्रयोग की है हालांकि अभी यह स्पष्ट नहीं है कि धमाके के लिए कौन सा विस्फोटक उपयोग किया गया है। 
किसी को भी बारूद की खबर क्यों नहीं लगी, भास्कर ने जब आला अफसरों से इस संबंध में चर्चा की तो उन्होंने बताया कि नक्सल प्रभावित क्षेत्रों में बारूद, बम को ढूंढने के लिए स्नेफर डॉग और मेटल डिटेक्टर का उपयोग किया जाता है, लेकिन इनकी भी अपनी क्षमता है। स्नेफर डाॅग जमीन में अधिकतम चार फीट की गहराई तक ही बारूद ढूंढ पाते हैं। यही हाल मेटल डिटेक्टर का भी है।कई मामलों में यदि नक्सलियों ने प्लास्टिक के कंटेनर का उपयोग बारूद को भरने के लिए किया है तो फिर मेटल डिटेक्टर यहां फेल हो जाते हैं। इसके अलावा कई बार विस्फोट के लिए बाहर निकाले गए वायर से इसकी खोज होती है। जिस स्थान पर नक्सलियों ने विस्फोट किया है उस स्थान पर जवानों ने कई बार सर्च अभियान चलाया। इस दौरान मेटल, बारूद और वायर डिटेक्ट नहीं हो पाए।

शहीदों में 2 जवान आंध्र, 1 ओडिशा व 1 पश्चिम बंगाल निवासी
  • एएसआई एम रहमान (50), पश्चिम बंगाल
  • हेड कांस्टेबल ड्राइवर बीएम बेहरा (43), ओडिशा
  • कांस्टेबल सीएच प्रवीण (21), आंध्रप्रदेश
  • कांस्टेबल जी श्रीनू कुमार (26), आंध्रप्रदेश
दो जवान घयल घायल
  • हेड कांस्टेबल बाबूराव सिद्धेश्वर – महाराष्ट्र
  • कांस्टेबल हार्दिक परमार सुरेश कुमार – गुजरात

जिल्ह्यातील ५ पोलिस अधिकार्‍यांचे स्थानांतरण


गोंदिया ,दि.28ः-जिल्हा पोलिस घटकांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ५ पोलिस अधिकार्‍यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी स्थानांतरण केले आहे. तसे आदेश २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील रामनगर, गोरेगाव, आमगाव, गंगाझरी व दवनीवाडा या ५ पोलिस स्टेशनचे ठाणेदार बदलले आहेत.

जिल्हा पोलिस घटकातील आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ५ पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक यांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थानांतरण करण्यात आले आहे. रामनगरचे ठाणेदार उमेश पाटील यांचे स्थानांतरण आमगाव पो.स्टे.ला, गोरेगावचे ठाणेदार जितेंद्र बोरकर यांचे स्थानांतरण रामनगर पो.स्टे., आमगावचे ठाणेदार शशिकांत दसुरकर यांचे स्थानांतरण गोरेगाव पो.स्टे.ला, विशेष पथकाचे सपोनि शामराव काळे यांचे स्थानांतरण गंगाझरी, नियंत्रण कक्षाचे सपोनि गणेश धुमाळ यांचे स्थानांतरण दवनीवाडा, दवनीवाडाचे सपोनि दिपक जाधव यांचे स्थानांतरण नियंत्रण कक्ष गोंदिया येथे करण्यात आले आहे.
२६ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात तात्पुरत्या स्वरुपात उपरोक्त अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित पोलिस स्टेशनला त्वरित त्यांनी पदग्रहण करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

देवरी येथे जैनकलार समाजाची कोजागिरी उत्साहात

देवरी, दि. 28- स्थानिक धूकेश्वरी मंदिर परिसरात जैन कलार समाज शाखा देवरीच्या वतीने (दि 27) कोजागिरी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन  सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी हेमचंदजी रामटेककर हे होते. यावेळी नगरसेवक यादोराव पंचमवार, नगरसेवक प्रवीण दहिकर, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर, सुरेश भदाड़े, रामेश्वर मुरकुटे सर, आत्माराम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला व मुलांसाठी संगीत खूर्ची, प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
प्रास्ताविक डॉ भांडारकर यांनी केले. संचलन जागेश्वर ठवरे यांनी केले. उपस्थितांचे आभार संदीप तिडके यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 26 October 2018

जिल्हा परिषद शिक्षकाचा अनोखा प्रतापः व्यवस्थापन समिती अध्यक्षाकडे केली १ लाख रूपयाची मागणी


गोंदिया/देवरी,दि.25- देवरी तालुक्यांंतर्गत येणाऱ्या जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा ओवारा येथील एका सहायक शिक्षकाने शाळा व्यवस्थापन समित्याच्या पदाधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे. सदर प्रकार हा गेल्या सोमवारी (दि. 22) दुपारी घडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर शिक्षकाने शाळा समितीच्या अध्यक्ष ज्या समाजाचे आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकविणार नाहीआणि हा समाज मला चालत नाही, अशी धमकी दिल्याचे  तक्रारीत म्हटले आहे. परिणामी, ज्ञान दानाचे कार्य करण्याऱ्या शिक्षकाकडून असे जातीय वितुष्ट निर्माण केल्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण असल्याचे बोलले जाते.
 सविस्तर असे की, ओवारा येथील जि.प. प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव लाडे यांनी गेल्या सोमवारी शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी मुख्याध्यापकांशी शालेय पोषण आहार आणि अन्यविषयांवर चर्चा केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले सहायक शिक्षक मंगेश बोरकर यांनी श्री लाडे यांना उद्धट उत्तरे दिली, असा आरोप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. श्री. नामदेव लाडे यांनी सदर शिक्षकाची कानउघाडणी केली.  परिणामी, त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. मुख्याध्यापक भोयर यांनी  मध्यस्थी करत मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर शिक्षकाने मुख्याध्यापकांचे  सुद्धा ऐकले नसल्याचे सांगण्यात येते.
दुसऱ्या दिवशी 23 तारखेला ला मुख्याध्यापकांनी सदर  वाद मिटविण्यासाठी शाळेत सभा बोलावली. त्या सभेत सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, व्यवस्थापन समितीचे  सदस्य, पालक सहभागी होते. सदर शिक्षकाने पोषण आहारातील घोळ लपविण्यासाठी नामदेव लाडे यांच्या वर एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दरम्यान, वाद मिटवायचा असेल आणि पोलिस कार्यवाही टाळण्यासाठी श्री लाडे यांचे कडे 1 लाख रुपयाची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यामुळे सभेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर  शिक्षक मंगेश बोरकर यांनी "नामदेव लाडे हा व्यक्ती मला चालणार नाही. हा व्यक्ती समितीत  राहील तर मी त्याच्या मुलाच्या वर्गात शिकविणार नाही तसेच त्यांचा समाज सुद्धा मला चालत चालत नाही. मी यांच्या मुलांना शिकविणार नाही व इतर शिक्षकांना शिकवू देणार नाही" भर सभेत असे विधान केले. यामुळे  एका विशिष्ट समाजातील पालकाच्या भावना दुखावल्या आहेत. शाळा ही ज्ञानमंदीर असून समाजाची धर्मनिरपेक्ष आणि समाज घडविणारी संस्था आहे. त्या शिक्षकाने एका समाजाप्रती जाहीर केलेली भावना ही शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी टीसी काढण्यासंबंधी अर्ज मुख्याध्यापकाला सादर केले असून  14 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  या घटनेला जवाबदार असलेला आणि जातधर्म द्वेश ठेवणाऱ्या शिक्षकाची तत्काळ बदली करण्यात यावी आणि त्यांच्यावर कार्यवारी करण्यात यावी, अशी मागणी सर्व पालकांनी केलेली आहे. 
सदर घटनेची शाहनिशा केली असता गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे याविषयी दुजोरा दिला असून प्राप्त तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी यांनी सुद्धा या प्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिल्याचे म्हटले. 
सदर शिक्षक 9-10 वर्षा पासून ओवारा शाळेत आहे असून त्याचे राजकीय लोकांशी साटेलोटे आहेत. यामुळे स्वतःलाच मुख्याध्यापक समजून पालकांशी वाद घालणे , पोषण आहारचे काम बघणे, अरेरावी ची भाषा वापरणे असे आचरण करीत आहे असे गावातील पालकांनी लेखी तक्रारीत सादर केलेले आहे. 
सदर  शिक्षकाला वाचविण्यासाठी शाळेत कमी आणि राजकारणात जास्त व्यस्त असलेले जि प शिक्षक मोलाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे.

हे तर ठगांचे सरकार ! – यशवंत सिन्हा

अकोला,दि.23 : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याची टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा केली.त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू च ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी दिला.

शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ आॅक्टोबर रोजी दुसºया ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा,आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते घनश्याम तिवारी,गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा, प्रिति मेनन,स्वराज्य सेनेच अब्दूल फारू ख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जिवनात थापडे, ठंगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते,ज्या मागण्या सहज मान्य करण्या सारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकºयांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे.आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली.या लढयात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला.

Thursday 25 October 2018

प्राचार्य महेंद्र मेश्राम यांना पितृशोक

देवरी: 25  येथील पं. स. सदस्य आणि प्राचार्य महेंद्र मेश्राम यांचे वडील तथा डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष चैतराम मेश्राम  ( वय - 87 )  यांचे आज गुरुवारला दिर्घ आजाराने दुपारी  01 : 45  वाजता दुखःद निधन झाले.
       अंत्यसंस्कार उद्या शुक्रवारला दुपारी  01 : 00  वाजता स्थानिक मोक्षधामवर करण्यात येईल.
       त्यांच्या पश्चात एक मुलगा,  एक मुलगी आणि बराच आप्तपरिवार आहे.

Sunday 21 October 2018

प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांना डी.लिट. ची पदवी बहाल

देवरी: 21 ऑक्टो.
तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे प्राचार्य पदावर कार्यरत डॉ. सुजित टेटे यांना नुकतीच डी. लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) हि मानाची पदवी देऊन गौरविण्यात आला. नुकताच सदर दीक्षांत समारंभ काठमांडू नेपाळ येथे पार पडला. सदर पदवीच्या मानासाठी मागील दोन वर्षा पासून प्रयत्न चालविले होते. अखेर यांच्या प्रयत्नाला यश मिळले. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण , नवनवीन शैक्षणिक संकल्पनाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा कार्य प्राचार्य डॉ. सुजित टेटे करीत आहेत.
त्याच बरोबर अखिल भारतीय शिक्षक कल्याण परिषदेसचे सदस्य , अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चे सदस्य आहेत.तसेच वेळवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी असतात. 
आपल्या कर्तव्यदक्ष कामामुळे शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
सदर यशाचे श्रेय आपले कुटुंब तसेच मित्र परिवार आणि सहकार्यांना दिले आहे.
यांच्या कामगिरी साठी सर्व क्षेत्रावरून शुभेच्छा मिळत आहेत.

Saturday 20 October 2018

मुल्ला येथे शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप


देवरी,दि.20- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून शालेय विद्यार्थ्याना स्कूलबॅगचे वाटप गेल्या सोमवारी (दि.15) करण्यात आले.

या बॅग वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुल्लाचे सरपंच कृपासागर गौपाले हे होते. यावेळी उपसरपंच सीमा नाईक, सदस्यांमध्ये वंजारी, छन्नू कांबळे,संगीता नागोसे, चंदन घासले, राजू खोटेले, नेतराम वघरे,रत्नकला नंदागवळी, रवींद्र आंबागडे,ग्रामसेवक किशोर वैष्णव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवाने आणि सदस्य, मुल्ला शाळेचे मुख्याध्यापक चांदेवार, हेटीटोला शाळेचे मुख्याध्यापक राणे, सर्व शिक्षक  आणि पालक वर्ग उपस्थित होते. 

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार

गोंदिया,दि.20 : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी कपात केले होते. परंतु यासंदर्भात तिरोडा गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. त्यावर संप काळातील तीन दिवसाचे वेतन देण्यात यावे असे आदेश शिक्षण मंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना दिले.
७ आॅगस्ट २०१८ ते ९ आॅगस्ट २०१८ पर्यंत तीन दिवसीय संपूर्ण राज्य कर्मचाºयांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय संप पुकारला होता. या संपामधील कर्मचाºयांच्या विविध मागण्यावर शासनातर्फे सकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी ९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता आपला संप मागे घेत १२ नंतर आपल्या कार्यस्थळी रुजू झाले होते.या संपाबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून ६ आॅगस्ट २०१८ ला शासन परिपत्रकाद्वारे संपामध्ये सहभागी कर्मचाºयांना संप न होण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत सूचित केल्याचे निदर्शनास आले आहे.
शासन परिपत्रकाच्या आधारावर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांनी संप कालावधीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत सर्व विभागाला पत्र दिले. संप काळातील कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपातीबाबतचे मुकाअ यांचे आदेश रद्द करण्यात यावे व संपात सहभागी जि.प. कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, ही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेन्द्रकुमार कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, नूतन बांगरे, उमाशंकर पारधी, सुधिर बाजपेयी, केदार गोटेफोडे, हेमंत पटले, नागसेन भालेराव, यशोधरा सोनवाने, वाय. डी. पटले, मोरेश बडवाईक, नरेन्द्र आगाशे, सुशिल रहांगडाले, अमोल खंडाईत, विजय डोये, दिनेश बोरकर, आर.एस.संग्रामे, दुर्गाप्रसाद कोकोडे, विनोद चौधरी, डी.बी.लांजेवार, सुरेश रहांगडाले, मयूर राठौर, जी.जी.खराबे, तोषिलाल लिल्हारे, शंकर नागपूरे, योगेश्वर मुंगुलमारे, शंकर चव्हाण, पवन कोहळे, श्रीधर पंचभाई, पी.के. पटले, एन.जे. डहाके व प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मनोज दिक्षित,सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे,किशोर डोंगरवार आदी शिक्षकांनी मुकाअ दयानिधी व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची भेट घेऊन केली.

देवरी येथे रावण दहन उत्साहात

हजारोंच्या संख्येत भाविकांनी लावली हजेरी

सुरेश भदाडे

देवरी,दि.२०- स्थानिक दसरा उत्सव समितीच्या वतीने नगरपंचायतीच्या क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. दसऱ्याच्या पर्वावर आयोजित या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दरम्यान, आयोजन स्थळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बहारदार नृत्याची मेजवानी ठेवण्यात आली होती.
दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय म्हणून हिंदू परंपरेनुसार विजयादशमीचा सण देशात साजरा केला जातो. यावेळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. याचाच भाग म्हणून देवरी येथे दसरा उत्सव समितीच्या वतीने रावण दहनाच्या सोहळा स्थानिक नगरपंचायतीच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी रामललांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांच्या मनोरंजनासाठी नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा समितीचे सदस्य,छोटेलाल बिसेन, राजिंदरपालसिंग (गेजी) भाटिया, गोपाल तिवारी, अ‍ॅड. सचिन बावरिया. अंशुल अग्रवाल, अनिल अग्रवाल, रितेश अग्रवाल,आफताब शेख, अल्ताफ हमीद, यादवराव पंचमवार, अमित गुप्ता, काक्के  भाटिया,प्रवीण दहिकर,पारस कटकवार,अ‍ॅड. भूषण मस्करे,ओमप्रकाश रामटेके,विजय गहाणे,संदीप भाटिया,सुरेश शाहू,अ‍ॅड. गंगबोईर,अनिल येरणे यांचेसह ३२ सदस्यांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. याशिवाय अनुचित प्रकार रोखण्यासाठी नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. 

Wednesday 17 October 2018

पोलिसांनी काढली हेल्मेटकरीता मोटारसायकल रॅली

गोंदिया, दि.१७: शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृत करण्यासाठी मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व पोलिस अधीक्षक हरिष बैजल यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तींचा अवकाळी मृत्यू होतो. वाहन चालक प्राणास मुकू नये, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात आले होते.
परंतु, गोंदियाच्या बाजारात हेल्मेटचा तुटवडा असल्याने हेल्मेट सक्ती तीन दिवस उशीरा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गोंदिया शहरातील वाहन चालकांना जागृत करण्यासाठी मनोहर चौक गोंदिया येथून रॅली काढण्यात आली. रॅली मुख्य बाजारपेठ, रामनगर सिव्हील लाईन होत वाहतूक शाखेत पोहचली. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक महिपालसिंह चांदा, पोलिस निरीक्षक हेमने, मनोहर दाभाडे, घोटेकर, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सिंग, संदीप चव्हाण, गणेश धुमाळ, बघेल, मेश्राम, ३६ पोलिस कर्मचारी, पोलिस मुख्यालयाचे ४० कर्मचारी, गोंदिया शहर ठाण्यातील ८ कर्मचारी, रामनगरचे ५ कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे ५ कर्मचारी व इतर २५ लोक असे १५० लोक रॅलीत सहभागी झाले होते.

17 ते 23 आॅक्टोंबरचा बेरार टाईम्स अंकासाठी क्लिक करा berartimes.com





Monday 15 October 2018

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे




मुंबई. ( शाहरुख मुलाणी)दि.15 – घरपोच ‘ऑनलाईन’ दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा, असेही त्यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.
ऑनलाईन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही, पण राज्याची ‘शोभा’ करण्याचा प्रयोग रोजच सुरू असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले  “मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होईल. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका त्यांना घरपोच दारू नको तर मदत हवीय”, अशा सणसणीत शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.

ब्लॉसम स्कुल मध्ये 10वा रास गरबा उत्साहात साजरा

देवरी:14 देवरी येथील लोकप्रिय आईएसओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे 10 व्या रास गरबा व दांडियाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी मिसेल्स रुबेला लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निर्मल अग्रवाल सचिव, डॉ. सुजित टेटे प्राचार्य, दिनेश भेलावे परीक्षक , कमल अग्रवाल, श्रुती अग्रवाल, हजारोच्या संख्येत पालक, सर्व विध्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी रास गरबा च्या माध्यमातून रुबेल्ला लसीकरणाच्या प्रचार केला. अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी आपल्या रास गरबा चे नृत्य सादर केले. पथनाट्य सादर करून मिसेल्स रुबेलाचे  जण जागृती करण्यात आली.
पालकांनी मोठ्या संख्येत स्पर्धे मध्ये भाग घेतला होता.शिक्षक आणि पालकांनी एकत्रित गरबा नृत्य साजरा करून आनंदोत्सव साजरा केला.
मोठ्या उत्साहात रास गरबाचे 10 वे वर्ष साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि सर्व शालेय विभागांनी मोलाची कामगिरी केली.

Sunday 14 October 2018

मनरेगा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आ.पुराम

देवरी,दि.14ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा)योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी संघटनेची 13 आॅक्टोबरला गोंदिया जिल्हास्तरीय सभा घेऊन संघटनेच्या अध्यक्षपदी देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांची निवड करण्यात आली. 
उपाध्यक्षपदी तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहागंडाले तर मार्गदर्शक म्हणून विनोद अग्रवाल यांची निवड करण्यात आली. संघटनेत सचिव डी.जी.ठाकरे, सह सचिव मनोज बोपचे, कोषाध्यक्ष डी. जे. लिल्हारे, सल्लागार रमेश चुटे व डॉ.लक्ष्मण भगत तर सदस्यांमध्ये डी.जी. रहागंडाले, मधुकर पटले, विजय पटले, मनुश्वर चौधरी, पुरुषोत्तम बावनकर, एल.डी.चव्हाण, एम.सी.पटले. पंकज आंबेडारे व महेंद्र साखरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंत्राटी कर्मचारी संघटनेवर राजकीय पक्षाचे म्हणजे भाजपचे वर्चस्व दिसून येत असल्याने ही भाजपची एक शाखाच भासविण्याचा प्रयत्न कंत्राटी कर्मचारी वर्गांनी केला की काय असे दिसून येत आहे.

Saturday 13 October 2018

गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून हेल्मेटची सक्ती

गोंदिया,दि.13 : जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा वाहतुक शाखेच्या वतीने काढण्यात आले आहे.हे पत्र सोशल मिडियावर सर्वत्र फिरू लागल्याने हेल्मेटसक्तीच्या निर्णयाबद्दल काही चालकांत नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिक संकट येते. दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात. त्यामुळे पोलीस कर्मचाक्तयांच्या कुटुंबावर संकट कोसळते.
हीच बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती महिनाभरापूर्वीपासून करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे ९ पोलिसांना दंड करण्यात आला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केलेला नाही, अश्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी, यासंदर्भात १३ सप्टेंबरला विशेष मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत ९ पोलीस कर्मचारी वाहन चालविताना हेल्मेट वापरलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन काद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ४५०० रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात आला.
आता सर्वसामान्य वाहन चालकांना व त्या वाहनावर मागे बसलेल्या लोकांनाही हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावरही मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. दंड म्हणून ५०० रूपये आकारण्यात येणार आहे. वाहन चालकांना सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेट वापरावेच लागते. परंतु बहुतांश वाहन चालक हेल्मेटला सांभाळण्याची कटकट समजून हेल्मेट वापरत नाही. त्यांना आता मोटार वाहन कायद्यान्वये दंड भरावा लागणार आहे.

Friday 12 October 2018

अश्वलाच्या हल्ल्यात मुलगा जखमी- आठवड्यातील हि दुसरी घटना

ओवारा/ देवरी - १२- देवरी पासून १८ किमी अंतरावर असलेल्या ओवारा गावा शेजारील धरणाजवळ सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या मुलावर अश्वलाने हल्ला केल्याची घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली.
या मध्ये आदेश श्रीराम वल्के हा मुलगा गंभीर जखमी झाला असून सोबत असलेल्या मित्रांनी त्याला अश्वलाच्या तावडीतून सोडलेले. आठवड्यातील हि दुसरी घटना सदर परिसरात घडल्या मुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Wednesday 10 October 2018

भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

उमरेड,दि.10 : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. मृतांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह एका महिलेचा समावेश आहे. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर – गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीकांत वामन लोढे (२९, रा. रत्नापूर), गीता के. झोडे (३५, रा. मकरधोकडा), विनोद मारोती ढोक (३७, रा. रत्नापूर), रागिनी व्ही. चहांदे (१९, रा. तुकूम), सुनील एस. डेकाटे (४५, रा. रत्नापूर), परसराम जे. पराते (४०, रा. भिवापूर), शैलेश बी. विजयकर, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, राहुल एस. तायडे (२६, रा. सिंदेवाही), शुभांगी देवीदास राऊत (२४, रा. तुकूम), आकाश ठवकर (२६), लक्ष्मण चहांदे (३०), जयप्रकाश सायरे (३५, रा. कामठी), चंद्रा तिकारे (२५, रा. अंतरगाव), गायत्री तिकारे (२३, रा. अंतरगाव), अमर मांढरे (६५, रा. सावरगाव), प्रियंका बनवारे (२३, रा. रमावा) यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे. त्या तीन जणांची नावे कळू शकली नाहीत.
हे सर्व जण नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे जाणाऱ्या  एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाचा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. दुसरीकडे, उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रक चाक पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. त्यात ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. शिवाय, ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा  झाला तर १९ जण जखमी झाले. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व सर्व जखमींला लगेच उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले.

नगरपरिषदेच्या कर विभागातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.10 : गोंदिया नगरपरिषदेच्या  कर विभागातील दोन लिपिकांना  (दि.९)  तक्रारदाराकडून घराचा कर भरणाला घेऊन १0 हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचखोर लिपिकांचे नाव अशोक गजभिये व गणेश मौजे (वरिष्ठ लिपिक) असे आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.गोंदिया नगरपरिषदेतील कर विभागाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात विभाग अपयशी पडत आहे.
अद्यापही परिषदेची थकीत कर वसुली ७ कोटींच्या वर आहे. प्रत्येक वर्षी पालिका प्रशासनाच्यावतीने कर वसुलीसाठी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येते. यामध्येही कर विभागातील कर्मचार्‍यांचे साटेलोटे असल्याने अनेक बडे करधारक आपले फावले करून घेतात. याच संधीचा लाभ घेत कर विभागातील लिपीक अशोक गजभिये व गणेश मौजे यांनी करवसुलीत सेटिंग करण्याच्या नावावर लाचेची मागणी केली.
लाच देऊन काम करण्याची इच्छा नसल्याने तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची शहनिशा करून मंगळवारला नगरपरिषद परिसरात सापडा रचण्यात आला. दरम्यान, एका झेरॉक्सच्या दुकानात तक्रारदाराकडून १0 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने पार पाडली. यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले.दरम्यान तक्रारकर्त्याने माजी नगरपरिषदेचे सभापती दिलीप गोपलांनी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितल्याने त्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.

10 ते 16 आॅक्टोंबरचा बेरार टाईम्सचा अंक नियमित बातम्यासांठी वाचा berartimes.com





Tuesday 9 October 2018

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गोंदिया ची नियोजित सभा पंचायत समीती गोंदियाचे सभागृहात संपन्न

गोंदिया 09 :राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गोंदिया ची नियोजित सभा पंचायत समीती गोंदियाचे सभागृहात संपन्न झाली. सभेत खालीलप्रमाणे नवीन पदाधिकारी यांची निवड झालेली आहे. कार्यकारीणी अध्यक्ष एम.सी.चुरे ,सरचिटणीस लीलाधर पाथोडे ,कोषाध्यक्ष  के.व्ही.नागफासे, सहकोषाध्य  बी.एन.तरोणे., उपाध्यक्ष  प्रशांत पाठक, रमेश नामपल्लीवार, चंद्रशेखर वैद्य ,अंबादास नगरधने,कु.अरुणा शिकारे, सहसचिव आशिष रामटेके, पी.आर.नवलकर , विजय कटकवार, यामिनी पारधी, महिला संघटक  सुलभा खाडे , अनुताई नान्हे ,तालुका प्रतिनिधी गोंदिया तालुका  आनंद बोरकर, आमगाव श्री महेश कांचनवार, देवरी श्री सुरज कोचे, सालेकसा श्री विठ्ठल पी.राठोर,सडक अर्जुनी श्री विनोद काळे, अ.मोरगाव श्री राकेश. एम.डोंगरे ,गोरेगाव श्री अतुल कडू, तिरोडा श्री पवन बिसेन. संघटक व कायदेशीर सल्लागार एड.श्री ईंद्रजीत गुरव मा.अध्यक्ष. या प्रमाणे कार्यकारिणी तयार करण्यात आली .

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...