गोंदिया/देवरी,दि.25- देवरी तालुक्यांंतर्गत येणाऱ्या जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा ओवारा येथील एका सहायक
शिक्षकाने शाळा व्यवस्थापन समित्याच्या पदाधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप
नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी
तक्रारीतून केला आहे. सदर प्रकार हा गेल्या सोमवारी (दि. 22) दुपारी
घडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर शिक्षकाने शाळा समितीच्या अध्यक्ष ज्या
समाजाचे आहेत, त्या
विद्यार्थ्यांना शिकविणार नाहीआणि हा समाज मला चालत नाही, अशी धमकी
दिल्याचे तक्रारीत
म्हटले आहे. परिणामी, ज्ञान
दानाचे कार्य करण्याऱ्या शिक्षकाकडून असे जातीय वितुष्ट निर्माण केल्यामुळे
गावातील वातावरण तणावपूर्ण असल्याचे बोलले जाते.
सविस्तर
असे की, ओवारा
येथील जि.प. प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव लाडे यांनी गेल्या
सोमवारी शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी मुख्याध्यापकांशी शालेय पोषण आहार आणि
अन्यविषयांवर चर्चा केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले सहायक शिक्षक मंगेश बोरकर
यांनी श्री लाडे यांना उद्धट उत्तरे दिली, असा आरोप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला
आहे. श्री. नामदेव लाडे यांनी सदर शिक्षकाची कानउघाडणी केली. परिणामी, त्या दोघांमध्ये चांगलाच
वाद झाला. मुख्याध्यापक भोयर यांनी मध्यस्थी करत मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर शिक्षकाने
मुख्याध्यापकांचे सुद्धा
ऐकले नसल्याचे सांगण्यात येते.
दुसऱ्या
दिवशी 23 तारखेला
ला मुख्याध्यापकांनी सदर
वाद मिटविण्यासाठी शाळेत सभा बोलावली. त्या सभेत सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, व्यवस्थापन समितीचे
सदस्य, पालक
सहभागी होते. सदर शिक्षकाने पोषण आहारातील घोळ लपविण्यासाठी नामदेव लाडे यांच्या
वर एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दरम्यान, वाद मिटवायचा असेल आणि
पोलिस कार्यवाही टाळण्यासाठी श्री लाडे यांचे कडे 1 लाख रुपयाची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला
आहे.
यामुळे
सभेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिक्षक
मंगेश बोरकर यांनी "नामदेव लाडे हा व्यक्ती मला चालणार नाही. हा व्यक्ती
समितीत राहील तर मी त्याच्या मुलाच्या वर्गात शिकविणार नाही तसेच त्यांचा
समाज सुद्धा मला चालत चालत नाही. मी यांच्या मुलांना शिकविणार नाही व इतर
शिक्षकांना शिकवू देणार नाही" भर सभेत असे विधान केले. यामुळे एका
विशिष्ट समाजातील पालकाच्या भावना दुखावल्या आहेत. शाळा ही ज्ञानमंदीर असून
समाजाची धर्मनिरपेक्ष आणि समाज घडविणारी संस्था आहे. त्या शिक्षकाने एका
समाजाप्रती जाहीर केलेली भावना ही शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी बाब असल्याचे
नागरिकांचे म्हणणे आहे.
या
प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी टीसी काढण्यासंबंधी अर्ज मुख्याध्यापकाला सादर
केले असून 14 विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होत आहे.
या घटनेला जवाबदार असलेला आणि जातधर्म द्वेश ठेवणाऱ्या शिक्षकाची
तत्काळ बदली करण्यात यावी आणि त्यांच्यावर कार्यवारी करण्यात यावी, अशी मागणी सर्व पालकांनी
केलेली आहे.
सदर
घटनेची शाहनिशा केली असता गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे याविषयी दुजोरा दिला असून
प्राप्त तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी यांनी सुद्धा या
प्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिल्याचे म्हटले.
सदर
शिक्षक 9-10 वर्षा
पासून ओवारा शाळेत आहे असून त्याचे राजकीय लोकांशी साटेलोटे आहेत. यामुळे स्वतःलाच
मुख्याध्यापक समजून पालकांशी वाद घालणे , पोषण आहारचे काम बघणे, अरेरावी ची भाषा वापरणे असे आचरण करीत आहे असे गावातील पालकांनी लेखी
तक्रारीत सादर केलेले आहे.
सदर
शिक्षकाला वाचविण्यासाठी शाळेत कमी आणि राजकारणात जास्त व्यस्त असलेले जि प
शिक्षक मोलाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment