Sunday, 28 October 2018

तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र

नाशिक,दि.28(विशेष प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु,  करु, अशी धमकी देणाऱ्या आशयाचे पत्र आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’वर  हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी पाठविले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे‘भुजबळ फार्म’वर  अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.
या पत्रात पुढे छगन भुजबळ यांना म्हटले आहे की, भुजबळ सातत्याने संभाजी भिडे यांच्याबद्दल तू चुकीची भाषा वापरत आहेस. तुला गुरुजींचे कार्य कधी कळणार, तुझी लायकी नाही गुरुजींबद्दल असे बोलायची. तू आम्हाला शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज नाही, आमचे गुरुजी जे सांगतील तोच आमच्यासाठी त्यांचा इतिहास असेल असेही या पत्रात म्हटले आहे. तू आताच मरता मरता वाचलास, राहिलेले थोडे दिवस व्यवस्थित जग. तुझ्या भुजात आता बळ राहिलेले नाही त्यामुळे शांत रहा असेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, या पत्रात जगात सर्वात श्रेष्ठ ग्रंथ हा मनुस्मृती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे आणि मनुस्मृती या श्रेष्ठ ग्रंथाचे नाव भुजबळांच्या तोंडातूनही निघणे अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फुले आणि आंबेडकर यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर, तुला संपवायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तर संभाजी भिडेंचे नाव तुझ्या तोंडून निघाले तर तुझाही दाभोळकर पानसरे झालाच समज अशी धमकी शेवटी या पत्रात देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...