Monday, 15 October 2018

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे




मुंबई. ( शाहरुख मुलाणी)दि.15 – घरपोच ‘ऑनलाईन’ दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा, असेही त्यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.
ऑनलाईन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही, पण राज्याची ‘शोभा’ करण्याचा प्रयोग रोजच सुरू असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले  “मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होईल. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका त्यांना घरपोच दारू नको तर मदत हवीय”, अशा सणसणीत शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...