Saturday 20 October 2018

देवरी येथे रावण दहन उत्साहात

हजारोंच्या संख्येत भाविकांनी लावली हजेरी

सुरेश भदाडे

देवरी,दि.२०- स्थानिक दसरा उत्सव समितीच्या वतीने नगरपंचायतीच्या क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. दसऱ्याच्या पर्वावर आयोजित या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दरम्यान, आयोजन स्थळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बहारदार नृत्याची मेजवानी ठेवण्यात आली होती.
दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय म्हणून हिंदू परंपरेनुसार विजयादशमीचा सण देशात साजरा केला जातो. यावेळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. याचाच भाग म्हणून देवरी येथे दसरा उत्सव समितीच्या वतीने रावण दहनाच्या सोहळा स्थानिक नगरपंचायतीच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी रामललांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांच्या मनोरंजनासाठी नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा समितीचे सदस्य,छोटेलाल बिसेन, राजिंदरपालसिंग (गेजी) भाटिया, गोपाल तिवारी, अ‍ॅड. सचिन बावरिया. अंशुल अग्रवाल, अनिल अग्रवाल, रितेश अग्रवाल,आफताब शेख, अल्ताफ हमीद, यादवराव पंचमवार, अमित गुप्ता, काक्के  भाटिया,प्रवीण दहिकर,पारस कटकवार,अ‍ॅड. भूषण मस्करे,ओमप्रकाश रामटेके,विजय गहाणे,संदीप भाटिया,सुरेश शाहू,अ‍ॅड. गंगबोईर,अनिल येरणे यांचेसह ३२ सदस्यांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. याशिवाय अनुचित प्रकार रोखण्यासाठी नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...