Monday 31 December 2018

पदमपूर येथे नाटककार भवभूतींचे स्मारक उभारा

२६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनातील ठराव: बोरकन्हार येथे आयोजित संमलनात पाच ठराव पारीत
गोंदिया,दि.31: झाडीबोली साहित्य संमेलन साकोली तर्फे आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथे आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनात पाच ठराव पारीत करण्यात आले. त्यातील पहिला ठराव आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील महाकवी व नाटककार भवभूती यांचे स्मारक उभारण्यात यावे यासंदर्भात ठराव लखनसिंह कटरे यांनी मांडला. या ठरावाला अनुमोदन डॉ.भुरूप्रसाद पााथोडे यांनी केले.
२६ व्या झाडीबोली साहित्य संमलनाच्या समारोपीय कार्यक्रमात पाच ठराव करण्यात आले. त्यात दुसरा ठराव गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वेला झाडीपट्टीची रेल्वे हे नाव देण्यात यावे असे झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे यांनी सूचविले. त्याला अनुमोदन अश्विन खांडेकर यांनी दिले. तिसरा ठराव मांडतांना शासकीय पारीतोषीक योजनेत बोलीतील साहित्याकरीता वेगळे पारीतोषीक देण्यात यावे असे डोमा कापगते यांनी सूचविले. तर अनुमोदन विजय मेश्राम यांनी दिले. चवथा ठराव महाराष्टÑ साहित्य आणि संस्कृती
मंडळाने प्रकाशनाकरीता अनुदान देण्यासाठी पुस्तके निवडतांना बोलीतील पुस्तकांना प्राधान्य द्यावे, असे इंद्रकला रहांडाले यांनी सूचविले तर याला पांडुरंग भेलावे यांनी अनुमोदन दिले. पाचवा ठराव महाराष्टÑ साहित्य आणि संस्कृती मंडळावर लखनसिंह कटरे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली त्याबद्दल साहित्य मंडळातर्फे त्यांचा गौरव करीत असल्याचे डॉ. हरिचंद्र बोरकर यांनी सूचविले तर अनुमोदन मिलींद रंगारी यांनी केले.समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष मिलींद रंगारी, अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लखनसिंह कटरे, संत जैरामदास हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य सी.जी. पाऊलझगडे, पंचशील हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी. मेश्राम व स्वागताध्यक्ष तथा बोरकन्हारचे सरपंच भोजराज ब्राम्हणकर, विजय मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुखचंद
वाघमारे यांनी केले तर आभार देवेंद्र रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाला झाडीपट्टीतील लोककलावंत, साहित्यीक, समीक्षक, कवी, नाटककार असे विविध मंडळी उपस्थित होते.

Sunday 30 December 2018

गडचिरोलीत पोलिसांसाठी आता गोंडी, माडिया भाषेची परीक्षा




गडचिरोली,दि.30 : पोलिस भरतीसाठी गडचिरोली जिल्हा पोलिस दलात भरती नियमांत बदल करण्यात आले आहेत. 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या पोलिस भरतीत केवळ जिल्ह्यातील उमेदवारांनाच संधी देण्यात येणार असून या भरतीत गोंडी, माडिया भाषेची परीक्षा राहणार आहे.
गृह विभागाने 22 मार्च 2018 रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस शिपाई नियम 2011 नुसार भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. पोलिस भरतीसाठी आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदारांचा वास्तव्याचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे. तसेच उमेदवाराला जिल्ह्याबाहेर बदली देण्यात येणार नाही. जिल्हा पोलिस दलात राज्य शासनाच्या धोरणानुसार 2019 मध्ये पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या पोलिस शिपाई पदाची भरती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक व शारीरिक पात्रतेत पात्र असलेल्या पोलिस भरतीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने पोलिस भरतीमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

Saturday 29 December 2018

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘लॉयन्सचा डबा’ उद्या रविवारी सुरू होणार

नांदेड,दि.29ः- लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने ‘लॉयन्सचा डबा’ रयत रुग्णालय नांदेड येथे रविवार दि.30डिसेंबर रोजी दुपारी 11.30 वाजता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सुरु होणार असल्याची माहिती लॉयन्स सेंट्रल चे अध्यक्ष लॉ.डॉ. देवेंद्र पालीवाल, सचिव लॉ.डॉ. सागर मापारे,कोषाध्यक्ष लॉ.लालचंद आसवानी व प्रोजेक्ट चेअरमन लॉ.अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स प्रांतपाल लॉ. डॉ. संजय वोरा हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लॉयन्स जीएसटी कॉर्डिनेटर लॉ. दिलीप मोदी, रयत रुग्णालय अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे हे उपस्थित राहणार आहेत. वर्षभरासाठी दररोज दहा डबे देण्याची घोषणा करणारे लॉ.आशिष भंडारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर,लॉ.संजय अग्रवाल,लॉ.चद्रकांत अलकटवार ,लॉ. कंवलजीतसिंघ यांनी सहकार्य केले आहे.
रयत रुग्णालयात बाहेर गावाहून आलेल्या गरीब रुग्णांना दररोज डबे देण्यात येणार आहेत. डब्यामध्ये पाच चपाती, भाजी,वरण-भात चा समावेश असणार आहे. लॉयन्सचा डबा’ चा स्वयंसेवक रयत रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून गरीब रुग्णांची माहिती घेईल. ज्यांच्या वतीने डबा देण्यात येणार असेल त्याचे नाव असणारे कार्ड डब्या सोबत रुग्णाना देण्यात येईल. दररोज ज्या रुग्णांना डबे देण्यात आले व ज्यांच्यातर्फे डबे देण्यात आले याची नोंदवहीत नोंद ठेवण्यात येईल. या उपक्रमात कोणत्याही दानशूर व्यक्ती ला सहभाग घेता येईल. एखाद्या शुभ प्रसंगी अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किमान तीस डबे देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लॉयन्स सेंट्रलच्या कोणत्याही सदस्यांसी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर  यांनी केले आहे

Friday 28 December 2018

... अखेर चेतन उईके या शिक्षकाचे निलंबन मागे


'बेरारटाइम्स'चा दणका



गोंदिया,दि.28- जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात  जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांचे करण्यात आलेले नियमबाह्य निलंबनाच्या मु्द्याला घेऊन विरोधी पक्षाच्या सदस्यांना सत्ताधारी पदाधिकारी व अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.सर्व सदस्यांचा भावना बघता अध्यक्षांना निलबंन मागे घेण्याची घोषणा करावी लागली.विशेष म्हणजे बेरार टाईम्स 28 डिसेंबरला यासंबधीचे वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.त्या वृत्ताची दखल विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर,जि.प.सदस्य जियालाल पंधरे,राजलक्ष्मी तुरकर,मनोज डोंगरे आदीनी घेत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करीत त्या शिक्षकाचे निलंबन मागे घेत आधी चौकशी करा नंतर निलबंन करा असा मुद्दा रेठून धरला.परंतु शिक्षणाधिकारी हेच गैरहजर राहिल्याने सदस्यांच्या भावनांचा अनावर झाल्याचे बघावयास मिळाले.
सभेत  जिल्ह्यातील प्रलंबित मुख्य विषयासह कृषी,बांधकाम व शिक्षण विभागातील अनेक प्रश्नांवर चर्चा होणार होती. सभा सुरू झाल्यानंतर या सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी समाजातील मुलीवर झालेल्या अत्याच्याराच्या विरोधात रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविल्याच्या आधारावर त्यांचे निलंबन करण्यात आले. वास्तविक उईके यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नसताना निलंबित करण्यात आले. तर याच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आणि पकडल्या गेल्या अशा काही शिक्षकाला अद्यापही निलंबित करण्यात आलेले नाही. एकीकडे विनयभंग व अत्याचार करणारे शिक्षक मोकळे तर समाजासाठी झटणारा शिक्षक निलंबित होत असल्याने मु्ख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हाच धागा पकडून आजच्या सभेत विरोधी पक्षाचे सदस्यांनी शिक्षण

विभागाला चांगलेच धारेवर धरले.
विभागातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले.शिक्षकांचे समायोजन यासह रिक्त जागांवर शिक्षण विभागाचे अवलंबिलेले चुकीचे धोरण या विषयाला धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजलक्ष्मी तुरकर, मनोज डोंगरे यांच्यासह सत्तारूढ पक्षातील काही सदस्यांनी चांगलाच आवाज बुलंद केला. विशेष म्हणजे, सायंकाळपर्यंत शिक्षण विभागातील प्रश्नांवरच चर्चा रंगल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याशिवाय जिल्ह्यातील अनेक शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन यावर शिक्षण विभागाने अवलंबिलेले धोरण चुकीचे असल्याचे समोर आले. ही बाब विरोधी बाकावरील सदस्यांसह सत्तारूढ पक्षातील सदस्यांनी उचलून धरली. या
विषयाला घेवूनच सभा सायंकाळपर्यंत सुरू होती. जि.प. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देणारे शिक्षणाधिकारीच अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असा सूरही जि.प. सदस्यांनी लावला.

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गुंजणार उईकेंच्या निलंबनाचा प्रश्न?


गोंदिया,दि.28ः- गोंदिया जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.सुरवातीला या सभेत ईव्हीएम व व्हीव्हीपीटी पॅटबद्दल निवडणुक विभागाच्यावतीने माहिती देण्यात येणार आहे.त्यानंतर सुरु होणार्या या सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या निलबंनावर सभा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उईके यांनी समाजहितासाठी काम करतांना समाजाला जागृत करणारे विचार कार्यक्रमात मांडले तसेच आदिवासी समाजातील मुलीवंर झालेल्या अत्याच्याराच्या विरोधात रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविल्याच्या वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारावर त्यांचे निलबंन करण्यात आले आहे.वास्तविक उईके यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नसताना निलबिंत करण्यात आले.तर याच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी शाळेतील अल्पवयीन मुलीवंर अत्याचार करुन विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आणि पकडल्या गेल्या अशा काही शिक्षकाला अद्यापही निलबिंत करण्यात आले नसल्याची माहिती शिक्षण  विभागाच्या सुत्रांनी दिली.एकीकडे विनयभंग व अत्याचार करणारे शिक्षक मोकळे तर समाजासाठी झटणारा शिक्षक निलबिंत होत असल्याने मु्ख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आजच्या सभेत विरोधी पक्षाचे सदस्य धारेवर धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Thursday 27 December 2018

मतदान यंत्राबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा-जिल्हाधिकारी लक्षीनारायण मिश्रा

वाशिमदि२६ : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत साशंकता आणि  संभ्रम आहे. त्यांच्या शंका आणि संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत नव्यानेच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन या दोन्हीच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत योग्य माहिती देवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
२६ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेतील पथकांसाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी मिश्रा बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, जनजागृती मोहिमेसाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांनी गावकऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके सादर करतांना ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान करावे. जनजागृती मोहिमेची पूर्व कल्पना ग्रामस्थांना व्हावी, यासाठी दवंडी देण्यात यावी. तसेच पूर्वप्रसिद्धी करण्यात यावी. कोणताही मतदार या मोहिमेदरम्यान प्रात्यक्षिकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या गावामध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना याबाबतची पूर्व कल्पना द्यावी. ज्यामुळे ते सुद्धा या मोहिमेदरम्यान आपल्या गावात प्रात्यक्षिके सादर करतांना उपस्थित राहतील व त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात येईल. ज्या गावामध्ये बाजार असेल अशा ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्याठिकाणी देखील सभागृहात किंवा शेडमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके दाखवावीत.
जनजागृती मोहिमेदरम्यान ज्या पथकांना जी वाहने देण्यात आली आहेत, त्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा असली पाहिजे. कोणत्या मार्गाने हे वाहन जात आहे व सद्यस्थितीस कोणत्या गावात आहे, याची माहिती देखील उपलब्ध होईल. प्रत्येक दिवशी पथकाने प्रात्यक्षिकाचा एक व्हिडीओ पाठवावा. मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाहीत, याची दक्षता घेवून त्यांच्या शंकाचे निराकरण करण्यासोबतच अभ्यासपूर्ण माहिती ग्रामस्थांना द्यावी, असेही श्री. मिश्रा म्हणाले.
श्री. हांडे म्हणाले, जनजागृती मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराला मतदान कसे करायचे, याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. व्हीव्हीपॅट या यंत्रामुळे आपण कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला व्हीव्हीपॅट यंत्राच्या माध्यमातून दिसणार आहे. एक ईव्हीएम व एक व्हीव्हीपॅट संच प्रात्यक्षिकाच्यावेळी काही बिघाड झाल्यास राखीव राहणार आहे. जनजागृती मोहिमेदरम्यान पथकासोबत पोलीस देखील तैनात राहणार आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जनविश्वास पथकाने आपला जनतेमध्ये विश्वास प्रात्यक्षिकादरम्यान निर्माण करून त्यांच्या शंकांचे समाधान करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही जनजागृती मोहीम जिल्ह्यातील एकूण १०४३ मतदान केंद्रात राबविण्यात येणार आहे. यासाठी ७ पथके गठीत करण्यात आली असून एका पथकामध्ये पाच कर्मचारी राहणार असून मंडळ अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून असतील. प्रत्येक पथकासोबत एक सुरक्षा रक्षक देखील असणार आहे. ही मोहीम जवळपास ४० ते ४५ दिवस जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कार्यशाळेला सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह पथकप्रमुख व पथकातील सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेनंतर जनजागृती पथकांच्या वाहनाला जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही पथके जनजागृती मोहिमेसाठी रवाना झाली.

Wednesday 26 December 2018

देवरी येथे वीज कामगारांची द्वारसभा


देवरी,दि.26- वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बुधवारी (दि.26) महावितरणच्या  देवरी येथील विभागीय कार्यालयासमोर एका द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला वीज वितरण कंपनीतील अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभेचे आयोजन करणे. येत्या 1 तारखेला प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावणे आणि 3 तारखेला स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे निवेदन देणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत      
महापारेषण कंपनीत स्टाफ सेटअप लागू करण्यापूर्वी मंजूर पदे भरणे,महावितरणची प्रस्तावित पुनर्रचना कर्मचारी संघटनांच्या सूचनांसह अंमलात आणणे, विजवितरणातील खाजगीकरण बंद करणे, मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभाग फ्रन्चायशी तत्वावर खाजगी भांडवलदारांना देण्याची प्रक्रिया त्वरीत थांबवणे, लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे शासनाने अधिग्रहीत न करता महानिर्मितीकडेच ठेवणे, महानिर्मितीचे 210 मेगावॅटचे संच कोणत्याही स्थितीत बंद करु नयेत, मंञीमंडळ समितीने मान्य केलेली तिन्ही कंपन्या साठीची जुनी पेंन्शन योजना त्वरीत लागू करणे,रिक्त पदे भरणे,बदली धोरण राबवण्यापूर्वी संघटनांशी चर्चा करणे,कंञाटी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी सामावून घेणे,समान काम-समान वेतन या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.


खजरी येथे रस्ता सुरक्षा विषयावर जनजागृती शिबीर

उपस्थितांना मार्गदर्शन करताना सपोनि पवार आणि उपस्थित मान्यवर
गोंदिया.दि.26- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत डोंगारगाव येथील महामार्ग पोलिस मदत केंद्रच्या वतीने सडक अर्जूनी तालुक्यातील खजरी येथे वाहतुक नियम आणि रस्ता सुरक्षा या विषयी एक दिवसीय शिबीराचे आज बुधवारी (दि.26) आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
 खजरीच्या ग्रामपंचायत कार्यालयात

आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थानी सरपंच सत्यशिला गायकवाड ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नरेंद्र दिहारी, महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस पाटील इंद्रराज राऊत,फौजदार कावळे, ग्रामसेवक जी. आर. भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहनांवर रिफ्लेक्टर लावताना पोलिस कर्मचारी
यावेळी पोलिस निरीक्षक पवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे उपस्थितांना उदाहरणासह पटवून दिले. वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन केले तर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर खाली आणता येणे सहज शक्य आहे. यामुळे अनेकांचे कुटुंब उद्धस्त होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष देऊन रस्ता ओलांडणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे, लहान मुलांना वाहन चालविण्यास न देणे आदी गोष्टींवर लक्ष दिल्यास अपघातांचे प्रमाणात घट आणणे आपल्या हातात आहे. आपल्या जीवाची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
या शिबीराच्या यशस्वितेसाठी हवालदार इश्वर, भोवते, भगत, शिपाई मेश्राम आदींनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2019 बेरार टाईम्स ई अंक berartimes.com





Tuesday 25 December 2018

माओवाद्यांच्या संपर्कातील वैज्ञानिकास बाघनदी परिसरात अटक

गडचिरोली,दि.25(विशेष प्रतिनिधी) :माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात असलेल्या हैदराबाद येथील वैज्ञानिकास पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. नक्का वेंकटराव असे अटक केलेल्या वैज्ञानिकाचे नाव असून तो हैदराबाद येथे केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत आहे. छत्तीसगड पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली असून महाराष्ट्र पोलिसही आता या वैज्ञानिकाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाच राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी आता नक्का वेंकटराववर लक्ष केंद्रीत केले आहे.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याची सीमा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यालगत आहे. या भागात रविवारी बाघनदी परिसरात माओवाद्याचा एक मोठा नेता येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या या नेत्याला सीमेत प्रवेश करताच पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो सुशिक्षित असून केंद्र सरकारच्या हैदराबाद येथील एका रिसर्च संस्थेत वैज्ञानिक पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. नक्का वेंकटराव हा मुळचा आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या कुत्तपेठ येथील रहिवासी आहे. त्याला छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माओवादी विचारांशी जुळलेली कागदपत्रे तसेच दोन मोबाइल आणि २३ डिटोनेटर त्याच्याकडे सापडले. वेंकटराव उर्फ मूर्ती हा विस्फोटकांचा तज्ज्ञ असल्याने दंडकारण्यात विस्फोटके पुरवण्यासह प्रशिक्षणातही त्याने भाग घेतल्याचा संशय आहे. तसेच संघटनेसाठी लागणाऱ्या मोठा शस्त्रसाठ्यासह आर्थिक रसद पुरवण्यातही वेंकटरावने भूमिका बजावल्याचा संशय आहे. छत्तीसगड पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही धक्कादायक तपशील त्याने मान्य केल्याचे सुरक्षा यंत्रणेमधील एका जबाबादार पदाधिकाऱ्याने  सांगितले. उत्तर गडचिरोली गोंदियासह बालाघाटपर्यंत सक्रिय असलेल्या माओवाद्याच्या एका केंद्रीय समितीच्या सदस्यासोबत २०१६ मध्ये कौरुवात तसेच २०१७मध्ये बागरझोलाच्या जंगलात दोन बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नुकतेच मोठा माओवादी नेता पहाडसिंगने दुर्ग पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यावेळीच नक्का वेंकटराव चळवळीतील सहभागाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्ंयाना मिळाली. त्यानंतर वेंकटरावच्या या भागातील दौऱ्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. दरम्यान, वेंकटरावच्या अटकेची माहिती मिळताच गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यानी एक पथक चौकशीसाठी दुर्गला रवाना केले आहे. पूर्व विदर्भातल्या माओवादी कारवाया, संघटनेचा विस्तार यात वेंकटरावच्या भूमिकेचा तपास केला जाणार असल्याचे अंकुश शिंदे यानी सांगितले. वेंकटरावच्या अटकेवर पुणे पोलिसांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या उपायुक्त सुहास बावचे यांनी छत्तीसगड पोलिसाशी संपर्क साधला. तसेच नक्का वेंकटरावचा लहान भाऊ नारायण राव हा तेलंगणा सिव्हील लिबर्टीज या संघटनेचा महासचिव असल्याची माहितीही पुढे आली आहे.
–कोण आहे नक्का वेंकटराव
नक्का वेंकटराव हा १९८० ते ८५ या काळात शिकत असताना पीपल्स वार ग्रुपची विद्यार्थी संघटना असलेल्या रेडिकल स्टुडंट युनियनच्या संपर्कात आला. नक्का वेंकटरावला त्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे केंद्र सरकारच्या जियोफिजिकल रिसर्च इस्टिट्युटच्या हैदराबाद येथील विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ या वैज्ञानिक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याला सध्या दीड लाख रुपये पगार असून त्याची पत्नी हेमललिता ही आंध्रप्रदेशात वकील आहे. ती उपकार नावाची एक खासगी संघटना चालवित असल्याची माहिती पुढे आली आहे.’पीपल्स वॉर ग्रुप’ या माओवादी संघटनेच्या विस्तारासह सध्याच्या माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी वेंकटरावने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमिका बजावल्याची माहिती आहे. माओवाद्याच्या केंद्रीय नेतृत्वासह अनेक केंद्रीय समितीच्या संपर्कात वेंकटराव होता. संघटनेत वेंकटरावला मूर्ती हे नाव आहे.

देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज : कन्हैय्या कुमार

नागपूर,दि.24ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक्यात आहे. त्यांना वाचवण्याची गरज आहे. देशाला हिंदूराष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लढाई पक्ष-विपक्ष अशी नाही. तर मोदी विरुद्ध भारतातील लोकं अशी असून व्हॉट्सअ‍ॅपचा जितका वापर करता, तितकाच आपल्या बुद्धीचाही वापर करा, आणि एकजूट होऊन प्रबुद्ध भारत घडवा, असे आवाहन युवा नेता कन्हैय्याकुमार याने केले.
बहुजन विचार मंचतर्फे रविवारी मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम येथे ‘मेरी शक्ती-मेरा संविधान’ हा संविधान जागर असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी महापौर अटलबहादूर सिंग प्रमुख अतिथी होते. यावेळी डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘संविधान निष्ठांनो एकत्र या’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कन्हैय्याकुमारने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकरावर चौफेर टीका केली. तो म्हणाला, सध्या गाय मातेच्या नावावर राजकारण सुरु आहे. खुर्चीचा धंदा चालवला आहे. या देशातील निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक यासारख्या संस्थांना नेस्तनाबूत केले जात आहे. स्कील इंडियाच्या नावावर कील इंडिया सुरु आहे. पूर्वी राजकीय पक्ष हे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चालत होते. परंतु आता ते न्यूज अँकरच्या भरवशावर चालत आहे. या देशातील मुख्य प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्याने यावेळी केली.कन्हैय्याने खास शैलीत थेट मोदी-शहांवर हल्ला चढविला. ‘पैसे देऊन वोट खरेदी करतात, नंतर हजारो कोटी घेऊन नीरव मोदी पळून जातो. राजकारणाचा हा गेम सेट आहे. जनतासुद्धा मूकदर्शक बनून बघते आहे. उद्योगपतींसाठी सरकारने लाखो कोटींची मागणी आरबीआयकडे केली. यामुळेच आरबीआय प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला,” असे म्हणाला.नोटबंदीतून तीन लाख कोटी रुपये पुढे आल्याचा दावा मोदी करतात, मग मेट्रोसह अन्य योजनांसाठी विदेशातून पैसा का आणावा लागतो, असा प्रश्‍नही त्याने उपस्थित केला.

कन्हैय्या कुमार याने यावेळी आरएसएसला हिंदूइझमवर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले. तो म्हणाला, भगवा रंग हे वीरतेचे प्रतीक आहे, कायरतेचे नव्हे. हा रंग दुसऱ्यांना वाचवण्याचा आहे, मारण्याचा नाही. हा रंग शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बुद्धाचा रंग आहे. रामाच्या नावावर राजकारण केले जात आहे.नागपूर  ही आरएसएसची संघभूमी नव्हे तर आंबेडकरांची दीक्षाभूमी होय, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, की यानंतरची लढाई ही धर्म आणि संविधान अशीच होणार आहे. त्यासाठी संविधाननिष्ठांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
नितीन राऊत म्हणाले, ते हुंकार रॅली काढत असतील तर आम्ही संविधान जागर करून या देशातील युवकांना जागृत करू. आ. जितेंद्र आव्हाड यांनीही मोदी सरकारवर टीका करीत या देशात सर्व काही बदलू शकते पण संविधान नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते प्रफुल्ल गुडधे यांनी प्रास्ताविक व भूमिका विषद केली. संचालन प्रा. अनमोल शेंडे यांनी केले. नरेश जिचकार यांनी आभार मानले.

भाजपने केंद्रात सत्तेवर येताच भेल बंद पडला- शरद पवार

शरद पवारांचा आरोप : रिलायंस समुहाच्या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन
गोंदिया ,दि.23: प्रफुल्ल पटेल केंद्रात अवजड उद्योग मंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात औद्योगीक क्रांती घडवून आण्याकरिता भेल उद्योग प्रकल्पाला गळ घालत या जिल्ह्यांत प्रकल्प तयार करण्याची मागणी केली. त्याकरिता जमिनीपासून इतर परवानग्या घेण्यात आल्या. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रितसर पायाभरणी देखील करण्यात आली. परंतु, त्यानंतर केंद्रात सरकार बदलले.भाजपच्या सरकारने सर्व प्रक्रीया आणि परवानग्या पूर्ण झाल्यानंतर देखील या प्रकल्पाला रद्द केले. त्यामुळे या जिल्ह्यात होणारी औद्योगीक क्रांतीला खीळ बसली. येत्या चार ते पाच महिन्यांत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आम्ही सत्तेत येण्याची आशा आहे. आमची सत्ता आल्यास सर्वप्रथम भेल प्रकल्पाला परवानगी देवून तो प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
 रिलायंस समुहाच्या वतीने शहरानजीक असलेल्या डव्वा येथे कर्करोग डे केअर सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते आज(ता.२३) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी रिलायंस समुहाच्या टिना अंबानी, अनमोल अंबानी, वर्षा पटेल, आमदार गोपाल अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, खासदार मधुकर कुकडे, जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल देशमुख, प्रकाश गजभिये तुषार मोतिवाला आदी उपस्थित होते. श्री पवार पुढे म्हणाले, आजार काय असतात याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. कर्करोग ते पायाचे दुखणे आणि इतर आजार मी स्वत: अनुभवले आहेत. परदेशात असणाऱे तंत्रज्ञान रिलायंसने तयार केलेल्या केंद्रात उपलब्ध आहे. कर्करोगाशी दूर राहण्याकरिता व्यसनांपासून दूर राहावे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात टिना अंबानी म्हणाल्या, संपूर्ण देशात कर्करुग्णाच्या सेवेकरिता डे केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. अकोला नंतर गोंदिया येथे हे सेंटर उभे राहिले. याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सेंटर उभारण्यात येणार आहेत. गुजरातची मुलगी आणि सून असली तरी महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव हे केंद्र उभारण्यात आले आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, रिलायंस समुहाने गोंदियात केंद्र सुरू करून मागासलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर केली. हे रुग्णालय इथपर्यंत मर्यादित न ठेवता मुंबई येथील कोकीळाबेन रुग्णालयासारखे प्रत्येक आजारावर उपचार होईल, असे रुग्णालय तयार करावे. अंबानी कुटुंबाशी घरचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मी अजूनही सुविधा तयार करण्याची मागणी करणार आहे. सर्वसोयीयुक्त विमानतळ असल्यामुळे या समुहाने गोंदियात पाऊल टाकल्याचेही त्यांनी सांगीतले.

अभियंता रामटेककरांच्या पुढाकाराने निराधार मानसिक रुग्ण महिलेस मिळाला शासकीय आसरा

गोंदिया,दि.२४: गोंदिया-बालाघाट या महामार्गावर असलेल्या अंभोरा गावाजवळील बसस्थानकावर गेल्या वर्षभरापासून राहत असलेल्या निराश्रित अवस्थेतील ४७  वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या महिलेला जेसीआयचे माजी अध्यक्ष व अभियंता वासुदेव रामटेककर यांनी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून घेतलेल्या पुढाकारामुळे सदर महिलेला नागपूरच्या मनोरुग्ण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.विशेष म्हणजे या महिलेला आरोग्याची सोय मिळावी आणि ती आपल्या कुटुबांपर्यत पोचावी यासाठी रामटेककर यांनी विविध माध्यमातून प्रयत्न केले.त्यात त्यांना पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांची मोलाची मदत मिळाली.परंतु जवळच असलेल्या रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या असामाजिक कर्तव्याची जाणीवही या प्रकरणात दिसून आल्याची नाराजीही रामटेककरांनी व्यक्त केली.
२ महिन्यापूर्वी या मार्गावरून अभियंता वासुदेव रामटेककर हे जात असताना त्यांना आंभोरा येथील बसस्थानकावरील प्रवासी निवाèयात सदर महिला निराश्रित अवस्थेत आढळून आली.आपले वाहन थांबवून त्यांनी सदर महिलेची आस्थेने विचारपूस केली असता महिलेने शंकुतला देवर असे सांगितले.वडिलांचे नाव घनश्याम तर आईचे लता सांगितले.ओडीसा राज्यातील देऊन्झर तालुक्यातील कादोकला या गावची रहिवासी असल्याचे सांगत बासुदेवपूरच्या कन्या विद्यालयातून आपण मॅट्रिक झाल्याची माहिती दिली.मात्र मानसिक अवस्था योग्य नसल्याने ती अधिक माहिती देऊ शकली नाही.त्यातच रामटेककर यांनी फेसबुक,व्हाटसअपसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून ओडिसा पर्यंत सदर महिलेची माहिती पाठविली.आणि ओडिसा राज्यातील केऊनसर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून सदर महिलेची माहिती देत त्या महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.सतत एक महिना कुटुंबीयांच्या शोध घेतल्यानंतर संपर्क झाला.परंतु गरीब कुटुंब असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी घरातील आर्थिक हलाखीचे चित्रण सांगत तिचे पालनपोषण व उपचार करण्यास असमर्थ असल्याचे सांगत परत घेऊन जायलाही नकार दिला.
यासर्व परिस्थितीत जेव्हा घरचेच कुटूबिंय सदर महिलेला घेऊन जायला तयार नसल्याचे लक्षात येताच महिला बालसंगोपनासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत लेखी पत्र देऊन महिलेचे वैद्यकीय उपचार व पुनर्वसनाची मागणी केली.अशाप्रसंगी पीडित व्यक्तीचे मानसिक चाचणी आवश्यक असल्याने कार्यालयाद्वारे रावणवाडी पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली.मात्र त्या माहितीवरही रावणवाडी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना कार्यवाही करावेसे न वाटल्याने आणि महिनाभराचा काळ लोटूनही काही होत नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्याकडे २१ डिसेंबरला सदर विषय पोचविला.आणि रामटेककरांनी सांगितलेले घटनाक्रम एकूण पोलिस अधीक्षकांच्या मनातही त्या महिलेबद्दल आपुलकी निर्माण होत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात लगेच रावणवाडीचे पोलिस उपनिरीक्षक मते यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.त्यानंतर मात्र लगेच दुसèया दिवशी २२ डिसेंबरला रावणवाडी पोलिस स्टेशनचे हवालदार रुबेलाल उईके, सुनील शेगोकर,महिला पोलिस सविता बिसेन व वैशाली सादेल यांच्या चमूने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या महिलेला सोबत नेऊन मानसिक तपासणी करवून घेतली.आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मनोरुग्नालय नागपूर येथे पुढील उपचार व पुनर्वसनाकरिता पाठविले.
उपचारानंतर अशा महिलांना शासकीय महिला आश्रमात ठेवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.विशेष म्हणजे वर्षभर या महिलेला अंभोरा येथील गावकèयांनी सहानुभूतीची वागणूक दिली.प्रवासी निवाèयाला लागून असलेल्या छोटेसे चहा दुकान चालविणारे शाहबाज सलीमुद्दीन शेख यांनी वर्षभर तिला दिवसाचे जेवण घातले.तर रात्री ही महिला गावातील मंदिरात जाऊन राहायची. तिथे गावातील सिद्धार्थ वंजारी व इतर गावकèयांनी तिला रात्रीचे जेवण देण्याचे काम केले.त्यातच अभियंते वासुदेव रामटेककर यांनी घेतलेल्या पुढाकाराने तिला असहाय स्थितीपासून सुटका मिळाली.त्यापूर्वी ही त्यांनी विविध ठिकाणी फिरत असलेल्या वेडसर महिलांना अशाचप्रकारे मदत केली आहे.२ महिलांचे कुटुंबीय शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.या प्रकरणात त्वरित दखल देऊन २४ तासाच्या आत पीडित महिलेस पूर्ण साहाय्य पुरविल्याबद्दल पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांचे विशेष आभारही रामटेककरांनी मानले आहे.

Monday 24 December 2018

ब्लॉसम स्कुलची वनविभागाच्या रोपवाटीकेला शैक्षणिक भेट

देवरी:24 डिसें
तालुक्यातील लोकप्रिय आणि नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या ब्लॉसम स्कुलच्या विध्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून वनविभागाच्या रोप वाटिकेला भेट दिली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  जितेंद्र वंजारी (वनक्षेत्रसाहाय्यक)
चारूलता वंजारी (वनक्षेत्रसाहाय्यक), वन विभागाचे अनिल कोराम आणि रघुनाथ येरने प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर क्षेत्रभेटीच्या सुरुवातीला प्रमुख मार्गदशकांचे शाळेच्या वतीने भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले.
पर्यावरणातील रोपट्यांचे आणि वृक्षांचे महत्त्व याविषयावर अतिथीनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रकाशसंसलेशन प्रक्रियेची माहिती यावेळी सविस्तरपणे सांगण्यात आली.
बीज प्रक्रिया (जर्मिनेसन) आणि रोपट्यांचे काळजी या विषयावर सदर भेट आयोजित करण्यात आलेली होती या विषयावर वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्येक्षात चालणारी कार्यपद्धती बीज प्रकिया , मातीचे प्रमाण, माती आणि सेंद्रिय घटकाचे प्रमाण याचे प्रात्यक्षिक देऊन विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रोपवाटिकेत वाढविलेल्या सर्व जातीच्या रोपांचे आणि वृक्षाचे जीवशास्त्रीय नावे सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक्षात रोपवाटिकेत एक अनोखा अनुभव घेतला.
सदर रोपवाटीकेच्या यशस्वी भेटीसाठी सहायक शिक्षक विश्वप्रीत निकोडे, स्वप्नील पंचभाई, राहुल मोहुर्ले, वैशाली मोहुर्ले यांनी सहकार्य केला.

सामाजिक नैतिकता जपण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करा- गोमती तितराम

देवरी,दि.24- समाजामध्ये दुसऱ्यांच्या चुकांकडे बोट दाखविण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. मात्र, स्वतःमधील दोषांवर पांघरून सोईस्कर रीत्या घातले जाते. हे समाजविकासामध्ये बाधक ठरते. म्हणून प्रत्येकाने सामाजिक नैतिकता जपण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. असे केल्याने समाजहित मोठ्याप्रमाणावर वाढीस लागेल, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य गोमती तितराम यांनी केले.
त्या देवरी तालुक्यातील गणूटोला येथे गेल्या शुक्रवारी (दि.21) श्री दत्त जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी आयोजित रक्तदान शइबिराचे उद्घाटन आंभारा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक शर्मा यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीच्या माजी सभापती सुनंदाताई नरेटी, सोनूजी नेताम, गिरधारी कडसाय, प.पु.फुलेश्वर दादा दर्यापुरकर, कमलदास, दयारामजी तेलासी, सितारामजी नरेटी, लालबहाद्दूर कलामे, यदूजी बक्चोरिया, राजूजी अठभैया,रंजीतजी कासम, चंद्रपालजी ऊईके आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 33 लोकांनी रक्तदान केले. दरम्यान, दोन जोडप्यांचे सामुहिक शुभमंगल सुद्धा यावेळी उरकण्यात आले.रात्री प.पु.प.म.श्री संतोषमुनी शास्त्री श्री क्षेत्र सुकडी/डाकराम यांचे भजन-प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन लोकनाथ तितराम यांनी केले. उपस्थितांचे आभार कुणाल उईके यांनी मानले. यावेळी परिसरातील महानुभाव पंथाने अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सत्तेवर येताच धानाचे मूल्य अडीच हजार रुपये करू-शरद पवारांची पत्रपरिषदेत माहिती

गोंदिया,दि.23- पुर्व विदर्भातील गोंदिया,भंडारा,गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे हा राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जातात.त्यातच,नागपूर,भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यात धान्याचे भाव प्रति क्विंचल अडीच हजार रूपये आहे. मात्र, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात १७४० रूपये धानाला भाव आहे. त्यासोबत अद्यापही भाजपा शासनाने धानाला बोनस जाहीर केला नाही. ही एकप्रकारे शेतकºयांची थट्टाच असून मुख्यमंत्री विदर्भातले असतानासुद्धा विदर्भात धानाला भाव नाही ही मोठी शोकांतिका असून आम्ही सत्तेवर येताच धानाचे भाव अडीच हजार रूपये करणार असल्याची घोषणा राष्ट्वादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज २३ डिसेंबर रोजी पत्रपरिषदेत केली.
पत्रपरिषदेत पूढे पवार म्हणाले, यंदा राज्यातील मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्टातील जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारच्यावतीने सर्वे केला. मात्र,विदर्भात सर्वे का केला नाही. राज्य सरकार जसे सांगेल त्याच ठिकाणी सर्वे करणारी टिम जात जाते. मराठवाड्यात चक्क अंधार झाल्यानंतर टीम दुष्काळीस्थितीची पाहणी केली. दुष्काळबाबद राज्य सरकार गंभीर नाही. तेव्हा आम्ही संसदेचे हिवाळी अधिवेशन सुट्या संपताच सुरु होताच हा मुद्दा मांडणार असून यावरही सरकारने हा शेतकºयांचा मुद्दा गंभीरतेने घेतले नाही तर, रस्त्यावर उतरण्याचा इशारा पवारांनी देत २०१९ मध्ये नक्किच सत्ता परिवर्तन होईल असा आशावाद व्यक्त केला. सध्या सत्तेत असलेल्या भाजपने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर विदर्भच्या मुद्द्याला बगल दिली.आमचा पक्ष विदर्भातील जनता ज्या दिवशी म्हणेल त्या दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही पवार म्हणाले. देश आणि राज्यात शेतकरी नापिकी, अवकाळी पाऊस आणि शेतमालाला कमी दर यामुळे आत्महत्या करत आहेत. परंतु, मोदी सरकारच्या मंत्र्यांनी २०१६ पासून आपल्याकडे शेतकरी आत्महत्येची माहिती उपलब्ध नसल्याची संसदेत सांगितले. मी स्वत:हा केंद्रात कृषी मंत्री राहिलो आहे, आत्महत्या झाली की, त्याची नोंद सरकारच्या यंत्रणेच्यावतीने करण्यात येते.यात शेतकरी आत्महत्याच नव्हे तर आत्महत्येच सर्वच प्रकाराची नोंद करण्यात येते. परंतु, भाजपने आपले पाप लपविण्यासाठी आकडेवारीच नसल्याचे सांगून दिशाभूल केली आहे.
येत्या निवडणुकात कॉंग्रेससोबत आघाडी होणार असून शेकाप व डाव्या पक्षांना राज्यात आघाडीत सहभागी करणार आहोत.आतापर्यंत ४० जागांवर एकमत झाले आहे तर, ८ जांगाचा निर्णय दोन तीन दिवसात होईल. असे त्यांनी सांगितले.त्यातच प्रधानमंत्री कुणाला बनवायचे हा विषय नंतरचा आहे.2004 मध्ये आम्ही सर्व स्वतंत्र लढलो त्यानंतर महागठबंधन करीत मनमोहन सिंह यांना प्रधानमंत्री केले आणि 10 वर्ष ते या पदावर राहिले.तसेच 2019 च्या निवडणुकीत सुध्दा आम्ही करु.ज्या राज्यात ज्यां राजकीय पक्षाची ताकद आहे,त्या पक्षाला मोठ्या पक्षाने आधी प्राधान्य द्यावे ही आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.
खालच्या स्तराची भाषा बोलणारे पहिले पंतप्रधान 
पंतप्रधान हे पद लोकशाहीत वरच्या स्तराचे आहे. देशाच्या स्वतंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने त्या पदाची अवमानना होईल असे भाष्य केले नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरीमा न ठेवता महिला आणि इतरांवर वैयक्तिक भाष्य करून त्या पदाची अवमानना केली. हे त्यांना शोभणारे नाही. येत्या ५ ते ६ महिन्यात निवडणुका लागणार आहेत. आता देशातील जनता या खोटे बोलणाºया सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे सत्ता बदल होणार आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.
आता सल्ला घेणे झाले बंद 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मी शरद पवार यांचा सल्ला घेतो असे म्हणत होते. यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारणा केली असता सुरुवातीच्या एक ते दीड वर्षापर्यंत ते अधुन-मधून फोन करायचे. मात्र, आता माझा सल्ला तर सोडा स्वत:च्या पक्षातील खासदार आणि मंत्र्यांना देखील जुमानत नाही. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा अंदाज येतो, असेही पवार म्हणाले.

Saturday 22 December 2018

वायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा - ना. सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, दि.21 - कोणताही देश किती धनसंपन्‍न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर त्‍या देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन केले जाते. त्‍यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्‍या सेवेत रूजु होणा-या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्‍या बेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्‍यासाठी करण्‍याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्रीमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा शहर आणि तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया यापेक्षाही अधिक गतीमान करण्‍यासाठी मला आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्याची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले.

21 डिसेंबर रोजी पोंभुर्णा शहरात नविन बस स्‍थानक बांधकामाचा भूमीपूजन सोहळा तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण या कार्यक्रमांच्‍या निमीत्‍ताने आयोजित जाहीर सभेत वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, नगराध्‍यक्षा श्‍वेता बनकर, उपाध्‍यक्षा रजिया कुरैशी, पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्‍य ज्‍योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी विपिन मुद्दा, तहसिलदार अशोक तरोडे, राज्‍य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक राहूल मोडक, वास्‍तु विशारद किशोर चिद्दलवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा शहर व तालुक्‍यातील नागरिकांच्‍या सोईच्‍या दृष्‍टीने सर्व सोयींनी युक्‍त असे बस स्‍थानक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे केली. ज्‍या तालुक्‍यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्‍या नागरिकांची मागणी मी प्राधान्‍याने पूर्ण केली व आज बस स्‍थानकाच्‍या बांधकामाचे भूमीपूजन करताना अतिशय आनंद होत आहे. एस.टी. महामंडळाला 700 नविन बसेस खरेदीसाठी जेव्‍हा मी मान्‍यता दिली. त्‍यावेळी त्‍यांना 200 बसेस चंद्रपूर जिल्‍हयासाठी देण्‍याबाबत सुचना मी दिल्‍या. पोंभुर्णा शहर व तालुक्‍यात विविध विकास कामे आम्‍ही पूर्णत्‍वास नेली आहेत. शहरात डॉ.श्‍यामप्रसाद मुखर्जी वाचनालय लवकरच जनतेच्‍या सेवेत रूजु होत आहे. स्‍मशानभूमी, कब्रस्‍तान, आठवडी बाजार यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तलावाच्‍या सौंदर्यीकरणाचे काम सुध्‍दा लवकरच सुरू होणार असून इतरही विकासकामे प्राधान्‍याने पूर्णत्‍वास येत आहेत. बिव्‍हीजीच्‍या मदतीने 5000 एकरवर शेतीत नवनविन प्रयोग करण्‍याचे प्रस्‍तावित असून यासाठी विख्‍यात उद्योजक रतन टाटा यांचा मी आभारी आहे. पोंभुर्णा तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी कुक्‍कटपालन योजनेच्‍या माध्यमातुन रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या असून घोंगडी क्‍लस्‍टरला मान्‍यता दिली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्‍य, कृषी विकास, रस्‍ते विकास, पाणी पुरवठा, विद्युत व्‍यवस्‍था या सर्वच घटकांवर विशेष लक्ष्‍य केंद्रीय करून पोंभुर्णा शहर व तालुक्‍याचा विकास करण्‍यासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याचे ते यावेळी बोलताना महणाले.
यावेळी नविन बसस्‍थानक बांधकामाचे भूमीपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शंभरकर यांनी केले.

आर्ची-परश्याने जिंकली गोंदियावासींची मने



- सीएम चषक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा थाटात

गोंदिया, २२ - 'सैराट' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील चित्रपट रसिकांच्या मनावर राज करणाऱ्या सैराटफेम रिंकू राजगूरू (आर्ची) व आकाश ठोसर (परश्या) या दोघांनी पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा व सिएम चषक क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दोघा कलावंतांनी हजेरी लावून विजयी स्पर्धकांना बक्षिस वितरण केले. 
या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले,  भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, श्रीमती शारदा बडोले, माजी जिप उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती एकनाथ हत्तीमारे, सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाध्यक्ष विजय बिसेन, लक्ष्मण भगत, माजी जिप सभापती उमाकांत ढेंगे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी सभापती कविता रंगारी, संदीप कापगते, उपसभापती राजेश कठाणे व  जिप सदस्य शीला चौहान, माधुरी पातोळे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाने, सर्व पंस सदस्य व पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
राज्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये खेळ भावना निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा व त्यांचातील खिलाडूवृत्ती वाढावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, दौड, बुद्धिबळ,कॅरम आदी खेळांच्या समावेश आहे. जिल्ह्यातही भाजयुमोच्या माध्यमातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अर्जुनी मोरगाव विधानसभा येथे देखील सीएम चषक क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. .या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारे सैराटफेम परश्या व आर्ची यांनी आपली हजेरी लावली होती. 
दरम्यान, आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये प्रतिभा असून या स्पर्धांच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. तसेच ना. बडोले यांचे कौतूक करत असे नेतृत्व सर्वांनाच लाभावे, असे मत यावेळी आकाश ठोसर यांनी व्यक्त केले. तर कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नसल्याचे रिंकू राजगूरू यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. यावेळी बोलताना ना. बडोले म्यांहणाले की, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कौशल्य दडलेले असून चांगले प्रतिभावंत खेळाडू व कलावंत असून या खेळाडूंच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी सीएम चषक हे एक प्रभावी माध्यम ठरले. या प्रसंगी ना. बडोले यांच्या आग्रहावर सैराट चित्रपटातील ‘मराठीत सांगितलेल कळत नाही होय इंग्लिशमध्ये सांगू काय, हे डायलॉगही आर्चीने बोलून दाखविले. यावेळी अर्जुनी-मोर विधान सभा क्षेत्रातील कलावंतांसाठी गायन व नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीएम चषकाच्या विविध खेळातील विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मिलिंगच्या तांदळाचा ट्रक सीडब्लूसीने पाठविला परत

गोंदिया,दि.22-जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीकरण्याकरीता आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आजपर्यंत लाखो क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून त्या धानाचे मिलिंग करुन तांदूळ  सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात राईस मिर्लसच्या वतीने पाठविण्यास सुरवात झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून ही प्रकिया सुरु झाली असून १९ डिसेंबरला एमएच ३५-के ३५९ व एमएच ३५-१५९५ या वाहनातून ५४० क्विंटल तांदूळ गोंदियाच्या सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात जमा करण्याकरीता नेण्यात आले असता त्या वाहनाची आवकमध्ये नोंद करण्यात आली.परंतु, त्या ट्रकमधील तांदूळ गोदामात जमा न करता परत पाठवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सेंट्रलवेयर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी येथील राईस मिलर्स असो.च्या दबावात तो ट्रक पाठविल्याची चर्चा बाजारात सुरु झाली आहे. येथील राईस मिलर्स अशोसिएशन ही मोठी संस्था असून सीडब्लूसीच्या गोदामात एकप्रकारे यांचा दबदबा असल्याचे बोलले जाते.येथील अधिकारीही त्यांच्याच दबावात काम करीत असल्याची चर्चा आहे.
आलेला तांदुळ जमा न करता परत का पाठविण्यात आले, याचे मात्र समाधानकारक उत्तर सेंट्रल वेयर हाऊसचे अधिकारी देऊ शकले नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात यावर्षी धानाचे पीक चांगले झाले असून शासकीय धान खरेदी केंद्रावरही मोठयाप्रमाणात धानाची खरेदी झालेली आहे. गेल्या आक्टोंबरपासूनच धान केंद्रावर असतानाही धानाची उचल मात्र उशीरा करण्यात आली, जेव्हा की खरेदीच्या एक महिन्यानंतर धानाची उचल संबधित राईस मिलर्सला करायचे असते. जिल्हा मार्केंटिग विभागाच्यावतीने सुरु केलेल्या केंद्रावर आजपर्यंत २० हजार २५६ शेतकऱ्यांनी ६ लाख ३१ हजार ९६८.५९ क्विंटल धान ११० .५९ कोटी रुपयाचे खरेदी केले आहे.तर आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १० हजार ६१७ शेतकऱ्यांचे ३ लाख १० हजार ८०६.८० क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून ५४ कोटी ३९ लाख रुपये किमत आहे.१६४ कोटी ९८ लाख रुपयाच्या खरेदी केलेल्या धानापैकी १२५ कोटी ९७ लाख रुपयाचा चुकारा शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे. हा खरेदी केलेला धान जिल्ह्यातील १४० राईस मिलर्सना मिलिंग करीता देण्यात आले आहे. त्यापैकी ज्या राईस मिलर्सनी धानाची उचल केली त्यांनी मिलिंग करुन तयार झालेला तांदूळ सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात पोचविण्यासही सुरवात केली आहे. मिलिंगपासून तयार झालेला तांदूळ ठेवण्यासाठी जिल्ह्यात ७ गोदामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सेट्रल वेयर हाऊस गोंदिया, एमआयडीसी, महाराष्ट्र सेंट्रल वेयर हाऊस आमगाव, शासकीय गोदाम देवरी, नवेगावबांध, सौंदड व गोरेगाव येथील गोदामाचां समावेश आहे. या गोदामात तांदूळ वेळेवर स्विकारला गेला नाही तर केंद्रावरील धानाची उचल होणार नाही आणि धान खरेदी केंद्रातील गोदामाची क्षमता पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सीडब्लूसीच्या गोदामात तांदूळ रिकामे करण्यासाठी आलेले ट्रक परत का गेले याबाबत सेंट्रल वेयर हाऊसचे व्यवस्थापक सुमित वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रक तांदूळ घेऊन आलेले होते. आपण त्यादिवशी नागपूरला होतो. मात्र ते ट्रक का परत गेले याबाबत माहित नसल्याचे सांगितले.

Tuesday 18 December 2018

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’


* प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद
             गोंदिया, दि. 18 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाआहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे.
             केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना,छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,प्रधानमंत्री पीक विमा योजना,मागेल त्याला शेततळे,गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,सुक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.
           मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची ईच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दिनांक 28 डिसेंबरपर्यत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क संचालनालयाने केले आहे.
           ईच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे कडेही दिनांक 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.

भाजप जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार 

गोंदिया : भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी सोमवार, १७ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करीत जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना नवीन जवाबदारी दिली आहे. 

विस्तारीत कार्यकारिणीत धनंजय तुरकर यांना किसान आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक कदम, नायकराम बिसेन, रेखलाल टेंभरे तर जिल्हा सचिवपदी सुरेश चौरागडे, एम. डी. वालदे, गजेंद्र फुंडे, वसंत गणवीर तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून युवराज लिल्हारे, निलीमा ढोरे, मुन्ना बहेकार, विक्रम बैस यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती आघाडीपदी हर्षपाल रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आघाडीपदी सदाशिव विठ्ठले, जिल्हा सचिव भाजयुमोपदी सोनु कुथे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडीपदी सुषमा मेश्राम, जिल्हा सहकार आघाडी महामंत्रीपदी राहूल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...