Friday 28 December 2018

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गुंजणार उईकेंच्या निलंबनाचा प्रश्न?


गोंदिया,दि.28ः- गोंदिया जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.सुरवातीला या सभेत ईव्हीएम व व्हीव्हीपीटी पॅटबद्दल निवडणुक विभागाच्यावतीने माहिती देण्यात येणार आहे.त्यानंतर सुरु होणार्या या सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या निलबंनावर सभा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उईके यांनी समाजहितासाठी काम करतांना समाजाला जागृत करणारे विचार कार्यक्रमात मांडले तसेच आदिवासी समाजातील मुलीवंर झालेल्या अत्याच्याराच्या विरोधात रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविल्याच्या वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारावर त्यांचे निलबंन करण्यात आले आहे.वास्तविक उईके यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नसताना निलबिंत करण्यात आले.तर याच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी शाळेतील अल्पवयीन मुलीवंर अत्याचार करुन विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आणि पकडल्या गेल्या अशा काही शिक्षकाला अद्यापही निलबिंत करण्यात आले नसल्याची माहिती शिक्षण  विभागाच्या सुत्रांनी दिली.एकीकडे विनयभंग व अत्याचार करणारे शिक्षक मोकळे तर समाजासाठी झटणारा शिक्षक निलबिंत होत असल्याने मु्ख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आजच्या सभेत विरोधी पक्षाचे सदस्य धारेवर धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...