२६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनातील ठराव: बोरकन्हार येथे आयोजित संमलनात पाच ठराव पारीत
गोंदिया,दि.31: झाडीबोली साहित्य संमेलन साकोली तर्फे आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथे आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनात पाच ठराव पारीत करण्यात आले. त्यातील पहिला ठराव आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील महाकवी व नाटककार भवभूती यांचे स्मारक उभारण्यात यावे यासंदर्भात ठराव लखनसिंह कटरे यांनी मांडला. या ठरावाला अनुमोदन डॉ.भुरूप्रसाद पााथोडे यांनी केले.
२६ व्या झाडीबोली साहित्य संमलनाच्या समारोपीय कार्यक्रमात पाच ठराव करण्यात आले. त्यात दुसरा ठराव गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वेला झाडीपट्टीची रेल्वे हे नाव देण्यात यावे असे झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे यांनी सूचविले. त्याला अनुमोदन अश्विन खांडेकर यांनी दिले. तिसरा ठराव मांडतांना शासकीय पारीतोषीक योजनेत बोलीतील साहित्याकरीता वेगळे पारीतोषीक देण्यात यावे असे डोमा कापगते यांनी सूचविले. तर अनुमोदन विजय मेश्राम यांनी दिले. चवथा ठराव महाराष्टÑ साहित्य आणि संस्कृती
मंडळाने प्रकाशनाकरीता अनुदान देण्यासाठी पुस्तके निवडतांना बोलीतील पुस्तकांना प्राधान्य द्यावे, असे इंद्रकला रहांडाले यांनी सूचविले तर याला पांडुरंग भेलावे यांनी अनुमोदन दिले. पाचवा ठराव महाराष्टÑ साहित्य आणि संस्कृती मंडळावर लखनसिंह कटरे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली त्याबद्दल साहित्य मंडळातर्फे त्यांचा गौरव करीत असल्याचे डॉ. हरिचंद्र बोरकर यांनी सूचविले तर अनुमोदन मिलींद रंगारी यांनी केले.समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष मिलींद रंगारी, अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लखनसिंह कटरे, संत जैरामदास हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य सी.जी. पाऊलझगडे, पंचशील हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी. मेश्राम व स्वागताध्यक्ष तथा बोरकन्हारचे सरपंच भोजराज ब्राम्हणकर, विजय मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुखचंद
वाघमारे यांनी केले तर आभार देवेंद्र रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाला झाडीपट्टीतील लोककलावंत, साहित्यीक, समीक्षक, कवी, नाटककार असे विविध मंडळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment