Saturday, 1 December 2018

राष्ट्रीय महामार्गावर देवरीनजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

देवरी,दि.1- ऱाष्ट्रीय महामार्ग 53 वरील देवरी नजीक असलेल्या शिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन ट्रकची सामोरासामोर धडक झाल्याने 4 जण ठार तर 1 जण जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी 3 वाजेच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये रवि यादव ३०, रा. महारुमकला, जिल्हा राजनांदगाव, जावेद हाला, बाकानेर गुजरात व दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे. आशिक नाथाभाई समा असे गंभीर असलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसाररायपूर कडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जीओ-4 टीए-९९०२ आणि देवरीवरून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या जीजे-०३,ए२-२८४५ या दोन ट्रक्सची सामोरासामोर शिरपूर तपासणी नाक्याजवळ धडक झाली.  यात दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला. दरम्यान सिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहचत जखमीला देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघात मृत्यू झाल्यांपैकी दोन जणांची ओळख पटली असून दोन जणांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...