देवरी,दि.04ः- महाराष्ट्र राज्य लालबावटा खेत मजदूर यूनियन देवरी तालुका शाखेच्यावतीने आज मंगळवारला(दि.4) राणी दुर्गावती चौकात संघटनेची जाहिर सभा घेत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी काॅ.बाबूराव राऊत होते.सभेला राज्य उपाध्यक्ष काॅ.हौसलाल रंहागडाले ,जिल्हा सचिव काॅ. शेखर कनौजिया,जिल्हा उपाध्यक्ष काॅ.चरणदास भावे यांनी मार्गदर्शन केले.देवरी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना व रोजगारासाठी कामे सुरु न केल्याने मजुरांना रोजगाराकरीता भटकण्याची वेळ आल्याचे यावेळी बोलतांना काॅ.कनोजिया यांनी सांगितले.यावेळी शामराव पंधराम, पवनलाल मानकर, रेखाबाई ताराम,छकुलाबाई आदी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment