Thursday 31 May 2018

पटोलेंच्या वैयक्तिक विरोध भाजपला ठरला धक्का देणारा

खेमेंद्र कटरे गोंदिया- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकèयांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता.सत्ताधारी भाजपच्या सर्वांनीच पटोलेंवर टिकेची झोळ उठविलेली असताना मात्र या निवडणुकीत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांच्या सहकार्याने भाजपच्या नेत्यांना वैयक्तीक संपर्क,नुक्कडसभेच्या माध्यमातून सरकारच्या विकासकामाची पोलखोल करुन चांगलाच धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत. भंडारा-गोंदियातील पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भातील वर्चस्वाला घरघर लागल्याचे मानले जात आहे.गोरखपूर टू गोंदिया असा हा निकाल असल्याची काहींनी प्रतिक्रिया सुद्दा व्यक्त केली आहे.कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरूवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि पटले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर मधुकर कुकडे यांनी सातत्याने आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार एल. के. मडावी हे तिस-या स्थानावर राहिले. पाहिजे तसे मतदान झाले नाही,बीआरएसपीलाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही.विशेष म्हणजे भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री,मध्यप्रदेशचे मंत्री,राज्याचे अर्थमंत्री,ऊर्जामंत्री,कामगार मंत्री,राष्ट्रीय प्रवक्ते,प्रदेशाध्यक्ष,आमदार,शेजारील खासदारांसह सर्वांनीच आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्यावेळी आपल्या सरकारने काय केले हे सांगण्यापेक्षा नाना पटोले यांच्यावरच वैयक्तिक पातळीवर टिका केल्याचे दिसून आले होते.विशेष करुन राज्याचे ऊर्जामंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांनी तर अक्षरंश प्रत्येक सभेत पटोलेंच्याविरोधात बोलूनच प्रचाराची सुरवात केल्याने बहुधा हा वैयक्तिक विरोधच भाजपच्या उमेदवाराला पराभवासाठी महत्वाचा ठरला म्हणण्यास वावगे होणार नाही.त्यातच गोंदियाचे पालकमंत्री असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आपल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पुढे नेता आले नाही,यावरुन त्या मतदारसंघात मंत्रीमहोदयाबद्दल किती नाराजी आहे हे या निकालातूनही स्पष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला.त्या निकालाकडे बघून काँगे्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनी जो विश्वास उमेदवारावर दाखविला तेवढाच अवविश्वास सरकारच्या कारभारावर दाखविल्यामूळेच सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराला तब्बल ४९ हजार मतांनी पराभव स्विकारावा लागला.त्यातच माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणुक होत असल्याचे वैयक्तिक आरोप करुन भाजपच्या नेत्यांना प्रचारात गाठलेली पातळीही त्यांच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरली आहे.सोबतच दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना पक्षात सामावून घेतल्यानंतरही भाजप उमेदवाराला तुमसर व गोंदिया विधानसभा मतदारसंघात पाहिजे तसा लाभ झाल्याचे चित्र कुठेच दिसून येत नाही.मात्र ६६०२ मतदारांनी नोटा बदन दाबून आपल्याला कुठलाही उमेदवार पंसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३ तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली.तिसèया क्रमांकावर भारीप बहुजनमहासंघाचे एल.के.मडावी राहिले यांनी ४० हजार ३२६ मते मिळविली.

मिळालेल्या मतांचा विचार केल्यास ४ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तर २ मतदारसंघात भाजप उमेदवाराला मतामध्ये आघाडी घेता आलेली आहे. राष्ट्रवादीचे उमेदावर मधुकर कुकडे यांना तुमसर विधानसभा मतदारसंघाने दिलेली १८८८२ हजाराची आघाडी महत्वाची ठरली आहे.त्यानंतर साकोली मतदारसंघातील १५१६९ हजार,अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील १२२८७ हजार,तिरोडा मतदारसंघातील  ७१२८ हजाराचे मिळालेले मताध्यिक हे त्या मतदारसंघातील आमदारांचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असून या मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार हेमंत पटलेंना २३१४मतांची आघाडी मिळाली तर भंडारा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपउमेदवाराला ३८०५ मताची आघाडी मिळाली आहे.भंडारा मतदारसंघात भारीप बहुजनमहासंघाच्या उमेदवाराने  १५५९४ व गोंदिया मतदारसंघात ३६३९ घेतलेल्या मतांचा फटका काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला बसल्याने याठिकाणी भाजप उमेदवाराला लाभ मिळालेला आहे. या सर्व निकालाकडे बघता ज्यापध्दतीने काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकरीता काम केले त्यापध्दतीने राष्ट्रवादीने जर प्रत्येक निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेतली तर विधानसभा व लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयरथाला कुणी रोखू शकणार नाही.त्यातच यावेळी राष्ट्रवादीने अर्थकारणाचा कमी केलेला प्रभाव आणि प्रचारसभावंर कमी प्रमाणात केलेले लक्ष्य लोकांच्या मनात असतानाच नानाभाऊंनी मात्र ही निवडणुक आपल्या मनात खुणगाठ बांधून घेतल्याने त्यांच्यासाठी महत्वाची होती.प्रफुल पटेलापेंक्षा पटोलेंच्या अस्तितावासाठी ही निवडणुक महत्वाची असल्याने आजच्या निवडणुकीचा निकाल हा फडणवीस व गडकरीलांना धक्का देणाराच म्हणावा लागेल.

शिवरायांचा अवमान करणा-या योगींची मस्ती यूपीतील लोकांनी उतरवली- उद्धव ठाकरे

मुंबई,दि.31- पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर तातडीने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसोबत राहायचे की नाही यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेतली त्यात  भाजपाला खडे बोल सुनावले. 11 पैकी 2 जागा सोडल्या तर इतर जागांवर भाजपाचा पराभव झालेला आहे. 2014साली एका पक्षाचं बहुमताचे सरकार आले. आज त्या सरकारला चार वर्षं पूर्ण झाली. 25 वर्षांचे सरकार 4 वर्षात खाली आलेले आहे. पहिल्यांदाच पालघरची लोकसभा शिवसेनेने लढवली होती. निवडणूक लढवायची की नाही द्विधा मनस्थितीत असतानाच वनगा परिवारावर झालेल्या अन्यायातून पालघर निवडणूक शिवसेनेन ताकदीने लढवली. 8 लाख 87 हजार लोकांना मतदान केले. 6 लाख लोकांनी भाजपाला नाकारल्याचे सांगत शिवरायांचा अवमान करणार्यां योगींची मस्ती उतरल्याची टिका केली.
पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले उद्धव ठाकरे?
– पालघरचा भाजपचा निसटता विजय
– भाजपला आता मित्रांची गरज नाही
– कैरानामध्ये योगींची मस्ती जिरली आहे.
– योगींनी शिवाजी महाराजांना अवमान केला.
– छत्रपतींच्या अपमानावर भाजप व त्यांचे नेते काहीच का बोलत नाहीत
– भाजपच्या शिवभक्तीवर आता संशय येतोय

नाना पटोलेंचा फडणवीस-गडकरींना ‘दे धक्का’!;राष्ट्रवादीचा विजय

गोंदिया,दि.31ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि पटले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर मधुकर कुकडे यांनी सातत्याने आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार एल. के. मडावी हे तिस-या स्थानावर राहिले. पाहिजे तसे मतदान झाले नाही, बीआरएसपीलाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे भाजपच्या सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यापासून केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यानी व खासदार, आमदार व उमेदवारांनीही नाना पटोलेंवरच आपल्या भाषणातून टिकेची झोड उठवली होती. मात्र या निवडणुकीत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांच्या सहकार्याने भाजपच्या या नेत्यांना चांगलाच धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत. भंडारा-गोंदियातील पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भातील वर्चस्वाला घरघर लागल्याचे मानले जात आहे. गोरखपूर टू गोंदिया असा हा निकाल असल्याची काहींनी प्रतिक्रिया सुद्दा व्यक्त केली आहे.कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे.

ईव्हीएमचा घोळ आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भाजपचा पराभव- देवेंद्र फडणवीस

ईव्हीएमसंबंधी भाजपच्याही तक्रारी; निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.

अपने ही कैबिनेट मंत्री के कारण फंस गए सीएम देवेंद्र फडणवीसमुंबई,दि.31- जेव्हा जेव्हा इलेक्ट्रानिक मतदान यंत्रामध्ये घोळ होतो, तेव्हा तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ पडला. या दोन्ही बाबी भाजपच्या विरोधात गेल्याने येथील पार पडलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आमचा पराभव झाला. मात्र, 2019 मध्ये तेथे आमच्या पक्षाचा उमेदवार भरघोष मतांनी निवडून येईल याची मला खात्री आहे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
 मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देताना  बोलत होते. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना गोंदियात झालेला पराभव हा विदर्भातील निकालावर परिणाम पडणार का? या प्रश्नाच्या उत्तराला टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ईव्हीएम मशिन्स संबंधी आमच्याही तक्रारी आहेत. भाजपचा मतदार हा सुशिक्षित असून तो मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात मतदानाला येतो. त्यामुळे मतदानाला सुरवात झाल्यावर त्याचा थेट परिणाम भाजपच्या मतांवर पडला. कारण एकदा परत गेलेला आमचा मतदार पुन्हा केंद्रावर येत नसतो. याशिवाय यावर्षी या दोन्ही जिल्ह्यात कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर काहीशा नाराज आहे. त्यामुळे आम्हाला तेथे फटका बसला. परंतु, तेथे परिस्थिती मात्र आम्हालाच अनुकूल आहे. यामुळे आगामी 2019च्या निवडणुकीत आमचा उमेदवार तेथे भरघोष मतांनी निवडून येणार याची मला खात्री असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप माघारला

गोंदिया,दि.31- केंद्र व राज्यात सत्ता असताना आणि केंद्रियमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री बावनकुळे आणि पालकमंत्री यांनी प्रचाराचा धुराळा उडविल्यानंतरही भाजपचे उमेदवार हेमंत पडले यांना विजयासाठी अक्षरशः झगडावे लागत असल्याचे चित्र मतमोजणीनंतर बघावयास मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या भंडारा लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने आकडेवारी जाहीर न करणे आणि पत्रकारांना पासेस असून सुद्धा करण्यात आलेला मज्जाव अनाकलनीय आहे. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम घोटाळा समोर आला होता. या प्रक्रियते निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सुद्धा संशय व्यक्त करीत त्यांचेवर निवडणुक आचारसहिंता भंग केल्याचा आरोप आहे. परिणामी, जिल्हाधिकारी आणि निवडणुक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची गैरव्यवस्थापनाच्या कारणावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी ईव्हीएम आणि प्रशासकीय कार्यवाहीवर आरोप केला होता. निवडणुक प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांना केलेल बोनसचे वाटप यात शासकीय यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या वतीने प्रचंड राळ उठविण्यात आली होती. राज्याचे उर्जामंत्री बावनकुळे तर या मतदार संघात तळ ठोकून होते. त्यांनी एकूण 50 सभा गाजविल्या. केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी 4 सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 सभा घेतल्या. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार यांचा जिल्हा असल्याने त्यांनी प्रचारात आपला जीव झोकून दिले होते. असे असताना मतदानाच्या वेळी या मतदार संघात तिरोडा मतदारसंघ वगळता भाजप माघारल्याचे दिसत आहे. मोरगाव अर्जूनी या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात तर पक्षाची वाईट स्थिती आहे.

भंडारा गोंदिया पोटनिवडनुक मतमोजनी आकडेवारी अजुन जाहीर नाही

भंडारा ३१

भंडारा गोंदिया पोटनिवडनुक मतमोजनी आकडेवारी अजुन जाहीर नाही. पत्रकार आणि अधिकारी मधे बाँचाबांची.


गोंदिया जिल्ह्यात 100 टक्के निकाल देणारे ४५ काॅलेज

गोंदिया जिल्हा बारावीच्या परिक्षेत विभागात दुसरा
गोंदिया,दि.30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल १.४८ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८७.५७ टक्के इतकी आहे.तर विभागात पहिल्या क्रमांकावर नागपूर  ८९.७२ % व व्दितीय क्रमांकावर गोंदिया जिल्ह्याचा ८९.३६ % निकाल लागला आहे. गोंदिया जिल्ह्यातून21139 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.21134 विद्यार्थी परिक्षेला बसले.960 विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणीत स्थान मिळविले आहे.तर 18861 विद्यार्थ्यांनी या परिक्षेत यश मिळविले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सरस्वती ज्यु.काॅलेज अर्जुनी मोरगावचा जयंत धर्मराज लोनारे या विद्यार्थ्याने 635  (650) 97.69 टक्के अंक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.याच महाविद्यालयातील अभय देवराम चांदेवार 97.07 टक्के,कु.पल्लवी हरीष ढोमणे 96.92 व जयंत मधुकर पर्वते यांने 94.15 टक्के अंक मिळविले आहे.
१०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यातील शाळा
विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया, जानकीदेवी चौरागडे कनिष्ठ महाविद्यालय कुडवा, प्रोग्रेसिव्ह उच्च माध्यमिक विद्यालय गोंदिया, मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय कामठा, मनोहरभाई पटेल सैनिकी हायस्कूल गोंदिया, उमाबाई संग्रामे क. महाविद्यालय नवेगावबांध, श्री संत ज्ञानेश्वर कला कनिष्ठ विद्यालय दतोरा, श्रीराम कनिष्ठ विद्यालय खमारी, जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय एकोडी, जी.ई.एस.विज्ञान विद्यालय कामठा, विमलताई कनिष्ठ विद्यालय कटंगीकला, जी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय रावणवाडी, जी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय दासगाव, शासकीय पी.बी.आश्रमशाळा मिरजापूर, गुरूनानक हायस्कूल व क.विद्यालय गोंदिया, फुंडे कनिष्ठ विद्यालय फुलचूर, के.डी.भास्कर कनिष्ठ विद्यालय डोंगरगाव, मात्रोश्री विज्ञान कनिष्ठ विद्यालय नागरा, शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ विद्यालय बनाथर, राजस्थान इंग्लीश हायस्कूल गोंदिया, साकेत ज्यूनीयर कॉलेज गोंदिया, गणेशन ज्यूनीयर कॉलेज गोंदिया लिटील फ्लावर्स गोंदिया, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी-मोरगाव, जि.प.कनिष्ठ विद्यालय अर्जुनी-मोरगाव, राजीव गांधी हायस्कूल वडद, नवोदय आटर्स कॉलेज नवेगावबांध, नूतन हिंदी हायस्कूल, अर्जुनी-मोरगाव, टी.डी.कनिष्ठ विद्यालय येरंडी, जे.एम.बी.कनिष्ठ विद्यालय अर्जुनी-मोरगाव, नत्थूजी पुस्तोडे कनिष्ठ विद्यालय देवरी, प्रगती कनिष्ठ विद्यालय परसटोला, रामकृष्ण कनिष्ठ विद्यालय कुऱ्हाडी, एम.आय.पटेल हायस्कूल सोनी, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय घोटी, वसंतराव कनिष्ठ विद्यालय सडक-अर्जुनी, सचिन लंजे कला विद्यालय सडक-अर्जुनी, शासकीय उच्च कनिष्ठ विद्यालय व आश्रमशाळा जमाकुडो या शांळाचा समावेश आहे.

पी.डी.राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कला शाखेत जिल्ह्यात व्दितीय
गोरेगाव :- पी.डी.राहांगडाले कन्या कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथिल एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत कला शाखेतून कु.सीमा कोहळे हि ८६.३१% गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी असून तालुक्यातून प्रथम आली आहे.तर ८५.५४% घेऊन कु.पल्लवी चव्हाण तालुक्यातून दुसरी आली आहे.पुजा टेंभरे ला ७८.१५% गुण मिळाले. कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८५% लागला तर विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. गुणवंत विद्याथिनींचे अभिनंदन ग्रामहिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाँ.टी.पी.येडे, सचिव अँड्.टी.बी.कटरे, सदस्य यु.टी.बिसेन , प्राचार्य एच.डी.कावळे,पर्यवेशक वाय.आर.चौधरी, प्रा.ज्योतिक ढाले, प्रा.छत्रपती बिसेन, प्रा.रेवचद कटरे,प्रा.सुरेशकुमार नंदेश्वर,प्रा.दयानंद चाटे, प्रा.ज्ञानेश्वर राठोड, प्रा.सी.डी.मोरघडे यांनी केले.

मागील दोन तीन वर्षांपासून बारावी निकालाच्या टक्केवारीत सुधारणा होत आहे. यात तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुका सरस ठरला आहे. अर्जुुनी मोरगाव तालुका ९३.५७ टक्के, गोंदिया तालुका ९०.२० टक्के, आमगाव तालुका ९०.४१ टक्के, देवरी ७९.५६ टक्के, गोरेगाव तालुका ९०.९८ टक्के, सडक अर्जुनी ८४.६५ टक्के, सालेकसा ९१.०३ टक्के, तिरोडा तालुका ८८.८१ टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारी सुधारणा झाल्याने जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसरे स्थान पटकाविले आहे.
देवरीच्या मनोहरभाई पटेल विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे सुयश
देवरी- यावर्षी घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत स्थानिक मनोहरभाई  कनिष्ठ  महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 97.93 टक्के व कला शाखेचा 72.18 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेमधून कु. मोनिका दुलिचंद मेश्राम व जितेश सुरजलाल कोसरकर यांनी प्रत्येकी 87.07 टक्के गुण घेऊन प्रथम आले. प्रमोद शामराव जांभूळकर 85.38 टक्के गुणांसह द्वतिय , राधा रामकिसन रॉय 76.15 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. विज्ञान शाखेतून अविनाश विजय निर्वाण (83.23) प्रथम, उमा धार्मिक डोंगरवार (80.61) द्वितिय आणि विजय नाजूक नंदेश्वर आणि पुष्पम दलितकुमार टेंभूरकर (75.53 प्रत्येकी) गुण घेऊन तृतीय आले आहेत.
या यशवंत विद्यार्थ्यांचे संचालक वासूदेव गजभिये, रामकुमार गडभिये, प्रा. के.सी.शहारे , उपमुख्याध्यापक के.बी गोंडाणे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
छत्रपती शिवाजी कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या ललिता लटेल खोबा (75.53), अविनाश प्रेमलाल मडावी (68) ऋतिक वामनराव देसाई (67.69) आणि विज्ञान शाखेतून रुपेश शामलाल पडोती (63.07), दामिनी संतोष रामरामे (61.84) कामिनी राजेंद्रगिरी ओंकारी (59.23) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष झामसिंग येरणे, सचिव अनिल येरणे, मुख्याध्यापक मनोज भरे आदींसह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई,दि.31: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालंय. पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळतेय. वयाच्या 67 व्या वर्षी फुंडकर यांचे निधन झाले.आज पहाटे चार वाजेच्‍या दम्‍यान पांडुरंग फुंडकर यांची तब्‍येत बिघडली. यावेळी त्‍यांना उलटीही झाली. त्‍यांच्‍या सुरक्षा रक्षकांनी त्‍यांना ताबडतोब सोमय्या रुग्‍णालयात दाखल केले. मात्र रस्‍त्‍यातच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. फुंडकर यांच्‍या जाण्‍याने भाजपला मोठा धक्‍का बसला आहे.
राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपा वाढवण्याचं काम फुंडकर यांनी केलं. फुंडकर यांच्या निधनाने राज्यात भाजपा रुजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. कृषीमंत्री म्हणून फुंडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम  करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखले जाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम केलंय. याशिवाय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले आहेत.

Wednesday 30 May 2018

फेरमतदानाला सुरवात,ईव्हीएममध्ये पु्न्हा बिघाडाचे वृत्त


गोंदिया,दि.30 -गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील 18 तर गोंदियाच्या 31 केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे.गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत आहे. 233 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार घडला आहे.सोबतच कामठा येथील 117 क्रमांकाच्या बुथवर सुध्दा व्हीव्हीपीटी काम करीत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. सकाळी 9 पर्यंत सरासरी 10 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. तर सकाळी 11 पर्यंत 22.84 टक्के इतके मतदान झाले होते.निवडणूक आयोगाने 5 विधानसभा क्षेत्रांतील 49 केंद्रावर बुधवारी फेरमतदान घेण्याचे आदेश काढले. सर्वाधिक केंद्र गोंदिया व भंडारा विधानसभा क्षेत्रातीलच आहेत. दरम्यान, यूपीतील कैराना येथेही 73 मतदान केंद्रांवर आज पुन्हा मतदान होत आहे. भंडारा-गोंदियाप्रमाणेच तेथेही ईव्हीएममध्ये घोळ झाला होता.

Berartimes_30May-06Jun_2018





Tuesday 29 May 2018

प्रसंग करिअर अकँडमीचा चाळणी परीक्षेचा बोगस निकाल

वाशिम,दि29(अशोक पडघम):-26 मे रोजी मालतीबाई सरनाईक कन्या शाळा वाशिम येथे  प्रसंग करिअर अकॅडमी मार्फत चाळणी परीक्षा घेण्यात आली,  बार्टी पुणे च्या माध्यमातून SC च्या विद्यार्थ्यांसाठी बँक रेल्वे lic तत्सम लिपीक वर्गीय परीक्षेसाठी मोफत क्लासेस ची सुविधा देण्यात येते. परंतु संस्था संचालक आपल्या संपर्कातील विद्यार्थाची यामध्ये निवड करून संगनमत करून आजवर हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळेस अशाच सावळा गोंधळ प्रसंग करिअर अकँडमी जयपूर , वाशिम या  संस्थेत घडला. अशा बोगस निवड करून संचालक मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याने अशा प्रकरनाला आळा घालण्यासाठी बार्टी पुणे तर्फे कुठली उपाययोजना राबविण्यात येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.   जवळच्या  विद्यार्थाना कोरे पेपर ठेवण्यासाठी सांगण्यात आले जेणे करून नंतर त्यांना संगनमत करून त्या विध्यार्थ्याला पात्र करता येईल, आणि विद्यार्थी उपस्थित असतानाही त्याला गैरहजर दाखविण्यात आले , याच संस्थेचे अन्य ठिकाणीही बार्टी मार्फत शाखा चालविल्या जातात सदर चालू असलेल्या गैरप्रकाराला आला घालण्यासाठी बार्टी मार्फत काय उपाययोजना राबविण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३० मे रोजी ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान ; मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

  •  फेरमतदान क्षेत्रात शासकीय सुट्टी

  •  ३० मे रोजी कोरडा दिवस

  • अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३
 पर्यंत मतदान

गोंदिया, दि.२९ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०१८ साठी खालील नमुद मतदान केंद्रावर फेरमतदान बुधवार, ३० मे २०१८ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ३० मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.

६१-भंडारा विधानसभा- ३०२- अडयाळ, ३२०नवेगाव, ३१८-उमरी, ३३५-पिंपळगाव, ४०३-पवनी, ४०५-पवनी, ३७४-खैरी दिवाण, ३१४-पिलांद्री, ३१७-केसलवाडा,३२२-पाथरी पुर्नवसन, ३६२-लोणारा, ३६३-लोणारा, ४२८-वलनी, ४२९-वलनी एकूण १४ केंद्र.
६२- साकोली विधानसभा-३०६-पारडी, ३१६-मुरमाडी, २९२-तई बु., २८७- घोडेझरी एकूण ४ केंद्र. ६३-अर्जुनी मोर विधानसभा-१०८-बोथली, १५९-मानेरी एकूण २ केंद्र. ६४-तिरोडा विधानसभा- ४५-अत्री, ९७-दवनीवाडा, १०२-पिपरटोला, १०८-विहीरगाव, २०५- भजेपार, २१५-पिंडकेपार, ३८-मुरदाळा, ५२-पालडोंगरी एकूण ८ केंद्र. ६५-गोंदिया विधानसभा- ५०-सोनपूरी, ७८-चारगाव, ९४-रतनारा, ११५-कामठा, ११६-कामठा, ११७-कामठा, १२३-लांबटोला, १६९-गोंदिया, १७६अ-गोंदिया, १९४-गोंदिया, २००-गोंदिया, २०६-गोंदिया, २१८-गोंदिया, २२५-गोंदिया, २३३-गोंदिया,२४०-गोंदिया, २५०-गोंदिया, २५३-गोंदिया, २७१-गोंदिया, २७६-गोंदिया, ३०३ अ- फुलचुर एकूण २१ केंद्र असे एकूण ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.

बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

पुणे,दि.29 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

1.www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharshtraeducation.com
4.https://www.knowyouerresult.com
5. hscresult.mkcl.org
6.https://jagranjosh.com
7. www.bhaskar.com या संकेतस्थळावर हा निकाल पहायला मिळणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन 6 जून लोकोत्सव

समिती सदस्य भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड दि. 29 -दुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 5 व 6 जूनला किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने सदस्य भागवत देवसरकर यांनी शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर युगपुरूष छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. अठरा अलुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन शिवरायांनी आदर्श राज्याची घडी बसविली. लोककल्याणकारी राज्य असे असावे, याचा पायाच त्यांनी घालून दिला आणि अत्याचारात दबलेल्या रयतेला स्वाभिमानाचा अंकुर फुलला. हा अंकुर फुलविणाऱ्या छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला व स्वराज्याला छत्रपती मिळाले. ही घटना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षणांनी नोंदणारी ठरली. हा दिन म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन, हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा 5 व 6 जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांमुळे रायगडावर लाखो शिवभक्तांची मांदीयाळी जमणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. गडावर 5 व 6 जूनला वैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण सह्याद्रीच्या गडकोटांनी केले. शिवरायांना स्वराज्यासाठी याच गडकोटांचे भक्कम पाठबळ मिळाले, शिवछत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे शेकडो गडकिल्ले महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यांनी रायगड किल्ल्याचे संवर्धन व विकास होण्यासाठी भरघोष निधी आणला. शासनाकडून त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे, तसेच रायगड संवर्धनाचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ही सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन केली. तोच आदर्श, तीच प्रेरणा घेऊन युवराज छत्रपती संभाजीराजे कार्यरत आहेत.

राज्यभिषेक सोहळ्याची रूपरेषा :

यंदा संभाजीराजेंच्या संकल्पनेतून रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, वास्तुतज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी, प्रशासन, स्थानिक रहिवाशी यांच्या सहभागातून 5 जूनला सकाळी 7 ते दुपारी 12 यावेळेत रायगडची स्वच्छता मोहीम होत आहे. दुपारी साडेबारा वाजता गडावरील अन्नछत्राचे उद्‌घाटन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती गड पायथा, चित्त दरवाजा येथून शेकडो शिवभक्तांसमवेत गडावर चालण्यास प्रारंभ करतील. दुपारी 4.30 वाजता गडपूजन 21 गावातील सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामकन्यांच्या उपस्थितीत नगारखाना येथे होईल. सायंकाळी 6 वाजता संभाजीराजे यांच्या हस्ते गडावर उत्सननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन हत्तीखाना येथे होणार आहे. त्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी थेट रात्री आठ ते नऊ या वेळेत संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, तर रात्री 9 वाजता जगदीश्वर मंदिर येथे वारकरी मंडळांच्याकडून जागर घातला जाणार आहे. रात्री 9 वाजता राजसदरेवर ही रात्र शाहिरांची कार्यक्रम होईल.
6 जूनला शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होणार आहे. सकाळी सहा वाजता ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम होईल. शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत केले जाईल. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करतील व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा शुभारंभ होऊन जगदिश्वर मंदिर व शिवाजी महाराजांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे प्रशिक्षक प्रा. संतोष देवराये, जिल्हा कार्याध्यक्ष नानाराव कल्याणकर, राजेश मोरे, अवधूत पवार, मंगेश कदम, बाळासाहेब देसाई, उद्धव पाटील सूर्यवंशी, जिल्हा सचिव रमेश पवार, सतीश जाधव, मराठा उद्योजक कक्षाचे धनंजय पाटील, कृषी परिषदेचे परमेश्वर काळे, सुनील ताकतोडे, व्यंकटराव जाधव, तिरूपती भगनुरे पाटील, वैशाली माने, प्रशांत आबादार, आत्माराम शिंदे, दीपक पवार, शंकर पवार, आदित्य शिरफुले, नरहरी लांगे, संगम लांडगे, महेश जाधव, कृष्णा जंगेवार, रमेश पवार, प्रतिक लहानकर, गजानन घोरबांड, दत्ता शिंदे, गोविंद अंबोरे, अक्षय जाधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोळवलकरांच्या नव्हे तर फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणार देश-मेवानी


नागपूर,दि.29 : स्वतःला चौकीदार म्हणणाèया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या आणि नीरव मोदी यांना भारताबाहेर जाताना का नाही अडवले. मोदी तुम्ही चौकीदार नाही चोर आहात, अशी जोरदार टीका गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केली.ते नागपुर येथे रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंन फेडरेशनतर्फे आयोजित मानवाधिकार परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या काळात ९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले. मोदी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही गुजराती तर मी पण गुजराती आहे.हा देश गोळवलकरांच्या विचारावर नाही तर फुले, आंबेडकर आणि भगत सिंग यांच्या विचाराने चालणारा आहे,असे मेवानी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाला रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, आयटकचे नेते श्याम काळे, भगतसिंह विचार मंचचे गुरप्रितसिंह,राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे विदर्भ संयोजक नीलेश देशभ्रतार, दलित मुस्लिम एकता मंचचे नेते अफझल फारुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिग्नेश मेवानी म्हणाले, की देशात महिला, मुली आणि बहिणी सुरक्षित नाही, तर गायी सुरक्षित आहेत. भाजपचे लोक पुन्हा सत्तेत आले तर ते देशाचा हाल करतील, व्यक्ती स्वातत्र्यांवर निर्बंध घालतील. पंतप्रधान मोदी यांना संविधान नष्ट करून मनुस्मृती आणायची आहे, ते सुरक्षा रक्षक नाही, चोर आहेत. ज्या लोकांच्या खात्यात २०१९ पूर्वी १५ लाख रुपये जमा झाले नाही त्यांनी मोदी यांच्या विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करावा. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काही संघी लोक त्यांना ट्विटरवर शिव्या घालत होते आणि मोदी त्यांना फॉलो करत होते. मोदी यांना फ्रॉड ऑफ दी सेंच्युरी पुरस्कार मिळायला हवा. जर भाजप एक हिंदू विरोधी पक्ष नाही, तर संघ आणि अभाविपच्या लोकांना तरी रोजगार द्या असेही मेवानी म्हणाले.आयोजनासाठी फेडरेशनचे राहुल जारोंडे, क्षितिज गायकवाड, अमिल भालेराव, नितेश मेश्राम, प्रतिक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, आशिष मेश्राम, कबीर मेश्राम, संकेत अलोणे, निखिल डोंगरे यांनी सहकार्य केले आहे.

जिल्हाधिकारी काळे यांची तडकाफडकी बदली,कादबंरी बलकवडे नव्या जिल्हाधिकारी


गोंदिया,दि.29ःभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे निवडणुक अधिकारी व गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची आज मंगळवारला अचानक सरकारने तडकाफडकी बदली केल्याचे वृत्त धडकले आहे.लोकसभा पोटनिवडणुकीतील नियोजनाचा अभाव व समन्वयाचा फटका काळे यांना बसल्याची चर्चा सुरु आहे.त्यातच नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या कादंबरी बलकवडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी काळे यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 25 व 26 मे रोजी बँका सुरु ठेवून बोनस व तुडतुड्याचे नुकसानभरपाईचे पैसे शेतकर्यांच्या खात्यावर वळते करण्यासाठी शुक्रवारला रात्री 11 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय सुरु ठेवण्याचे दिलेल्या निर्देशावर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या चौकशीनुसार काळे यांनी आचारसहिंता भंग केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांची बदली झाल्याची सुत्रांनी माहिती दिली.

इनामी कमांडर समेत 3 नक्सली ढेर, हथियार भी बरामद

गोंदिया(berartimes.com),दि.29।छत्तीसगढ़ के नक्सल प्रभावित राजनांदगांव जिले में मंगलवार को फोर्स को बड़ी कामयाबी हाथ लगी है। सर्चिंग पर निकले सुरक्षाबलों के जवानों ने एक दरेकसा दलम के नक्सली उपकमांडर समेत तीन माओवादियों को मार गिराया है। 
नक्सली कमांडर पर 5 लाख का इनाम था। एनकाउंटर में हथियार भी बरामद हुए हैं। बोरतालाब थाना इलाके में पुलिस बल गश्त पर निकली था। चंदिया डोंगरी जंगल इलाके में नक्सलियों और जवानों आमना-सामना हो गया। दोनों ओर से फायरिंग शुरू हो गई। फायरिंग में दर्रेकसा एरिया कमांडर की मौत हो गई। एनकाउंटर में दो अन्य नक्सलियों की भी बॉडी बरामद हुई है। मौके से नक्सलियों के हथियार भी मिले हैं। मुठभेड़ में बाकी नक्सली भागने में सफल हो गए। सुरक्षाबलों का कहना है कि कई नक्सली घायल भी हुए हैं। रविवार को नक्सलियों के आईईडी ब्लास्ट में पुलिस जीप के परखच्चे उड़ गए। हमले में कुल 7 जवान शहीद हो गए। इनमें से दो ने इलाज के दौरान दम तोड़ा। पुलिस के मुताबिक, नक्सलियों ने ब्लास्ट के बाद जवानों पर फायरिंग की और उनके हथियार लूटकर ले गए थे।
नक्सलियों ने मानपुर के रेतेगांव, जलवाही, मूरचर व कुंजकन्हार समेत एक और गांव में आगजनी की वारदात को अंजाम दिया है। यहां करीब छह फड़ों को आग के हवाले किया गया है। वन विभाग के सूत्र बता रहे हैं कि इस इलाके के  गांवों में तोड़ाई के बाद तेंदूपत्ता का संग्रहण कर रखा गया था। इसी बीच नक्सली मौके पर आ धमके और तेंदूपत्ता फड़ों में आग लगा दी।

शेतकऱ्याचे आमरण उपोषण तलावात !

नागपूर ,दि. २९ : लघुसिंचन विभागाच्या आसोली शिवारातील तलावाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ताराचंद सलामे यांनी तलावाच्या मध्यभागी सोमवारपासून (दि. २८) आमरण उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी तलावाच्या मध्यभागी मचाण बांधून सदर आंदोलन सुरू केले.
आसोली (ता. रामटेक) शिवारातील या तलावाची निर्मिती २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केली होती. या काळात प्रशासनाने एकदाही या तलावाची दुरुस्ती केली नाही. एकूण ९० एकरात पसरलेल्या या तलावाची सिंचनक्षमता ७० एकर असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. वास्तवात, दुरुस्तीअभावी या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने एकीकडे पाणी साठवण क्षमता कमी झाली असून, दुसरीकडे सिंचनक्षमताही घटली आहे.
दरम्यान, ताराचंद सलामे यांनी पुढाकार घेत या तलावाच्या दुरुस्ती साफसफाईची मागणी करायल सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयात अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु, प्रशासनाने त्यांची ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. निधी उपलब्ध होत नसल्याने तलावाची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने प्रत्येकवेळी त्यांना लघुसिंचन विभागातील अधिकाऱ्यांकरवी सांगण्यात आले.
वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात येता पूर्वसूचनेनुसार ताराचंद सलामे यांनी सोमवारपासून तलावाच्या मध्यभागी पाण्यात मचाण बांधून आंदोलनाला सुरुवात केली आहे.दरम्यान, उपोषणाला सुरुवात होताच तहसीलदार धर्मेश फुसाटे, लघुसिंचन विभागाचे सहायक अभियंता सलाम यांनी आंदोलनस्थळ गाठून ताराचंद सलामे यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाला निधी मागण्यात आला आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही या अधिकाऱ्यांनी सलामे यांनी केली. मात्र, जोपर्यंत शासन निधी मंजूर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका सलामे यांनी घेतल्याने ही शिष्टाई फिसकटली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचे चाक तुटले

नागपूर,दि.29(विशेष प्रतिनिधी) – गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला.गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस नागपूरजवळील कलमेश्वर येथे आली असता या गाडीच्या एका डब्याखालून मोठा आवाज आला. सतर्क प्रवाशांनी डब्याखालून येणारा मोठा आवाज ऐकून याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून  ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू



सोयीसुविधांच्या अभावाने घेतला पोलिस शिपायाचा बळी

गोंदिया,29- भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्ध्यावरून आलेल्या पोलिस शिपायाचा येथील पोलिस मुख्यालयात आज सकाळीच मृत्यू झाला. प्रकृती स्वास्थ्य आणि सोईसुविधांअभावी या शिपायाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 मृत पोलिस शिपायाचे नाव अशोक सोनटक्के (वय45) बकल क्रमांक 321 असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई अशोक सोनटक्के यांची गोंदिया जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. मोरगाव अर्जूनी येथील बुथ क्र. 108 बोथली येथे त्यांनी कर्तव्य बजावल्यानंतर रात्री 1 वाजता ते गोंदिया येथील पोलिस मुख्यालयात पोचले होते. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याटे सांगण्यात येत आहे. गोंदिया मुख्यालयात पोचल्यावर तिथे रात्री पिण्याच्या पाण्याची सोय आणि मेस बंद असल्याने त्यांना अन्न पाण्यावाचून मैदानाच पडून राहावे लागले. सोनटक्के हे 25 तारखेला गोंदियात आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवसी अर्जूनीमोर ला पाठविण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे अशोक यांच्या मृत्यू आज सकाळीच झाला असून वर्धेच्या पोलिसांना घटनेनंतर साडे बारा वाजता रवानगी देण्यात आली, हे विशेष. दरम्यान, या घटनेविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून  अशोकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.




नक्षलग्रस्त भरनोलीत ७४ टक्के मतदान,बोंडगावदेवीत नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

गोंदिया,दि.२८ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज २८ मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गावात ७४ टक्के मतदान झाले.  अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील बोडंगावदेवी येथील राकेश साखरे या वराने वधुमंडपी वराड घेऊन जाण्याआदी मतदानाचा हक्क बजावला.
रखरखत्या उन्हात भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदार मतदान करतांना उत्साहीत दिसत होते. विशेष म्हणजे हा भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होती. भरनोली येथील ३०५ क्रमांकाच्या एकमेव मतदान केंद्रावर ५३७ पुरुष आणि ५०६ स्त्रिया अशा एकूण १०४३ मतदारांचा समावेश होता. त्यापैकी दुपारी ३ वाजतापर्यंत ३८४ पुरुष आणि ३८३ स्त्री अशा एकूण ७६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७४ टक्के इतकी आहे.
 भरनोली येथील मतदान केंद्रावर भरनोली, बल्लीटोला, शिवरामटोला, बोअरटोला व तिरखुरी या गावातील मतदारांनी रखरखत्या उन्हात आडवळणावर असलेल्या आपल्या गावावरुन येऊन मतदान केले. विशेष म्हणजे भरनोली येथील श्रीमती भागरथा कराडे (वय ९० वर्ष) व श्रीमती जनको कुमरे (वय ८५ वर्ष) यांनी देखील आपल्या नातवंडांचा आधार घेवून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या भरनोली येथील मतदान केंद्रावर वरील ५ नक्षलग्रस्त गावातील मतदारांनी येवून व मतदान केंद्रावरील रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात मतदान केले. यावरुन या भागातील लोक नक्षलवादाला कंटाळले असून त्यांचा लोकशाहीवरच विश्वास असल्याचे केलेल्या मतदानावरुन स्पष्ट झाले आहे. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वात मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

गोरेगावचे बिडीओ हरिणखेडे यांची बदली तिरोड्याला

गोंदिया,दि.28ः-गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे यांची बदली तिरोडा पंचायत समितीचे बीडीओ म्हणून झाली आहे.तिरोड्याचे बीडीओ जे.एस.ईनामदार यांच्या प्रस्तावित बदलीमुळे हरिणखेडे यांची बदली करण्यात आली आहे.गोरेगावला त्यांच्या जागी मात्र अद्यापही कुणाला दिलेले नाही.

नक्षलवाद्यांनी जाळले सायगाव डेपोतील लाकडे



अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.28 :  तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात चार लाखांचा लाकूड जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सायगाव येथील वनविभागाच्या डेपोला आग लावून ४ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. शनिवारच्या पहाटे १५ नक्षलवाद्यांनी या डेपोला आग लावली. यासंदर्भात केशोरी पोलिसांनी नक्षलवाद्यांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, सहकलम १६, २०, २३ बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा कलम १३५, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
राजोलीपासून ३ किमी अंतरावर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र क्रमांक ३३० मध्ये लाकूड डेपो आहे. या डेपोमध्ये अंदाजे ३० घनमीटर इमारत बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ६८ घनमीटर लाकडाचा साठा होता. हा सर्व लाकूड नक्षलवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नक्षल्यांनी लावलेल्या आगीमध्ये या डेपोमधील संपूर्ण लाकूड जळाल्याने वनविभागाचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी डेपो परिसरात गेले असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आला. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केशोरी पोलीस स्टेशनला दिली. शुक्रवारी (दि.२५) राजोली भरनोली परिसरात नक्षली पत्रके व बॅनर आढळले होते. या पत्रकाच्या माध्यमातून नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर एकाच दिवसानंतर लाकूड डेपोला आग लावल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Monday 28 May 2018

फूस लावून बाल मजुरांना नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ‘पर्दाफाश’

गोंदिया,दि.28: कमी पैसे देवून अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने बाल मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  नेणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’ गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाने केला आहे.बालमजुर आणि त्यांना घेऊन जाणार्या युवकाला सोबत घेऊन रायपूर रेल्वेस्थानकावर पिंटू कोरडे नामक व्यक्तीला आरोपी पंकजद्वारे फोन करुन बोलाविले असता.तिथे आल्यानंतर आधीच रापळा रचलेल्या रेल्वेपोलीसांनी पिंडू कोरडेला ताब्यात घेत टोळीचा पर्दाफाश केला.या मुलांना कॅटरिंगच्या कामासाठी वापरले जात असल्याचे तपासात समोर आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा बल नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहायक सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात, पोस्ट प्रभारी किरण एस. व गोंदियाचे सीबीआय निरीक्षक एस. दत्ता यांच्या मार्गदर्शनात स्पेशल टास्क टीम गोंदियाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम, उपनिरीक्षक एस.एस.बघेल व जी.आर. मडावी, आर. सी. कटरे, आरक्षक पी.एल. पटेल, आर.एस.के. वरकडे हे शनिवारी (दि.२५) दुपारी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर नजर ठेवून होते. दरम्यान दुपारी त्यांना दोन अल्पवयीन मुले घाबरलेल्या स्थितीत भटकताना आढळले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आपले नाव अक्षय जगत धुर्वे (१३) व आकाश बालकराम मडावी (१५) दोन्ही रा. सेघाट ता. वरूड जि. अमरावती असे सांगितले.
दोघांची चौकशी केली असता गोंदियाला येण्याबाबत  त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्यामुळे दोघांवर नजर ठेवण्यात आली. त्यांच्यासोबत पुन्हा दोन जण असून ते आपल्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे आढळले. काही वेळेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर त्यांचे आठ इतर सोबती आढळले. त्यांच्यावर पुन्हा नजर ठेवण्यात आली. काही वेळानंतर एक तरुण त्यांना प्रलोभन देवून दुसऱ्या ठिकाणी घेवून जाण्यासाठी गाडीची वाट पहात असल्याचा आढळला. एकूण १० अल्पवयीन मुलांना घाबरलेल्या स्थितीत बघताच उपनिरीक्षक विवेक मेश्राम, एस.एस. बघेल यांना बाल तस्करीचा संशय आला. त्यांनी टीमद्वारे सर्व अल्पवयीन व त्यांना सोबत नेणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता माहिती दिली.त्यांनतर. आरोपी पंकजसह ठेकेदार व पिंटू कोरडे यांना घेवून ट्रेनने २६ मे २०१८ रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. सर्व अल्पवयीन असल्यामुळे सर्वांच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली.तर बाल मजुरीसाठी नेणाऱ्या आरोपी पंकज व बोलाविणारा पिंटू कोरडे व ठेकेदार कुलदीपसिंह राजपूत यांना ताब्यात घेऊन कारवाईसाठी जीआरपी गोंदियाच्या सुपूर्द करण्यात आले.

गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवर मतदान बंद

गोंदिया,दि.२८: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी ७५ बुथवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनबंद असल्याच्या १४१ तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड आला. काही ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बदलविण्यात आल्या. परंतु मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी आज (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सकाळपासूनच मतदान केंद्रावरून ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. परंतु ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या त्या ठिकाणी तांत्रीक अधिकारी जाऊन त्यांनी बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक विभागाच्या निदेर्शानुसार ज्या ठिकाणी एकदा मतदान सुरू झाले. तसेच मध्येच बिघाड झाला तर ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅट दुरूस्त न करता संपूर्ण सेटच नवीन लावण्याचे निर्देश दिले. परंतु गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड आला. या विधानसभा क्षेत्रात फक्त १० टक्के ईव्हीएम मशीन अतिरिक्त असल्यामुळे ३४ बुथवरील मतदान बंदच राहीले.ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध नसल्यामुळे मतदान सुरूच करता आले नाही. सुरूवातील ३५ केंद्रावरील मतदान बंद होते. परंतु प्रशासनाने बुथ क्र. १६६ सरस्वती महिला विद्यालय गोंदिया येथील मशीन दुरूस्त करून मतदान प्रक्रिया पुर्ववत सुरु केले आहे. ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅटमध्ये आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी ५ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती.

या बुथवरील मतदान बंद
बुथ क्र.१६ जि.प.हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा काटी, बुथ क्र.३३ जि.प. हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा बनाथर, बुथ क्र.३५ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा बघोली, बुथ क्र.३६ जि.प. हिंदी माध्यमिक बघोली, बुथ क्र.४३ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा बिरसी, बुथ क्र.४४ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा रायपूर, बुथ क्र.५० जि.प. प्राथमिक शाळा सोनपूरी, बुथ क्र.५२ जि.प. प्राथमिक शाळा लोहारा, बुथ क्र.९४ जि.प. उच्च प्राथमिक शाळा रतनारा, बुथ क्र.१०९ जि.प. मराठी प्राथमिक केंद्रीय शाळा अजुर्नी, बुथ क्र.११५ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११६ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११७ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.१२० जि.प. हिंदी प्राथमिक शाळा झिलमिली, बुथ क्र.१२३ जि.प.हिंदी माध्यमिक शाळा लंबाटोला-गिरोला, बुथ क्र.१२७ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा पांजरा, बुथ क्र.१३५ जि.प. मराठी  प्राथमिक शाळा कटंगीकला, बुथ क्र.१३८ जि.प. मराठी माध्यमिक मुले मुली शाळा कटंगीकला, बुथ क्र.१६९ बी.एच. जे. कॉलेज गोंदिया, बुथ क्र.१९४ मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कूल गोंदिया, बुथ क्र.१९५ महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२०० एन. पी. मराठी प्राथमिक शाळा सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२०६  जे. एम. हायस्कूल सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२१५ श्री गुरूनानक प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२१८ बी. एन. आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२२५ एन.पी. मराठी गणेशनगर गोंदिया, बुथ क्र.२३३ माताटोली म्युनिसिपल हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२४० एन.पी. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२५० एन.पी. मराठी हिंदी मालवीय शाळा गोंदिया, बुथ क्र.२५३ सरस्वती शिशू मंदिर मूर्री रोड गोंदिया, बुथ क्र.२७१ संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया, बुथ क्र.२७६ मनोहर म्युनिसीपल हायस्कूल इंग्लिश गोंदिया, बुथ क्र.२७६ (ए) अनाग्रीकर धम्मपाल सार्वजनिक वाचनालय गोविंदपूर गोंदिया, बुथ क्र.३०३ (ए) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचूरपेठ गोंदिया येथील मतदान बंद आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...