Friday 25 May 2018

कॅनेडामधील भारतीय रेस्टारेंटमध्ये स्फोट


15 people injured in blast at restaurant in canada | कॅनडातल्या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, 15 जण जखमी 

टोरंटो,दि25- कॅनडामधील एक भारतीय रेस्टॉरन्ट भीषण स्फोटाने हादरले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोरंटो शहरातील उपनगरीय भागातल्या मिसिसॉगामधल्या बॉम्बे भेल या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पील रिजनल पॅरामेडिक सर्व्हिसनं ट्विट करीत सांगितले की, 3 लोकांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा स्फोट झाला आहे. परंतु, स्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीही टोरंटोमध्ये एका ड्रायव्हरने स्वतःची गाडी गर्दी घुसवली होती. यामध्ये 10 लोक ठार झाले होते, तर 15 जण जखमी होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...