देवरी : ०८ मे ( सुजित टेटे ) वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी ५ अवयव दान करून आपले नाव अमर करून गेलेल्या रिव्यानी रहांगडाले च्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या पालकांचा सत्कार करण्यासाठी पोलीस मुख्यालय गोंदिया येथील प्रेरणा सभागृह मध्ये समाजाला नवीन संदेश देणाऱ्या राधेश्याम रहांगडाले आणि आरती रहांगडाले या पालकांचा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नीलिमा पाटील भुजबळ आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते . रिव्यानी च्या पालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे ६ बालकांना जीवनदान मिळाले असून त्यांना जग बघता आले. त्यांचे निर्णय समाजाला सदैव संदेश देत राहणार असून महिला पोलीस अधिकारी , कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य पूर्ण जीवन मिळावे या साठी रेव्यानी जिमन्याशिअम चे कोनशिला समारंभ नीलिमा पाटील भुजबळ यांच्या हस्ते पार पाडण्यात आले .
सविस्तर वृत्त असे कि रिव्यानी रहांगडाले हि चिमुकली देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये केजी २ च्या वर्गात शिकत होते. तिचे परीक्षा संपल्यावर सुट्ट्या घालवितांना दुर्दैवी अपघात झाले सलग ८ दिवस मृत्यूशी झुंज देत तिने २७ एप्रिल ला अखेरचा स्वास घेतला आणि तिच्या पालकांनी तिचे ६ अवयव गरजूना दान करून दिले. सर्व जगाला इतक्या कमी वयाच्या रिव्यनिने अवयवदानाचा संदेश दिला असून अवयवदान महान दान हि संकल्पना तिने साध्य करून दाखविली आहे. 
No comments:
Post a Comment