
मृत बालकांमध्ये शुभम रामचंद्र मोरदेवे (वय 13) आणिअश्विनी भोजराज मेश्राम (वय14) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये विश्वेश्वरी परतेती (वय 14) आणि रोशनी मोरदेवे ( वय13) यांचा समावेश असून ही सर्व बालके ओवारा येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शुभम, अश्विनी, रोशनी आणि विश्वेश्वरी ही चारही बालके उन्हाचा दाह असल्याने ओवारा धरणावर आंधोळी साठी गेले होते. दरम्यान, ही चारही बालके पाण्यात बुडत असल्याचे तेथे कपडे धुवायला गेलेल्या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बालकांच्या मदतीसाठी गावकऱ्यांना धरणाच्या दिशेने धूम ठोकली. परंतु, गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अपुरे यश आल्याने या घटनेत शुभम आणि अश्विनी यांना मृत्यूने आपल्या कवेत ओढले. तर विश्वेश्वरी आणि रोशनी या दोन बालिकांचे प्राण वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे. या घटनेविषयी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment