

आज शुक्रवारी देवरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वतीने कौशल्या कुंभरे यांनी तर राष्ट्रवादी तर्फे नगराध्यक्ष सुमन बिसेन, दविंदर कौर भाटीया आणि माया निर्वाण यांनी नामांकन दाखल केले होते. परंतु, भाटीया यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन नामांकन कायम होते. आज नगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या कुंभरे यांना 9 मते तर राष्ट्रवादीच्या माया निर्वाण यांना 7 मते पडली. याउलट उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर शेख यांना 10 मते तर कॉंग्रेसच्या ओमप्रकाश रामटेके यांना केवळ 7 मते पडली. गेल्यावेळी कॉंग्रेसच्या भरवश्यावर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीने यावेळी मात्र कॉंग्रेसच्या उमेदवाराचा घात केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसवर होत आहे. दरम्यान, या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवणारे या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यावेळी जातीने हजर होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. तर राष्ट्रवादीच्या गोटात श्मशान शांतता होती.
No comments:
Post a Comment