Sunday 27 May 2018

तिसर्या अपत्यामुळे मांडवीच्या ग्रा.प.सदस्य ढेंगेची सदस्यता रद्द

तिरोडा, दि.२७-तालुक्यातील मांडवी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या महिला सदस्यास ३ अपत्य असल्याची माहिती लपविल्याच्या कारणामुळे सदस्यता रद्द करण्याच्या तक्रारीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी महिला सदस्याचे सदस्यता रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे. पंचायत समिती तिरोडा अंतर्गत ग्रामपंचायत मांडवी येथे १७ ऑक्टोबर २०१७ ला निवडणूक वार्ड क्रमांक ३ मधून इतर मागास वर्गीय प्रवर्गातुन मंगला गुलाब ढेंगे या विजयी झाल्या. मात्र त्यांना तीन अपत्ये असून त्यांनी तीन अपत्ये असल्याची माहिती निवडणूक अर्जात लपविल्याने त्यांचे सदस्यता रद्द करण्याची तक्रार मांडवी येथील भोजलाल कमलप्रसाद नागपुरे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती.जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दोन्ही पक्षाचे बोलणे ऐकून ग्रामपंचायत मांडवीच्या जन्मनोंद वहीत गैरअर्जदार मंगला ढेगे यांचे तिसरे अपत्याचा जन्म २८ ऑक्टोबर २०१४ च्या राज्य निवडणूक आयोग नियम प्रमाणे तिसरे अपत्य १२ सप्टेंबर नंतर जन्मास आले असल्याने त्या ग्रामपंचायत अधिनियम १५५८ चे कलम १४(१) (ज१) अन्वये ग्रामपंचायत सदस्या पदावर कार्यरत राहण्यास अपात्र ठरतात.अर्जदार भोजलाल कलमप्रसाद नागपुरे यांचं अर्ज ग्राह्य धरून मंगला गुलाब ढेगे या ग्रामपंचायत मांडवीचे सदस्या पदावरून कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया अशोक लटारे यांनी पारित केल्याने मांडवी येथील वार्ड क्रमांक ३ च्या मंगला गुलाब ढेगे यांचे सदस्यता रद्द झाले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...