Tuesday 31 January 2017

देवरीत वेडसर कुत्र्याची दहशतः 14 जखमी

देवरी- शहरात आज सकाळपासून एका वेडसर कुत्र्याने आतापर्यंत 14 जणांचा चावा घेत जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान, या कुत्र्याच्या चर्चेने शहरात दहशतीचे वातावरण होते.
शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीमध्ये कैलाश सोनवाने (24), वैभव बोरकर (12), सचिन कवाडकर (18), नितेश रहांगडाले (24), शशिकला सयाम (24), इंदी मडावी (50), गुंजन खोब्रागडे (4), हिरालाल उके (40) ऋषिकेश साखरे (18), लेकचंद दसरे (40), सुधा अग्रवाल (54), कैलाश राऊत (40), जयती कुंभरे (40) आणि जानकी शाहू (30) यांचा समावेश आहे.
आज मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने बाहेरगावावरून बाजारानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांचा यात मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लग्नसमारंभातील जेवणातून १५० पाहुण्यांना विषबाधा

भंडारा - लाखनी तालुक्‍यातील सामेवाडा येथे रविवारी झालेल्या लग्नसमारंभातील अन्नामुळे सुमारे शंभर जणांना विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनी, पिंपळगाव आणि भंडारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गावात उपचार शिबिर सुरू आहेत.
सामेवाडा येथील रामू लक्ष्मण गिऱ्हेपुंजे यांच्या मुलीचे लग्न रविवारी भंडारा येथील सोनू बांगडकर याच्यासोबत झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लग्नसमारंभ पार पडला.
मात्र, या समारंभातील जेवण करणारे गावकरी व वऱ्हाड्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आज सकाळी हगवण, उलटीचा त्रास झाल्याने अनेकांनी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.
घटनेची माहिती झाल्यानंतर आरोग्य विभागाने सामेवाडा येथे उपचार शिबिर सुरू केले. गावातील सुमारे १०० लोकांवर उपचार करण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या २७ जणांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपळगाव येथे १३ आणि भंडारा येथे सहा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विषबाधेची घटना कशामुळे झाली, याची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पथक रवाना झाले असून, अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे माहिती साथरोग विभागाचे डॉ. आंबेकर यांनी दिली. 
दरम्यान, वरपक्षाकडील काही जणांनासुद्धा पोटदुखी व उलटीचा त्रास झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत, असे बांगडकर कुटुंबीयांनी सांगितले.

सांघिक शाळा भेट उपक्रमांतर्गत यवतमाळच्या चमूची देवाटोला शाळेला भेट


    देवरी (वार्ताहर)- तालुक्यातील देवाटोला येथील जिल्हा परिषद शाळेला सांघिक शाळा भेट उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील चमूने आज (ता.31) मंगळवारी भेट दिली.

       या भेटीत यवतमाळच्या चमूमध्ये एक केंद्रप्रमुख व तिन विषयसाधनव्यक्तींचा समावेश होता. यावेळी चमूचे स्थानिक कर्मचाऱ्यांचे परिचय करून देत सर्वच प्रपत्रांची माहिती चमूतील सदस्यांना देण्यात आली. दरम्यान, श्री. भरणे, वलथरे आणि शेंदरे या विषयतज्ज्ञांनी प्रगत विद्यार्थी शोधण्याची पद्धत आणि प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांनी शिकविण्याच्या पद्धतीविषयी पाहुण्यासदस्यांचे मार्गदर्शन केले.

भाषा विषयाचे डेमोलेशन श्री. लोथे व मस्के विषयसाधनव्यक्ती व गणित विषयाचे डेमोलेशन श्री शेंडे केंद्रप्रमुख व कावळे सर यांनी घेतले. भेटीअंती कृतीकार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली,

  सदर कृती कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना योग्य न्याय देणारा असून डायटचा हा कार्यक्रम महाराष्ट्रा साठी प्रेरणा देणारा अाहे, असा अभिप्राय देत पाहुण्या सदस्यांनी समाधान व्यक्त केला. 
  यावेळी देवरी तालुक्यातील सर्व विषयसाधनव्यक्ती, डोंगरगांव केंद्राचे केंद्रप्रमुख व शाळेतील शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होतेे.

Friday 27 January 2017

देवरी तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

 देवरी तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

देवरी- भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापनदिन देवरी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी मिqलद टोणगावकर यांचे हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते. पोलिस पथकासह शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्याथ्र्यांच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. श्री टोणगावकर यांनी उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती देवरीच्या प्रांगणात पंचायत समितीच्या सभापती देवकी मरई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एम पांडे यांची उपस्थिती होती. पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. देवरी नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी मुख्याधिकारी चिखलखुंदे यांच्या उपस्थितीत केले. यावेळी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेकेंसह सर्व नगरसेवक आणि गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण तहसीलदार संजय नागतिळक यांनी केले. पोलिस मुख्यालयातील ध्वजारोहण अप्पर पोलिस अधीक्षक संजय पखाले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वनविभागाच्या कार्यालयातील ध्वजारोहण वनपरिक्षेत्राधिकारी मारबते यांचे हस्ते वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनपाल, वनरक्षक आणि वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ध्वजारोहण वीज उपकेंद्रातील आवारात कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीतील सर्व अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवरीच्या दिवाणी न्यायालयातील ध्वजारोहण न्यायाधीश इंगळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विधीक्षेत्रातील मान्यवर आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलातील ध्वजारोहण सभापती देवकी मरई यांचे उपस्थितीत संस्थेचे सचिव झामसिंग येरणे यांचे हस्ते करण्यात आले. मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील ध्वजारोहण नगराध्यक्ष सुमन बिसेन यांचे हस्ते करण्यात आले. वंदना कन्या विद्यालयातील ध्वजारोहण मुख्याध्यापिका एस डब्ल्यू श्रीरामे यांचे हस्ते करण्यात आले. बाबूराव मडावी विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक राम गायधने यांचे हस्ते करण्यात आले.
मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. पटले यांचे उपस्थितीत रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपक पवार यांचे हस्ते करण्यात आले. तालुक्यातील इतरही ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

ब्लासम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनीने फडकावला तिरंगा
  आपले राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रीय सणांचे महत्त्व आणि राष्ट्रनिष्ठा या विद्यार्थी दशेतच बालकात रूजवून देशभक्ती अंगात भिणवण्याच्या कल्पनेतून देवरीच्या ब्लासम पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी यावर्षी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची संकल्पना अमलात आणली. तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जाते. याचाच एक भाग म्हणून या विद्यालयातील ध्वजारोहण यावर्षीची सर्वोत्कृष्ठ विद्यार्थिनी अवनी पनपालिया हिच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कॅनरा बॅंकेच्या व्यवस्थापिका पूनमलता, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि मुख्याध्यापक सुजीत टेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Tuesday 24 January 2017

महिलेने दिला 4 पायांच्या बाळाचा जन्म

बेल्लारी (वृत्तसंस्था)- रायचूर येथील एका गावातील आरोग्य केंद्रात एका माहिलेने 4 पायांच्या बाऴाला जन्म दिला आहे. ललिताअम्मा असे या महिलेचे नाव आहे. जन्मानंतर बाळाला बेल्लारीच्या 'विजयनगर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस'मध्ये (व्हिआयएमएस) दाखल करण्यात आले आहे.
ललिता अम्मा यांचे हे दुसरे अपत्य आहे. हे बाळ म्हणजे आमच्यासाठी देवाची कृपाच असल्याचे बाळाच्या आईने म्हटले आहे. 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची आई आणि संबंधित कुटुंबियांचा सल्ला घेऊन बाळाला बेल्लारी येथे हलविण्यात आले आहे. सध्या बाळाला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन, बाळ चांगले होईल अशी अपेक्षा डॉक्टर विरुपक्ष टी यांनी व्यक्त केली आहे.
व्हिआयएमएसमधील डॉक्टर दिवाकर गड्डी यांनी, ही आमच्यासाठी आव्हानत्मक केस असल्याचे म्हटले आहे. 

Saturday 21 January 2017

माओवाद्यांचे विशेष शिबीर पोलिसांनी केले उद्ध्वस्त

गडचिरोली- माओवाद्यांचे छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवरील विशेष शिबीर गडचिरोली पोलिसांनी आज उद्धवस्त केले आहे.
 भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या सीमेतून वाहणाऱ्या पर्लकोटा या नदीच्या पलीकडे माओवाद्यांचे मोठ शिबीर असल्याची माहिती मिळाताच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सी-60 ची पथके त्या भागात रवाना केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास नदी पार करुन छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मुर्सीपार जवळ असलेल्या माओवाद्यांच्या कॅंपजवळ कमांडो पोहचताच नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तराने दोन तासाच्या चकमकीनंतर माओवादी जंगलाच्या दिशेने पळुन गेले. या ठिकाणी पन्नास ते साठ माओवादी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मोठया प्रमाणात स्वयंपाक माओवाद्यासाठी तयार करण्यात आला होता. अनेक माओवादी साहित्य त्या ठिकाणी सापडले असून माओवाद्यांच्या घातपाताची तयारी सुरु असल्याने पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत शिबीरच उद्धवस्त केले आहे. सध्या या भागात कोंबींग आपरेशन सुरु असल्याची माहीती एसपी अभिनव देशमुख यांनी दिली आहे

विष्णू सावरा यांना नोटीस

नागपूर - नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह राज्य आदिवासी विकास विभागाचे सचिव, एमएससीटीडीसीएल आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावत 7 फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले. 
मीनाक्षी वट्टी आणि अन्य 12 जणांनी ही याचिका दाखल केली. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली 9 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या बैठकीत अनेक संचालकांचे पद कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सरकारने ठराव पारित करून 29 जून 2016 रोजी अध्यादेश जारी केला. हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. तसेच सावरा आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. एमएससीटीडीसीएल विभागातील गैरकारभाराबद्दल 28 सप्टेंबर 2016 रोजी विष्णू सावरा यांना याचिकाकर्त्यांनी निवेदन दिले होते. त्यांना कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु, कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने सावरा यांनी घेतलेला निर्णय आणि अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. 
याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांत ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. 

आंबेडकरांचे नाव घेऊन ब्राह्मणवाद संपवावा- पांडे

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आरक्षण बंद करा, असे सांगणारयांनी आगोदर आंबेडकरांचे नाव घेऊन मनुवाद, ब्राह्मणवाद संपवावा, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे याने व्यक्त केले. 
अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनात बोलताना मोहित पांडे याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. जातीय आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीत मोहित पांडे याने आपले मत मांडले आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरही उपस्थित होत्या.
पांडे म्हणाला, की मोदी सरकारने द्वेष, मतभेद, विभाजन, अंधभक्ती, निराशावाद व नोटबंदी यासारख्या मुददयांनाच प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला फोडण्याचेच काम केले आहे. अन्याय, चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्या कलाकारांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांना संपविले जात आहे. सक्ती व सत्तेच्या जोरावर विवेकवाद्यांचा आवाज दडपला जात आहे, त्यांना संपविले जात आहे. धर्म व जातीयवादाला खतपाणी घालण्याचे काम संघ करत आहे. रोहित वेमुलाची हत्या संस्थात्मक हत्या आहे. ही हत्या घडविणारे कुलगुरू आप्पाराव सारख्यांना पुरस्काराने गौरविले जात आहे. 'जेएनयू'च्या नदीम अहमद या विद्यार्थ्यास 'अभाविप'ने मारहाण करून गायब केले आहे. 

Tuesday 17 January 2017

अनामत रक्कम 10 हजार...तिही चिल्लर! निवडणूक अधिकाऱ्याची तारांबळ

नागपूर,दि.17- गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात नाऱ्या अर्थात मकरंद अनासपुरे निवडणुकीचा अर्ज भरायला जातो तेव्हा चक्क एक-एक रुपयांचे नाणे घेऊन जातो. याच कृतीची पुनरावृत्ती बुधवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात घडली. विलास बल्लमवार या उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची चिल्लर आणल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पार तारांबळ उडाली.
बल्लमवार हे विना अनुदानित शाळा कृती समितीचे उमेदवार आहेत. गेल्या १६ वर्षांपासून विना अनुदानित शाळेचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. महाराष्ट्रात जवळपास ७० हजारांवर विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना आपल्या कामाचे दामसुद्धा मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुठलाही शिक्षक आमदार आमचे प्रश्न सोडवू शकला नाही, असा या शिक्षकांचा आरोप आहे. त्यामुळे विना अनुदानित शाळा कृती समितीने स्वत:चा उमेदवार नागपूर शिक्षक मतदार संघातून रिंंगणात उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भ विद्यालय, पोटेगाव येथील मुख्याध्यापक विलास बल्लमवार यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. बल्लमवारांनी आपल्या प्रचारात प्रत्येक शिक्षकाकडून ह्यएक रुपया द्या व एक मत द्याह्ण असे आवाहन केले. जवळपास ८८२५ रुपयांची चिल्लर त्यांनी प्रचारादरम्यान गोळा केली. मंगळवारी बल्लमवार विभागीय आयुक्त कार्यालयात गोळा केलेल्या चिल्लर रकमेसह पोहचले. जमा केलेली अख्खी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यापुढे अनामत रक्कम म्हणून भरली. ही इतकी चिल्लर बघून निवडणूक निर्णय अधिकारी व उपस्थित कर्मचारी घामघूम झाले.
एका मताबरोबर एक रुपयाही मागितला
नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात मी फिरलो. शिक्षकाला भेटल्यानंतर त्यांना एका मताबरोबर एक रुपयाची मागणी केली. असे करून ८,८२५ रुपये जमा झाले. वरचे पैसे मी टाकले. अशा प्रकारे निवडणुकीचा फॉर्म भरला-विलास बल्लमवार, उमेदवार, नागपूर शिक्षक मतदार संघ 

ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या चामोर्शी तालुका उपाध्यक्षपदी उमेश गझलपेल्लीवार

चामोर्शी,,दि. 17-ओबीसी विद्याथ्र्यांच्या विविध समस्या व न्याय मागण्या प्रभावीपणे शासनापुढे मांडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गडचिरोली येथील संत तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या चामोर्शी तालुका उपाध्यक्षपदी व कुनघाडा रै. अध्यक्षपदी उमेश गझलपेल्लीवार यांची निवड करण्यात आली आहे.

पोटगीसाठी पतीने केला पत्नीचा खून

तुमसर (जि. भंडारा) - न्यायालयाने मंजूूर केलेली पोटगी द्यावी लागणार म्हणून पत्नीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सोदेपूरच्या जंगलात महिलेचा सांगाडा तेवढा मिळाला. मृताची कपडे, चप्पल व इतर साहित्यांची मृताचा भाऊ व आईने ओळख पटविली. पोलिसांनी आरोपी पतीवर खूनाचा गुन्हा दाखल केला. 
मिना जगने हिचा विवाह 12 वर्षापूर्वी तेजू जगने (वय 40, रा. खमारी, ता. तिरोडा) याच्यासोबत झाला होता. सततच्या भांडणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला. तत्पूर्वी दोघेही तुमसर येथे संत रविदास नगरात मिनाच्या भावाकडे राहत होते. घटस्फोटानंतर पत्नीला न्यायालयातून पोटगी मंजूर झाली होती. त्याचा राग पती तेजू याने आपल्या मनात राग धरून ठेवला होता. आठ डिसेंबर 2016 ला न्यायालयात पेशीसाठी उपस्थित राहण्यास मीना घराबाहेर गेली. तेव्हापासून ती घरी परतली नाही. त्यामुळे मीनाचा भाऊ राजेश भोंडेकर याने 11 डिसेंबरला तुमसर पोलिस ठाण्यात बहिण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. 
12 जानेवारीला पोलिसांनी तेजू जगने याला अटक केली. त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने पत्नी मीनाचा खून केल्याची कबुली दिली. त्याने सोदेपूरच्या जंगलात तिचा मृतदेह फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. 
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक राजेंद्र शेट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र ठाकूर, आरोपी तेजू जगने, मृताची आई, भाऊ राजेश भोंडेकर आणि पोलिस पथक सोदेपूर जंगलात गेले. तिथे मिनाच्या मृतदेहाचा सांगाडा शिल्लक मिळाला. मृताची आई व भावाने तिची साडी, चप्पल ओळखली. आरोपीवर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकूर तपास करीत आहेत. 

जैनकलार समाजाच्या हळदीकूंकवाचा कार्यक्रम उत्साहात

देवरी- गेल्या रविवारी (ता.१५) जैन कलार समाज मंडळ देवरीच्या वतीने महिलांसाठी आयोजित हळदीकुकंवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदा भांडारकर ह्या होत्या. यावेळी अनिता भदाडे, गीता भदाडे, मंदा ठवरे,वर्षा शेंद्रे,भारती दुरुगकर,राखी रणदिवे,पूनम तिडके, पौर्णिमा दुरुगकर, वंदना दुरुगकर,साधना दहिकर,पुष्पा शेंद्रे,मीना शेंद्रे, qसधू शेंडे, सरोज शेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता भदाडे यांनी केले. सौ भदाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील महिलांच्या उत्थानाविषयी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून सौ भांडारकर यांनी महिलांनी वेळोवेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.
संचलन मंदा ठवरे यांनी केले. उपस्थितांचे आभार साधना दहिकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजातील सर्व महिलांनी सहकार्य केले.

Friday 13 January 2017

नोटाबंदीचे नव्हे, त्र्यंबकेश्‍वरच्या बडव्यांवर छाप्याचे स्वागत

सिंदेखडराजा - "मोदी सरकारने एका रात्रीत नोटाबंदी केल्याचा नव्हे, तर नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्‍वर येथील बडव्यांच्या घरावर आयकर विभागामार्फत छापे टाकले. याबाबत मोदी सरकारचे स्वागत आहे,' असे प्रतिपादन शिवधर्माचे संस्थापक डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी गुरूवारी (ता. 12) जिजाऊसृष्टीवर केले. 
महाराष्ट्रासह, हरियाना, उत्तर प्रदेश अशा विविध प्रदेशांतून राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी लाखो मराठा समाजबांधव जिजाऊसृष्टीवर एकवटले होते. यावेळी छत्रपती राजे संभाजी भोसले, देवानंद कापसे, चंद्रशेखर शिखरे, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, नेताजी गोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या छाया महाले, रेखाताई खेडेकर, विजयाताई कोकाटे, मंदाताई किमये, हरियाना येथील सुरजित दाभाडे, दिलीपराव देशमुख, पप्पू भोयर, श्री. तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
शिवश्री खेडेकर म्हणाले, मराठा समाजाने जागीरदार, पाटील, देशमुख या पदव्यांचे भूषण टाळणे गरजेचे आहे. आपल्याकडे बघताना इतर समाजाला चीड निर्माण होत असेल, तर विचार करण्याची गरज आहे. ऍट्रॉसिटीबद्दल बोलताना ते म्हणाले, या कायद्याचा दुरुपयोग होत आहे. या दृष्टीने विचारवंतांनी आमच्या मागणीकडे गांभीर्याने विचार करावा, "दंगल' चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी मराठा समाजातील महिलांना उद्देशून आपल्या मुलींना स्वाभिमानी बनविण्याचे आवाहन केले. महिलांनी गुलामगिरीतून बाहेर यावे. बुवाबाजी, भटजीसह स्वत:च्या नवऱ्याचेही चरणस्पर्श करू नये. जिजाऊंसारखे तेज आपल्यात निर्माण करावे. यापुढे शिवाजी महाराजांचे पुतळे बसवू नका, तालुका, जिल्हा व गावागावांत खासगी वसतिगृह निर्माण करून गरीब मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी. 
 सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. 

'तक्रार मागे घेण्यासाठी जवानावर दबाव'

हरियाना (वृत्तसंस्था)- जम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओ पोस्ट करुन देशभर खळबळ उडवून दिल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी माझ्या पतीवर दबाव आणला जात आहे, असे यादव यांची पत्नी शर्मिला यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना शर्मिला म्हणाल्या, 'जवानांना मिळणाऱया अन्नाबाबत माझ्या पतीने व्हिडिओमधून परिस्थिती समोर मांडली आहे. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, माझ्या पतीने मांडलेली बाजू मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. याबाबत पतीसोबत माझे बोलणे झाले आहे. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. जवानांना चांगले अन्न मिळावे एवढीच त्यांची मागणी आहे. ही मागणी चुकीची नाही.'
माझ्या पतीने सत्य परिस्थिती समोर मांडल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे अधिकारी बोलतात. परंतु, त्यांची मानसिक स्थिती चांगली नसेल तर मग बंदूक त्यांच्या हातात देऊन सीमेवर का उभे केले? त्यांच्यावर उपचार का नाही केले? असा माझा प्रश्न आहे. त्यांनी जे काही केले ते योग्यच आहे. परंतु, आता त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असेही शर्मिला म्हणाल्या.
सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जवानाने अपलोड केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सर्वसामान्य नागरिक जवानाच्या बाजूने उभे राहिले आहेत. याप्रकरणी चौकशीचे सुरू आहे.
दरम्यान, तेज बहादूर यादव यांनी केलेल्या आरोपानंतर सीमेवरून त्यांना हटविण्यात आले असून, मुख्यालयामध्ये त्यांना दुय्यम दर्जाचे (प्लंबर) काम देण्यात आले आहे. शिवाय, मेस कमांडरलाही हलविण्यात आले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Thursday 12 January 2017

'दंबग' IPS शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : बिहारमधील कामगिरीमुळे 'दंबग' म्हणून ओळखले जाणारे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (IPS) शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकामध्ये पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
वेशभूषा बदलून छुपे अवैध धंदे उघड करून अनेकवेळा कारवाया केल्याने लांडे यांचा धाक तिथे निर्माण झाला. बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेल्या प्रांतात अनेक माफियांवर लांडे यांनी जरब बसवली होती. 
मराठी असून आपल्या कर्तृत्वामुळे लांडे हे बिहारी जनतेत लोकप्रिय अधिकारी बनले आहेत. यापूर्वी बदली होत असताना त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला लांबच लांब रांग लागली होती. यावरून त्यांची तेथील लोकप्रियता अधोरेखित झाली.
लांडे यांनी बिहारमध्ये केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्रातही गुन्हेगारी रोखण्यात ते धडाडीने काम करतील अशी अपेक्षा मराठीजनांना आहे.

पैसे न भरल्यास रॉय यांनी तुरुंगात जावे- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना 600 कोटी रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ नाकारली आहे. रॉय यांनी 6 फेब्रुवारीपर्यंत सेबी-सहारा खात्यात 600 कोटी रुपये जमा करावेत अन्यथा तुरुंगात जावे असे न्यायालयाने म्हटले आहे. 
नोटाबंदीचा निर्णय आणि आर्थिक मंदीमुळे ही रक्कम जमा करण्यास उशीर होत असल्याचे कारण रॉय यांनी दिले आहे. मात्र, इतर आरोपींच्या तुलनेत रॉय यांचे आतापर्यंत भरपूर लाड पुरविले आहेत अशी टीका करत न्यायालयाने मुदतवाढ नाकारली आहे. सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि एके सिक्री यांच्या खंडपीठाने रॉय यांना दोन महिन्यांमध्ये 1,000 कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ही रक्कम कमी करुन 6 फेब्रुवारीपर्यंत 600 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
सहारा समुहाकडे व्याजासकट अद्याप 37,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 18,000 कोटी रुपयांचे फेडले आहेत. सुब्रतो रॉय त्यांच्या आईच्या निधनानंतर मे महिन्यापासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत.
 

Wednesday 11 January 2017

वन्यप्राणी शिकार प्रकरणी आणखी तिघे अटकेत

विजेचा शाक देऊन वन्य जीवांची शिकार 

वार्ताहरः  गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील वनक्षेत्र कार्यालय गोरेगाव अंतर्गत येणा-या हेटी गावच्या जंगलात वीजेचा शॉक देऊन राडुकराची शिकार करणा-या तीन आरोपींना गोरेगाव वन विभागाने अटक केली आहे 
वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, पालेवाडा हेटी गावच्या जंगलात अज्ञात आरोपीने जंगलातून जाणा-या हाय टेन्शन विद्युत प्रवाहाच्या तारांवरून लोखंडी ताराच्या साहाय्याने विजेचा करंट लावून ठेवला असता एका जंगली रानडुकरांचा तारात अडकून मृत्यू झाला. सदर आरोपी दुस-या दिवशी मृत डुकराला जंगलात कापून मास आणण्यासाठी गेला असता जंगलात लावलेल्गूया छुप्या कॅमे-यात कैद झाला. वनविभागाच्या गस्तीपथकाला घटना स्थळी विद्युत तार मिळाल्याने सदर प्रकरण उघडकीस आले. कॅमेऱ्यातील फोटोच्या आधारे आरोपीची ओळख पटवून कपिल मेश्राम , होमराज राऊत आणि वासुदेव धुरे या तिघाना अटक करण्यात आली. आरोपींजवळून शिकार करतेवेळी वापरण्यात आलेले साहित्य व मांस हस्तगत करण्यात आले. आरोपीविरुद्ध वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) वन्यजीव संरक्षण गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती एस एम जाधव आर एफ ओ गोरेगाव यांनी दिली आहे.

तब्बल बारा तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद


५ कोंबड्या आणि एका बकरीची केली शिकार 
 गोंदिया ः गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव राष्टीय अभयारण्या लगतच्या कोहळगाव येथे आज बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बिबट्या एका घरात शिरल्यामुळे गावक-यांची चांगलीच तारंबळ उडाली. सकाळपासूनच या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने मोठे शर्तीचे प्रयत्न केले.  तब्ब्ल १२ तासानंतर या बिबट्याला जेर बंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले.
 नवेगाव राष्टीय अभयारण्यातुन हा बिबट्या भटकंती करत कोहळगावात शिरला. गावातील दादासुर साखरे यांच्या घरातील ५ कोंबड्यांना ठार केले. दुसऱ्या एका घटनेत या बिबट्याने किशोर जांभुळकर यांच्या घरातील एका शेळीची शिकार केली. जांभुळकर याने या बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केले असता बिबट्या गावातीलच सुरेश सहारे यांच्या बंद घरात शिरला. गावकऱ्यांनी त्याला बंद करून याची माहिती वनविभागाला दिली. तसेच वन अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेत अखेर बिबट्याला जेर बंद केले असून त्याला नवेगावबांध राष्टीय अभयारण्यातील अनाथालयात ठेवण्यात आले आहे. या बिबट्यावर उपचार करून बिबट्याला पुनः जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. या बिबट्याला पाहण्याकरिता आणि बिबट्याचे फोटो काढण्यासाठी गावातील लोकांनी तोबा गर्दी केली होती. परिणामी, त्यामुळे वन अधिकाऱ्यांना कारवाईत याचा त्रास सहन  करावा लागला.


अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजन करा- अभिमन्यू काळे


28 वा रस्ता सुरक्षा अभियान
 गोंदिया,दि.11 : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ता अपघातातील मृतांचा आकडा हा 75 टक्क्यांच्या खाली आणावयाचा आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध महत्त्वाचा असून अपघात टाळण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचे पालन होणे सुद्धा आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
  आज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे आयोजित 28 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संगीता भिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर अभियान दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, यावर्षी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच इतर यंत्रणासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्ह्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवी चुकांमुळे अपघात होत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, ज्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला आहे त्याला योग्यप्रकारे वाहन चालविता येत असल्याची खात्री परिवहन विभागाने करावी. वाहनाची तांत्रिक तपासणी करणे देखील गरजेचे आहे. वाहन, रस्ता नादुरुस्त असेल तर संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, केवळ अभियानाचे आयोजन करुन सुरक्षीतता मिळणार नाही. अपघात होण्याचे कारण शोधून त्यावर उपाययोजना गरजेची आहे. अलिकडच्या काळात आधुनिक वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याचे सांगून डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले की, पॉवर स्टेरिंग व जास्त इंजन क्षमतेची वाहने वेगाने धावताना दिसत आहेत. वेग मर्यादा प्रत्येक वाहनासाठी असली पाहिजे. स्पीड ब्रेकर सुध्दा चांगले असले पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणारी वाहने धोकादायक असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी.  108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेची माहिती प्रत्येकाला झाली तर अशाप्रसंगी अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय सुविधा पुरविता येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी सोनाली चव्हाण व डॉ.संगीता भिसे यांनीही मार्गदर्शन केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण यांनी आपल्या  प्रास्ताविकातून राज्यातील अपघाताची स्थिती व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली. संचालन सुजाता बहेकार यांनी केले. उपस्थितांचे आभार संदिप पवार यांनी मानले. 
कार्यक्रमाला शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी, ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सहायक मोटर वाहन निरिक्षक संदिप पवार, प्रभाकर पेन्‍सीलवार, अनिरुध्द देवधर, कर्मचारी प्रशांत मांडवेकर, राहूल कुरतोडवार, श्री.राठोड, श्री.गुल्हाणे, श्री.विग्रे, श्री.मोहोड, श्री.वानखेडे, करुणा बसवनाथे, सविता राजुरकर यांनी परिश्रम घेतले. 

अभय अग्रवाल पक्षातून निष्कासीत


गोंदिया : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता अभय अग्रवाल यांनी भाजपच्या पदाधिकारीसोबत केलेल्या अशोभनिय व्यवहारामुळे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी त्यांना पक्षातून निष्कासीत केले आहे. जिल्हाध्यक्ष पटले यांनी १० जानेवारी रोजी सदर निर्णय घेतला आहे.

धानाला दोनशे रुपये क्विंटल प्रोत्साहन अनुदान जाहीर


गोंदिया : राज्य शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत २०१६-१७ या हंगामात खरेदी केलेल्या धानासाठी केंद्राच्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा दोनशे रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त प्रोत्साहन राशी जाहीर केली आहे

उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाने हंगाम २०१६-१७ साठी साधारण धानासाठी १ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल व अ ग्रेड धानासाठी १ हजार ५१० रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत ठरविली होती. या आधारभूत किंमतीपेक्षा जास्त किंमत  देण्यात येणार नसल्याचे ठरविले होते. मात्र, धान उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. त्यमुळे शासनाने आधारभूत किंमतीमध्ये प्रति क्विंटल २०० रुपये अतिरिक्त रक्कम प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय १० जानेवारी रोजी निर्गमित करण्यात  आला. सदर अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी ही प्रति शेतकरी ५० क्विंटल धानाच्या मर्यादेपर्यंत मिळणार असून ती  शेतकऱ्यांना रेखांकित धनादेशाद्वारे मिळणार आहे. सदरील प्रोत्साहन राशी सन २०१६-१७ च्या हंगामात २४ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत खरेदी होणाऱ्या धानासाठीच लागू राहील. 

BERARTIMES: 11-17 JAN 2017





Tuesday 10 January 2017

भारतीय अर्थव्यवस्था देशात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर- मोदी

नवी दिल्ली, दि. 10 - भारतीय अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. सरकारनं अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी येणा-या अडचणी दूर झाल्या आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर संमेलनात ते बोलत होते.
यावेळी मोदींचा कुर्ता आणि मोदी जॅकेट विकण्यासाठी लावलेल्या स्टॉलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. भारतीयांसोबतच अनेक विदेशी प्रतिनिधींनाही या दुकानांनी आकर्षिक केलं आहे. मोदी कुर्त्याची किंमत 1595 रुपये असून, मोदी जॅकेट 5900 रुपयांना विकण्यासाठी ठेवण्यात आलं आहे.
मोदी म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा आहे. जागतिक मंदीतही भारताने चांगली प्रगती केली आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. मेक इन इंडिया हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे.

भिम अॅप : 10 दिवसात 1 कोटी डाऊनलोड

नवी दिल्ली, दि. 10 - कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिम अॅप लॉन्च केलं. या अॅपला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या 10 दिवसात तब्बल 1 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 
 
भिम अॅपमुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे आणि जलदगतीने होत आहेत. त्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्यास तरूणांचीही पसंती आहे आणि म्हणूनच अॅप तरूणांमध्ये लोकप्रिय झालं असं प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे.   

व्हिडिओनंतर 'त्या' जवानाशी संपर्क नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - एका व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणणारा सीमा सुरक्षा दलाचा जवान (बीएसएफ) संपर्कात नसल्याची तक्रार
तेज बहादूर यादव नावाच्या जवानाने व्हिंडिओतून लष्करातील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. सीमेचे संरक्षण करताना निकृष्ट जेवण मिळत असल्याने अनेकवेळा उपाशी झोपत असल्याचेही त्याच्या व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तेजच्या पत्नीने हा व्हिडिओ समोर आल्यापासून पतीशी संपर्क होत नसल्याचे फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. पत्नीने लिहिले आहे की, 'या देशातील नागरिकांना नमस्कार. सोमवारी संध्याकाळपासून माझा पतीशी संपर्क होऊ शकत नसल्याचे मला सोशल मिडियाद्वारे लोकांना सांगायचे आहे. त्यांना कोठे आणि कोणत्या परिस्थितीत ठेवले आहे हे देखील आम्हाला माहिती नाही.'
तेज बहादूर यांनी व्हिडिओतून काही धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. त्याने या व्हिडिओत म्हटले आहे की, "सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेले सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकतात. अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागते. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास बर्फात उभे राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थिथीत कर्तव्य पार पाडतो.'

प्रत्येकाने कॅशलेश पद्धतीचा अवलंब करावा- राजेश तटकरे

एका देशभक्तीपर गीत सादर करताना राष्ट्रध्वजाची आकर्षक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केली होती.

देवरी येथे आठव्या ब्लॉसम महोत्सवाची थाटात सुरवात


देवरी- देशात सर्वत्र कॅशलेसचे वारे वाहत आहेत. दैनंदिन व्यवहारात रोखीचा वापर कमी केल्याने आर्थिक सुरक्षितता मिळते. केशलेसमुळे बँqकग प्रणालीवरील देवाणघेवाणीचा ताण कमी होऊन आपला अमूल्य वेळसुद्धा वाचतो. आपले व्यवहारसुद्धा सुलभ आणि सुरक्षित होतात. या पद्धतीचा अवलंब केल्याने आर्थिक गैरव्यवहारांवरसुद्धा अंकुश लावता येतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी देवरी येथे आठव्या ब्लॉसम महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या आठव्या ब्लॉसम महोत्सवाचे काल सोमवारी (ता.९) थाटात शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंकिता रुहिया, प्रितपालqसह भाटिया, विष्णू अग्रवाल, कल्पवृक्ष शिक्षण संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, ब्लॉसम पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सुजित टेटे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. तटकरे यांनी सायबर गुन्हे आणि सुरक्षा याविषयीसुद्धा उपस्थितांचे मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांवर प्रकाश टाकला.  ते म्हणाले की, आता कॅशलेस पद्धतीची सुरवात झाल्याने बनावट फोन कॉल्सपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. आपल्या बँक खात्याची वा क्रेडिट-डेबिट कार्डविषयीची कोणतीही माहिती फोनवर देऊ नये. यामुळे फसगत होणार नाही. बँक आपल्याला कोणतीही माहिती फोनद्वारे विचारत नसते, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. 
वेळी शाळेतील आर्ट आणि क्राफ्ट तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात शालेय विद्याथ्र्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या स्पर्धेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नाटिका, एकल नृत्य, समूह नृत्य, लोकनृत्य, ऑर्केस्ट्रा आदी स्पर्धांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचलन हरीश उके यांनी केले. उपस्थितांचे आभार सरिता थोटे यांनी मानले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक,शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday 9 January 2017

'एटीएम’मध्ये म्हशी बांधण्याचा ‘राष्ट्रवादी’चा प्रयत्न

कोल्हापूर, दि. 09 -  ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापुरात सोमवारी नोटा बंदीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील एटीएम मशीनमध्ये म्हशी बांधण्यासाठी गेले पण, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सदस्य आर. के.पोवार व शहराध्यक्ष राजेश लाटकर व महापौर हसिना फरास यांच्या नेतृत्वाखाली नोटा बंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. सकाळी सर्वजण महाराणा प्रताप चौकात जमले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. चार म्हशी घेऊन पदाधिकाºयांसह कार्यकर्ते लक्ष्मी रोडमार्गे लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेजवळ आले. त्यावेळी पायरीवरून एटीएममध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी म्हशी नेल्या. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’असे फलक  म्हशीवर लावण्यात आले होते. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला.
या आंदोलनात कार्याध्यक्ष अनिल कदम, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रा.जयंत पाटील, माजी स्थायी सभापती आदिल फरास, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमोल माने, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अफझल पिरजादे, नगरसेविका सरिता मोरे, माजी स्थायी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक विनायक फाळके, निरंजन कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शीतल तिवडे, सुनील देसाई आदींचा सहभाग होता.

नागपुरचे अकरावी प्रवेश पुण्यातून होणार

नागपूर, दि. 09 -  नवीन शैक्षणिक सत्रापासून नागपूर विभागातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून  केंद्रीय प्रवेश समिती हद्दपार होणार असून नागपुरातील प्रवेशाची गुणवत्ता यादी पुण्यातून तयार होणार आहे. विशेष म्हणज सर्व प्रक्रिया ‘आॅनलाइन’ राहणार असून विज्ञान, द्विलक्षीसोबतच कला, वाणिज्य व ‘एमसीव्हीसी’चे प्रवेशदेखील याच प्रक्रियेतून होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जून महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची यादी ‘आॅनलाइन’च पाहता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांची गुणवत्ता यादी तयार होईल. त्यानंतर त्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. जर विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाल्यावर अभ्यासक्रम व महाविद्यालय बदलायचे असेल तर दुस-या फेरीत त्यांना त्यासाठी प्रयत्न करता येतील. अंतिम गुणवत्ता यादी पुण्यातून जाहीर करण्यात येईल.
या निर्णयामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिलासा मिळाला आहे. ‘आयआयटी-जेईई’, ‘नीट’चे ‘कोचिंग क्लास’चे महाविद्यालयांसोबत साटेलोटे आहे. परंतु, या निर्णयामुळे काही महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यात चिंता वाढली आहे. यासंबंधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाºयांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यासंबंधात पुढील आठवड्यात अधिकृत निर्देश येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

कल्याण कृष्णमुर्ती फ्लिपकार्टचे नवे सीईओ

नवी दिल्ली, दि. 9 - इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून बिन्नी बन्सल यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सीईओ बनवण्यात आलं आहे. व्यवस्थापनेतील पुनर्रचनेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. 
 
जून 2016 मध्ये टायगर ग्लोबल सोडून  कृष्णमुर्ती  हे फ्लिपकार्टमध्ये आले होते. वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  टायगर ग्लोबल  फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे. 
 
गेल्या वर्षीही फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये बदल करण्यात आले होते. सचिन बन्सल यांच्याजागी बिन्नी बन्सल यांना सीईओ बनवण्यात आलं होतं. कार्यकारी अध्यक्ष पदामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून सचिन बन्सल हेच पदभार सांभाळतील. 

सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

कोलकाता, दि. 9- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे.  एका अज्ञात व्यक्तिने चिट्ठी पाठवून गांगुलीला धमकी दिली आहे. 
 
स्वत: गांगुलीने  धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली. गेल्या 5 जानेवारीला गांगुलीला एक चिट्ठी मिळाली. त्यामध्ये 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमात सहभागी झाला, तर यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे लिहिले आहे. ही चिठ्ठी गांगुलीच्या घराच्याबाहेर सापडली.
 
दरम्यान, या चिठ्ठीतून दिलेल्या धमकीबाबत गांगुलीने पोलिसांत तक्रार केली असून याबाबतची माहितीही 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमाच्या आयोजकांना माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गांगुली या कार्यक्रमात जाणार की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच, याप्रकरणाची कोलकाता पोलिस चौकशी करत आहेत.    

'नरेंद्र मोदी व दोवल यांच्यामुळेच ओम पुरींचे निधन'

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल यांच्यामुळेच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले आहे, असे पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनेचे निवेदक अमीर लियाकत यांनी म्हटले आहे.
'सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर ओम पुरी यांनी जवानांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ओम पुरी यांच्या वक्तव्यानंतर मोदी व दोवल यांच्याकडून पुरींवर दबाव आला होता. दबावानंतर ओम पुरींनी मद्यप्राशनात वाढ केली होती. यामुळे ओम पुरी यांच्या मृत्यूला मोदी व दोवल जबाबदार आहेत. ओम पुरी यांच्यानंतर फवाद खान व सलमान खान हे मोदींच्या हिटलिस्टवर आहेत,' असे लियाकत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओम पुरी यांचे 6 जानेवारी रोजी राहत्या संशयास्पद मृत्यू झाला आहे, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या डोक्याला जखम आढळून आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

तिरोड्यात राष्ट्रवादीकडून हिसकावले भाजपने नगराध्यक्षपद

भाजपच्या सोनाली देशपांडे ९५ मतानी नगराध्यक्षपदी विजयी

बहुमत राष्ट्रवादीला सत्ता मात्र भाजपकडे
गोंदिया,berartimes.com,दि.०९- जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरपरिषद गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून मात्र या निवडणुकीत भाजपने जनतेतील नगराध्यक्षाच्या माध्यमातून नगरपरिषद आपल्या ताब्यात घेतली आहे.भाजपने नगराद्यक्षपद काबीज केले असले तरी मात्र नगरसेवकांचे बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याने सत्ता चालवितांना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती भाजपला मात्र नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्याची सभा महत्वाची निकालावरुन ठरल्याचे दिसून येते.१७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ९ जागा qजकल्या,भाजपने ५ व शिवसेनेने २ तर अपक्षाने १ जागा qजकली.काँग्रेसला मागच्यावेळची एक जागाही टिकविता आली नाही.आमदार विजय रहागंडाले यांनी मात्र नगराध्यक्ष निवडून आणून पक्षाची ताकद वाढविल्याचे दिसून येत आहे.
तिरोडा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते.यासाठी ७ महिला उमेदवार रिंगणात होत्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सोनाली अमृत देशपांडे यांनी ५९८७ मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता आनंद बैस यांना ५८९२ मते मिळाली.देशपांडे यांनी बैस यांचा ९५ मतांनी पराभव केला.तिसèया क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या पौर्णिमा मेश्राम १३५८ मते घेऊन राहिल्या तर ४ थ्या क्रमांकावर काँग्रेसच्या ममता दुबे राहिल्या.नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यामध्ये प्रभाग क्रमांक १ च्या सर्वसाधारण गटातून भाजपचे संतोष मोहने यांनी ८४३ मते घेत ओमप्रकाश येरपुडे यांचा पराभव केला यांना ३८२ मते मिळाली.याच प्रभागातील अनु.जाती महिला गटातून भाजपच्या राखी गुणेरिया यांनी १०८४ मते घेत स्वाती बोरकर यांचा पराभव केला यांना ४०२ मते मिळाली. प्रभाग क्रमाक २ सर्वसाधारण महिला गटातून अनिता अरोरा यांनी ८३८ मते घेत शाहिदा शेख यांचा पराभव केला यांना ५८७ मते मिळाली.प्रभाग २ मधून भाजपचे विजय तुकाराम बंसोड विजयी झाले.प्रभाग ३ मधून प्रभु जिवनलाल असाटी यांनी ८१६ मते घेत भोजराज धामेचा यांचा पराभव केला,यांना ६०७ मते मिळाली. प्रभाग क्रमाक ३ अनुसूचित जाती महिला गटातून द्वारका भोडंकर यांनी ८४७ मते घेत मनिषा नरीखेकर यांचा पराभव केला यांना ६५३ मते मिळाली. प्रभाग ४ मधून रश्मी विनोद बुराडे ५६८ व अपक्ष अशोककुमार असाटी ८२२ मते घेऊन राष्ट्रवादीचे अविनाश जायस्वाल यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ५ नामाप्र महिला गटातून शिवसेनेच्या श्वेता मानकर यांनी १४३० मते घेत राजश्री उपवंशी यांचा पराभव केला यांना ८८१ मते मिळाली.याच प्रभागातील नामाप्र पुरुष गटातून शिवसेनेचे सुनिल पालांदूरकर यांनी १९२६ मते घेत भाजपचे प्रकाश ठाकरे यांचा पराभव केला यांना ४२५ मते मिळाली.याच प्रभागातून सर्वसाधारण महिला गटातून भाजपच्या भावना चवले यांनी १३३२ मते घेत रजनी पेलागडे यांचा पराभव केला यांना ४६६ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक ६ ब सर्वसाधारण गटातून अजय गौर यांनी १०३७ मते घेत रविशंकर qसगनजुडे यांचा पराभव केला यांना ४९७ मते मिळाली.याच प्रभागातील महिला गटातून राष्ट्रवादीच्या ममता हट्टेवार यांनी ७९५ मते घेत शारदा तितिरमारे यांचा पराभव केला यांना ४४० मते मिळाली.प्रभाग क्रमांक ७ नामाप्र गटातून जगदिश कटरे यांनी ६५४ मते घेत राजकुमार कटरे यांचा पराभव केला यांना ५९७ मते मिळाली.याच गटातील सर्वसाधारण महिला गटातून किरण डहाटे यांनी ८१७ मते घेत जयश्री कटरे यांचा पराभव केला यांना ७८० मते मिळाली.प्रभाग क्रमांक ८ मधून सोनाली राजेश श्रीरामे यांनी ७०४ मते घेत छाया दिलीपकुमार मडावी यांचा पराभव केला यांना ४१५ मते मिळाली.याच प्रभागात सर्वसाधारण गटातून नरेश कुंभारे यांनी ७१७ मते घेत बसंत नागपूरे यांचा पराभव केला यांना ४६६ मते मिळाली.

गोंदियात नगराध्यक्षपदी भाजपचे इंगळे १८ नगरसेवकासह विजयी

एका दशकानंतर बसपचे पुन्हा नगरपरिषदेत आगमन

बसपने रोखले राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला

गोंदिया दि.०९-गोंदिया नगरपरिषदेच्या ८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार पडली.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह सर्वाधिक १८ जागावर विजय मिळविला.नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक (गप्पु)गुप्ता यांचा ५८८२ मतांनी पराभव केला.तिसèया क्रमांकावर काँग्रेसचे राकेश ठाकुर राहिले.तर चौथ्या क्रमांकावर बसपचे पंकज यादव आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेनेचे दुर्गेश रहागंडाले हे राहिले.
गोंदिया नगरपरिषदेच्या २१ प्रभागातील ४२ जागापैकी १८ जागा भारतीय जनता पक्षाने,९ जागा काँग्रेसने ,७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने,बहुजन समाज पक्षाने ५ जागा,शिवसेनेने २ जागा आणि अपक्षाने १ जागा qजकली.प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन गोंविद शेंडे यांनी विजय मिळविला.

विजयी उमेदवारामध्ये प्रभाग १ मधून घनश्याम पानतवणे व विमला मानकर (भाजप),प्रभाग २ मधून राष्ट्रवादीचे हेमंत पंधर व कुंदाताई पंचबुध्दे,प्रभाग ३ मधून विवेक मीश्रा व अनिता मेश्राम(भाजप), प्रभाग ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश देशमुख व सविता मुदलियार ,प्रभाग ५ मधून भाजपच्या रत्नमाला साहू व काँग्रेस बंडखोर अपक्ष सचिन शेंडे,प्रभाग ६ मधून भाजपच्या भावना कदम व अपसाना पठाण,प्रभाग ७ मधून काँग्रेसचे क्रांती जायस्वाल व श्रीमती शिलू राकेश ठाकूर,प्रभाग ८ मधून काँग्रेसचे शकिल मंसुरी व श्वेता पुरोहित,प्रभाग ९ मधून जितेद्र पचबुध्दे व आशालता चौधरी(भाजप),प्रभाग १० मधून मैथुला बिसेन व दिपक बोबडे (भाजप).
प्रभाग ११ मधून हेमलता पतेह व धर्मेश अग्रवाल (भाजप),प्रभाग १२ मधून शिव शर्मा व मौसमी परिहार (भाजप),प्रभाग १३ मधून बसपच्या गौसिया शेख व काग्रेसचे सुनिल भालेराव,प्रभाग १४ मधून बसपचे कल्लू यादव व ज्योत्सना मेश्राम,प्रभाग १५मधून भाजपच्या नितु बिरीया व दिलीप गोपलानी,प्रभाग १६ मधून बसपाच्या ललिता पंकज यादव व संकल्प खोब्रागडे ,प्रभाग १७ मधून काँग्रेसच्या निर्मला मिश्रा व राष्ट्रवादी काँग्रेसचे विनित शहारे,प्रभाग १८ मधून भाजपच्या वर्षा खरोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रगडे,प्रभाग १९ मधून शिवसेनेचे राजु कुथे व नेहा नायक,प्रभाग २० मधून राष्ट्रवादीच्या मालती राजेश कापसे व काँग्रेसचे सुनिल तिवारी आणि प्रभाग २१ मधून काँग्रेसच्या दिपिका रुसे व भागवत मेश्राम निवडून आले.

भाजपच्या विजयाला गालबोट-शहरभाजप अध्यक्षाला पालकमंत्री कार्यालयासमोर मारहाण

गोंदिया, दि.०९-गोंदिया नगरपरिषदेकरीता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरु असताना मतमोजणी केंद्रावर आणि निवडणुक निकाल लागल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयासमोर गोंदिया शहर भाजपचे अध्यक्ष यांना भाजपच्या पराभूत महिला उमेदवाराच्या पतीने मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेने भाजपच्या विजयाच्या आनंदोत्सवावर एकप्रकारे गालबोटच लागले.प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपच्या उमेदवार श्रध्दा अभय अग्रवाल या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वेता पुरोहीत यांच्याकडून पराभूत झाल्या.आपल्या पत्नीचा पराभव हा भाजपच्या शहरअध्यक्षामुळेच झाल्याचा राग मनात पक्का करुन अभय अग्रवाल यांनी निकालानंतर पालकमंत्री यांच्या फुलचूरनाका कार्यालयात एकत्रित आलेल्या भाजपच्या उमेदवार व नेत्यांच्या समोरच आपल्या तीनचार साथीदारांसह येऊन केलनका यांचा शोध घेऊन त्यांना मारहाण केली.या मारहाणीत कार्यकत्र्यांच्या तीन चार दुचाकींची सुध्दा चांगलीच मोडतोड झाली आहे.या मारहाणीत इतरांनी अभय अग्रवालसुध्दा मारहाण केली.नंतर बजरंग दलाचे विदर्भ सयोंजक देवेश मिश्रा हे या प्रकरणाला शांत करण्यासाठी आले असता अग्रवाल यांच्यासोबत आलेल्या युवकांनी त्यांनाही धक्काबुकी केली.मात्र पालकमंत्री यांच्या कार्यालयात बसलेल्या एकाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने खाली उतरुन अभय अग्रवालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फुलले 'कमळ'

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आहे. यापैकी पाच नगराध्यक्ष भाजपचे निवडूण आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आठ जागांवर दावा केला होता. मात्र त्यांना अपेक्षेनुसार यश मिळाले नसले तरी भाजपचे प्रथमच मोठ्याप्रमाणात यश मिळाले आहे.
या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेरचे आमदार सुनिल केदार यांना धक्का बसला आहे. पालकमंत्र्यांनी कामठीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. याकरिता माजी मंत्री ऍड. सुलेख कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत आघाडी केली होती. याकरिता माजी नगराध्यक्ष रणजित सफेलकर यांना भाजप सोडायला भाग पाडले होते. यानंतरही पालकमंत्र्यांना अपेक्षित विजय मिळविता आला नाही. 
रामटेक 
माजी आमदार आशीष जयस्वाल यांचे रामटेक नगरपालिकेवर वर्चस्व होते. शिवसेनेने बिकेंद्र महाजनला उमेदवारी दिल्याने सेनेचे रमेश कारेमोरे यांची बंडखोरी केली. याचा फायदा भाजपच्या दिलीप देशमुख यांनी उचलला. कारेमोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. एकूण 17 जागा 
भाजप -13 
कॉंग्रेस-02 
शिवसेना-02 
नगराध्यक्ष दिलीप देशमुख (भाजप) 
------- 
खापा 
एकूण 17 जागा 

भाजप-15 
कॉंग्रेस-01 
अपक्ष-01 
नगराध्यक्ष प्रियंका मोहिटे (भाजप) 
---- 
कळमेश्‍वर 
एकूण 17 जागा 

भाजप-05 
कॉंग्रेस-08 
सेना-02 
राष्ट्रवादी-02 
नगराध्यक्ष स्मृती इखार (भाजप) 
--- 
सावनेर 
सावनेर आमदार सुनील केदार यांचा बालेकिल्ला समजला जातो. मतदानाच्या दिवशीसुद्धा कॉंग्रेसच विजयी होईल अशी शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र निकालाने केदार यांना जबर धक्का बसला. फक्त चार जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या. 
एकूण जागा 17 
भाजप-12 
कॉंग्रेस-04 
नगराध्यक्ष रेखा मोवाडे (भाजप) 
----
उमरेड 
एकूण जागा 25 

भाजप-14 
कॉंग्रेस-06 
पाच जागांचे निकाल यायचे आहे.
----
नरखेड 
नरखेड तालुक्‍यात माजी मंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांचा दबदबा होता. विधानसभेत त्यांचे पुतणे डॉ.आशीष देशमुख यांनी धक्का दिला. यामुळे मरगळ झटकून देशमुख पुन्हा नगर पालिकेत सक्रिय झाले. त्यांनी पुतण्याने केलेल्या पराभवाचा बचपा काढला. विशेष म्हणजे आशीष देशमुख यांचे मेव्हण यांनी बंडखोरी करून अपक्ष दावेदारी दाखल केली होती. येथे भाजपला खातेही उघडता आले नाही. नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता नगराध्यक्षपदी निवडूण आले. 
एकूण जागा 17 
राष्ट्रवादी- 08 
शिवसेना- 03 
नगर विकास आघाडी -06 
नगराध्यक्ष अभिजित गुप्ता (अपक्ष -नगर विकास आघाडी) 
----
कामठी 
कॉंग्रेस-04 
भाजप-01 
शिवसेना-01 
बसप-01 
अपक्ष-01 
---------
काटोल
काटोलमध्ये सुरुवातीपासूनच खिचडी होती. चरणसिंग ठाकूर यांनी नेहमीप्रमाणे आपला वेगळा गट स्थापन केला. विदर्भ माझा नवा पक्षाला त्यांनी खाते उघडूण दिले. त्यांची पत्नी वैशाली ठाकूर येथून निवडूण आल्या. त्या खालोखाल शेकापने धडक मारली. कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला येथे फारसे येथे यश मिळविता आले नाही. 
एकूण जागा 20 
विदर्भ माझा-15 
शेकाप-04 
भाजप-01 
नगराध्यक्ष वैशाली ठाकूर (विदर्भ माझा) 
----
मोहपा 
एकूण जागा 17 

कॉंग्रेस-10
भाजप-05 
नगराध्यक्ष शोभा कौटकर (कॉंग्रेस) 

सहा महिन्यांतील जमेची माहिती द्या


नवी दिल्ली (पीटीआय)- बॅंकांमध्ये जमा होणाऱ्या रोख रकमेची तपासणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सर्व बॅंकांकडून नोटाबंदीच्या आधीचे सहा महिने म्हणजेच 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबरदरम्यान बचत खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमांचे तपशील मागविले आहेत.
खातेधारकांनी पॅन क्रमांक दिला नसल्यास अथवा फॉर्म 60 खाते उघडताना भरला नसल्यास त्यांच्याकडून हे दोन्ही 28 फेब्रुवारीपर्यंत मागून घ्यावेत, असे निर्देशन प्राप्तिकर विभागाने बॅंकांना दिले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिसूचनेनुसार, बॅंका, सहकारी बॅंका आणि टपाल कार्यालयांनी 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर या काळात जमा झालेल्या रोख रकमांचे तपशील द्यावयाचे आहेत. सर्व बॅंकांनी खातेधारकांकडून पॅन क्रमांक आणि फॉर्म 60 भरून घ्यावा. पॅन क्रमांक बंधनकारक असलेल्या व्यवहारांसाठी तो नोंदवावा. खाते उघडताना पॅन क्रमांक न देणाऱ्या आणि फॉर्म 60 न भरणाऱ्या खातेधारकांकडून ते 28 फेब्रुवारीपर्यंत घ्यावेत. पॅन क्रमांक नसलेल्या व्यक्तीकडून फॉर्म 60 हा घोषणापत्राच्या स्वरूपात भरून घेण्यात येतो.
याआधी प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर बचत खात्यांमधील अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आणि चालू खात्यात साडेबारा लाखांपेक्षा अधिक जमेची माहिती सर्व बॅंकांकडून मागविली होती. ही माहिती 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीतील मागविण्यात आली होती. तसेच, एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा अधिक एका खात्यात जमा झाले असल्यास त्याचेही तपशील मागविले होते.
पंधरा लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा
पाचशे व हजारच्या रद्द नोटांपैकी सुमारे 15 लाख रुपयांच्या नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने त्यामुळे बॅंकांतील जमेची तपासणी सुरू केली आहे. प्राप्तिकर विभाग बॅंकांमधील आधी झालेली रोख जमा आणि नोटाबंदीनंतर झालेली रोख जमा याची पडताळणी करणार आहे.

नोटाबंदी: 4,708 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने काळ्या पैशाविरोधात देशभरात केलेल्या कारवाईत 4 हजार 807 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. तसेच, 112 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने 8 नोव्हेंबरला नोटांबदी झाल्यानंतर देशभरात एकूण 1 हजार 138 छापे टाकले. कर चुकवेगिरी आणि हवाला व्यवहारप्रकरणी 5 हजार 184 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या छाप्यात 609.39 कोटी रुपयांची रोकड व दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच, 112.8 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जमा केल्या असून, यात प्रामुख्याने दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर देशभरात झालेल्या कारवाईत 5 जानेवारीपर्यंत 4 हजार 807.45 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.
प्राप्तिकर विभागाने 526 प्रकरणे तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) पाठविली आहेत. यात कर चुकवेगिरी, बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा समावेश आहे.

Sunday 8 January 2017

गोंदिया-तिरोडा नप निवडणुकः मतदान शांततेत



गोंदिया- 62.72 %, तिरोडा- 73.14 %
  गोंदिया,दि.8 : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 8 जानेवारी रोजी शांततेत मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिका निवडणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. निवडणूकी दरम्यान कुठलीही अडचण येणार नाही यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज होती. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजता नंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली.  
 गोंदिया येथील 143 मतदान केंद्रावर आणि तिरोडा येथील 58 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. गोंदिया येथील 1 लाख 15 हजार 607 मतदारांपैकी 72 हजार 504 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 62.72 इतकी असून यामध्ये 36 हजार 558 पुरुष आणि 35 हजार 946 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

 तिरोडा नगर पालिका क्षेत्रातील 58 मतदान केंद्रावर देखील शांततेत मतदान पार पडले. या केंद्रावर 20 हजार 859 मतदारांपैकी 15 हजार 258 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 73.14 इतकी आहे. यामध्ये 7 हजार 642 पुरुष आणि 7 हजार 616 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 9 जानेवारी रोजी गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन व तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

देवरी येथे पेट्रोलपंपला वाहनाची धडक

देवरी- राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर असलेल्या स्थानिक जैन पेट्रोलपंपावर एका वाहनाने धडक दिल्याने एक इसम जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जैन पेट्रोल पंपावर रामाजी मांदाळे हा एका दुचाकी वाहनात पेट्रोल टाकत असताना एक टाटा इंडिगो या कार ने पेट्रोल डिलिवरी पोस्टला जोरदार धडक दिली. यामुळे संपूर्ण पोस्ट कोलमडल्याने त्याखाली रामाजी मांदाळे दुचाकीसह आला. त्यामुळे मांदाळे याला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी त्याला गोंदियाच्या बजाज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्या कारचा चालक त्याच पंपावर काम करणारा असल्याचे बोलले जाते.

तहसिलदाराच्या जाचाला कंटाळून तलाठी परातेचा आत्महत्येचा प्रयत्न


 गोंदिया- गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या त्रासाला कंटाळून एका तलाठ्याने चक्क मंडळ कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.७) सकाळच्या सुमारास केला. त्या तलाठ्याची प्रकृती चिंताजनक असून महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, गोरेगाव तालुक्यातील लीलाधर पराते नामक तलाठ्याने गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून काल शनिवारी सकाळच्या सुमारास चक्क गोरेगावच्या मंडळ कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तलाठ्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परातेची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 
सन २०११ ते २०१६ या निलंबन काळातील वेतनासह अन्य कामासाठी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना विनंती केली. मात्र, डहाट यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पराते यांचेवर उपासमारीची वेळ आली होती. गेल्या तीन दिवसापासून तलाठी पराते हे त्रस्त होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. थकीत वेतन व भत्ते काढण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शेवटी तेढा परिसरात कार्यरत असलेले लीलाधर पराते यांनी तहसील कार्यालय परिसरातच विषप्राशन केले. लीलाधर पराते हे अनेक वर्षापासून कार्यरत असून गेल्या काही महिन्यापासून गोरेगाव येथील तहसीलदार कामाबाबत सतत दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला असून डिसेंबर महिन्यापासून त्याचे वेतन सुद्धा काढण्यात आले नव्हते. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक स्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे पीडित तलाठ्याचे म्हणणे आहे. शिवाय कामाचा अतिरिक्त दबाव गोरेगाव येथील तहसीलदार कल्याणकुमार डहाट तसेच कार्यालयातील दोन इतर कर्मचाèयांनी वाढविल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा आरोप लीलाधर पराते तसेच त्यांचा पत्नी मीना लीलाधर पराते यांनी केला आहे.
तलाठी पदावर असलेले लीलाधर पराते हे गेल्या ५ वर्षांपासून अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना ५ वर्षात १६ महिने कामावरून कमी करण्यात आले होते. तसेच त्यांची पदोन्नती सुद्धा थांबली होती. याशिवाय हे प्रकरण तत्कालीन तहसीलदार यांनी निकाली न काढल्यामुळे त्यांचा वेतनाचे काम खोळंबले होते. मात्र, विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी त्यांचे काम बऱ्यापैकी निकाली काढून पुढील कार्यवाही करीत वरिष्ठ कार्यालयात पाठविले होते. मात्र, लीलाधर पराते यांच्या सेवा पुस्तिकेत काही त्रुट्या आढळल्याने त्याचे पगार आणि ५ वर्षाची वेतनवाढ अद्यापही निघाली नाही. म्हणून लीलाधर पराते यांची मनःस्थिती खालावल्याने त्यांनी शनिवारी गोरेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच लीलाधर पराते यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्याशी विचारणा केली असता हे प्रकरण माझ्या रुजू होण्याआधी पासून असून मी या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लीलाधर पराते यांचा थकीत वेतन आणि वेतनवाढ काढून देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सेवापुस्तिकेत त्रुट्या आढळल्याने पेमेंट निघू शकले नाही. त्यामुळे, त्यांनी विनाकारण कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. मात्र, या संदर्भात अद्यापही कुठलीही पोलिस कार्यवाही करण्यात आली नाही. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...