
स्वत: गांगुलीने धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली. गेल्या 5 जानेवारीला गांगुलीला एक चिट्ठी मिळाली. त्यामध्ये 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमात सहभागी झाला, तर यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे लिहिले आहे. ही चिठ्ठी गांगुलीच्या घराच्याबाहेर सापडली.
दरम्यान, या चिठ्ठीतून दिलेल्या धमकीबाबत गांगुलीने पोलिसांत तक्रार केली असून याबाबतची माहितीही 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमाच्या आयोजकांना माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गांगुली या कार्यक्रमात जाणार की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच, याप्रकरणाची कोलकाता पोलिस चौकशी करत आहेत.
No comments:
Post a Comment