Tuesday 30 April 2019

१ मे रोजी भाईचारा मैत्री कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया,दि.३०:संविधान बचाव कृती समितीच्यावतीने राष्ट्रपीता महात्मा फुले, राजा सम्राट अशोक व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त ओबीसी, एस.सी.,एस.टी. अल्पसंख्याक संघटनेच्या युवक महिलांकरिता भाईचारा मैत्री कार्यक्रमांतर्गत संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मंतर चौक गांधी वार्ड छोटा गोंदिया येथे १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,जिल्हाध्यक्ष व्ही.एम. करमकर, हरिश ब्राम्हणकर, सुनील तरोने, क्रांती ब्राम्हणकर, सविता बेदरकर, शिव नागपुरे, जितेश राणे, रवि भांडारकर, गवली, यशवंत रामटेके, अबरारभाई सिद्दीकी,ओबीसी विद्यार्थी संघ जिल्हाध्यक्ष दीपक बहेकार, डॉ. सुवर्णा हुबेकर, अनिल गोंडाने, निखत खान, फिरदौस खान, चेतना रामटेककर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कठाणे, संचालन अतुल सतदेवे, अफजल शाह करणार आहेत. आयोजनाकरिता बहुजन युवा मंचचे सुनील भोंगाडे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे, पोर्णिमा नागदेवे, संजूताई खोब्रागडे, गीता मदनकर, ज्योती कापसे, ताहिरा शेख, वंदना देशभ्रतार, सुनीता वैद्य, माधुरी भेलावे, रिना भोंगाडे, आशा भांडारकर, रुपाली रोटकर, निलू मोहंती आदि परिश्रम घेत आहेत.

Monday 29 April 2019

देवरी आमगाव रोडवर दुतर्फा ट्रक्स पार्किंगमुळे अपघातांना आमंत्रण

देवरी:29
देवरी येथील आमगाव रोड वर सकाळी 8 ते 9 च्या सुमारास अनधिकृतरित्या ट्रक्स पार्किंग मूळे अपघातांना आमंत्रण टाळता येत नाही याकडे प्रशासनाचे आणि पोलीस विभागाचे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
सविस्तर वृत्त असे की देवरी आमगाव रोड वर 2 शाळा आणि 1 महाविद्यालय आणि 1 औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय आहे.  परीक्षा सुरू आहेत विध्यार्थी आणि सामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यांनी येत आहेत.या रस्त्यावर मोठया प्रमाणात सर्वसामन्याची आवक जावक असते. तरी सुद्धा या रस्त्यावर प्रशासन दुर्लक्ष करीत असून होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.

Sunday 21 April 2019

चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

रायपूर(वृत्तसंस्था)दि.२१ः – छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (२१ एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसभा चुनाव में किसके लिए खतरे की घंटी है 534 सीटों पर हुए सर्वे की यह रिपोर्ट?

नई दिल्ली: लोकसभा चुनाव के मौसम में राजनीतिक सुधारों पर नजर रखने वाली संस्था एडीआर ने ऑल इंडिया सर्वे रिपोर्ट जारी की है. जिससे पता चलता है कि जनता के मुद्दों पर केंद्र से लेकर राज्य सरकारों का प्रदर्शन औसत से भी खराब रहा है. एडीआर की ओर से यह सर्वे देश की 534 संसदीय सीटों पर किया गया. देश भर की जनता ने इस दौरान अपनी प्राथमिकताएं बताईं. जनता ने रोजगार को 46.80 प्रतिशत के साथ शीर्ष स्थान पर रखा. वहीं दूसरे नंबर पर 34.60 प्रतिशत के साथ बेहतर स्वास्थ्य सुविधाओं को प्राथमिकता बताया. इसके बाद पेयजल(30.50 %), अच्छी सड़कें(28.34%), बेहतर परिवहन(27.35%), खेती के लिए पानी(26.40%), कृषि लोन(25.62%), कृषि उत्पादों का अधिकतम मूल्य(25.41%), बीज और उर्वरकों पर सब्सिडी(25.06%), सुदृढ़ कानून व्यवस्था(23.95%) को जनता ने अपनी प्राथमिकता बताई. एडीआर ने अपनी रिपोर्ट में इन मुद्दों के आधार पर सरकार के प्रदर्शन को औसत से खराब करार दिया है. सरकार ने कुछ प्रमुख राज्यों की भी अलग से रिपोर्ट से जारी की है.

योगी सरकार का प्रदर्शन खराब
एडीआर की रिपोर्ट के मुताबिक उत्तर प्रदेश की जनता की अपेक्षाओं को सत्ताधारी दल ने नजरअंदाज किया है.एसोसिएशन फार डेमोक्रेटिक रिफार्म्स (एडीआर) के इस सर्वेक्षण के मुताबिक, मतदाताओं से जुड़े प्रमुख मुद्दों पर उत्तर प्रदेश सरकार की योगी सरकार का प्रदर्शन औसत से भी नीचे रहा है. इन मुद्दों में रोजगार के अवसर, स्वास्थ्य सुविधा एवं कानून-व्यवस्था शामिल हैं. एडीआर ने ‘उत्तर प्रदेश सर्वे 2018’ के नतीजों को गुरुवार को जारी किया. मतदाताओं ने कहा कि उनकी शीर्ष प्राथमिकता रोजगार के अवसर (42.82 फीसदी), अच्छे अस्पताल एवं प्राथमिक चिकित्सा केंद्र (34.56 फीसदी) और बेहतर कानून व्यवस्था (33.74 फीसदी) हैं. राज्य के ग्रामीण क्षेत्रों में मतदाताओं की शीर्ष प्राथमिकता में कृषि कर्ज की उपलब्धता (44 फीसदी), कृषि के लिए बिजली (44 फीसदी) और रोजगार के अवसर (39 फीसदी) रही और लोगों के बीच सरकार का प्रदर्शन इन सभी क्षेत्रों में औसत दर्जे से भी कम पाया गया.

बिहार में नीतीश सरकार भी लचर
बिहार के मतदाताओं ने भी रोजगार को 49.95 प्रतिशत के साथ अपनी शीर्ष प्राथमिकता बताया. वहीं खेती के लिए पानी की उपलब्धता(41.43 प्रतिशत) को दूसरे, जबकि अच्छे अस्पताल और स्वास्थ्य सुविधा(39.09) को तीसरे नंबर की प्राथमिकता बताया. एडीआर की रिपोर्ट के मुताबिक बिहार सरकार जन अपेक्षाओं पर खरी नहीं उतर सकी है. जनता से जुड़े मुद्दों पर सरकार का खराब प्रदर्शन मिला है.

राजस्थान में 25 सीटें, 2 चरण में मतदान
29 अप्रैल : जोधपुर, टोंक-सवाईमाधोपुर, पाली, बाड़मेर, जालौर, उदयपुर, बांसवाड़ा, चित्तौड़गढ़, राजसमंद, भीलवाड़ा, कोटा, झालावाड़-बारां, , अजमेर,
6 मई :  दौसा, नागौर, गंगानगर, बीकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपुर ग्रामीण, जयपुर, अलवर, भरतपुर, करौली धौलपुर,

मध्यप्रदेश में 29 सीटें, चार चरण मतदान
29 अप्रैल : सीधी, शहडोल, जबलपुर, मंडला, बालाघाट, छिंदवाड़ा
6 मई : टीकमगढ़, दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद, बैतूल
12 मई : मुरैना, भिंड, ग्वालियर, गुना, सागर, विदिशा, भोपाल, राजगढ़
19 मई : देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, धार, इंदौर, खरगोन, खंडवा

छत्तीसगढ़ में 11 सीटें, 3 चरण में मतदान 
23 अप्रैल : रायपुर, सरगुजा, जांजगीर-चंपा, कोरबा, बिलासपुर, दुर्ग,

बिहार में 40 सीटें, 7 चरणों मतदान
23 अप्रैल : खगड़िया, झंझारपुर, सुपौल, अररिया, मधेपुरा,
29 अप्रैल : दरभंगा, उजियारपुर, समस्तीपुर, बेगूसराय, मुंगेर
6 मई : मधुबनी, मुजफ्फरपुर, सारन, हाजीपुर, सीतामढ़ी,
12 मई : पूर्वी चंपारण, पश्चिमी चंपारण, , शिवहर, वैशाली, गोपालगंज, सिवान, महाराजगंज, वाल्मीकिनगर
19 मई : नालंदा, पटना साहिब, पाटलिपुत्र, आरा, बक्सर, सासाराम, काराकट, जहानाबाद

उत्तर प्रदेश में 80 सीटें, 7 चरणों में मतदान
23 अप्रैल : मुरादाबाद, रामपुर, संभल, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदायूं, आंवला, बरेली, पीलीभीत
29 अप्रैल : शाहजहांपुर, खेड़ी़, हरदोई, मिश्रिख, उन्नाव, फर्रुखाबाद, इटावा, कनौज, कानपुर, अकबरपुर, जालौन, झांसी, हमीरपुर
6 मई : फिरोजाबाद, धौरहरा, सीतापुर, माेहनलालगंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, बांदा, फतेहपुर, कौशांबी, बाराबंकी, बहराइच, कैसरगंज, गोंडा
12 मई : सुल्तानपुर, प्रतापगढ़, फूलपुर, प्रयागराज, अंबेडकर नगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आजमगढ़, जौनपुर, मछलीशहर, भदोही
19 मई : महाराजगंज, गोरखपुर, कुशीनगर, देवरिया, बांसगांव, घोसी, सालेमपुर, बलिया, गाजीपुर, चंदौली, वाराणसी, मिर्जापुर, रॉबर्ट्सगंज

झारखंड में 14 सीटें, 4 चरणों में मतदान
29 अप्रैल : चतरा, लोहारदगा, पलामू
6 मई : कोडरमा, रांची, खूंटी, हजारीबाग
12 मई : गिरीडीह, धनबाद, जमशेदपुर, सिंहभूम
19 मई : राजमहल, दुमका, गोड्डा

महाराष्ट्र में 48 सीटें, 4 चरणों में मतदान 
23 अप्रैल : जलगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, मढ़ा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हटकानांगले
29 अप्रैल : नंदूरबार, धुले, डिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावल, शिरूर, शिर्डी

असम में 14 सीटें, 3 चरणों में मतदान
23 अप्रैल : धुबड़ी, कोकराझार, बारपेटा, गुवाहाटी

जम्मू-कश्मीर में 6 सीटें, 5 चरणों में मतदान
23 अप्रैल : अनंतनाग (सिर्फ अनंतनाग जिले में वोटिंग)
29 अप्रैल : अनंतनाग (सिर्फ कुलगाम जिले में वोटिंग)
6 मई : लद्दाख, अनंतनाग (सिर्फ शोपियां जिले में वोटिंग)

कर्नाटक में 28 सीटें दो चरणों मतदान
23 अप्रैल : चिक्कोडी, बेलगांव, बगलकोट, बीजापुर, गुलबर्गा, रायचूर, बीदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड़ा, उत्तर कन्नड़, दावणगेरे, शिमोगा

ओडिशा में 21 सीटें, 4 चरणों मतदान
23 अप्रैल : संबलपुर, क्योंझर, ढेंकानाल, कटक, पुरी, भुवनेश्वर
29 अप्रैल : मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपुर, केंद्रपाड़ा, जगतसिंहपुर

बंगाल में 42 सीटें, 7 चरणों मतदान
23 अप्रैल : बालुरघाट, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, जंगीपुर, मुर्शिदाबाद
29 अप्रैल : बेहरामपुर, कृष्णानगर, राणाघाट, बर्धमान पूर्व, बर्धमान-दुर्गापुर, आसनसोल, बोलपुर, बीरभूम
6 मई : बंगांव, बैरकपुर, हावड़ा, उलुबेरिया, श्रीरामपुर, हुगली, आरामबाग
12 मई : तामलुक, कांति, घाटल, झारग्राम, मेदिनीपुर, पूर्णिया, बांकुरा, विष्णुपुर,
19 मई :  मथुरापुर, डायमंड हार्बर, जाधवपुर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर, दमदम, बारासात, बशीरहाट, जयनगर,

मालेगांव केस की पूर्व सरकारी वकील का खुलासा:शहीद करकरे पर आरोप ‘घटिया हरकत’

नई दिल्ली(न्युजएजंसी): मालेगांव ब्लास्ट केस में एक पूर्व सरकारी वकील ने बीजेपी नेता प्रज्ञा ठाकुर को यह दावा करने के लिए फटकार लगाई कि उन्हें 26/11 के हीरो हेमंत करकरे की अगुवाई वाली टीम द्वारा जांच के दौरान प्रताड़ित किया गया था. दो दिन पहले, 2008 के मुंबई आतंकवादी हमलों के दौरान आतंकवादियों की फायरिंग में शहीद हुए पुलिस अधिकारी हेमंत करकरे को लेकर मालेगांव ब्लास्ट की आरोपी प्रज्ञा ठाकुर ने विवादित बयान दिया था. प्रज्ञा ठाकुर ने कहा कि उन्होंने शहीद करकरे को शाप दिया था, जिसकी वजह से उनकी मौत हो गई. प्रज्ञा ठाकुर ने कहा कि ‘हेमंत करकरे राष्ट्रविरोधी थे. वह धर्म के विरुद्ध (धर्म-विरोधी) थे. आप इस बात पर विश्वास नहीं करेंगे, लेकिन मैंने कहा था कि ‘तुम्हारा सर्वनाश होगा’. इसके तुरंत बाद, आतंकवादियों ने उन्हें गोली मार दी.
इस केस की पूर्व सरकारी वकील रोहिणी साल्यान ने स्पष्ट किया कि प्रज्ञा ठाकुर को यातना देने या अवैध हिरासत में रखने का कोर्ट को कोई सबूत नहीं मिला. मैंने कभी सुना नहीं कि एक साध्वी ने शाप दिया और कोई शख्स मर गया. ये टिप्पणियां (हेमंत करकरे के खिलाफ) अनुचित और बिना सोचे समझे हैं. मुझे लगता है कि वह प्रचार के लिए ऐसा कर रही हैं क्योंकि वह चुनाव लड़ रही हैं. इस तरह की अवांछित टिप्पणियां घटिया हैं. पूर्व वकील सलियन ने प्वाइंट आउट किया कि कोर्ट ने प्रज्ञा ठाकुर के मामले में यातना या अवैध हिरासत का कोई सबूत नहीं पाया था. इसलिए उन्होंने (अभियुक्त) ने उच्च न्यायालय में फैसले को चुनौती दी थी, जिसमें मेडिकल रिपोर्ट सहित सभी रिकॉर्ड थे, मगर इसके बाद भी उनकी याचिका खारिज कर दी गई.
पूर्व वकील रोहिणी साल्यान ने भाजपा के इस आरोप को भी खारिज कर दिया कि उसके भोपाल के उम्मीदवार साध्वी प्रज्ञा को पिछली कांग्रेस सरकार ने फंसाया था. उन्होंने कहा कि ‘दोनों अभियुक्तों को आखिरी बार भोपाल में प्रज्ञा ठाकुर के साथ देखा गया थ, इस बात के भी सबूत हैं. साध्वी प्रज्ञा का वाहन (एक स्कूटर) उसी परिसर में पड़ा हुआ था, जहां वे रह रहे थे. अंत में, इस स्कूटर को ब्लास्ट की जगह पर ले जाया गया और वहां इस्तेमाल किया गया. सरकारी वकील ने कहा कि उन्होंने 2015 में इस मामले से खुद को अलग कर लिया, क्योंकि राष्ट्रीय जांच एजेंसी ने उन पर इस केस को सॉफ्ट करने का दबाव डालना शुरू कर दिया था. तब तक, मैं अदालत में अपने कानूनी कर्तव्यों को पूरा करने के लिए स्वतंत्र थी. हालांकि, ऐसी परिस्थितियों में काम करना मुश्किल था. ने कहा कि वह आतंकवादी हमलों के दिन हेमंत करकरे से मिलने वाली अंतिम व्यक्ति थीं. उन्होंने कहा कि मैं आज केवल एक उद्देश्य के लिए बोल रही हूं, क्योंकि मैं वीर पुलिस अधिकारियों को बदनाम नहीं होने दे सकती.

ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 158 जणांचा मृत्यू


हेल्प लाइन सुद्धा सुरु


भारतातही हाय अलर्ट जारी
Multiple explosions in Colombo and other parts of Sri Lanka, reports Sri Lankan media | कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 156 जणांचा मृत्यू
कोलंबो,दि.21 - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 158 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
प्राप्त माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. 
View image on Twitterभारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे. तसेच कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 
दत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपरेक क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या  क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात. 

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अपत्यांना आईची जात लावण्याची संमती


आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अपत्यांना आईची जात लावण्याची संमतीनागपूर,दि.21 : भारतीय संविधानाने स्त्री-पुरुषांना समान दर्जा दिला असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याची अपत्ये स्वतःला आईची जात लागू करण्याची मागणी करु शकतात, अशा अपत्यांना आईची जात नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 
नागपूरच्या गंजीपेठ परिसरातील भारती बडवाईक आणि त्यांची मुलगी आंचल बडवाईक यांच्या चेहऱ्यावर सध्या समाधान झळकत आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या आंचलने एक महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढाई जिंकली आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आंचलचे वडील अनुसूचित जातीचे, तर आई इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहे. तिने आईच्या जातीची मागणी करुन जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला होता. मात्र, पाल्याची जात वडिलांच्या जातीवरुन निर्धारित होत असल्याचं सांगत तिला वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश तिला देण्यात आले होते.
समितीच्या या आदेशाच्या निर्णयाविरोधात आंचलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यावर निर्णय देत नागपूर खंडपीठाने पाल्याला जातीचे प्रमाणपत्र देताना त्याच्या आईची जात नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
आता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सिंगल मदर, पतीपासून विभक्त झालेल्या माता यांच्यासाठी हा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचं कायद्याचे जाणकार सांगतात.



भरधाव वाहनाने भाजी व्यापाऱ्याला दुकानासमोरच चिरडले

नागपूर,दि.21 : गोंदियातून भाजी घेऊन आलेल्या एका वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुकानासमोर झोपलेल्या एका व्यापाऱ्याला चिरडले. 
संतोष जगन्नाथ चव्हाण (वय ४५) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून, शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे  कॉटन मार्केटच्या सब्जी मंडी परिसरात तीव्र शोककळा पसरली.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनाकी मंगळवारीत राहणारे संतोष चव्हाण यांचे कॉटन मार्केटच्या म. फुले सब्जी मंडीत दुकान आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि पहाटेच भाजी बाजारातील व्यवहार सुरू होत असल्यामुळे चव्हाण त्यांच्या दुकानासमोरच झोपत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ते झोपले होते. आरोपी साहेबलाल तिलकचंद शिसोदे (वय ६०, रा. हिवरा, गोंदिया) हा भाजी बाजारात शनिवारी पहाटे ३.४५ ते ४ च्या सुमारास भाजीचा ट्रक घेऊन आला. त्याने निष्काळजीपणे वाहन (एमएच ३५/ १३९३) चालवून चव्हाण यांना चिरडले. चव्हाण यांचा जागीच मृत्यू  झाला.बाजारात तीव्र शोककळा पसरली. फिर्यादी रोशन गणेश नायकेले (वय ३४, रा. हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी शिसोदेला अटक करण्यात आली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात गारपीट

अर्जुनी मोरगाव,दि.20ः- तालुक्यात आज २० एप्रिलच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट पडल्याने रब्बी पिकाचे नुकसान झाल आहे.सोबतच गारपीट व वादळवार्यामुळे तालुक्यातील ईटखेडा ईसापूर परिसरात लग्न समारंभाचे मंडपाचे नुकसान झाले आहे.

भूमिपूजन वादाच्या भोवर्‍यात, आचारसंहितेचा भंग

पवनी,दि.21ः-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक डॉ. आंबेडकर चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याने नगरपरिषद अध्यक्षांसहीत उपस्थित शासकीय कर्मचारी व इतरांवर कारवाई करावी, याबाबतची तक्रार डॉ. राजेश नंदुरकर यांनी निवडणूक अधिकारी भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र यांना दिल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली.
नंदुरकर यांनी सांगितले की, भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्रात दि. ११ एप्रिलला मतदान झाले. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका आहेत. जरी भंडारा लोकसभा क्षेत्रात मतदान संपले असले तरी राज्यात इतर ठिकाणी मतदान शिल्लक आहे. त्यामुळे पूर्णराज्यात आदर्श आचारसंहीत लागू असून कुठेही शिथील करण्यात आली नाही. असे असतानाही नगरपरिषदेच्या सर्वसाधारण फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून न.प. अध्यक्षा पूनम काटेखाये यांनी सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले.
यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून पदमुक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. नंदुरकर यांनी यावेळी केली.

Saturday 20 April 2019

जोगी कांग्रेस को बड़ा झटका : प्रवक्ता सुब्रत डे, संजीव अग्रवाल सहित पदाधिकारी कांग्रेस में




रायपुर,20 अप्रैल। चुनाव के ठीक पहले जोगी कांग्रेस को बड़ा झटका लगा है। जोगी कांग्रेस के मुख्य प्रवक्ता सुब्रत दे और संजीव अग्रवाल समेत सोशल मीडिया के प्रदेश अध्यक्ष इस्माइल अहमल ने पार्टी छोड़ दी है। आज ये सभी  कांग्रेस के प्रदेश प्रभारी पीएल पुनिया और मुख्यमंत्री भूपेश बघेल की मौजूदगी में कांग्रेस में शामिल हुए। सुब्रत डे का कांग्रेस में शामिल होना पार्टी के लिए बड़ा झटका है, क्योंकि वो जोगी कांग्रेस के फाउंडर मेंबर में से एक थे और लंबे समय से मीडिया विभाग संभाल रहे थे। वहीं संजीव अग्रवाल को अजीत जोगी का बेहद करीबी माना जाता है। मीडिया विभाग के एक और प्रवक्ता नितिन भंसाली पहले ही कांग्रेस में शामिल हो चुके थे। इस दौरान सुब्रत डे ने कहा कि यह मेरी “घर वापसी” है, मुख्यमंत्री  भूपेश बघेल का आभारी हूँ जिन्होंने बड़ा दिल दिखाते हुये पुनः घर वापसी की अनुमति दी है | छत्तीसगढ़ में सामाजिक समरसता के लिये बेहद आवश्यक है कि विधानसभा के बाद अब लोकसभा में भी भाजपा शासन का अंत सुनिश्चित हो | भाजपा मुक्त छत्तीसगढ़ बनाना मुख्य उद्देश्य’, इसके लिये तन, मन से कांग्रेस का काम करूँगा |  सुब्रत डे ने कांग्रेस प्रवेश के लिए उत्तर विधानसभा के विधायक कुलदीप जुनेजा, शहर अध्यक्ष गिरीश दुबे के प्रति आभार व्यक्त किया है |इस दौरान प्रमुख रूप से आमितेश भारद्वाज, सुनील भूवाल उपस्थित थे ।

वर्ध्यात NIA चा छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात

वर्धा,दि.20 -शहरातील प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैद्राबाद येथील अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे.अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे ४ वाजता छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या या महिलांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे बंद खोलीत त्यांना विचारपूस केली जात आहे. एनआयएच्या या चमूमध्ये एका उपपोलीस अधीक्षकासह दोन पोलीस निरीक्षक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच वर्धा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वत: सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठले होते. सध्या चौकशी सुरू असून चौकशी पथकातील अधिकारी व स्थानिक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी गुप्तता बाळगली जात आहे.
आयएसआयएसशी संबंध असल्या प्रकरणी केस आरसी ४/२०१६/एनआयए/डीएलआय या दाखल गुन्ह्याचा तपासाचा एक भाग म्हणून वर्ध्यांत छापा टाकून सदर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी नेमकी ही कारवाई कुठल्या अनुषंगाने आहे याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

जस्टिस गोगोई बोले-खतरे में न्यायपालिका की स्वतंत्रता




नई दिल्‍ली 20 अप्रैल। सीजेआई रंजन गोगोई के खिलाफ एक महिला द्वारा लगाये गए यौन उत्पीड़न के आरोपों पर सुप्रीम कोर्ट ने सुनवाई पूरी की। इस दौरान चीफ जस्टिस गोगोई ने अपने ऊपर लगे आरोपों को बेबुनियाद बताया और कहा कि इसके पीछे कोई बड़ी ताकत होगी, वे सीजेआई के कार्यालय को निष्क्रिय करना चाहते हैं।
बता दें कि जस्टिस गोगोई पर सुप्रीम कोर्ट की ही एक पूर्व कर्मचारी ने यौन शोषण का आरोप लगाया है। सुप्रीम कोर्ट ने इस मामले में सुनवाई करते हुए कहा कि इस तरह के आरोप न्यायपालिका की स्वायतता के खिलाफ साजिश हैं। सुप्रीम कोर्ट की पूर्व महिला कर्मचारी द्वारा लगाए गए गंभीर आरोपों पर शनिवार को मामले की सुनवाई मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस अरुण मिश्रा और जस्टिस संजीव खन्ना ने की।
सीजेआई गोगोई ने कहा कि न्यायाधीश के तौर पर 20 साल की निस्वार्थ सेवा के बाद मेरा बैंक बैलेंस 6.80 लाख रुपये है। उन्होंने कहा कि कोई मुझे धन के मामले में नहीं पकड़ सकता है, लोग कुछ ढूंढना चाहते हैं। प्रधान न्यायाधीश गोगोई ने कहा कि इसके पीछे कोई बड़ी ताकत होगी, वे सीजेआई के कार्यालय को निष्क्रिय करना चाहते हैं। उन्होंने कहा कि 20 साल की सेवा के बाद यह सीजेआई को मिला इनाम है।
न्यूज के अनुसार, उन्होंने आगे कहा कि न्यायपालिका को बलि का बकरा नहीं बनाया जा सकता। मैंने आज अदालत में बैठने का असामान्य और असाधारण कदम उठाया है क्योंकि चीजें बहुत आगे बढ़ चुकी हैं। उन्होंने कहा कि मैं इस कुर्सी पर बैठूंगा और बिना किसी भय के न्यायपालिका से जुड़े अपने कर्तव्य पूरे करता रहूंगा।वहीं, न्यायमूर्ति अरूण मिश्रा ने कहा कि इस तरह के अनैतिक आरोपों से न्यायपालिका पर से लोगों का विश्वास डगमगाएगा। न्यायिक प्रणाली में लोगों के विश्वास को देखते हुए हम सभी न्यायपालिका की स्वंतत्रता को लेकर चिंतित हैं।

देवरी तालुक्यातिल भर्रेगावात पाणी टंचाई


या दृष्टीने संतप्त लोकांनी डिसेंबर २०१८ ला संरपंचाला या विषयी माहिती दिली पण याकडे दुर्लक्ष करन्यात आला , असा लेखीपत्र गावकऱ्यांनी सरपंचाच्या कामास कंटाळुन दैनिक वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यास दिलेले आहे.

गावातिल पाच ही हातपंप बिनकामी
20 दिवसापासुन गावातिल लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंति
सरपंचाचे गावाकडे दुर्लक्ष
गावातिल प्राथमिक शाळेतिल विहीरीचे पाणी पिण्यायोग्य योग्य नाही 

देवरी : 20-उन्हाळ्याची चटक लागताच तालुक्यातील भर्रेगाव कुंभारटोला या गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे .
पाण्याविषयीची समस्या सरपंचाना २० दिवशा अगोदर सांगून सुद्धा या कडे लक्ष दिले जात नाही असे आरोप संतप्त नागरिकांनी केलेले आहे. गावात, गणेश मंदिराजवळील हातपंप क्र. २ ,हनुमान मंदीराजवळील हातपंप क्र. ३ , राजेश मेढें याच्या घरासमोरील हातपंप क्र. ४ ,प्राथमिक शाळेतिल विहीर व हातपंप, या सगळ्या पंपाचि स्थिती मागील २० दिवसापासुन खराब झाली आहे. प्राथमिक शाळेतिल विहीरीचा पाणी पिण्यायोग्य नसल्याने शाळकरी विद्यार्थांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे .

अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

नांदेड दि.20- नांदेड क्लब  व यशवंत कॉलेज येथील टेनिस मैदानावर दिनांक १५ एप्रिल ते दिनांक १९ एप्रिल २०१९ दरम्यान नांदेड डिस्ट्रीक्ट अँड सिटी लॉन टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित योनेक्स सनराईस १६ वर्षाखालील मुले व मुलींच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या अंतिम एकेरी सामन्यात इंदौरच्या दीप मुनीम याने मुंबईच्या साहेबसिंग सोडी याच्यावर सरळ दोन सेट मध्ये ६-३,६-३ ने मात करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या अंतिम एकेरी सामन्यात तामिळनाडूच्या लक्ष्मीप्रभा अरुणकुमार हिने महाराष्ट्राच्या साई भोयर हीच सरळ दोन सेट मध्ये ६-२, ६-३ ने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 
मुलांच्या अंतिम दुहेरी सामन्यात इंदौरच्या दीप मुनीम व पुण्याच्या यशराज दळवी या जोडीने पुण्याच्याच प्रसाद इंगे व औरंगाबाद च्या ओम काकड यांचा सरळ दोन सेट मध्ये ६-२, ६-३ असा प्रभाव करून दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. 
 मुलींच्या दुहेरी अंतिम सामन्यात हैद्राबादच्या अपूर्वा वेमुरी व अभया वेमुरी या जुळ्या भगिनींनी नागपूरच्या साई भोयर व पुण्याच्या इशिता जाधव यांचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात तीन सेट मध्ये ६-४, ६-७, (३) १०-७ असा पराभव केला. व दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहराचे माजी महापौर श्री अजयसिंह बिसेन, दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे, यशवंत कॉलेजचे क्रीडा विभागाचे संचालक मनोज पैंजणे, महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे काउन्सिल मेम्बर ए के पंजवानी, व नांदेड डिस्ट्रीक्त अँड सिटी लॉन टेनिस असोसिएशनचे खजिनदार डॉ किशोर विडेकर, यांची उपस्थिती होती.विजेत्यांना व उपविजेत्याना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 
या स्पर्धेला ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे रे फ्री म्हणून कोलकात्याचे श्री सुरजीत बंदोपाध्याय यांची नेमणूक झाली होती. त्यांनी हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका पार पडली. 
बक्षिस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ अमोल पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन स्पर्धेचे संचालक शिवानंद विडेकर यांनी केले 

राज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेज बंद?

मुंबई/वृत्तसंस्था,दि.20ः–इंजिनीअरिंगप्रमाणे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही मोठय़ा प्रमाणात रिक्त राहण्यास सुरुवात झाली आहे. २0१८ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पॉलिटेक्निकच्या सुमारे ७१ हजार ९00 जागा रिक्त राहिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, २७ कॉलेजांनी आपले कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल पाच हजार जागा कमी होणार आहेत.
दहावीनंतर पॉलिटेक्निक पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र, आता या अभ्यासक्रमांना दहावीचा निकाल उत्कृष्ट लागत असताना उतरती कळा लागली आहे. गेल्यावर्षी तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यापूर्वी, म्हणजे २0१७मध्ये पॉलिटेक्निकच्या तब्बल ८0 हजार ८३५ जागा (५६.६४ टक्के) रिक्त राहिल्या होत्या. यानंतर २0१८ची प्रवेश प्रक्रिया करताना जागा रिक्त राहणार्‍या संस्थांमधील १९ हजार जागा कमी करण्यात आल्या होत्या. यानंतरही पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यामुळे टक्केवारीनुसार २0१८मध्ये जास्त जागा रिक्त आहेत. २0१८मध्ये राज्यभरातील १ लाख २३ हजार ५0९ जागांपैकी केवळ ५१ हजार ६९0 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शासकीय तसेच, अनुदानित कॉलेजांमधील सुमारे पाच हजारांहून अधिक जागा ओस पडल्या होत्या. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार फी भरावी लागत असूनही या जागा भरलेल्या नाहीत. शासकीय कॉलेजांतील ४ हजार ७७२, तर शासकीय अनुदानित कॉलेजांतील ४१0 जागा रिक्त राहिल्या होत्या.सरकारी कॉलेजांतील जागा रिक्त राहू लागल्यानंतर खासजी कॉलेजांनीही नांगी टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक संस्थाचालकांनी कॉलेज चालविणे परवडत नसल्याचे कारण पुढे करत कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सादर केले आहेत.

Friday 19 April 2019

एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करा

गोंदिया,दि.19ः- जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करुन बुधवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.शासन सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करताना ती एकस्तर वेतनश्रेणी शिवाय केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन विद्यमान वेतनापेक्षा कमी होते. ही वस्तूस्थिती मुकाअ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या वेळी मुकाअ दयानिधी यांनी शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन ही समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप सोमवंशी, जिल्हाध्यक्ष राज कडव, जिल्हा सचिव सचिन राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण सरगर,जिल्हा सहकार्याध्यक्ष मुकेश राहांगडाले, शीतल कनपटे, सदाशिव पाटील, संदीप तिडके, सुमित चौधरी, सचिन सांगळे, गणेश कांगणे, किशोर ब्राम्हणकर, बाबासाहेब होनमाने, भूषण जाधव, मिथुन चव्हाण, जीवन आकरे, तेजराम नंदेश्वर, रमेश उईके, संजय उके, सोमेश्वर वंजारी, डी.टी.कावळे, क्रांतीलाल पटले, अजित रामटेके, अनमोल उके, अमोल खंडाईत, पी.एस.राहांगडाले, तानाजी डावखरे, प्रकाश परशुरामकर, महेन्द्र चव्हाण, रोहित हत्तीमारे, अश्विन भालाधरे, चंद्रशेखर ब्राम्हणकर, लोकेश नाकाडे, अंजन कावळे, सुरज राठोड, सतिश बिट्टे, सुरेश मुधोळकर, रावसाहेब सिदने, किशोर डोंगरवार, हुमेंद्र चांदेवार उपस्थित होते.

प्रज्ञा साध्वींचे धक्कादायक वक्तव्य – ‘अतिरेक्यांनी करकरेंना मारून माझे सूतक संपवले’

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.19 – भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. उमेदवारी भेटल्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.एका सभेत साध्वी म्हणाली, ‘तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितले होते. पण हेमंत करकरेंनी मात्र नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते’
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या, वाचा त्यांच्याच भाषेत…..
“वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.””ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.””मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ.”
 भाजपाकडून दोनदिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार

गोंदिया,दि.19  – उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाºया ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अतयाचार केला. त्या ढोंग्याला आता तुरूंगाची हवा खावी लागली.   
गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याला घेऊन त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका १७ वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३०) या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी २७ मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली.त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पिडीत मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत भिंगत असलेल्या त्या पिडीतेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पिडीतेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते.
त्यामुळे तिची मावशी सुध्दा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पिडीतेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगीं बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी ८-८ वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. ३१ मार्चला त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. १ ते ४ एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली.    ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ९ एप्रिल रोजी त्याला पोलीस उपनिरीक्षक संदीया सोमनकर यांनी अटक केली. न्यायालयाने ९ ते १५ एप्रिल दरम्यान पोलीस कोठडी सुनावली. आता त्याला भंडाराच्या कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

हिंगोली,दि.19: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि त्यांच्या  पत्नी प्रियंका जयवंशी आणि अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला मिणियार यांनी देखील हिंगोली येथील सिटी क्लब या सखी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
 यावेळी विविध मतदान केंद्रावर नव मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केल्याचे चित्र होते.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मतदान केंद्राची पाहणी केली.तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतदानाची जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी, हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, लिंबाळा, ता. हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, संतुक पिंपरी, ता. हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, डिग्रस कऱ्हाळे, ता. हिंगोली आदी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

Thursday 18 April 2019

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? – राज ठाकरे

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.18 –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता? मोदींच्या गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? महिलांवर अन्याय व्हायचे तेव्हा गप्प का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.  मी महाराष्ट्रात भाषण करतोय आणि माझ्या भाषणाच्या क्लीप देशभरात व्हायरल होतेय. देशाला मराठी भाषा समजतेय. हेच चांगले झाले. अनेक जण सांगतात मी देशात भाषणं करावं. हिदींतून भाषण करावं अशी मागणी होतेय. मात्र मी महाराष्ट्रातच राहणार, देशात जाणार नाही असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावले, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.  दरम्यान ५ वर्षांपूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर मोदी त्या स्वप्नांनवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायाचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मते मागायची आहेत अशी टीका केली.महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर महिलांवरील बलात्काराचे राजकारण करू नका, असे म्हणताहेत. मात्र विरोधात असताना हेच नरेंद्र मोदीं महिलांवरील अत्याचारांसाठी सरकारला दोषी ठरवत होते.” असा आरोप  राज ठाकरे यांनी केला.

शशिकरण नजिक ट्रेलरच्या धडकेत दुचारीस्वार ठार


सडक/अर्जुनी,दि.18 - राष्ट्रीय महामार्गावरील सशिकरण पहाळी जवळ आज  गुरूवारी  सायंकाळी साडे सहाच्या सुमारास  ट्रेलरच्या धडकेत एक मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला.

मृताचे नाव मंगेश विष्णू बनकर (वय-३२ ) रा.कोदामेडी ता.सडक/अर्जुनी असे आहे
सविस्तर असे की, शशिकरण पहाळी जवळ नागपूर कडून जाणारा ट्रेलर क्र.सी.जी.०४-५७८६ च्या चालकाने हलगर्जी पणाने ट्रेलर चालवून मोटारसायकल क्र.एम.एच.३५ ए.के.६७८७ चा चालक मंगेश विष्णू बनकर वय-३२ वर्ष रा.कोदामेडी ता.सडक/अर्जुनी  याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मंगेश हा कोदामेडीवरून नातेवाईकाचे घरी लग्न सोहळा असल्या ने पत्नी मुला सोबत बाम्हणी/खडकी येथे सोडून अहेर घेण्या करिता सडक/अर्जुनीला आला होता. बाम्हणी/खडकी ला पून्हा परत जात असतांना हा अपघात घडला.
फिर्यादी मुन्नासिंग रामसिंग ठाकूर रा.बाम्हणी/खडकी यांचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय सडक अर्जुनी येथे पाठविण्यात आले.पुढील तपास पोलिस.निरिक्षक प्रदिप अतुलकर हे करीत आहेत.

नकली खाद एंव बीज सप्लायर के लिये काम करनेवाले पुर्वमंत्री की करेंगे पोलखोल-भगत

बालाघाट। भारतीय जनता पार्टी के बागी प्रत्याशी के रूप मे सामने आये सांसद बोधसिंह भगत बालाघाट-सिवनी संसदीय सीट से फिर अपनी किस्मत आजमा रहे है।मध्यप्रदेश के पुर्व मंत्री एव बालाघाट के विधायक गौरीशंकर बिसेन इन्होने भगत का प्रखर विरोध करते हुये ढालसिंह बिसेन को टिकट दिलवाकर चुनकर लाने का आश्वासन पार्टी हायकमान को दिया।वही सासंद बोधसिंह भगत ने भी इस अन्याय के खिलाप जनता के साथ लढाई लढकर गौरीशकंर बिसेन के मंत्रीकाल मे किये काले कारनामे एंव नकली बिज खरीदी के भ्रष्टाचार को जनता के सामने लाने की कसम खाकर नया इतिहास रचने का संकल्प लिया है।
बुधवार को बैहर,बालाघाट क्षेत्र का सघन दौरा कर बोधसिंह भगत ने जनता से मुलाकात कर विजयी होने का आशिर्वाद लिया,वही महावीर जंयती के उपलक्ष्य मे निकली शोभायात्रा मे भी सम्मिलीत हुये।
निर्दलीय प्रत्याशी के रूप मे बोधसिंह भगत पुरे क्षेत्र मे दौरा कर रहे वही कटंगी,वारासिवनी,परसवाडा,बैहर क्षेत्र के भाजपाईयोने खुलकर भगत का साथ देने का निश्चय किया है । सांसद बोधसिंह भगत ने कहा कि उन्होने निष्ठापूर्वक पांच वर्ष तक कार्य कर कई विकास कार्य किया। अधूरे कार्यो को पूरा करना है, कुछ श्ािक्तयां नहीं चाहती वे चुनाव लड़े, इसलिये धनशक्ति के आधार पर टिकट कटवाया। हम अन्याय के खिलाफ झुकना पसंद नहीं करेंगे। हमने नकली दवा, नकली खाद का विरोध किया था, कुछ लोगों ने भाजपा को अपने जेब की परिवार की पार्टी बना दिया। गोंदिया जिले के नकली खाद एव बीज सप्लायर के लिये काम करनेवाले पुर्वमंत्री का कालाचिठ्ठा जनता के सामने रखना है। परिवार को टिकट नहीं मिली तो दबाव डालकर, पैसा भरकर टिकट दूसरे को दिलवायी। श्री भगत ने कहा कि उनकी जनता से टिकट नहीं कटी है जनता की टिकट पर निर्दलीय प्रत्याशी के रूप मे चुनाव लडुंगा। मैने राजनीति मे सेवा को धर्म समझा, चुनाव मे जनशक्ति जीतेगी, धनशक्ति हारेगी। इस दौरान आमसभा मे मौजूद कार्यकर्ताओं ने संकल्प भी लिया कि वे बोधसिंह के साथ है और अन्याय से लड़ते हुये एक नया इतिहास रचेंगे। आमसभा मे बोधसिंह भगत समर्थको ने भी संबोधित करते हुये कहा कि आज न्याय यात्रा है जो अन्याय के खिलाफ है हम सबको एकजुट होकर चुनाव मे ताकत दिखाना है।

मतदाराने फोडले मतदान यंत्र;दुपारी 1 पर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान

मुंबई दि 18(विशेष प्रतिनिधी) – आज सकाळपासून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील 13 राज्यांत 97 जागांवर हे मतदान होत आहे. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होत आहे. राज्यातील 10 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत असून अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 34 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
अकोला – बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडले. मतदान यंत्राऐवजी बलेट पेपर द्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्याने इव्हीएम फोडले. कवठा-बहादूरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या इसमाने गोंधळ घातला. ईव्हीएम मशिनवर आपला विश्वास नसल्याचे सांगत त्याने बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. घ्यारे याने मतदान यंत्र जमीनीवर आदळले. यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. निवडणुक अधिकाऱ्यांनी दुसरे मतदान यंत्र बोलावल्यानंतर एका तासाने मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. दरम्यान, श्रीकृष्ण घ्यारे याला उरळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी :
बुलडाणा 34.43 %
> अकोला 34.46 %
> अमरावती 33.68 %
> हिंगोली 37.44 %
> नांदेड 38.19 %
> परभणी 37.95%
> बीड 34.65 %
> उस्मानाबाद 34.94 %
> लातूर 36.82 %
> सोलापूर 31.56 %
उस्मानाबाद जिल्ह्यात 3 गावात मतदानावर बहिष्कार
> महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांनी केले मतदान
> अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील योगेश नागळे हा युवक मतदान केल्यानंतरच बोहल्यावर चढण्यासाठी मार्गस्थ झाला
> हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खा. राजीव सातव यांनी आपले संपत्नीक मतदान मसोड ता. कळमनुरी येथे मतदानाचा हक्क बजावला
>माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
> उमरखेडचे आमदार राजेंद्र नाजरधाने यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
> सोलापूर – उजनी धरणातून पाणी सोडले नाही, यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुडल, अंकलगी आणि आळगी या तीन गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. आंदोलन करून बहिष्कार टाकण्याचा दिला होता इशारा.
> भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी बजावले मतदानाचे कर्तव्य.
> उस्मानाबादेत मतदानावेळी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
> अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रविण पोटे पाटील यांनी आपल्या परीवारासकट सकाळीच मतदानाचे कर्तव्य बजावले.
अगोदर मतदान नंतर बोहल्यावर चढणार
जालना- रामसगावतील आकाश भोजने या तरुणाने स्वतःचे लग्न असून देखील लोकशाही बळकट करण्यासाठी अगोदर मतदानाला महत्व दिले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

> विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
> मतदान झाले जाहीर, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन मध्ये अचानक बिघाड झाला मशीन दुरुस्त करताना कर्मचाऱ्याकडून चुकीचे बटन दाबले गेले आणि झालेले मतदान फुटले. तेथे राष्ट्रवादीला 22 शिवसेनेला 8 वंचित बहुजन आघाडी ला 2 आणि अपक्षाला एक मत पडल्याचे समोर आले.मतदान सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे तब्बल २६ ठिकाणी बॅलेट युनीट तर २४ ठिकाणी कंट्रेल युनीट बदलावे लागले. ५६ ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलावे लागण्याची पाळी निवडणूक यंत्रणेवर आली.
बुलडाणा जिल्ह्यातील १९७९ मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोल झाल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ या कालावधीत ७.८५ टक्के अर्थात आठ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजेपर्यंत एकूण एक लाख ३८ हजार १५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची ही सरासरी टक्केवारी २०.२९ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे प्रामुख्याने या टप्पात जवळपास १२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
दुसरीकडे दुपारी एक वाजेदरम्यान मतदानाच्या दिवशी तिसऱ्या टप्प्यात ३४.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये  सहा लाख पाच हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दोन लाख ६८ हजार ९४० महिला आणि तीन लाख ३६ हजार ५५८  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार आहेत. यामध्ये आठ मतदार हे तृतियपंथीय आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व संबंधीत वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

प्राप्तिकर रिटर्न : फॉर्म 16 मध्ये बदल; पगाराशिवाय अन्य स्रोतांचे उत्पन्नही सांगावे लागणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- प्राप्तिकर विभागाने फॉर्म -१६ मध्ये बदल केले आहेत. हा फॉर्म जारी करणाऱ्यांना (नियोक्ता) आता कर्मचाऱ्यांबाबत अधिकची माहिती द्यावी लागेल. यात कर्मचाऱ्याला घराद्वारे मिळणारे उत्पन्न, इतर नियोक्त्यांकडून मिळणारी पैशाची विस्तृत माहिती आता फॉर्म-१६ मध्ये द्यावी लागेल. यामुळे प्राप्तिकर विभागाला कर चोरीच्या तपासात मदत होणार आहे.नव्या फॉर्म-१६ मध्ये वेगवेगळ्या कर बचत योजनात केलेली गुंतवणूक, त्याच्याशी संबंधित कपात, कर्मचाऱ्यांना मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि इतर स्रोताकडून मिळालेले उत्पन्न याची माहिती द्यावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागाद्वारे सुधारित फॉर्म-१६ या वर्षीच्या १२ मेपासून लागू होईल. आर्थिक वर्ष २०१८-१९ चे रिटर्न सुधारित फॉर्मच्या आधारे भरावे लागतील.
इतर बाबींशिवाय नव्या फॉर्म १६ मध्ये बचत खात्यातील जमावरील व्याजाबाबतचा तपशील तसेच त्यावर मिळणारी सवलत तसेच अधिभार (लागू असेल तर) याचाही समावेश राहील. आर्थिक ‌‌वर्ष संपल्यानंतर नियोक्त्याकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म-१६ दिला जातो. यात कर्मचाऱ्याच्या उगमस्थानी कर कपातीची (टीडीएस) माहिती असते. फॉर्म-१६ च्या आधारेच कर्मचारी प्राप्तिकर रिटर्न सादर करतात. नियोक्ता सर्वसाधारणपणे जूनमध्ये फॉर्म -१६ जारी करतात. प्राप्तिकर विभागाने २०१८-१९ या आर्थिक ‌वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न फॉर्म अधिसूचित केले आहेत. वेतनधारकांशिवाय ज्या लोकांच्या खात्यांचे लेखा परीक्षण होत नाही अशांना ३१ जुलैपर्यंत रिटर्न दाखल करायचे आहेत.
सर्व घटकांतील कपातीची माहिती नियोक्त्याला द्यावी लागणार 
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या इंदूर शाखेचे अध्यक्ष पंकज शहा यांच्या मते, रिटर्न दाखल करण्याच्या प्रमाणीकरणासाठी फॉर्म-१६ मध्ये बदल करण्यात आला आहे. अनेक वेळा फॉर्म-१६ आणि दाखल रिटर्नमधील आकड्यांत फरक दिसून येतो. मात्र, फॉर्म-१६ मध्ये कर्मचाऱ्याची गुंतवणूक आणि उत्पन्नाची सर्व माहिती असेल तर हा फरक दिसणार नाही. ज्या भत्त्यांवर कर सवलत मिळते आहे ती मिळत राहील. मात्र नियोक्त्याला सर्व साधनांतून होणाऱ्या कपातीची संपूर्ण माहिती फॉर्म-१६ मध्ये द्यावी लागेल.

फॉर्म 24 क्यू मध्येही बदल 
नियोक्ता हा फॉर्म प्राप्तिकर विभागाला देत असतो. ज्या कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना आता कर्जदात्या बिगर संस्थात्मक एजन्सींचा किंवा ज्यांच्याकडून घर खरेदी केले त्यांचा पॅन क्रमांक द्यावा लागणार आहे.

राजकुमार बडोलेविरुध्द आचारसहिंता भंगाचा गुन्हा दाखल




गोंदिया,दि.18ः- देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसहिंता लागू झालेली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही 11 एप्रिलला मतदान पार पडले.या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचाराच्या सभेसाठी आलेले भाजपचे नेते नितिन गडकरी हे आले असता त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्जुनी मोरगावचे आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी स्वागत फलक लावले.हे स्वागतफलक नवेगावबांध टी-पाईंटवर विद्युत खांब क्रमांक 320 वर तसेच रस्त्यालगतच्या झाडावर हार्दिक अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते.आचारसहिंता भंग केल्यामुळे भरारी पथकाचे विजय भैय्यालाल साखरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Wednesday 17 April 2019

आल्लापल्ली येथे अवैध प्रवाशी वाहनाला भीषण अपघातः तीन ठार


तालवाडा जवळील घटना

गडचिरोली,दि.17 -  सकाळच्या सुमारास आल्लापल्लीहून भामरागडच्या आठवडी बाजाराकरिता निघालेल्या महिंद्रा पिकअप  (क्र. एम एच ३४ एम ३७२८) आणि पेरमिली (मांड्रा) येथील अवैध प्रवाशी वाहन  या दोन वाहनात झालेल्या भीषण धडकेल तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज बुधवारी (दि.17) रोजी आल्लापल्ली नजीक घडली.

मृतकामध्ये दोन महिला व एक पुरुष यांचा समावेश असून मृतांचे नाव अद्याप कळू शकले नाही. याच अवैध प्रवासीवाहन मधील अन्य 11 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 
आल्लापल्लीवरून भामरागडच्या आठवडी बाजारासाठी निघालेले महिंद्रा पिकअप हे आल्लापल्ली नजीक पोचताच विरुद्ध दिशेने येणारी अवैध प्रवाशी वाहन यांच्यात जोरदार धडक झाली. भरधाव वेगात असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असलेल्या अवैध प्रवाशी वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये नाहक तिघांचा बळी गेला असून अन्य अकरा जखमींवर अहेरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघातामधील मालवाहू ही नागेपल्ली येथील शिंदे तर  अवैध प्रवाशी वाहन हे पेरमली (मांड्रा) येथील सुनील सुरमवार यांच्या मालकीची असल्याचे कळते.
अहेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मेमोवरून अहेरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. यावेळी असिफ पठाण, प्रमोद आत्राम सरपंच पेरमिली, वंजा गावडे यांनी अपघात ग्रस्तांना प्राथमिक उपचाराकरिता मदत केली आहे.

17 ते 23 एप्रिल बेरार टाईम्स अंक क्लिक





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...