अमरावती,दि.12ः-महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुºहा येथील बुधवारच्या जाहीर सभेतील अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती मतदारांमध्ये उमंग भरुन गेलेली आहे. सुनील शेट्टी व्यासपीठावर येताच एकच जल्लोष झाला. त्यांची छबी टिपण्यासाठी एकाच वेळी हजारो मोबाइल सरसावले. दरम्यान अभिनेता शेट्टी यांच्या ‘सभी नटो का एकही पाना, चुनकर लाना है नवनीत राणा’ असा संवादाला उपस्थित हजारो मतदारांनी टाळांच्या कडकडाट केला.
त्यासोबतच निराधार महिला, पुरुषांना ६०० ऐवजी दोन हजार रुपये मानधन मिळण्याकरिता शासनाविरुद्ध एल्गार पुकारला जाईल. आमदार यशोमती ठाकूर आणि मी आम्ही दोघीही सोबतीने तिवस्यात विकासाची गंगा आणू असे नवनीत राणा म्हणाल्या.
राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी तिवसा व कुºहा येथे जाहीर सभेत केला. यावेळी अभिनेता सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासाठी परिसरातील युवक, महिला, असंख्य नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मंचावर रिपाइं (गवई गट) राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव नावखडे, संपर्कप्रमुख जितू दुधाने, नितीन मोहोड, हरिभाऊ मोहोड, एजाज पटेल, फिरोज शाह, माजी सभापती दिलीप काळबांडे, महादेव गारपवार, डॉ. तंवर, धीरज केने, संदेश मेश्राम, काळे, निंदाने, पप्पू देशमुख, सय्यद जहांगीर, संदीप आमले, मुकुंद देशमुख आदी उपस्थित होते.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मतदारांचा आशीर्वाद घेऊन दिल्लीत शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याची ग्वाही नवनीत राणा यांनी दिली. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी केली जाईल. प्रसंगी शेतकºयांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास मागेपुढे बघणार नाही, असा ठाम विश्वास नवनीत राणा यांनी मतदारांना दिला. मेळघाटवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या तापी धरणाचा मी पुरेपूर विरोध करीन आणि लोकसभेत हा मुद्दा येऊच देणार नाही, अशी ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथे दिली. अभिनेता सुनील शेट्टी यांनी सभेपूर्वी १० च्या सुमारास धारणीच्या प्रमुख मार्गाने रोड शो केला. नवनीत राणा यांना बळ द्या, मी पुन्हा मेळघाटात येईल, असे शेट्टी म्हणाले.
No comments:
Post a Comment