गडचिरोली दि 11-: 12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात रात्री 9.00 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सकाळी 7.00 वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली. सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले. 95 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले.एटापल्ली तालुक्यातील कसनसुर जवळील मौजा वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्या जवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्या जवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता जिल्हयात व मतदारसंघात अन्यत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
गडचिरोली येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मतदान केंद्रावर खासदार अशोक नेते व त्यांच्या पत्नी अर्चना नेते यांनी मतदान केले.तर जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी चामोर्शी येथे तर माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आञाम यानी कुटूंबियासह अहेरीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.काॅग्रेस नेते प्रा.एन.डी.किरसान यांनी आमगाव मतदारसंघातील रिसामा मतदान केंद्रावर मतदान केले.काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यानीही गडचिरोलीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
No comments:
Post a Comment