Wednesday, 10 April 2019

देवरी तालुक्यात कमी दाबाचा वीजपुरवठा



धानपिक संकटासह लघुउद्योजक संकटात

Image result for electric tower imagesदेवरी- केंद्रासह राज्य सरकार विद्युतीकरणाच्या कितीही बाता करत असले तरी ग्रामीण भागातील जनजीवन मात्र भर उन्हाळ्यात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे कमालीचा हवालदिल झाला आहे. विजेच्या सतत डोळे मिचकावणीमुळे देवरी तालुक्यातील शेतकèयांचे उन्हाळी भातपीक संकटात सापडले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने ते सुद्धा संकटात सापडले आहेत. दरम्यान, वीज कंपनीच्या सूत्रांनी 132 केव्हीमधूनच कमी दाबाची वीज मिळत असल्याने आणि वारंवार होत असलेल्या ब्रेक डाऊन्समुळे आम्ही हतबल असल्याची स्पष्ट कबुलीच दिली आहे.
सविस्तर असे की, देशातील व राज्यातील सरकार मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करून ग्रामीण जीवन सुखकर आणि प्रकाशमय केल्याच्या मोठमोठ्या जाहिरातीतून सांगत सुटले आहेत. मात्र, प्रत्यक्षात देवरी सारख्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. या भागात विद्युतीकरणाच्या नावावर मोठमोठी कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू असल्याचा देखावा मात्र सुरू आहे. पण प्रत्यक्षात याचा फायदा मात्र लोकांना होताना दिसत नाही. ग्रामीण भागात तर 160 ते 180 वोल्ट एवढा कमी दाबाचा विद्युत पुरवठा सुरू आहे. परिणामी, शेतकèयांच्या शेतातील कृषिपंप हे कार्यक्षमतेनुसार काम करीत नाही. कमी दाबाचा प्रवाह मिळत असल्याने अनेक शेतकèयांचा विद्युतपंप जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे ग्रामीण भागातील शेतकरी सांगत आहेत. याशिवाय दिवसभर लघुउद्योजक सुद्धा आपला रोजगार यापरिस्थितीत करू शकत नसल्याने तेही संकटात सापडले आहे. असे असले तरी महिना संपला रे संपला की वीज कर्मचारी मात्र वीजबिल भरण्यासाठी ग्रामीण नागरिकांवर दबाव टाकत वीज पुरवठा खंडित करण्याचा धाक दाखवत आहेत. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यात भरीस भर म्हणून या तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याप्रकरणी माहिती घेतली असता संबंधित कर्मचाèयाने लाइनचे मेंटेनन्स व्यवस्थित नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची स्पष्ट ग्वाही दिली. याशिवाय देवरी आमगाव महामार्गाचे काम सुरू असल्याने विद्युत मंडळाच्या कामात तारतम्य नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे. कामाचे योग्य नियोजन न करता वाट्टेल तेव्हा वीज पुरवठा बंद करण्याचा सपाटा वीज कंपनीने सुरू केला आहे. यासंबंधाने शहरी भागातील वीज पुरवठा योग्य करण्यासाठी ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकंदरीत, ग्रामीण भागातील शेतकèयांसह नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून वीज देयकाची वसुली मात्र शक्तीने केली जाते. याप्रकरणी लोकप्रतिनिधींची उदासीनता सुद्धा कारणीभूत ठरत आहे.

मुल्ला येथील सब स्टेशनचे काम कासव गतीने 

गेल्या दोन अडीच वर्षापासून तालुक्यातील मुल्ला येथे वीज कंपनीच्या सब स्टेशनचे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. देवरी येथील 33 केव्हीए सब स्टेशनच्या आमगाव फिडरवर अत्यंत ताण आहे. हा फिडर अत्यंत लांब आणि यावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने कमी दाबाचा वीजपुरवठा येथे नेहमीचीच डोकेदुखी ठरली आहे. कासव गतीने काम सुरू असून याकडे या क्षेत्रातील प्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष आहे. भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात या लोकप्रतिनिधींचा हातखंडा असला तरी प्रत्यक्षात कृती मात्र शून्य असल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...