गोंदिया,दि.३०:संविधान बचाव कृती समितीच्यावतीने राष्ट्रपीता महात्मा फुले, राजा सम्राट अशोक व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त ओबीसी, एस.सी.,एस.टी. अल्पसंख्याक संघटनेच्या युवक महिलांकरिता भाईचारा मैत्री कार्यक्रमांतर्गत संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मंतर चौक गांधी वार्ड छोटा गोंदिया येथे १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,जिल्हाध्यक्ष व्ही.एम. करमकर, हरिश ब्राम्हणकर, सुनील तरोने, क्रांती ब्राम्हणकर, सविता बेदरकर, शिव नागपुरे, जितेश राणे, रवि भांडारकर, गवली, यशवंत रामटेके, अबरारभाई सिद्दीकी,ओबीसी विद्यार्थी संघ जिल्हाध्यक्ष दीपक बहेकार, डॉ. सुवर्णा हुबेकर, अनिल गोंडाने, निखत खान, फिरदौस खान, चेतना रामटेककर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कठाणे, संचालन अतुल सतदेवे, अफजल शाह करणार आहेत. आयोजनाकरिता बहुजन युवा मंचचे सुनील भोंगाडे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे, पोर्णिमा नागदेवे, संजूताई खोब्रागडे, गीता मदनकर, ज्योती कापसे, ताहिरा शेख, वंदना देशभ्रतार, सुनीता वैद्य, माधुरी भेलावे, रिना भोंगाडे, आशा भांडारकर, रुपाली रोटकर, निलू मोहंती आदि परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment