या दृष्टीने संतप्त लोकांनी डिसेंबर २०१८ ला संरपंचाला या विषयी माहिती दिली पण याकडे दुर्लक्ष करन्यात आला , असा लेखीपत्र गावकऱ्यांनी सरपंचाच्या कामास कंटाळुन दैनिक वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यास दिलेले आहे.
गावातिल पाच ही हातपंप बिनकामी
20 दिवसापासुन गावातिल लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंति
सरपंचाचे गावाकडे दुर्लक्ष
गावातिल प्राथमिक शाळेतिल विहीरीचे पाणी पिण्यायोग्य योग्य नाही
देवरी : 20-उन्हाळ्याची चटक लागताच तालुक्यातील भर्रेगाव कुंभारटोला या गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे .
पाण्याविषयीची समस्या सरपंचाना २० दिवशा अगोदर सांगून सुद्धा या कडे लक्ष दिले जात नाही असे आरोप संतप्त नागरिकांनी केलेले आहे. गावात, गणेश मंदिराजवळील हातपंप क्र. २ ,हनुमान मंदीराजवळील हातपंप क्र. ३ , राजेश मेढें याच्या घरासमोरील हातपंप क्र. ४ ,प्राथमिक शाळेतिल विहीर व हातपंप, या सगळ्या पंपाचि स्थिती मागील २० दिवसापासुन खराब झाली आहे. प्राथमिक शाळेतिल विहीरीचा पाणी पिण्यायोग्य नसल्याने शाळकरी विद्यार्थांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे .
No comments:
Post a Comment