Thursday, 18 April 2019

शशिकरण नजिक ट्रेलरच्या धडकेत दुचारीस्वार ठार


सडक/अर्जुनी,दि.18 - राष्ट्रीय महामार्गावरील सशिकरण पहाळी जवळ आज  गुरूवारी  सायंकाळी साडे सहाच्या सुमारास  ट्रेलरच्या धडकेत एक मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला.

मृताचे नाव मंगेश विष्णू बनकर (वय-३२ ) रा.कोदामेडी ता.सडक/अर्जुनी असे आहे
सविस्तर असे की, शशिकरण पहाळी जवळ नागपूर कडून जाणारा ट्रेलर क्र.सी.जी.०४-५७८६ च्या चालकाने हलगर्जी पणाने ट्रेलर चालवून मोटारसायकल क्र.एम.एच.३५ ए.के.६७८७ चा चालक मंगेश विष्णू बनकर वय-३२ वर्ष रा.कोदामेडी ता.सडक/अर्जुनी  याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मंगेश हा कोदामेडीवरून नातेवाईकाचे घरी लग्न सोहळा असल्या ने पत्नी मुला सोबत बाम्हणी/खडकी येथे सोडून अहेर घेण्या करिता सडक/अर्जुनीला आला होता. बाम्हणी/खडकी ला पून्हा परत जात असतांना हा अपघात घडला.
फिर्यादी मुन्नासिंग रामसिंग ठाकूर रा.बाम्हणी/खडकी यांचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय सडक अर्जुनी येथे पाठविण्यात आले.पुढील तपास पोलिस.निरिक्षक प्रदिप अतुलकर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...