Tuesday 16 April 2019

लाचखोर पोलीस अधिकारी अटकेत




नागपूर,दि.15 : रेतीची अवैध वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास (एएसआय) लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे तो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा ‘रायटर आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रामटेक शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली.
हरिश्चंद्र ब्रह्मनोटे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर ‘एएसआयचे व राजू अवझे असे त्याच्या अटकेतील वाहनचालकाचे नाव असून, तो उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांच्या कार्यालयात ‘रायटरङ्कपदी नोकरीला आहे. सीताराम मधुकर निंबोने (४९, रा. मनसर, ता. रामटेक) हे शेतकरी असून, त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. त्यांनी अधूनमधून रेतीची वाहतूकही केली. याबाबत माहिती मिळताच हरिश्चंद्र ब्रह्मनोटे याने त्यांना कारवाई करण्याची धमकी दिली, शिवाय कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने ब्रह्मनोटे याने निंबोने यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. निंबोने यांनी होकार देताच त्याने ३२ हजार ५०० रुपयांची मागणी केली. शेवटी हा सौदा २५ हजार रुपयांवर आला आणि ही रक्कम सोमवारी (दि. १५) दुपारी देण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, सीताराम निंबोने यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. ठरल्याप्रमाणे निंबोने यांनी ब्रह्मनोटेला रक्कम देण्यासाठी रामटेक येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात बोलावले. दुपारी २ वाजताच्या सुमारास सदर रक्कम स्वीकारत असताना दबा धरून असलेल्या ‘एसीबीङ्कच्या कर्मचाक्तयांनी त्याला व त्याचा वाहनचालक राजू अवझे याला रंगेहात पकडून अटक केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई ‘एसीबीङ्कचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबीङ्कचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शेळके, हवालदार प्रवीण पडोळे, लक्ष्मण परतेती, सरोज बुधे, पसरराम साई यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...