नागपूर,दि.६ एप्रिल – भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत.
बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे. या मतदारसंघात 21 लाख मतदार आहेत.त्या मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करायचे त्यांचे मत कुणाला मिळवून द्यायचे त्या मतदाराला काय हवे त्यासाठी पुर्ण तयारी भारतीय जनता पक्षाने पेजप्रमुखच्या माध्यमातून केली आहे.तर दुसरीकडे याच मतदारसंघात काँग्रेसमध्ये अद्यापही नियोजन दिसून येत नसल्याने पटोलेंना फटका बसण्याची पुर्ण शक्यता आहे.काँग्रेसमध्ये आजही मतभेद असून वार्डपातळीवरील कार्यकर्त्यांच्या अभावामूळे पटोलेंचा प्रचार प्रत्येक गल्लीबोळीत पोचलेला नाही.भाजपने मुस्लीम मतांना आपल्या मोजणीतून बाद केलेले आहे.परंतु ही मते काँग्रेसला लाभदायक ठरणारी असतानाही मुस्लीम बहुल भागात अद्यापही काँग्रेसचे स्थानिक नेतेच पोचले नसल्याचे चित्र बेरार टाईम्सच्या चमूने मारलेल्या फेरफटके दरम्यान समोर आले आहे.एका भागात तर दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्तेसुध्दा प्रचाराला गेले नसल्याचे जाणवले.
भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी पुर्ण धनबलासह तयारी केलेली आहे.त्यात 21 लाख मतदारयादीचे 35 हजार मागेपुढे असून या 70 हजार पानाचे पेजप्रमुख भाजपने मतदारसंघात तयार केले.70 हजार पेजप्रमुखांना किमान 10 मताचे उदिष्ठ देण्यात आले आहे.त्यानुसार 7 लाख मताचे गणित भाजपने या पध्दतीने तयार केले आहे.21 लाख मतदारपैकी 14 लाख मतदान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.यात उर्वरित 7 लाख मतामध्ये 3 ते साडेतीन लाख मते ही काँग्रेसच्या नाना पटोलेंना मिळतील आणि अडीच ते तीन लाखाने भाजपचे गडकरी विजयी होतील असा अंदाज काहींचा आहे.नागपूरातील प्रचाराकडे बघितल्यास आज जो काही पटोलेंचा प्रभाव दिसून येत आहे,तो त्यांच्या वैयक्तीक प्रभावाचाच असून काँग्रेसचा एकही प्रभाव नाही.त्यातच महानगरपालिकेत फक्त 27 नगरसेवक काँग्रेसकडे आहेत.त्यापैकी आपल्या वार्डात किती मताधिक्य मिळवून देतील याबद्दल फेरफटका मारल्यावर शंका दिसून येत आहे.त्यातुलनेत भाजपकडे 100 च्यावर असलेल्या नगरसेवकापैकी जे 45 ते 50 संख्येत कुणबी समाजाचे नगरसेवक आहेत.ते मात्र गडकरींचे मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठीच कामाला लागल्याने पटोलेंना जातीय समिकरणही लाभदायक ठरणार असे दिसून येत नाही.दलितांची मते अद्यापही पटोलेंच्या बाजुने पडतील अशी शक्यता कमी असून ती वंचित बहुजन आघाडी व बसपकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या सर्व प्रकरणात भंडारा-गोंदियातील राजकारणाचाही प्रभाव पटोलेंवर पडणार आहे.पटोलेंनी जर गोंदिया भंडारामतदारसंघात पोवार समाजाच्या अपक्ष उमेदवारासाठी भूमिका जाहिर केली तर त्याचा लाभ त्यांना नागपूरात शेवटच्या घटकात मिळू शकतो परंतु पटोलें खरच मनाने भूमिका घेतील याबद्दलही विश्लेषकांत शंका व्यक्त केली जात आहे.काँग्रेसने तेली समाजाला डिवचल्याने संपुर्ण महाराष्ट्रात तेली समाज भाजपच्या पाठीशी मोंदीच्या नावावर वळू लागला आहे.या मतदारसंघात भाजपचे उमेदवार गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे भाजपचा ढोंगीपणा,ओबीसी विरोधी भूमिका,सविंधानविरोधी भूमिकेसह, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवित असले तरी सर्वाधिक भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे.ओबीसी हा अद्यापही झोपेचा सोंग घेत भाजपच्या पारड्यात संघाच्या माध्यमातून असल्याने भाजपसाठी लाभदायक मसाला आहे तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पटोलेंच्या पराभवासाठी दबा धरून बसली आहे.
No comments:
Post a Comment