भोपाळ(वृत्तसंस्था)दि.19 – भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. उमेदवारी भेटल्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.एका सभेत साध्वी म्हणाली, ‘तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितले होते. पण हेमंत करकरेंनी मात्र नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते’
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या, वाचा त्यांच्याच भाषेत…..
“वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.””ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.””मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ.”
भाजपाकडून दोनदिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment