Wednesday 31 May 2017

गोंदिया महावितरणचे अधीक्षक अभियंता कांबळे सेवानिवृत्त



गोंदिया,दि.31-  महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळातील अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शंकर रायप्पा कांबळे हे आज आपल्या सेवेची 34 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत.
सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून बी ई (इलेक्ट्रीकल) ची पदवी संपादन करून श्री कांबळे यांनी 17 फेब्रुवारी 1984 मध्ये विज वितरण कंपनीच्या सेवेत क रूजू झाले होते. त्यांनी आपल्या सेवेची सुरवात पुणे येथे कनिष्ठ अभियंता या पदापासून केली होती. श्री कांबळे हे 1990साली नासिकच्या डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग येथे सहायक अभियंता म्हणून पदोन्नत झाले. ते 1993 साली जळगाव जिल्ह्यातील रावेर त्यानंतर इगतपुरी येथे सेवा बजावली. पुढे उपकार्यकारी अभियंता म्हणून  अहमदनगरच्या बांधकाम उपविभागात कार्य केले. श्री कांबळे यांनी  कार्यकारी अभियंता म्हणून गडहिंग्लज, कोल्हापूर मंडळ, इचलकरंजी येथे कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी पार पाडली. 2012 ला वर्धा  व गडचिरोली येथे अधिक्षक अभियंता येथे ही त्यांनी काम पाहिले.
श्री कांबळे मृदू भाषी प्रशासकीय अधिकारी म्हणून विज वितरण कंपनीत ओळखले जातात. आपले सहकारी कर्मचारी-अधिकारी असोत वा जनसामान्य नागरिक यांच्यात मिसळून काम करण्याच्या शैलीमुळे ते लोकप्रिय अधिकारी त्यांनी छाप सोडली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा कंपनीला चांगला फायदा झाल्याचे मत वीज वितरण कंपनीच्या वर्तुळात बोलले जाते. आपल्या सेवेची 34 वर्षे पूर्ण करून आज कांबळे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी गोंदिया मंडळाचे मुख्य अभियंता जे एम पारधी, गोंदियाचे अधिक्षक अभियंता बोरीकर, भंडारा मंडळाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांचेसह इतर अधिकाऱ्यांनी श्री कांबळे यांच्या भावी जीवनाबद्दल सदिच्छा व्यक्त करीत त्यांना निरोप दिला.

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षावर अविश्वास पारीत; शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी



भंडारा,दि.31 : भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती. याकरिता आलेल्या संचालकांविरुद्ध रोष व्यक्त करून शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच  हाणामारी केली. तणावाच्या वातावरणात विद्यमान अध्यक्षांविरुद्ध १० विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांच्याविरूद्ध हा अविश्वास ठराव पारित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेल्या गायधने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संघातील पाच संचालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेशी हातमिळवणी केली. अखिलचे पाच व विद्यमान कार्यकारिणीतील पाच अशा दहा संचालकांनी अध्यक्षांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर हे दहाही संचालक पर्यटनवारीवर गेले होते. या दहा संचालकांमध्ये रमेश सिंगनजुडे, शंकर नखाते, रमेश काटेखाये, विजया कोरे, शिवकुमार वैद्य, अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, प्रकाश चाचेरे, संजीव बावनकर, यामिनी गिऱ्हेपुंजे यांचा समावेश आहे.
या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी १ वाजता चर्चा आयोजित केली होती. याकरिता पर्यटनवारीवरील हे दहाही संचालक पाच मिनिटांपूर्वी वाहनाने कार्यालय परिसरात दाखल झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेकडो शिक्षकांनी फुटीरवादी संचालकांविरुद्ध घोषणाबाजी केली. यातील काहींनी या संचालकांना पकडून धक्काबुक्की व मारहाण करीत कपडे फाडले. दोन शिक्षक संघटनांच्या राजकीय वर्चस्वाच्या अधिपत्यामुळे हा प्रकार घडला. आक्रमक शिक्षकांच्या तावडीतून संचालकांना कसेबसे बाहेर काढून जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. यानंतर सहाय्यक उपनिबंधक एस.जे. हटवार व सहकार अधिकारी श्रेणी २ चे निलेश जिभकाटे यांच्यापुढे या दहाही संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. चर्चेदरम्यान पतसंस्थेचे संचालक रमेश सिंगनजुडे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आणि त्याला उपस्थित नऊ संचालकांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अन्य एक संचालक गैरहजर होते.

प्रतिकूल परिस्थितीतही पती-पत्नी आणि वहिनीने गाठले ध्येय

नागपूर - प्रतिकूल परिस्थितीने शिक्षणाची वाट अडविली. काळानेच शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याची जाणीव करून दिली. गरज ओळखून पती-पत्नीने शिक्षण पूर्ण करण्याचा  ध्यास घेतला. अल्पशिक्षित वहिनीनेसुद्धा या निर्णयाला बळ देत त्यांच्याच सोबतीने अभ्यास करण्याचा निर्धार केला. तिघांनीही बारावीच्या परीक्षेत एकत्रितच यश संपादित केले. हे चित्रपटाचे कथानक नाही, तर उपराजधानीतील गजभिये कुटुंबीयांनी साकारलेले वास्तव आहे.
नारी मार्गावारील दीपकनगरात गजभिये कुटुंब वास्तव्यास आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे विनोद गजभिये (४२) यांना शिक्षण थांबवून रोजगाराची कास धरावी लागली. पत्नी सुनीता गजभिये (३६) व वहिनी स्वर्णा गजभिये (३४) यांनासुद्धा अपेक्षेनुसार शिक्षण पूर्ण करता आले नाही. शिक्षण कमी असल्याने त्यांच्यापुढे सातत्याने अडचणी येत होत्या. मुलांनाही अभ्यासात सहकार्य करू शकत नसल्याची रुखरूख मनात होती.
दोन वर्षांपूर्वी सुनीता व विनोद यांनी दहावीची परीक्षा देण्याचे ठरविले. वहिनी स्वर्णा यांनीही त्यांच्या सोबतीने अर्ज केला. दहावीत मिळालेल्या यशाने त्यांना पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळाली. कामाच्या व्यापामुळे दिवसा शिकणे शक्‍य नसल्याने त्यांनी बर्डीतील जवाहर नाईट ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. विनोद व सुनीता यांचा मुलगा सत्वम मॉडर्न स्कूलचा विद्यार्थी असून, दहावीची परीक्षा तोंडावर असतानाही तो पालकांना इंग्रजी विषयाशी संबंधित मार्गदर्शन करीत होता.
मुलाकडून शिकण्याचे न्यून न बाळगता त्यावर अभिमान व्यक्त करीत होते. कुटुंबाच्या या परिश्रमावर आजच्या निकालाने यशाची मोहर उमटली. सुनीता यांनी ६७ टक्के, विनोद यांनी ४९ टक्के, तर स्वर्णा यांनी ५६ टक्के गुण पटकावले. परिश्रम आणि शिक्षकांमुळेच हे शक्‍य होऊ शकल्याची प्रतिक्रिया तिघांनीही नोंदविली. जवाहर नाईट कॉलेजच्या ६६ टक्के विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीत यश संपादित केले असून, शहरातील सायंकालीन महाविद्यालयांमधून कॉलेजने टॉप  केले आहे.
शिक्षणासाठी नोकरीवर पाणी
सुनीता आणि स्वर्णा या गृहिणी असून, विनोद खासगी नोकरी करून संसाराचा गाडा ओढतात. जीवनात यशासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याची जाणीव झाली. परंतु, ऐन परीक्षाकाळातच नोकरीमुळे अभ्यासात व्यत्यय येत होता. यामुळे विनोद यांनी परीक्षेला महत्त्व देत नोकरीवर पाणी सोडले. आज मिळेल ते काम करून ते संसाराला हातभार लावत आहेत. प्रत्येकाने किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे मत विनोद यांनी व्यक्त केले.

बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण


Beef fest: IIT-M scholar attacked by right-wing students

चेन्नई,दि.31(वृत्तसंस्था) - मद्रास आयआयटीमध्ये बीफ फेस्टिव्हल आयोजित केल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून एका पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. 
आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) संबंधित हा विद्यार्थी असून, त्याच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. आर. सुरज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मद्रास आयआयटीमध्ये तो डिपार्टमेंट ऑफ एरोस्पेसमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या डोळ्याला जखम झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मित्रांसोबत जेवण करण्यासाठी जात असताना त्याच्यावर उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून हल्ला करण्यात आला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मनीष व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. केंद्राच्या निर्णयाला विरोध म्हणून मद्रास आयआयटीमध्ये 28 मे रोजी बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये सुरजसह अन्य दोन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट


Kabul Blast: Massive explosion near Indian Embassy in Afghan capital, no casualties reported

काबूल,दि.31(वृत्तसंस्था) - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. मात्र, या स्फोटात दुतावासातील एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नाही. मात्र, या स्फोटात 60 जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भारतीय दुतावासापासून दीड किमी अंतरावर हा शक्तीशाली स्फोट झाला. इराणच्या दुतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटात 60 जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. स्फोटानंतर भारतीय दुतावासाच्या इमारतीच्या काच्या फुटल्या. या स्फोटानंतर भारतीय दुतावासातील सर्वजण सुखरुप आहेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे.
काबूलमधील वजीर अकबर खान भागात असलेल्या इराणच्या दुतावासाला लक्ष्य करुन स्फोट घडविण्यात आला. अध्यक्षांचे निवासस्थानही स्फोटाच्या ठिकाणापासून जवळच आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आलेली नाही.

सत्तेचा माज आणि नेत्यांची दादागिरी


संपादकीय

सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तोल सुटत असल्याच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. लोकशाही असलेल्या देशात गेल्या तीन वर्षात राजकीय मूल्ये पायदळी तुडविल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे..  लोकशाही राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपापली भूमिका बजावत असताना नैतिक मूल्ये सुद्धा जपायची असतात. एकमेकांचा अनादर वा अपमान होणार नाही, याची दक्षता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी घेणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या तीन वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपच्या काही नेत्यांना आपण काहीही केले वा बोलले तर आपले कोणीही वाकडे करू शकत नसल्याची भावना वाढीस लागल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी ओबीसी समाजातील कार्यकर्ते राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या ना. राजकुमार बडोले यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी उद्धट भाषेचा वापर करून ओबीसी समाजाची चांगलीच धुवून काढली होती. ती घटना ओबीसी अद्यापही विसरलेले नाहीत. एका मंत्र्याने बहुसंख्य समाजाचा असा अपमान करण्याची राज्यातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. अलीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शेतकऱ्यांविषयी अपशब्द काढले. देशाचा पोशिंदा असलेल्या बाळिराजाला शिवराळ भाषेत बोलताना निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वासनाचे भान राहू नये, हे न समजण्याइतपत दानवे साहेब दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यानंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच आव्हान देत मारहाणीची भाषा वापरली. त्याचाच कित्ता गिरवत गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी तर गोंदियाच्या बाजार समितीच्या उपाध्यक्षाला चक्क आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांदेखत मारपीट करण्याची जाहीर धमकी दिली. ही घटना घडली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सभागृह सोडले तर आमदार परिणय फुके यांनी अग्रवाल यांच्या वागण्यावर नापसंती व्यक्त केली. यावरून जनतेने काय समजायचे. या घटनेतून विनोद अग्रवाल यांचा ओबीसी समाजावर असलेला राग अधोरेखित होतो. विनोद अग्रवाल विरोधी पक्षात असताना ते आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावर कशा प्रकारे टीका करायचे याचे भान आता विनोद अग्रवाल यांना राहिलेले नाही. भाजपला देशात व राज्यात पूर्णरुपाने सत्तेत येऊन केवळ तीनच वर्षे झाली आहेत. त्यातही विनोद अग्रवाल हे भाजपचे केवळ माजी अध्यक्ष आहेत. तरी पण त्यांनी ठाकरे यांना अधिकारी-पदाधिकारी यांच्या समोर मारण्याची जाहीर धमकी दिली. जर ते आमदार असते तर काय झाले असते, याची कल्पना केली तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आमदार अग्रवाल यांच्यावर आरोप करणारे भाजपचे हे पदाधिकारी आता कोणती भाषा करीत आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
देशात मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपला सत्ता मिळाली, असे बोलले जात असले तरी भाजपच्या काही नेत्यांना कदाचित ते मान्य नसावे. किंबहुना आपण जनतेची आयबहीण एक केली तरी आपली सत्ता कोणी हिरावू शकत नाही, अशी गरमी या नेत्यांमध्ये तर आली नसावी ना? या सर्व बाबींचा विचार भाजप श्रेष्ठींना करण्याची वेळ आली आहे. अन्यथा मोदींनी कमावले आणि वाचाळ नेत्यांनी लुटले, अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. आमदार परिणय फुके यांच्या समोर घडलेल्या या प्रकाराची खुद्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घ्यावी, असा विचार सामाजिक स्तरावरून प्रकट होत आहे. भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांमध्ये पैसा आणि सत्ता यामुळे निर्माण झालेला घमेंड कोणत्या स्तराला जाईल, याचा सध्या तरी नेम नाही. अशा नेत्यांच्या कृत्यांविषयी पक्षाने सारवासारव करण्याची वृत्ती सोडून जनतेला दम देणाèयांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे. 

BERARTIMES-31MAY-6JUNE_2017





Saturday 27 May 2017

गोंदिया जिपचे डेप्युटी सीईओ पुराम यांची बदली


गोंदिया,दि.२६- गोंदिया जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ राजकुमार पुराम यांच्या जागी भंडारा जि.पचे डेप्युटी सीईओ एस.एस.वाळके यांची बदली करण्यात आली आहे.पुराम यांना मात्र कुठलेही ठिकाण दिलेले नाही.वाळके यांच्या जागेवर भंडारा बीडीओ मंजुषा भेदे यांची बदली करण्यात आली.आमगाव पंचायत समितीचे बीडीओ म्हणून ठाणे जिप चे डेप्युटी सीईओ ए.एस.पाटील यांची बदली करण्यात आली.तर रायगडचे डेप्युटी सीईओ राजेश कुलकर्णी यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

Friday 26 May 2017

विठोबा समूहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार



नागपूर,दि.26 : आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट या क्षेत्रात आघाडीच्या विठोबा समूहाला लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि भारत लघु व मध्यम उद्योग फोरमच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले.केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन शेंडे यांना पुरस्कार, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावर्षीच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी निवडण्यात आलेल्या १०० कंपन्यांमध्ये विठोबा समूहाचा समावेश आहे, हे विशेष.
आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात कंपनीने दिलेल्या योगदानाची दखल घेत मिश्र यांनी समूहाची प्रशंसा केली. कार्यक्रमात अ‍ॅक्सिस बँक लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका शिखा शर्मा, लघु आणि मध्यम उद्योग फोरमचे प्रल्हाद कक्कड आणि विनोद कुमार उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कंपन्यांमधून १०० कंपन्यांची निवड करण्यात आली. एक परिपूर्ण आयुर्वेदिक उत्पादन देशातील गल्ली-चौकातील दुकानांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपला प्राचीन आयुर्वेदिक खजिना आकर्षक पॅकिंग आणि विविध आकारात उपलब्ध करून देणे, हा कंपनीसाठी समाधानाचा विषय आहे. सर्व ठिकाणी विठोबा उत्पादनांची मागणी वाढत असून, ग्राहकांचा विश्वास आणि संतुष्टी विठोबाच्या चमूसाठी प्रेरणास्थान आहे.

Friday 19 May 2017

भीषण अपघातात दोन ट्रक जाळून खाक

देवरी: १९मे (सुजित टेटे)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर देवरी पासून 10 किलोमीटर अंतरावरील मासुलकसा घाटात आज सकाळी दोन जड वाहनांची धडक झाल्याने भीषण अपघात घडला. अपघात इतके भीषण होते की अपघात ग्रस्त दोन्ही ट्रकला जागीच आग लागली.  दोन्ही ट्रक जाळून खाक झाले.  वृत्त लिहित पर्यंत या भीषण आगीत किती जीवित हानी झाली हे कळू शकले नाही. आग इतकि भीषण होती की कुठलेही मदतकार्य आणि बचाव कार्य वेळे वर पोहचु शकले नाही.

विशेष म्हणजे भीषण आग लागण्याची ही देवरी येथील १५-२० दिवसातील ही दूसरी घटना आहे. या आधी वन विभागाच्या डेपोला भीषण आग लागुन लाखों चा लाकुड़ जाळून खाक झाला.
वारंवार घडणाऱ्या या घटनामुळे देवरी नगरपंचायत आगी पासुन सुरक्षित आहे की नाही ? अशा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करुन बसला आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेची मागणी सर्व नागरिकांनी केली आहे.  

Wednesday 17 May 2017

सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराजांवर मुंबईत प्राणघातक हल्ला


आकोट (जि. अकोला) : सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंधश्रद्वा, व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज आपल्या पुरोगामी विचारसरणीतून प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव दादर येथे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्र काढले. या गर्दीत तोंडाला बांधून एक युवक महाराजांजवळ पोहोचला आणि त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्याचे नाटक करुन चाकूने पोटावर वार केले.
सत्यपाल महाराजांनी लगेच स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले.
जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सत्यपाल विश्वनाथ चिंंचोळकर महाराज यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, आरोपी किशोर जाधव याच्याविरुद्ध भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
हल्ल्यामागचा उद्देश काय?
सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी आहे. कुणालने महाराजांवर हल्ला का केला, याची पोलीस कसून चौकशी करत असून, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा असून, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करतो. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करतो. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी माझ्यावरही हल्ला झाला, या हल्ल्याने आपण विचलीत झालो नसून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार.
– सत्यपाल महाराज, सप्त खंजिरीवादक

नोटाबंदीनंतर देशभरात ९१ लाख नवे करदाते वाढले



नवी दिल्ली,दि.17: केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाची पाठराखण केली. या निर्णयामुळे ९१ लाख लोक नव्याने कराच्या कक्षेत आल्याचा दावा जेटली यांनी केला. काळ्या पैशाविरोधात मोहीम तीव्र करण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन क्लिन मनी' ही नवीन वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटचे अनावरण जेटली यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २0१६ रोजी ५00 आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयानंतर डिजिटायझेशनचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढला. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे अत्यंत आवश्यक होते. रोखीचे व्यवहार कमी झाले. जास्तीत जास्त लोक कारवाईच्या भीतीने कराच्या कक्षेत आले. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कररूपाने जमा होणार्‍या महसुलात वाढ झाली. सुमारे ९१ लाख नवे करदाते या निर्णयानंतर तयार झाले. आयकर भरणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली. एकूणच नोटाबंदी आणि काळ्या पैशांच्या विरोधात सरकारने छेडलेल्या व्यापक मोहिमेमुळे मोठे व्यवहार रोखीने करून कर चुकवेगिरी करणार्‍यांना आता आपली काही खैर नाही, हे कळून चुकले, असे जेटली याप्रसंगी म्हणाले. 'ऑपरेशन क्लिन मनी' या वेबसाईटमुळे काळ्या पैशाच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र होईल. मात्र प्रामाणिक करदात्यांना याचा फायदा होईल, असेही जेटली पुढे म्हणाले.

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर सरचार्ज वाढवून दिला झटका

मुंबई, दि. 17 - तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण त्याचा महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार कदापि नाही. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होताच महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी घट झाली असली तरी, महाराष्ट्रात प्रत्यक्षात फक्त 1 रुपयांचीच घट झाली आहे. 
 
सोमवारी रात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 16 पैशांची  तर डिझेलच्या किंमतीत प्रती लीटर  2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. राज्यसरकारने मंगळवारी रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली. 
 
त्यामुळे या दर कपातीची महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रण मुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी-जास्त करत असतात.  1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती.  त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी  पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती. 

पाणी व स्वच्छता विभाग सिनिअरांवर ‘मेहरबान‘ का?


  • नवशिक्यांच्या खांद्यावर हागणदारीमुक्तीची जबाबदारी
  • जुने मात्र एसीची हवा खाण्यासाठी?

गोंदिया,दि.१७(berartimes.com)- राज्यातील सर्व ग्राम पंचायती हागणंदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात रोटेशन पद्धतीने सध्या नियुक्ती करणे सुरू आहे. दरम्यान, सरकारी तिजोरीवर ताण कमी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत कायम न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवाय अशा कर्मचाऱ्यांना तीन वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ठेवू नये, असे आदेश देखील आहेत. असे असताना या विभागात नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरूपात जिल्ह्याबाहेर नियुक्ती दिली जात आहे. मात्र, अनुभव व सेवेने ज्येष्ठ असताना सुद्धा या विभागातील जुन्या जाणत्या कर्मचाऱ्यांना कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी कायम ठेवले जात आहे. परिणामी, राज्यातील पाणी व स्वच्छता विभाग या मुरब्बी कर्मचाऱ्यांवर मेहरबान कसा? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील सर्व ग्राम पंचायती येत्या दोन महिन्यात हागणदारी मुक्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यातील २३ जिल्ह्यात प्रपत्र अ नुसार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि तालुकास्तरावर गट साधन केंद्र सल्लागार व तज्ज्ञ यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देणे आहे. या कर्मचाऱ्यांना मानधन म्हणून ७ हजार, प्रोत्साहन मानधन म्हणून ५ हजार तर तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना ४ हजार व इतर देय असलेले भत्ते देण्यात येणार आहेत. या अभियानात एका जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची चमू दुसऱ्या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने सोपविलेला तालुका पूर्णतः हागणदारीमुक्त होईपर्यंत कार्य करणार आहे.
या धोरणानुसार शासनाने काही नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुद्धा नेमणूक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे पाणी व स्वच्छता विभागाने जे जिल्हे अद्यापही हांगणदारीमध्ये मागे आहेत, अशा जिल्ह्यांची निवड करून दुसऱ्या जिल्ह्यातील चमूची तेथे नेमणूक केली गेली असली तरी संबंधित विभाग या मोहीमेप्रती उदासीन असल्याचे या नियुक्त्यांवरून स्पष्ट होत आहे. जे कर्मचारी या विभागात कंत्राटी तत्वावर गेल्या ५-१० वर्षापासून कार्यरत आहेत, अशांची इतर जिल्ह्यात नेमणूक का करण्यात आली नाही, असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.
विशेष म्हणजे या विभागात जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा या निमित्ताने प्रश्नचिन्ह लावला जात आहे. कोट्यवधीचा निधी उधळून सुद्धा ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यात या विभागाला अपयश आले आहे. यामुळे आता नव्या दमाचे कर्मचारी नेमण्याची नामुष्की या विभागावर आली आहे. जुन्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विभागाचा विश्वास राहिला नसल्याने त्यांची अभियानाच्या यशस्वितेसाठी बदली करण्यात आली नसावी, अशी शंका व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षापासून या कर्मचाऱ्यांवर शासकीय निधीची उधळपट्टी सुरू आहे. तरी राज्यातील ग्रामपंचायती अद्यापही हागणंदारी मुक्त होऊ शकल्या नाहीत. आता तर एकदम नव्या कर्मचाऱ्यांची बाहेर जिल्ह्यात नेमणूक केली जात आहे. असे असताना जुन्या व अनुभवी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या बदल्यांची शासनाने तरतूद केली असताना त्यांचा मुक्काम आहे तेथेच कायम ठेवण्यात आला आहे. जर या विभागाला हांगणदारी मोहिमेचे गांभीर्य कळले असते तर त्यांनी या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण केले असते. या विभागातील अशा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर संबंधितांचा विश्वास नसेल तर अशा कर्मचाऱ्यांचा समाजाच्या कोणत्या फायद्यासाठी पोसले जात आहे, हे कळायला मार्ग नाही.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू


गोंदिया दि.१७(berartimes.com): कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने पुन्हा बालाजी नर्सिंग होम येथे तिला दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती आटोक्याबाहेर असल्याचे सांगून बालाजी नर्सिंग होम येथील डॉक्टरांनी तिला केएमजे नर्सिंग होम येथे हलविण्याचा सल्ला दिला. केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१५) दुपारी १२ वाजताची आहे. मुस्कान योगेश समुद्रे (३१) रा. गोंदिया असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेवरुन केएमजे रुग्णालयात मृताच्या कुटुंबीयांनी चांगलाच संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे केएमजे नर्सिंग होमचे मुख्य डॉक्टर जायस्वाल यांनी सदर महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास चक्क नाकारले. यावरुन सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप करण्यात आला आहे.सविस्तर असे की, मुस्कान योगेश समुद्रे या महिलेला दोन अपत्य असल्यामुळे १२ मे रोजी बालाजी नर्सिंग होममध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. दोन दिवसानंतर मुस्कानला नर्सिंग होममधून सुट्टी देण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पोटात दुखने सुरु झाल्याने तिला पुन्हा बालाजी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यातच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने बालाजी नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी तिला केएमजे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.यावरुन कुटुंबीयांनी वेळ वाया न घालविता त्वरित मुस्कानला केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान तिचा केएमजे रुग्णालयात मृत्यू झाला. यावर मृताच्या कुटुंबीयांनी केएमजे नर्सिंग होमच्या मुख्य डॉक्टराला मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चक्क नकार दिला. यावरुन रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, पोलिसांना पाचारण करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

BERARTIMES_17-23_MAY_2017





Tuesday 16 May 2017

मुरमाडीच्या ग्रामीण बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा सात लाखाची रक्कम लंपास


गोंदिया,दि.16 (berartimes.com)-तिरोडा तालुक्यातील मुरमाडीच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेवर आज मंगळवारला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञातबंदुकधारी व्यक्तींनी दरोडा घालून अंदाजे सात लाख रुपयाची रोख लंपास केल्याची घटना घडली.पोलिस सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुकामुख्यालयापासून 20 किलोमिटरवर मुरमाडी हे गाव आहे.येथे विदर्भ कोंकण ग्रामीण बंकेची शाखा असून दररोजप्रमाणे आजही नियमित कामकाज सुरु हाेता.अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तीन ते चार बंदुकधारी व्यक्तींनी बँकेत प्रवेश करुन त्यावेळी बँकेत हजर असलेल्या तीन ते चार ग्राहकांसह बँकेतील कर्मचारी व व्यवस्थापकांना दमदाटी करुन धमकावले.आणि कॅशियरकडे असलेली रक्कम व इतर अशी अंदाजे सहा ते सात लाख रुपयाची रोखड घेऊन पसार होत असतानाच  बँकेतील काच बंदुकीने फोडले.काचफोडतेवेळी त्या बंदुकधारीपैकी एकाला लागल्याने त्याच्या हाताचे रक्त सुध्दा तिथे पडल्याचे सांगितले.रक्कम घेऊन हे अज्ञात बंदुकधारी पसार झाले असून तिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.पोलीस निरिक्षक संदिप कोळी आपल्या पथकासह तपास करीत असून उपविभागीय पोलीस अधिकारी हे सुध्दा घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

नाभिक शहर युवा अध्यक्षपदी विक्रम राजूरकर यांची नियुक्ती




गोंदिया,दि.16 : गोंदिया जिल्हा नाभिक युवा महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांनी प्रदेश युवाध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर युवा अध्यक्ष पदावर येथील सामाजिक युवा कार्यकर्ता विक्रम विठोबा राजूरकर यांची निवड केली आहे.
राजूरकर यांनी आपल्या निुयक्तीचे श्रेय प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, बारबर असो. अध्यक्ष राजुकुमार प्रतापगडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव भाकरे, सचिव दुलिराम भाकरे, तालुकाध्यक्ष भूमेश मेश्राम, प्रदिप लांजेवार यांना दिले असून त्यांच्या नियुक्तीवर कैलाश क्षिरसागर, राज श्रीवास, शंकर आतकर, राकेश श्रीवास, मुरली नागपूरे, हेमंत कौशल, जितू सूर्यवंशी, कमलेश लांजेवार, सुनील लांजेवार, गोलू घोटेकार यांनी अभिनंदन केले.Facebook
TwitterGoEmail

माजी वित्तमंत्री चिदंबरम यांच्या निवासावर सीबीआयची धाड



नवी दिल्ली, दि. 16 - माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्थी चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर आज मंगळवारी सकाळी सीबीआयने धाड टाकली. गेल्या महिन्यात कार्थी चिदंबरम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कार्थी चिदंबरमशी संबंधित असलेल्या या कंपनीवर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 
एअरसेल-मॅक्सिस आर्थिक व्यवहार प्रकरणी सुद्धा त्याची चौकशी सुरु आहे. अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांचे संचालक आणि कार्थी चिदंबरमला ईडीने कारणेदाखवा नोटीस बजावली होती. एअरसेल-मॅक्सिस करारात आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप झाल्यानंतर . अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ईडीच्या रडारवर आली. 
केंद्र सरकारला माझा आवाज बंद करायचा आहे- चिदंबरम 
केंद्र सरकार सीबीआयसह अन्य सरकारी यंत्रणांचा वापर करुन मला, माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य करत आहे. सरकारला माझा आवाज बंद करायचा आहे. मला लेखन करण्यापासून सरकारला रोखायचे आहे. यापूर्वी विरोधीपक्ष, पत्रकार, स्तंभलेखक आणि एनजीओंची जशी कोंडी केली, तशी त्यांना माझी कोंडी करायची आहे असे चिंदबरम म्हणाले. 
दरम्यान, काँग्रेसनेही चिदंबरम यांचा बचाव केला आहे. चिदंबरम यांनी काहीही चुकीचे केलेले नसून हे छापे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत असे काँग्रेस नेते के.आर.रामासामी म्हणाले. मागची तीन वर्ष तुम्ही काय करत होता ?. तुमच्याकडे पुरावे असतील तर सिद्ध करा. तुम्ही प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहात. भारतातील जनता हे सर्व बघत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडाक्कन यांनी या छाप्यांवर दिली. 

Monday 15 May 2017

अकोला :शेतकऱ्याचा तहसील कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न


farmer attempt suicide in Akola

अकोला - मुर्तिजापूर तालुक्यातील चिखली येथील शेतकरी वासुदेव आकाराम राऊत या शेतकऱ्याने आज (साेमवार) सकाळी पावणेबाराच्या सुमारास तहसील कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी धाव घेत त्याला थांबवल्याने अनर्थ टळला.
या शेतकऱ्याला शेतीची नाेंद करून देण्यासाठी त्रास दिला जात हाेता. आज ताे सातबारा मागायला आला. मात्र त्याला उशीर झाल्याने त्याने तहसील कार्यालयाबाहेर जावून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी धाव घेत त्याला अडवले. त्यामुळे अनर्थ टळला.
तहसीलदार राहूल तायडे यांनी घटनेची दखल घेत शेतकऱ्याला तत्काळ सातबारा उपलब्ध करून दिला.

गडकरींच्या वाड्यावरून शेतकऱ्याला माघारी पाठविले



Indian Farmerनागपूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरून अपमान केल्याचे प्रकरण ताजे असताना आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन निघालेल्या सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील शेतकरी विजय जाधव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यास गेले होते. त्या वेळी निवासस्थानी मंत्री गडकरी यांची भेट घेऊ न देता अपमानास्पद वागणूक देऊन परत पाठविल्याचा आरोप झाल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
गेल्या 6 मेपासून कोल्हापूर येथून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थी व रक्षा कलश दर्शन यात्रा विजय जाधव यांनी सुरू केली. आज ते सकाळी नागपुरात पोचले. त्यांनी नितीन गडकरींना भेटण्यासाठी त्यांचे महाल भागातील निवासस्थान गाठले. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना पहिल्यांदा प्रवेश दिला नाही. काही वेळाने गडकरींचे स्वीय सहायक कार्यालयात आले. नितीन गडकरी घरी असूनही स्वीय सहायकांनी गडकरी साहेबांशी भेट होऊ दिली नाही. निवेदन मलाच द्या. सही करून तुम्हाला रिसिव्हड देतो, असे त्यांच्या स्वीय सहायकांनी सांगितले. मला केवळ गडकरींना भेटायचे आहे, असे जाधव यांनी सांगितल्यानंतर स्वीय सहायकांनी निवेदन मला द्यायचे असेल तर द्या नाही तर येथून निघा, असा दम भरल्याचा आरोप जाधव यांनी केला. गडकरींची भेट न झाल्याने जाधव पुढे अमरावतीकडे रवाना झाले. अमरावती येथे ते प्रहार संस्थेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत.
अपमानास्पद वागणूक दिली नाही - देऊळगावकर
या संदर्भात नितीन गडकरी यांचे स्वीय सहायक सुधीर देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, विजय जाधव यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा इन्कार त्यांनी केला. नितीन गडकरी साहेब पहाटे परदेशातून आल्यामुळे ते सध्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. आपण निवेदन द्या, ते स्वाक्षरी करून तुम्हाला देतो, असे सांगितले होते. जाधव यांनी निवेदन देण्यास नकार दिला. यात अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे देऊळगावकर म्हणाले.

पॅन’, ‘आधार’मधील चुका सुधारा एका क्लिकवर!


aadhar

नवी दिल्ली,दि.15 (वृत्तसंस्था)- नागरिकांना आता एका क्लिकवरुन पॅन कार्ड आणि आधार कार्डात झालेल्या चुका दुरुस्त करता येणार आहेत. प्राप्तिकर विभागाने पॅन आणि आधार कार्डावरील नाव किंवा इतर तपशीलात बदल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
याअंतर्गत प्राप्तिकर विभागाने वेबसाईटवर दोन लिंक उपलब्ध करुन दिल्या आहेत. पहिल्या लिंकवर क्लिक करुन पॅन कार्डातील चुका दुरुस्त होतील. तसेच या लिंकवरुन नव्या पॅन कार्डसाठीदेखील अर्ज करता येणार आहे. आधार कार्डावरील तपशीलात बदल करण्यासाठी दुसरी स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
आतापर्यंत देशातील सुमारे 1.22 कोटी करदात्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडले आहे. परंतु, देशात आधारकार्डधारकांची संख्या तब्बल 111 कोटी असून पॅनकार्डधारकांची 25 कोटीएवढी आहे. यामुळे सर्व नागरिकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.
देशातील सर्व नागरिकांना येत्या 1 जुलैपर्यंत पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर आपल्या आधार कार्डासोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील प्राप्तिकर संकलन वाढवण्यासाठी आणि करचुकवेगिरी करणार्‍या लोकांवर लगाम लावण्यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत.

कुलभूषण खटल्यासाठी साळवेंची रोजची फी 30 लाख


Harish Salve

हेग - पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) खटला लढण्यासाठी भारताने दररोज तब्बल 30 लाख फी घेणारे वकील हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे. हरिश साळवे यांनी 2015 मध्ये सलमान खानचा हिट अँड रन प्रकरणी खटला लढला होता. या खटल्यातून सलमान निर्दोष सुटला होता.
कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली होती. आता या प्रकरणी आज (सोमवार) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु असून, हरिश साळवे भारताची बाजू मांडत आहेत. साळवे यांनी युक्तिवादा दरम्यान पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. पाकने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. साळवे यांच्यावर भारतीयांच्या आशा टिकून आहेत.
कोण आहेत हरिश साळवे?
  • जन्म नागपूरचा. आजोबा पी. के. साळवे प्रसिद्ध वकील
  • अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1999 ते 2002 भारताचे सॉलिसिटर जनरल होते
  • सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढविल्यानंतर तो घेण्यास त्यांनी नकार दिला होता
  • साळवे यांची रोजची फी  30 लाख रुपये
  • फी च्या आकड्यामुळे साळवे सर्वप्रथम आले चर्चेत 
  • मुलायमसिंह, प्रकाशसिंह बादल, मुकेश अंबानी यांसह अनेक प्रसिद्ध नेते, उद्योगपतींचे खटले त्यांनी लढले आहेत
  • मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील खटल्यात त्यांनी विजय मिळविला होता
  • मुकेश अंबानी यांच्याबाजूने खटला लढून त्यांनी 15 कोटी रुपये फी घेतली होती.
  • 2015 मध्ये सलमान खानचा हिट अँड रन प्रकरणी खटला लढला आणि तो निर्दोष मुक्त झाला
  • व्होडाफोनपासून रतन टाटा यांच्यापर्यंत सर्वांचे खटले साळवे यांनी लढले आहेत
  • साळवे यांच्याकडे लक्झरी बेंटले कार असून, गोव्यात हॉलिडे होम आहे
  • साळवे कपडे खरेदी करण्यासाठी लंडनला जातात, असेही बोलले जाते

लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे निधन



गोंदिया,दि.15(berartimes.com)-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध निवासी लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे आज सोमवारला(दि.15) दुपारी 3.30 वाजता  हृद्यविकाराच्या झटक्याने डाॅ.कापगते यांच्या रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनामूळे एक चांगला व्यक्तिमत्व निसर्गप्रेमी हरपला आहे.भारतीय जनता पक्षाचे ते वरिष्ठ पदाधिकारी होते.कापगते यांनी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद,गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी उत्पादक संघाचे सदस्य,अर्जुनी मोरगाव तालुका खरेदी विक्री सहकारी,मत्स्य सहकारी संस्थामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार असून उद्या मंगळवारला सकाळी 9 वाजता त्यांच्यावर नवेगावबांध येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले, दोन मुली सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.विशेष म्हणजे त्यांनी पोलिटिकल सांयस व इतिहासात डबल एमए केलेेले असून ते कायद्याचे जाणकार होते.
माजी आमदार दयाराम कापगते यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणुक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढविली होती.त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रमिला कुंटे यांचा पराभव करीत विजय संपादन केला होता.त्यानंतर मात्र 1999 च्या निवडणुकीत लाखांदूर मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.त्यांचा पराभव नाना पटोले यांनी केला होता.दय्रारामभाऊनी नवेगावबांधचा पर्यटन विकास व्हावा यासाठी मोठ्याप्रमाणात आपले योगदान दिले आहे.परिसरातील जंगली प्राण्यामुळे गावातील नागरिकांना धोका होऊ नये यासाठी वन्यजीव व वनविभागाच्या अधिकार्यांशी समन्वय ठेवून त्यांना सातत्याने नवेगावबांध अभयारण्यातील वन्यजीवांच्या रक्षणासाठीच नव्हे तर जंगल रक्षणासाठीही हिरहिरीने त्यांनी पुढाकार घेतला होता.
पक्षाचेच नव्हे तर आमचे आधारस्तंभ हरपले-पालकमंत्री राजकुमार बडोले
लाखांदूर मतदारसंघाचे माजी आमदार व गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष राहिलेले दयारामभाऊ कापगते यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचेच आधारस्तंभ नव्हे तर सर्वसामान्य माझ्यासारख्या व्यक्तीचेही आधारस्तंभ हरपले असून त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.दयारामभाऊनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासात्मक कार्यामूळेच त्यांची जनमानसात सर्वमान्य नेते म्हणून ओळख होती.त्यांच्याच कार्यकाळात इटियाडोह धरणाच्या पाळीची उंची वाढून सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होऊन मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर समृध्द झाला.त्यानी नेहमीच समाजासाठीच कार्य केले असून लहान मोठा कधीच भेदभाव न करता काम कऱणारे दयाराम कापगते यांच्या निधनाने पक्षाची व जिल्ह्याची हाणी झाली असून ती भरुन निघणे कठीण आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशीच इश्वरचरणी प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना व्यक्त केली आहे.
कुशल संघटक व्यक्तिमत्वाचे धनी-माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आमचे सहकारी मित्र दयारामभाऊ कापगते यांच्या निधनाने एक चांगला कुशल संघटक,मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे धनी असलेले व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या निधनाने अर्जुनी मोरगाव तालुक्याचेच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार व माजी आमदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी व्यक्त केली आहे.
कापगतेच्या निधनाने कुशल संघटकाची पोकळी भरुन निघणे कठिण-खासदार नाना पटोले
आमचे वरिष्ट मार्गदर्शक राहिलेले दयारामभाऊच्या निधनाचे वृत्त कळताच आपला पहिल्यांदा विश्वासच बसेना.कारण त्यांच्यासारखी चांगली व्यक्तिमत्व अचानक आम्हाला कशी काय सोडून जाऊ शकते.परंतु ईश्वरासमोर कुणाचेही चालत नसते त्यांना सकाळीच कसे तरी वाटू लागल्याने ते तपासणीसाठी गेले आणि त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.त्यांच्या या निधनामुळे भाजपमध्येच नव्हे तर इतर पक्षातही त्यांच्या संघटनात्मक बांधिलकीची चर्चा व्हायची असे ते कुशल संघटक होते.आपण त्यांच्यासोबत निवडणुक लढून जिंकलो असलो तरी कधीही त्यांनी त्याचे वाईट न मानता नेहमीच प्रत्येक कार्यात मला सहकार्य केले.आजही मी जे काही आहे त्यांच्याच महत्वाचा वाटा दयारामभाऊंचा असून त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरुन निघणे खूप कठिण असल्याची प्रतिक्रिया खासदार नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केली.

उद्योगपती नारायणदास सराफ यांचे निधन

नवी दिल्ली ,दि.१५ प्रतिष्ठित उद्योगपती नारायणदास सराफ यांचे आज नवि दिल्ली येथे निधन झाले.त्यांनी भंडारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक भारतीय जनता पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्या विरोधात लढविली होती.तुमसर येथील रहिवासी असून खान उद्योग  देश विदेशात पसरलेले आहे.Facebook

मोदींच्या "ड्रीम प्रोजेक्‍ट'वर जल आयोगाचे पाणी


sauni project

अहमदाबाद,दि,15 - सौराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू केला जाणारा बहुचर्चित "सैनी प्रकल्प' केंद्रीय जल आयोगानेच नामंजूर केला आहे. तांत्रिक बाबींचा मुद्दा पुढे करत आयोगाने या दहा हजार कोटींच्या प्रकल्पास स्थगिती दिली असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून नर्मदा नदीतील पाणी सौराष्ट्रामध्ये आणले जाणार होते.
हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतो की नाही याबाबत जल आयोगालाच साशंकता आहे. आता हा मुद्दा पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला जाऊ शकतो. मोदी हे 22 आणि 23 मे रोजी गुजरात दौऱ्यावर येत असून, तेव्हा तो उपस्थित केला जाऊ शकतो. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी निधी द्यायला नकार दिल्यानंतर राज्य सरकारने तो स्वबळावर तडीस नेण्याचा विडा उचलला होता.
मोदींच्या हस्ते लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या तिन्ही टप्प्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून नर्मदा नदीतील पाणी आणून ते सौराष्ट्राच्या 115 जलाशयांमध्ये सोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, राज्याने केंद्राकडे 6 हजार 399 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता राज्य सरकारने या प्रकल्पाची किंमत वाढवून ती अठरा हजार कोटी रुपये एवढी केली आहे.
म्हणून अहवाल फेटाळला
राज्य सरकारकडून या प्रकल्पासंबंधी सादर करण्यात आलेला सविस्तर अहवाल केंद्रानेही याआधीच फेटाळला आहे. या अहवालामध्ये प्रकल्पाचा तांत्रिक अंगाने विचार करण्यात आला नव्हता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. केंद्राने या भागातील सध्याची पीक पद्धती आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती मागितली होती. तसेच या पाण्यावरील अवलंबित्व हे 50 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक असावे, असा दावा तज्ज्ञांनी केला होता.

प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी-मुख्यमंत्री फडणवीस



मुंबई,दि.15 : देशातील कोणत्याही राजकीय पक्षात ज्याचा एकही शत्रू नाही, प्रत्येक पक्षात ज्यांचे केवळ मित्रच आहेत, असे प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट छायाचित्रातून उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन वरळीच्या ‘एनएससीआय’ सभागृहात झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि सिनेदिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते. तर, सभागृहात राजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा विश्वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी आणि प्रफुल्ल पटेल दोघेही विदर्भातील असल्याने एकमेकांशी जास्त राजकीय लढाई लढतो. राजकारणातील आपली भूमिका चोख बजावतानाही प्रफुल्ल पटेल यांनी कधी व्यक्तिगत जीवनातील मैत्रीत अंतर पडू दिले नाही.मुंबईतील उद्योग जगतात जितक्या सहजतेने त्यांचा वावर असतो, तितक्याच सहजतने ते भंडारा-गोंदियातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, महिला आणि कामगारांमध्ये मिसळतात. केंद्रात हवाई वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी जे काम केले त्याचे आजही कौतुक होते. मुंबईत दाखल होणारे परदेशी पाहुणे मुंबई विमानतळाचे देखणे रूप व पायाभूत सुविधांमुळे माझेच कौतुक करतात. तेव्हा मी त्या पाहुण्यांना स्पष्ट सांगतो की, या कामाचे श्रेय केवळ प्रफुल्ल पटेलांचे आहे. भारतातही जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करता येतात, हे प्रफुल्ल पटेलांनी दाखवून दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘उडान’ हा फक्त प्रफुल्ल पटेलांच्या फोटोंचा अल्बम नाही तर त्यांची जीवनगाथा असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या कॉफीटेबल बुकची सुरुवातीची पाने प्रफुल्ल पटेलांचे वडील दिवंगत मनोहरभार्इंबाबत आहेत. हालाखीच्या परिस्थितीतून मनोहरभार्इंनी आपल्या जीवनाला वळण दिले.पण, स्वत:च्या आयुष्याला वळण देतानाच इतरांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा हाच वारसा प्रफुल्ल पटेल पुढे चालवित आहेत, असे ठाकरे म्हणाले. प्रफुल्ल पटेलांकडे माणसे जोडण्याची किमया आहे, असे सांगताना उद्धव यांनी व्यासपीठाकडे हात करून आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे उद्गार काढले.मात्र, पटेलांच्या शेजारीच मुख्यमंत्री बसले होते. तेव्हा विरोधी म्हणजे प्रफुल्ल पटेलांविषयी बोललो. मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही सत्तेतच आहोत, असे उद्धव यांनी स्पष्ट करताच सभागृहात एकच हशा पिकला.प्रफुल्ल पटेल यांना वडिलांकडून उद्योग आणि सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. तो त्यांनी समर्थपणे पुढे चालविलाच, शिवाय त्याला नवे आयामही जोडले, असे कौतुक अमिताभ बच्चन यांनी केले. नावाप्रमाणे चेहऱ्यावर कायम प्रफुल्लित करणारे हास्य आणि डोळ्यांत तितकाच खट्याळ भाव यामुळे प्रफुल्ल पटेल कायम इतरांना आपल्यात गुंतवून ठेवतात. मी स्वत: भंडारा-गोंदियात त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचे हे काम जणू स्थानिकांच्या पाठीचा कणाच आहे, अशी स्तुती अमिताभ यांनी केली.राजकारण्यांचा गोतावळा असो की कला-क्रीडा जगतातील पार्ट्या किंवा उद्योगजगतातील गाठीभेठी सर्वत्र प्रफुल्ल पटेलांचा वावर असतो. पण, या सर्वच ठिकाणी प्रफुल्ल पटेलांचा जो सहज आणि हसतमुख संचार असतो ते एक आश्चर्यच म्हणायला हवे, असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, नीता अंबानी, उद्योजक उदय कोटक, गीतकार जावेद अख्तर यांनीही प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भंडाऱ्यात हजारोंचा जनसमुदाय जमा झाला होता. आपल्याच घरातील कोणी गेल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, या घटनेने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तुम्ही जोपर्यंत एखाद्याच्या मनात स्थान निर्माण करत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत. वडिलांचा हाच वारसा शेवटच्या क्षणापर्यंत पुढे चालवायचा आहे. लोकांच्या आयुष्यात थोडे जरी परिवर्तन घडवू शकलो तर स्वत:ला भाग्यवान समजेन, अशी भावना प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यक्त केली..

लग्न पत्रिकेतून मातेरे कुटुंबीयांचे समाजप्रबोधन



अर्जुनी मोरगाव,दि.15 : महापुरुषांचे विचार, शासनाचे धोरण शेवटपर्यंत स्थानिक पातळीवरून संदेश रूपात पोहोचविणे हे योग्य ठरते. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पत्रिकेतून हा संदेश आप्तस्वकीयांपर्यंत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून उत्कृष्टपणे पोहोचविल्याचे उदाहरण ऊर्मिला रामदास मातेरे यांच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून दिसत आहे.सोशल मीडियावर फिरणार्‍या या पत्रिकेमागे  उद्धव मोहेंदळे यांची कल्पकता असून सावरटोल्याचे विजय भोवे यांनी सुरेख मांडणी करून लग्नपत्रिकेचे वेगळेपण तयार केले आहे. एकंदरीत ही पत्रिका नवसमाजनिर्मितीसाठी प्रबोधनात्मक ठरत आहे.
महापुरुषांचे विचार, शासनाचे धोरण ते शेती, आरोग्य, शिक्षणापर्यंतचा सुरेख संगम या पत्रिकेत दिसते. पाणी व्यवस्थापन शेतीसाठी सूक्ष्म सिंचन नवरीकडल्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊ, नवरदेवाकडे शिवरायांचा फोटो, महात्मा गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश जगद्गुरू तुकोबाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जिजाऊ शिवरायांच्या जय घोषापासून श्रीगुरुदेवांचा संदेश दिसतो. दुसरीकडे पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी केळीच्या पानावरील खाद्यान्न, मावशीच्या लग्नाला या म्हणणार्‍या बालक-बालिका, सर्व शिक्षा अभियानातून सारे शिकू-पुढे जाऊ व मतदान माझा हक्क व कर्तव्यापर्यंत राष्ट्रजागृती. पाठीमागच्या बाजूला बेटी बचाओ अभियान तर दुसरीकडे जिजाऊ व शिवाजी त्यामध्ये शेवटी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेतून पत्रिकेचे वेगळेवच वैशिष्ट आहे. पुरोगामी विचारसरणीच्या पत्रिकेत राष्ट्र निर्मितीचे सूचक पैलू दिसून येतात.सोबतच स्वच्छतेचा संदेश ही देत आहे.

आधुनिक विज्ञानाच जगाला शाश्वत विकासाचा नवा प्रकाश दाखवेल-मुख्यमंत्री



पुणे दि. 14 (विमाका) : प्राचीन काळापासून भारत हा विज्ञानात प्रगत होता. भारतीय पारंपारिक विज्ञान हे निसर्गावर आधारित असल्याने ते शाश्वत विकासाचे साधन आहे. भारतीय पारंपारिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुयोग्य संगमच जगाला विकासाचा नवा शाश्वत प्रकाश दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. तसेच याच धर्तीवर प्रत्येक वर्षी आपल्या राज्यात महाराष्ट्र विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी आयोजकांना केली.
महाराष्ट्र शासन, विज्ञान भारती, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विज्ञान भारतीचे संघटनमंत्री जयंत सहस्त्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. सुरेश मांडे, शरद कुमठे, शेखर कामटे, संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय प्राचीन विज्ञानाने जगाला मोठी देणगी दिली आहे. भाषा, विज्ञान, विविध शास्त्रात प्राचीनकाळी भारत अग्रेसर होता. आधुनिक विज्ञानाने लावलेल्या अनेक शोधांचा उल्लेख आपल्या पुरातन वेद, उपनिषीदांत आहे, हाच आपल्या पारंपारिक शास्त्र प्रगत असल्याचा पुरावा आहे. भारतातील तक्षशिला विश्वविद्यालय दीड हजार वर्षे जगाला ज्ञानाचा प्रकाश देत होते. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी तक्षशिलासह नालंदा विद्यापीठात ज्ञानार्जनासाठी येत होते. पारंपारिक विज्ञान हेच शाश्वत असून निसर्गाशी एकरूप होते. आधुनिक विज्ञानाच्या आधारावर प्रगत झालेले देश हे प्रदूषणकारी आहेत. प्रदूषणाच्या प्रश्नाला आपले पारंपारिक विज्ञान हेच उत्तर आहे. पारंपारिक विज्ञान हे शाश्वत विकासावर आधारित आहे, विनाशावर नाही. आधुनिक विज्ञानाने प्रगती साधली मात्र ती शाश्वत नसून या प्रगतीबरोबरच अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे यापुढे पारंपारिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुयोग्य संगमच जगाच्या विकासाला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केन्द्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भांबरे म्हणाले, आधुनिक विज्ञानाचे मूळ हे आपल्या पारंपारिक विज्ञानात आहे. आयुर्वेद ही आपल्या देशाने जगाला दिलेली मोठी देणगी  आहे. भारतीय पारंपारिक विज्ञानाने धातूशास्र,खगोलशास्त्रात अनेक शोध लावले होते. आपल्या पारंपारिक विज्ञानाला आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी स्वत:वर विश्वास ठेवून या क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची आवश्यकता आहे.यावेळी महापौर मुक्ता टिळक, कौस्तुभ साखरे, मुकुंद देशपांडे यांची भाषणे झाली.

हिन्दुओ ने मुसलमानों से माफ़ी मांगनी चाहिए – मैं हिन्दू हूँ और माफ़ी मांगती हूँ -आर.के.शाह



अहमदाबाद : ‘यह मेरा फ़र्ज़ था कि पीड़िता को न्याय मिले. बिलकीस हो या कोई और, उसका न्याय में भरोसा बना रहे, यह मेरी ज़िम्मेदारी है.’ ये बातें जन विकास मंच द्वारा अहमदाबाद मैनेजमेंट एसोसिएशन में आयोजित प्रेस वार्ता में मीडिया से बात करते हुए आर.के. शाह ने कहीं.शाह ने न्याय प्रक्रिया के दौरान आई कठिनाइयों का ज़िक्र करते हुए बताया कि किस प्रकार से पुलिस का गैर-ज़िम्मेदाराना रोल रहा. पुलिस आरोपियों को पकड़ती नहीं थी और उसके बाद कोर्ट में आकर आसानी से कह देती थी कि आरोपी नहीं मिल रहे हैं.आगे उन्होंने बताया कि, इस केस में पीड़ित महिला अनपढ़ और गांव की थी, जिसे गुजराती के सिवा दूसरी भाषा नहीं आती थी. मुंबई में ट्रायल चल रहा था. सीबीआई के ऑफिसर नॉन-गुजरती थे. पीड़िता एक गांव से भाग रही थी. एक ग्रुप से बिछड़ गई थी, जब ये घटना पेश आई थी.
सभी को मिलना चाहिये न्याय
आर.के. शाह ने कहा कि, ‘निर्भया हो या बिलक़ीस, सभी को न्याय मिलना चाहिए.’ साथ ही शाह ने कहा कि, पुलिस द्वारा जांच अच्छी हो इसके लिए उनकी ट्रेनिंग की ज़रूरत है और पब्लिक प्रासीक्यूटर भी अच्छा होना चाहिए. पब्लिक प्रासीक्यूटर नयना भट्ट ने इस फ़ैसले को ऐतिहासिक बताते हुए कहा कि, जिस प्रकार से गगन भाई, फ़रहा नक़वी एवं अन्य सिविल सोसाइटी के लोग न्याय के लिए कोशिश करते रहे, समाज के लोग साथ खड़े रहे, बिलक़ीस खड़ी रही और कोर्ट में सही से बयान दे पाई, इससे न्याय पाना आसान हुआ.
उन्होंने आगे कहा कि, यह फ़ैसला उनके लिए सबक़ है, जो किसी के इशारे पर फ़र्ज़ी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बना देते हैं. उन जांच अधिकारियों के लिए भी सबक़ है, जो आरोपियों को बचाने की कोशिश करते हैं. न्याय मिलना आसान नहीं, लेकिन नामुमकिन भी नहीं. इस केस में हमें भी बहुत सीखने को मिला.
बिलक़ीस बानो और निर्भया कांड की हो रही तुलना पर नयना भट्ट ने कहा कि, इन दोनों की तुलना नहीं की जा सकती. निर्भया घटना वासना को संतोष करने के लिए हुई थी, जबकि बिलक़ीस के साथ हुई घटना सांप्रदायिकता के कारण हुई थी. निर्भया पढ़ी-लिखी महिला थी. उस घटना का गवाह भी शहरी और पढ़ा लिखा था. पुलिस ने तुरंत कार्यवाही की थी. जबकि बिलक़ीस केस में जांचकर्ता अधिकारी ही आरोपियों को बचाने में लग गए थे. निर्भया केस में साइंटिफिक सुबूत थे, जबकि बिलक़ीस के मामले में ऐसा नहीं था. यह केस जांचकर्ता अधिकारियों के कारण गेहूं में पत्थर निकलने जैसा हो गया था.
सत्ता के लोग उठाते हैं फायदा
मैग्सेसे अवार्ड विजेता संदीप पाण्डेय ने कहा कि, सत्ता में बैठे लोग सरकारी कर्मचारियों का उपयोग करते हैं, जैसा कि इस केस में हुआ. इस केस में दो डॉक्टर और पांच पुलिसकर्मी को सज़ा होने से एक सन्देश गया है कि सरकार द्वारा उपयोग होने पर भी बचना इतना आसान नहीं है.
नफ़ीसा बेन ने कहा कि, यह लड़ाई सिर्फ़ बिलक़ीस की नहीं थी, बल्कि उन सभी महिलाओं की थी, जिनको लिंग, जाति और धर्म के आधार पर निशाना बनाया जाता है. इनके साथ हुई दर्दनाक घटना को एक आम आदमी समझना तो दूर एहसास भी नहीं कर सकता.
कहो सॉरी सॉरी सॉरी
जन विकास मंच के गगन शेट्टी ने कहा, ये समय है कि हिन्दू समाज मुस्लिमों से सॉरी बोलें. मैं एक हिन्दू हूं, ये मेरे लिए मौक़ा है कि मैं सॉरी बोलूं. सॉरी… सॉरी… सॉरी…
आगे उन्होंने कहा कि, ये हम सब की ज़िम्मेदारी है कि हम सब कोशिश करें कि हर नागरिक का भरोसा ‘स्टेट’ और नेशन में बना रहे. स्टेट को खुद सामने आना चाहिए. क्या हम सुप्रीम कोर्ट जायेंगे तब सरकार मुवाअजा देगी? बिलक़ीस कभी भी सरकार के आगे हाथ नहीं फैलाएगी. सरकार को फैसला करना है कि उसको क्या करना है. हुमा बेन जो 15 वर्ष से बिलक़ीस के साथ खड़ी हैं, भावुक होते हुए कहा कि, इस देश में कुछ लोगों को जाति, धर्म और लिंग के आधार पर दूसरे-तीसरे दर्जे का नागरिक बना दिय गया है. इस फैसले से लोगों में न्यायपालिका पर भरोसा बढ़ा है.
फ़रहा नक़वी ने कहा, भले ही ये जघन्य अपराध गुजरात में हुआ हो, लेकिन इस लड़ाई में इसी सरज़मीन के दो बाशिंदे नयना भट्ट और आर.के. शाह ने अहम भूमिका निभाई. सलाम है इन्हें. हम सभी लोगों ने इस न्याय की उम्मीद में 15 साल काटे हैं.
इस प्रेस-वार्ता में बिलक़ीस बानो और उनके पति याक़ूब भाई भी मौजूद थे. साथ ही सिविल सोसाइटी के वो सारे लोग भी मौजूद थें, जो पिछले 15 सालों से बिलक़ीस बानो को न्याय दिलाने के लिए कोशिश कर रहे थे. इस प्रेस वार्ता से पहले जस्टिस आर.ए. मेहता के हाथों इस केस के स्पेशल पब्लिक प्रासीक्यूटर आर.के. शाह और नयना भट्ट का सन्मान किया गया. शाह और भट्ट को बिलक़ीस व उसके पति के हाथों सम्मान-पत्र भी दिया गया.
अदालत के फैसले से खुश हूं
बिलक़ीस बानो ने इस प्रेस-वार्ता में सिवल सोसाइटी, न्यायलय, वकील, सीबीआई सभी का आभार व्यक्त किया, जिन्होंने इस लड़ाई में साथ दिया. बिलक़ीस ने कहा कि, मैं निर्णय से खुश हूं. डॉक्टर और पुलिस को भी सज़ा हुई. इससे और खुश हूं. न्याय पाने की इस लड़ाई में बहुत तकलीफ़ भी उठानी पड़ी. धमकियां मिलती थी. बार बार घर बदलने पड़े. सरकार ने न्याय दिलाने में किसी भी प्रकार से मदद नहीं की.
बिलक़ीस के पति याक़ूब भाई ने कहा कि, हम जहां पैदा हुए, बड़े हुए. वह राज्य छोड़ना पड़ा. हम अपने ही राज्य में सुरक्षित नहीं. न्याय के लिए मुंबई जाना पड़ा. हम सभी लोग इस फ़ैसले से खुश हैं. मीडिया से सवाल-जवाब में बिलक़ीस ने मृत्युदंड के जवाब में कहा कि, मैं न्याय चाहती हूं, बदला नहीं.  उनके पति ने बताया कि, वतन जाना चाहते हैं. लेकिन दिल गवारा नहीं करता. सरकार से सुरक्षा मांग चुके हैं, लेकिन अभी तक मिली नहीं. सुरक्षा कारणों से बार-बार घर बदलना पड़ता है.
बताते चलें कि 4 मई, 2017 को मुंबई हाईकोर्ट ने बिलक़ीस बानो केस में ऐतिहासिक फ़ैसला सुनाया. न्यायपालिका के इतिहास में पहली बार पांच पुलिस और दो डॉक्टरों को सज़ा दी गई. इस मामले में हाईकोर्ट ने 11 दोषियों की सज़ा बरक़रार रखा, जबकि सीबीआई ने तीन मुख्य आरोपियों को फांसी की सज़ा की मांग की थी, जिसे अदालत ने मानने से इनकार कर दिया.

दारू दुकानाच्या स्थानांतरणावरून गाजली ग्रामसभा




एकोडी(गोंदिया),दि.14 : येथील ग्रामपंचायत कार्यालयात (दि.१३) तहकूब ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतने अनेक विषयावर चर्चा केली. परंतु दारू दुकानाच्या स्थानांतरण या एकाच विषयाने ग्रामसभा गाजली.1 मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत लोकसंख्येच्या कमीत कमी १०० लोकांची उपस्थिती आवश्यक होती. ती नसल्याने तहकूब करून १3 मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रकाश पटले पं.स. सदस्य, माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, अजाबराव रिनायत, सावलदास कनोजे, नामदेव बिसेन ग्रा.पं. सदस्य व सभेचे अध्यक्ष सरपंच रविकुमार पटले यांनी आपापले विचार मांडले. याप्रसंगी गावातील महिला-पुरूष मोठ्या संख्येत उपस्थित होते.
ग्रामसभेचे अध्यक्ष रविकुमार पटले यांच्या अनुमतीने ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश ग्राम विस्तार अधिकारी यांना दिले. त्यानुसार ग्रामसभेला सुरुवात करीत जमा खर्चाला मंजुरी देणे, नवीन कामाचे नियोजन करणे, मनरेगा अंतर्गत घरकुल व शौचालय बांधकामाची माहिती देणे अशा अनेक विषयावर चर्चा करायची होती. परंतु जमाखर्च वाचून झाल्यावर नंतर येणाऱ्या विषयावर दारु दुकान स्थानांतरणाचा विषय होता. मोठ्या संख्येने उपस्थित महिला पुरुषांनी वेळ न घालवता ज्या विशेष मुद्यावर लोकांची नजर होती तोच विषय लोकांकडून प्रथम घेण्यावर भर देण्यात आला.त्यानुसार ग्रामविकास अधिकारी ओ.एन. तुरकर यांनी चर्चेला सुरुवात करीत ग्रामपंचायत कडे दोन दारु दुकानाचे (ज्यामध्ये एक बियरबार व एक चिल्लर व थोक देशी दारू) दुकान मालकाकडून दारु दुकान स्थानांतरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतकडे आल्याचे सांगितले. न्यायालयच्या आदेशाने शासनाला राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यांच्यापासून ५०० मिटर अंतरावर असलेल्या दारू दुकानाला मुख्य रस्त्यापासून ५०० मिटर दूर हटविण्याचे ३१ मार्च २०१७ नंतर बंद करण्याचे आदेश दिले होते. सचिवाने दोन दारु दुकानासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे सांगितले.
परंतु या विषयावर चर्चा करीत असताना असे लक्षात आले की बियरबार मालकाकडून ग्रामपंचायतकडून कोणतीच परवानगी न घेता लोकवस्तीत असलेल्या घरमालकाशी बोलणीकरुन त्या घराची बियरबारला लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधां नियोजित घर तयार करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतने सांगितले. त्यावरुन दारु दुकान समर्थक आणि विरोधक यांच्या एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जरी दोन्ही दुकान हे शासन मान्यतेचे असले तरी त्यांना दुकानाच्या स्थानांतरण प्रक्रियेत लोकवस्तीत दुकान लावण्याचे काहींचे म्हणणे होते. तर समर्थकांकडून असे उदाहरण देण्यात आले की जे दुकान गावात बेकायदेशीर व अवैध रुपाने सुरू आहेत त्यांचे काय? जर गावात शासनमान्य परवाना धारक दुकानाला जर परवानगी ग्रामपंचायत देत नसेल तर गावात सुरू असलेले अवैध दारू दुकान बंद झाले पाहिजे असे दारू दुकान समर्थकांचे म्हणणे होते. हा मुद्दा खूपवेळेपर्यंत रेंगाळत राहिला. यावर मतदान करुन संपूर्ण दारूबंदी गाव करण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली. परंतु उपस्थित लोकांनी संपूर्ण गाव दारुबंदी करण्याकडे कानाडोळा केला. परत बियरबार करीता नियोजित घराच्या जागेवरच चर्चा सुरू करण्यात आली. परंतु त्यातही मोठ्या संख्येत दारू दुकान समर्थक महिला व पुरुष असल्याचे दिसून आले. मतदान होवून त्या जागेवर दुकान लागण्3चे जवळपास निश्चित झाले होते. पण विरोधकांनी कित्येक दिवसापूर्वीच ग्रामपंचायतला अर्ज देवून परवानाधारक दुकान असल्याने लोकवस्ती व लोकहित, सामाजिक प्रश्न याचा विचार करुनच लोकवस्तीत दारू दुकानाला परवानगी न देता लोकवस्तीपासून दूर अंतरावर दारू दुकान लावण्यास हरकरत नाही असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तुर्त या विषयावर तोडगा निघाल्याचे दिसून येते. याविषय नंतर ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित महिला-पुरुषांना संपूर्ण दारूबंदी गाव करण्याकरिताही समर्थन देण्याचे आवाहन केले. सरपंचाच्या आवाहनाला किती महिलांचे व पुरुषांचे समर्थन करतील याकडे विशेष लक्ष लागून राहील. परंतु लोकवस्तीचा प्रश्न उपस्थित करुन दारू विक्रेत्यांकडून ग्रामसभेत बोलावण्यात आलेला जनसमुदाय असूनही दारू विक्रेत्याचा डाव फसल्याचे दिसून आले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...