Saturday 13 May 2017

देवरी येथे आदिवासी गोवारी समाजाची सभा




 देवरी,दि.12-  देवरी येथील आदिवासी गोवारी मिशन आणि आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी (ता.12) येथे आदिवासी गोवारी जमातीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे केशवराव राऊत हे होते. यावेळी पुण्याचे हिरामण कोयरे, स्वागताध्यक्ष तथा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे क्रिष्णा सर्पा ,गोंडी धर्म प्रचारक बाबा नाथेश्वर , मारोतराव वाघाडे अमरावती , नारायणराव शाहारे नागपूर , होमराज ठाकरे गोदिया जिल्हा अध्यक्ष , मनोहरराव शाहारे साहेब यवतमाळ , हिरासिग कोराम , गोकुळ बोपचे , सुंदर बक्चोरिया ,शेखर लसुंते नागपूर ,कोहळे भंडारा , डीएम राऊत गुरूजी, अरूण शहारे, सरपंच वाघाडे , गजानन कोहळे चंद्रपुर ,मंगेश चौधरी वर्धा , धनराज दुधकवर वडसा , प्रभाकर नेवारे साकोली , निलेश सोनवणे नागपूर ,गोवारी जमातीचे अभ्यासक संजय ठाकरे नागपूर , विवेक ठाकरे चंद्रपुर, उत्तम राऊत , यादव कोरची ,भुवनेश्वर ठाकरे आमगाव ,कोहळे गुरूजी चौधरी गुरूजी सालेकसा , आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर वाघाडे गुरूजी देवरी यांनी केले. प्रास्ताविक दामोदर नेवारे यांनी केले. उपस्थितांचे आभार रुपेश चामलाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक समाजबांधवांनी सहकार्य केले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...