Wednesday 10 May 2017

सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष


लोहारा परिसरातील झाडांची दुरवस्था


 देवरी-आमगाव राज्यमार्गाशेजारी लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे अशी मूळासकट कोलमडली. 
देवरी,दि.९- एकीकडे राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी प्रसार-प्रसिद्धी करीत अनेक योजना राबवीत आहे. मात्र, दुसरीकडे सामाजिक वनीकरण विभागाद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेल्या झाडांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र देवरी तालुक्यात बघावयास मिळत आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रसार-प्रचारासाठी वापरण्यात येणारे चित्ररथ त्याच भागातून घेऊन जाणाèया अधिकाèयांनाही रस्त्याच्या कडेला पडलेली झाडे दिसली नाही का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
सविस्तर असे की, राज्यातील जंगलांचे घटते प्रमाण यावर मात करण्यासाठी राज्य सरकार वृक्ष लागवडीवर सध्या भर देत आहे. यासाठी शतकोटी वृक्ष लागवड योजनांसारख्या योजना राबविल्या जात आहेत. अलीकडेच राज्याचे वित्तमंत्री व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना आवाहन करीत सर्व ग्रामसभांना आपापल्या गावशिवारात वृक्षलागवडीसाठी आवाहन केले आहे. एवढेच नाही तर प्रचार-प्रसार आणि वृक्षलागवडी साठी सरकार कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे.
देवरी तालुक्यातील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राज्यमार्गाच्या काठाने बिहार पॅटर्नप्रमाणे दुतर्फा वृक्षारोपण केले. या झाडांची देखभाल करण्यासाठी लाखोंची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना लोहारा परिसरातून जाणाèया आमगाव देवरी राज्यमार्गाशेजारी मुल्ला ते सावली दरम्यान असलेले सुमारे १०-१२झाडे पाण्याचा निचरा न झाल्याने मूळासकट कोलमडून पडले. या भागात तलावाच्या पाण्याने रब्बी पिके घेतली जात असताना या पाण्यापासून झाडांचे संरक्षण करण्याकडे वनीकरण विभागाने दुर्लक्ष केले. उल्लेखनीय म्हणजे या कामासाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे काही दिवसापूर्वी वृक्षसागवडीसंबंधाने जनजागृती करण्यासाठी वनविभागाचे चित्ररथ या कोलमडलेल्या झाडांच्या शेजारूनच गेला असला तरी या प्रकाराची साधी दखल सुद्धा कोणी घेतली नाही. परिणामी, पाणी तसेच साचून राहिल्यास पुन्हा झाडे कोलमडून पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...