
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधानाचार्य वरूण खंगार हे होते. यावेळी संस्थेचे कोशाध्यक्ष अनिल बहेकार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी श्री खंगार यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची सुद्धा भाषणे झाली.
संचलन श्री बोहरे यांनी केले. उपस्थितांचे आभार विवेकानंद गिऱ्हेपुंजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेंढे, तुरकर, भाजीपाले, रहमतकर, शेंडे, ठाकूर, कंगाले आदी शिक्षकांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment