Monday 1 May 2017

देवरी येथे महाराष्ट्र दिनी चिमुकल्यांनी केले ध्वजारोहण




देवरी, ०१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आईएसओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देवरी तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त पब्लिक शाळा ही नवनवे उपक्रम राबविण्यासाठी ओळखली जाते. आज महाराष्ट्र दिनी आपल्याच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत आपली परंपरा क़ायम ठेवतमुख्याध्यापक सुजित टेटे यांनी चिमुकल्याच्या हातानी ध्वजारोहण करुनघेतला.
आराध्या कानतोडे आणि मिहीर काशिवार अशी ध्वजारोहण करणाऱ्या बालकांची नावेआहेत. या उफक्रमाचे समाजाच्या सर्वच स्तरातून याचे कौतुक केले जात आहे. सदर संकल्पना राबविण्याचे श्रेय मुख्याध्यापक सुजित टेटे यांना दिले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...