Sunday 28 March 2021

गोंदियात 107 रुग्ण पॉझिटिव्ह,51 रुग्णांना डिस्चार्ज

गोंदिया,दि.28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 28 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आजपर्यंत 15,633 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,705 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 740 आहे. 564 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 188 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.06टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

होळीच्या पूर्वसंध्येला तिरोडा पोलिसांनी जप्त केला 1.82 लाखांचा माल

 तिरोडा,दि.28 : होळी सणाच्या वेळी कायदा व सुवयवस्था राहावी यासाठी तिरोडा पोलिसांचा दररोज विशेष अभियान राबवून अवैध धंद्यावर धाडसत्र सुरु आहे. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवार, 27 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजतापर्यंत एकूण 9 ठिकाणी छापे घालून 1 लाख 81 हजार 850 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.


  • 1. मेंढा-सुकडी येथील झुडपी जंगल शिवारात सुरु असलेल्या रनिंग भट्टीवर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये दिलीप राधेश्याम खरोले, ऍलन संजय बरियेकर, जतीन दिलीप खरोले, अनमोल हंसराज बरियेकर सर्व राहणार संत रविदास वॉर्ड तिरोडा हे मोहफुलांची दारू काढताना मिळून आले. त्यांच्याजवळून 1100 किलो सडवा मोहफूल किंमत 88 हजार रुपये, रनिंग भट्टी साहित्य, 2 मोटरसायकल असा एकूण 1 लाख 65 हजार 150 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
  • 2. प्रतिमा विनय उके रा. वडेगाव हिच्या घरी 200 किलो सडवा मोहफुल किंमत 16 हजार रुपये, 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रुपये असा एकूण 18 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 3. आशा राजेंद्र भोंडेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 4. मुन्नी रमेश चौरे रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 5. सीमा अनिल राऊत रा. संत कबीर वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 30 लिटर मोहदारू किंमत 3 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 6. गीता छोटेलाल दमाहे रा. गुरुदेव वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 7. शांता सीताराम बावणे रा. चिखली हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा मिळून आलेला आहे.
  • 8. निर्मला भोला रंगारी रा. चिखली हिच्या घरझडतीत 30 लिटर मोहदारू किंमत 3 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 9. अंजना विजय लिल्हारे रा. भूतनाथ वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 10 लिटर मोहदारू किंमत 1 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.

असा एकूण 1 लाख 81 हजार 950 रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोउपनि केंद्रे, महिला पोउपनि राधा लाटे, पोलीस हवालदार चेटुले, दामले, नापोशि बांते, बरवैया, बर्वे, श्रीरामे, मुकेश थेर, पोशि सवालाखे, दमाहे, बिसेन, उके, अंबादे, शेख महिला नपोशि भूमेश्वरी तीरीले यांनी केलेली आहे.

अजित पवारांचा संजय राऊतांवर निशाणा

 बारामती--मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर 'रोखठोक'मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी आज बारामतीत कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका अजित पवारांनी राऊतांवर केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिले की, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांनी गृहमंत्री पदाची माळ अनिल देशमुखांच्या गळ्यात टाकली. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम, त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे मत राऊतांनी व्यक्त केले होते.

आज 56 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि.28: आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 47जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10490 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9960 वर पोहचली. तसेच सद्या 421 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.01 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

          नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17अहेरी तालुक्यातील 8आरमोरी तालुक्यातील 3भामरागड तालुक्यातील 1,  चामोर्शी तालुक्यातील 2धानोरा तालुक्यातील 1एटापल्ली तालुक्यातील 04कुरखेडा तालुक्यातील 1तर वडसा तालुक्यातील 19 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 18,  आरमोरी 7भामरागड 08धानोरा 6एटापल्ली 02कुरखेडा 02तर वडसा  मधील 4 जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 01,साई नगर 02अमीर्झा 01वनश्री कॉलोनी 02राखी गुरवडा02गणेश नगर 01कन्नमवार वार्ड 01आंनद नगर 01,गीलगाव 02गोकूल नगर वार्ड 5 सोनकूर 01,  जेप्ररा 01अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 08स्थानिक 01नागेपल्ली 1आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 03,  भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 02चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 02धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 01एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 2कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कस्तुरर्बा वार्ड 01आर्शीवाद वार्ड 01किदवही वार्ड 01हनुमान वार्ड 03,  कुरुड 4विसारो 01,कोन्डाला 02मधुबन कॉलोनी 04गांधी वार्ड 02तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.

माझी हार्डडिस्क फुटत आहे!; दीपाली यांचे मृत्यूपूर्वी पतीला भावनिक पत्र

 


अमरावती: हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी  दीपाली चव्हाण  यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनीवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे लिहिले आहे. ही तिन्ही पत्रे धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र अतिशय भावनिक आहे. हे पत्र जशास तसं...

प्रिय नवरोबा,

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरंच संपली आहे... यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये. घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देनं कमी झालं नाही.


मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं...मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली... माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिस्क फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...

- दीपाली...

गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा बालबाल बचावले

 


गडचिरोली दि. 28 मार्च- शहरातील कारगील चौकात दुपारी तीन वाजता दरम्यान कॉम्प्लेस कडून भरधाव वेगाने येणाऱ्या पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन वाहन पलटले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.या वाहनात गडचिरोलीचे नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा होते. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

 कॉम्प्लेस कडून येणाऱ्या ट्रकला (क्रमांक टी.एस.08 यु इ  1569) ओवर टेक करून पोलीस वाहन क्रमांक एम.एच.3 सी.436  जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण  सुटल्याने पोलीस वाहन हे दुभाजकावर पलटले. गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रनील गिल्डा हे सोमवारी रुजू झाले आहेत. मुख्य म्हणजे ट्रक चालकाची कोणतीही चूक नसतांना त्याला नागरिकांनी मारहाण केली. पोलिसांना वाहनातून काढण्याकरिता उदय धकाते, महेंद्र वाघमारे, बादल आरेकर आणि नंदू कुमरे यांनी मदत केली.

शववाहिका खोळंबली

सदर अपघात झाला त्यावेळी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून एक कोविड ने मृत्यू झालेल्याचे पार्थिव शववाहिके मधून नेत होते. वाहनांची रीघ लागल्याने तसेच नागरिकांची गर्दी झाल्याने शववाहकीला येथे जवळ-जवळ 15 मिनिटे थांबावे लागले होते. शव वाहिकेमध्ये कोविड मृतकाचे शव असल्याचे वाहनातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांना सांगितले. त्यांंनी  मित्रमंडळीसह शववाहिकेला पूढे जाण्यासाठी मार्ग सुरळीत करून दिला.

तहसील कार्यालयासमोर माकपच्या जिल्हा महासचिवाची कार पेटली

 


कुरखेडा-- येथील तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. यामध्ये सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी आगीमुळे कारचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

आरमोरी येथील मकपाचे जिल्हा महासचिव तथा माजी परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली टाटा इंडिगो एम. एच. 33 ए 3218 या क्रमांकाची कार स्वतः मारकवार चालवीत होते. दरम्यान पाण्याची बाटली घेण्यासाठी मारकवार यांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला कार उभी करून समोरच्या हॉटेलमध्ये गेले असता त्यांच्या पाठीमागे कारने अचानक पेट घेतला.
या दरम्यान शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयात आयोजित आंदोलन आटोपून परत येत असताना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना कार इंजिनच्या भागातून पेट घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः व कार्यकर्त्या सोबत समोरच्या हॉटेलमधून बादलीने पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू कार दुसऱ्या बाजूने पेट घेत होती. थोड्यावेळाने नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाचे मदतीने आग विझवण्यात आली. यावेळी आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेले कुरखेडा पोलिस पोलिस पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बघ्यांना घटनास्थळापासून दूर सारून कुरखेडा तळेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

निलज ते सिंदपुरी मार्ग झाला मृत्युचा सापडा

पवनी : निलज ते करधा या रस्ता बांधकामाला आता सुमारे 3 वर्ष होत आहेत परंतु अजुन पर्यंत काम पूर्ण झाला नाही. गेले कित्येक वर्षापासून निलज ते सिंदपुरी पर्यंत खड्डे आहेत आता काही ठिकानी बांधकाम सुरु आहे तर काही ठिकानी माती टाकून ठेवली परंतु अजुन पर्यंत कामाला सुरुवात केली नाही आहे. याचाच एक उदाहरण म्हणजे पवनी पुल पासून ते न.प. महाविद्यालय पवनी पर्यंत चा रोड  या ठिकानी माती च भरण टाकून सहा महीने लोटून गेले परंतु अजून पर्यंत या ठिकानी काम केल नाही यामुळे रोडवरून येणे- जाण्याऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अपघाताला आमंत्रण देण्याचे काम या रोडवर दिसते. माती टाकून ठेवल्यामुळे धूळ चे प्रमाण वाढले व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वतःचे आयोग्य धोक्यात घालून या रोडवरुन जावे लागते तर त्या ठिकानी असलेल्या दूकान घरां मध्ये धूळ जाते यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. काही दिवसा अगोदर धुळ चे प्रमाण अतिशय वाढल्या मुळे नागरिकांना रोडवर उतरून आंदोलन देखील केले याचा परिणाम अस झाल की रोज सकाळ सायंकाळ या रोडवर पाणी मारल्या जाते. परंतु काम अजुन पर्यंत सुरु केले नाही. अर्धवट काम करून सोडल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे व आपघाताला सामोरे जावे लागत आहे. पवनी च्या आत सुद्धा काम सुरु आहे गावाचा आत पन धूळ आणि बाहेर तर अति धूळ यामुळे नागरिकांचा आरोग्याचा घोका निर्माण झाला आहे. पवनी च्या पुलावर खुप खड्डे व पुलाचा दोन्ही बाजूला माती जमा झाली आहे यामुळे अपघाताला आमंत्रण देण्याचे काम येथे दिसून येते. 

  आता पर्यंत निलज ते सिंदपुरी रोडवर सन 2019 ते 23 मार्च 2021 पर्यंत पवनी पोलिस स्टेशन मध्ये नोंद असल्या प्रामाणे एकूण 16 अपघात झाले त्यापैकी 09 मृत्यु तर 08 जखमी झाले याप्रमाणे 56.25% मृत्यु दर आहे.

नितीन गडकरी यांनी कित्येकदा सांगितले आहे की एकाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्याला black स्पॉट घोषित करून तेथे बदल करावा परंतु इतके अपघात होऊन व मृत्यू होऊन प्रशासन झोपले आहे. अपघाताचे कारण काय तेथे तांत्रिक चूका काय आहेत याचे विश्लेषण करण्याची तसदी सुद्धा संबंधीत अधिकारी घेत नसतील तर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं म्हणावं लागेल. 

 नागरिकांचा जीव कवळीमोल समजू नये जर नागरिक कर भरून चांगल्या सोयी सुविधाच्या अपेक्षा करत असताना प्रशासन नागरिकांना मृत्यू देत असेल तर संविधानाने दिलेल्या सन्मानाणे व कुणाला न घाबरता जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. येणाऱ्या दिवसात ही भयावह परिस्थिती आणि अधिकाऱ्यांची बेपरवाही माननीय नितीन गडकरी यांच्या समोर मांडण्यात येईल व त्यांनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून नागरिकांचे जाणारे नाहक प्राण वाचवावे व दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाही करावी ही विनंती करण्यात येईल.

 यानंतर अपघातात कुणाचा मृत्यु झाला किंवा अपंगत्व आले तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याची मागणी करण्यात येईल त्यासाठी न्यायालयातून न्याय मागण्यात येईल असा इशारा योगेश बावनकर यांनी दिला आहे.


भंडारा जिल्ह्यात आज 439 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह


• 99 रुग्णांना डिस्चार्ज

• बरे झालेले रुग्ण 14400

• पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 16789

• क्रियाशील रुग्ण 2052

• आज 02 मृत्यू

• एकूण मृत्यू 337

• रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.77 टक्के

भंडारादि.28 :- जिल्ह्यात आज 99 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14400 झाली असून आज 439 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16789 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.77 टक्के आहे.

          आज 1803 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 439 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 73 हजार 66 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 16789 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

          जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 226मोहाडी 14तुमसर 28पवनी 64लाखनी 60साकोली 31 व लाखांदुर तालुक्यातील 16 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 14400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 16789 झाली असून 2052 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 337 झाली आहे.

 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.77 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.00 टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

• कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहेमास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

केंद्र सरकारच्या 3 काळया कृषी कायद्याविरोधात लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने एक दिवशीय उपोषण


लाखनी: केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता देशावर लादलेल्या कृषी विरोधी काळया कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जवळपास मागील चार महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. सरकारने सुरुवातीला चर्चा तर केलीच नाही मात्र त्यानंतर दिखावा करण्यासाठी चर्चा केली. मात्र देशभरातील शेतकऱ्यांनी केलेली कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. त्यासाठी सदर आंदोलनाला पाठिंबा देऊ करण्यासाठी आणि या काळया कायदयांचा विरोध करण्यासाठी लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवशीय उपोषण लाखनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजु निर्वाण यांच्या नेतृत्वात स्थानिक तहसील कार्यालय समोर करण्यात आले. 

याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते शफीभाई लद्धानी, राजु पालिवाल, सत्यवान हुकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी सभापती खुशाल गिदमारे, दादूभाऊ खोब्रागडे, माजी जि.प. सदस्य आकाश कोरे, जयकृष्ण फेंडरकर, ज्ञानेश्वर रहांगडाले, रूपलता जांभुळकर, महिला काँग्रेसच्या प्रिया खंडारे, माजी उपसभापती विजय कापसे, मोरेश्वरी पटले, नंदलाल चौधरी, माधवराव भोयर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघाये, लाखनी तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी बोपचे, अनु. जाती ता. अध्यक्ष रितेश कांबळे, मोनाली गाढवे, पंकज शामकुंवर, नगरसेवक अनिल निर्वाण, प्रदीप तितिरमारे, सरपंच परसराम फेंडरकर, अनिल नंदेश्वर, मनोहर बोरकर, देवनाथ निखाड़े, हेमंत बांडेबुचे, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, योगेश गायधने, लोकेश गायधने, हेमंत बड़वाईक, मोहीत झलके, सेवादल शहर अध्यक्ष अनिल बावनकूळे, उपसरपंच, सचिन बागडे, मुरलीधर बुराडे, विक्रम लांजेवार, विकास वासनिक, पुरुषोत्तम रामटेके, भूपेश शेंडे, अंबर येटरे, रविंद्र मसराम, प्रदीप मेश्राम, संध्या धांडे, सुनंदा धनजोडे दिगंबर उइके, रघुनाथ आत्राम, संजू रहांगडाले, विना डोंगरे, गुनिराम वंजारी, धम्मा रामटेके, शिवदास गायधनी, अशोक पटले, महेश पटले, रूपचंद सोनवाने, सुनील कसंते, देवानंद ऊके, रामभाऊ थेर, लाल बादशाह, सारांश बंसोड,ज्ञानेश्वर मोहतुरे, कपिल देशपांडे, मोरेश्वर वंजारी, देवनाथ निखाड़े, नजीर छवारे, नरेश ठाकरे, धनपाल बोपचे, स्वप्निल बघेले, सुखदेव वाघाये, नारद पटले, दामोधर राणे, पवन देशमुख, राजेश बागडे, सोनू चोले, सुनिल पटले उपस्थित होते.

अपघातात युवकाचा मृत्यू

चिचगड,दि.28ः- चिचगड ते नवेगाव रस्त्यावर शनिवारला चार वाजेच्या सुमारास पळसगाव धमदिटोला येथील 19 वर्षाच्या युवक कोमल प्रभुजी प्रचारी हा नवेगाव वरुन मोटरसायकलने धमदिटोलाकडे येत असताना ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.ट्रक हा मगरडोहवरून नवेगावला बांबू भरून जात असताना हा अपघात गावापासून एक किलोमीटर अंतरावर झा


ला.ट्रक (क्रमांक सी जी ०४-डी एन १००१)हा कोमलच्या मांडीवरुन गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. मृतक हा आई-वडीलांचा एकटा मुलगा होता. कोमलच्या मृत्यूमुळे म्हाताऱ्या आई वडिलांच्या आधार हरपलामुळे संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद पोलीस स्टेशन चिचगड येथे झाली असून याचा तपास हवालदार होरे करीत आहेत.

ग्रामीण क्षेत्र के पथदीपों की बिजली आपूर्ति खंडित

रावणवाड़ी (गोंदिया)

गोंदिया तहसील अंतर्गत आनेवाले दर्जनों गांवों की पथदीप का बिल बकाया होने की वजह से महाराष्ट्र महावितरण कंपनी ने गत एक सप्ताह पूर्व बिजली काट दी है। जिस वजह से गांवों में अंधेरे का साम्राज्य कायम हो गया है। नागरिकों को रात के समय आवागमन करने में अब टॉर्च लाइट का सहारा लेना पड़ रहा है। 

गोंदिया तहसील अंतर्गत आनेवाले रावणवाड़ी, मुरपार, रजेगांव आदि ग्राम पंचायतों में गांवों में लगे पथदीपों का विद्युत बिल नहीं अदा करने की वजह से विद्युत विभाग ने स्ट्रीट लाइट खंडित कर दी है। पथदीप बंद होने की वजह से इन दिनों गांवों की गलियों में अंधेरा छाया हुआ रहता है। रात के समय यदि किसी व्यक्ति को गांव की गलियों से आवागमन करना होता है तो उनके द्वारा टार्च व लालटेन का उपयोग किया जाने लगा है। टार्च एवं लालटेन इस आधुनिक युग में ग्रामवासी कर रहे हैं। यह इन दिनों गोंदिया तहसील के गांवों में चर्चा का विषय बना हुआ है। तहसील के अनेकों ग्राम पंचायतों पर विद्युत बिल बकाया होने की वजह से विभाग द्वारा यह बिजली आपूर्ति खंडित की गई है। ग्राम पंचायत व जिला परिषद का ग्राम विकास विभाग समय रहते विद्युत बिल की राशि विभाग को जमा कर देता तो यह स्थिति ग्रामीण अंचलों में निर्माण नहीं होती। बता दें कि जिला परिषद व पंचायत समिति के सदस्य का कार्यकाल समाप्त हुए तकरीबन ६ माह का समय बीत गया है। जिस वजह से इस समस्या से जिला परिषद के वरिष्ठ अधिकारियों को अब अवगत करानेवाला कोई जनप्रतिनिधि नहीं है। यदि समय रहते जिप व पंचायत समिति चुनाव हो जाते तो, गांव के पथदीप की विद्युत आपूर्ति सेवा खंडित नहीं होती। कोरोना की वजह से जिप, पंस चुनाव का कार्यकाल समाप्त होने के बावजूद भी चुनाव नहीं होने की वजह से जिला परिषद, पंचायत समिति व ग्राम पंचायत के आलाधिकारी की लचर कार्यप्रणाली की वजह से पथदीपों की बिजली की ओर ध्यान नहीं दिया गया। इसलिए यह विभाग ने विद्युत आपूर्ति सेवा खंडित कर दी है। ऐसी चर्चा इन दिनों गोंदिया तहसील के गांवों में चल रही है। दर्जनों गांव अंधेरे के साये में होने की वजह से अब गांव में टार्च व लालटेन का उपयोग बढऩे लगा है।

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...