Saturday 31 March 2018

*सावली येथे हॉटेल जाळून खाक*

देवरी/सावली: 31 मार्च
देवरी तालुक्यातील सावली गावात दिलीप दौलत शिरसाम या व्यक्तीचे एक छोटेसे हॉटेल अज्ञात व्यक्तीने रात्री 1:30 च्या सुमारास जाळल्याचे  संशय व्यक्त केले जात आहे या मध्ये संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले.त्याचे सुमारे 45000 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

Thursday 29 March 2018

सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा- माजी खासदार नाना पटोले

उंदीर मार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला देशविदेशात नुकसान
चारा घोट्याळापेक्षाही उंदीर मार घोटाळा
गोंदिया,दि.२६ः-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील qपडकेपार येथील एका शेतकèयाने मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याने त्यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबधी माजी खासदार नाना पटोले यांनी देवरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याविरुद्द गुन्हा न नोंदविता मुख्यमंत्री पोलीस महानिरिक्षकांच्या माध्यमातून आपल्याविरुध्दच मुख्यमंत्र्याची बदनामी केल्याचे कारण पुढे करुन गुन्हा नोंदविण्यासाठी स्थानिक पोलीसांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.जर आपल्याविरुध्द गुन्हाच दाखल करावयाचा असल्यास देशद्रोहाच्या कलम १५३ अंन्वये नोंदवावा अन्यथा एनसी दाखल केले तर आपण तपासअधिकारी पासून पोलीस महानिरिक्षकापंर्यत सर्वांना न्यायालयात ओढू  असे सांगितले.ते गोंदिया येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा महासचिव व माजी सभापती पी.जी.कटरे,अमर वराडे,पृथ्वीपालसिंह गुलाटी,डेमेंद्र रहागंडाले,प्रकाश रहमतकर,विशाल शेंडे,मनिष मेश्राम,व्यंकट पाथरू आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोबतच महाराष्ट्राच्या मंत्रालयात घडलेल्या उंदीर मार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेचे देशविदेशात सर्वात मोठे नुकसान झाले असून चारा घोटाळ्यापेक्षाही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रालयात झालेला हा घोटाळा असल्याचे म्हणाले.पटोले पुढे म्हणाले की,आपण मुख्यमंत्र्याविरुध्द नोंदविलेल्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी न करताच उलट पोलीस महानिरिक्षकांनी आपल्यालाच फसविण्यासाठी स्थानिक पोलीसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार तपासी अधिकारी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी आपल्या गावी येऊन याप्रकरणात आपली चौकशी केली होती.त्यानंतर आपल्याविरुध्द एनसी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.त्यावर आपण पोलीस अधिक्षकांना भेटून आपल्याविरुध्द सरकारविरोधात आवाज उठविल्याबद्दल कलम १५३ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करता एनसी केल्यास आपण तपासअधिकारीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याविरुध्द न्यायालयात जाणार असल्याचेही सांगितले.एकीकडे दोंडाईच्या नगराध्यक्षाविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागते.तर याठिकाणी मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर शेतकèयाने आत्महत्या केली असल्याने त्यांच्याविरुध्द का गुन्हा दाखल होऊ नये असेही पटोले म्हणाले.
मंत्रालयात मारले गेलेल्या ३ लाख उंदराबाबत बोलतांना म्हणाले की हा गैरव्यवहार भाजपचे जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांनीच उघडकीस आणला आहे.जेव्हापासून नवे मंत्रालया तयार झाले तेव्हापासून हे सरकार त्यामध्ये बसले असल्याने हे उंदीर कुठून आले आणि त्यांना मारण्यासाठी त्या कंपनीला काम देण्यात आले त्याचीच चौकशी व्हायला हवी.या उंदीरमार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची देशविदेशात बदनामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने फडणवीस यांचा हा घोटाळा चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे म्हणाले.तसेच भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकसदर्भात बोलतांना निवडणुकीसंदर्भात न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही.ज्या युवकाने ही याचिका न्यायालयात टाकली त्यासाठी वकील केला.त्या वकीलाची फीस एका पेशीची सुमारे २ लाख रुपये असल्याने त्या युवकाला पैसे कुणी दिले याचाही तपास व्हावा qकवा त्या युवकाची खरीच आर्थिक क्षमता आहे का या गोष्टीचीही तपासणी होणे आवश्यक झाले असून कुठेतरी अशा गोष्टीवंर आळा घालण्याची गरज असल्याचेही म्हणाले.

Wednesday 28 March 2018

10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार

28Match :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शाळांना सुट्टी १ मेपासून..

28 March: शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे. 


शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक

परीक्षा संपल्या की मामाच्या किंवा बाबांच्या गावाला जाण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आणि बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात यंदापासून बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी  सुरू राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असे. यंदापासून मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.  पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.

Tuesday 27 March 2018

बिबट्याचा दोघावर हल्ला,


गोंदिया,दि.२७-गोरेगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या मुरदोली येथे आज सकाळी ७.३०.ते ८ वाजेच्या सुमारास बिबट्याने गावात धुमाकुळ घालत दोघांवर जखमी केल्याची घटना घडली.त्यानंतर हा बिबट्या गावातीलच सुरज आहाके यांच्या घरात शिरल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी रेस्कु ऑपरेशन वनविभागाच्यावतीने सुरु करण्यात आले आहे.नागझिरा व्याघ्रपकल्पाला लागून हे गाव असल्याने पाण्याच्या शोधात बिबट गावात आला असावा अशी शंका आहे.वन्यजीव विभागाचे अधिकारी सचिन qशदे यांनी घटनास्थळी पोचून वनविभागाच्या qपजèयात बिबट्याला आत घालण्याचे प्रयत्न सुरु होते.

Monday 26 March 2018

देवरी येथे मध संकलन प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या दृष्टीने जनजागृती मेळावा


गोंदिया,दि.२६ : जिल्हा मानव विकास समिती तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज २७ मार्च रोजी देवरी येथील पंचायत समितीच्या कृषि भवनात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आग्या मधमाशा मध संकलन, प्रशिक्षण व साहित्य वाटप करण्याच्या दृष्टीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वन व जंगल भागात आग्या मधमाशांचे मध आदिवासी व बेरोजगार बांधव मोठ्या प्रमाणात संकलीत करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे ज्ञान व प्रशिक्षण नसते. पारंपारीक पध्दतीने पिळका व अशुध्द पध्दतीने मध संकलन केले जाते. अशा मध संकलन पध्दतीमुळे नैसर्गीक मधमशांच्या वसाहती नाश पावत आहे. त्यामुळे आदिवासी व बेरोजगार व्यक्तींना शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलन करण्यासाठी प्रशिक्षण देवून त्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उपस्थित राहून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक व्यक्तींनी कार्यक्रमस्थळी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. आसोलकर (९४०५१५२८२१) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

ब्लॉसम स्कुलच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे थाटात लोकार्पण

शैक्षणिक दिनदर्शिका दाखवितांना सर्व शिक्षक व मुख्याध्यापक 
देवरी: 26मार्च (बेरार टाइम्स)
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे ब्लॉसम 2018-2019 शैक्षणिक दिनदर्शिकेचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, मुख्याध्यापक सुजित टेटे, सर्व शिक्षक आणि विध्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा या शैक्षणिक दिनदर्शिकेचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. सदर दिनदर्शिकेत शालेय घडामोडी, सहशालेय उपक्रम या गोष्टीचा समावेश केलेला आहे. एप्रिल 2018 ते मार्च 2019 पर्यंतच्या सर्व गोष्टी नमूद केलेले आहे.
सदर दिनदर्शिका या वेळी सर्व शालेय विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

Sunday 25 March 2018

कार्यकर्त्यांनो, जनहिताची कामे करा-खा.पटेल

गोरेगाव,दि.२५ : निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला. त्यामुळे या खोटारड्या आणि संधीसाधू सरकारचा खरा चेहरा आता जनतेपुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावून जनहिताची कामे करावी. असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे केले.
स्थानिक शारजा लॉन येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे,युवका आघाडी किशोर तरोणे,केतन तुरकर, जिल्हा सचिव गोविंद खंडेलवाल, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक रुस्तम येळे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, राकाँ तालुकाध्यक्ष केलवराम बघेले, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, बाबा बहेकार, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर,पंचम बिसेन विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कमलेश बारेवार, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, प्रदीप जैन, विना बिसेन, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, अनिता तुरकर, छाया हुकरे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोणे उपस्थित होते.
पटेल म्हणाले, सध्या सत्तेत असलेले सरकार म्हणजे जनतेला भुलथापा देणारे सरकार आहे. शेतकèयांची कर्ज माफी असो, शेतक?्यांना देण्यात येणाक्तया सुविधा असो यासाठी अनेक अडचणी निर्माण करुन गोरगरीबांना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यमान सरकारकडून केले जात आहे. या सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी करण्याचे आवाहन करित त्यांनी कार्यकत्र्यांमध्ये जोश भरला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असो वा नसो आमच्या पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. निवडणुकीपूर्वी विकास कामे करुन परिसराचा कायापालट करु असे सांगणाèयांनी सांगता येईल असे एकही विकास काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
बन्सोड यांनी कार्यकत्र्यानी आपल्या तालुक्यातील गावागावातील प्रभाग वॉर्ड, बुथ संघटन बळकट करण्यासाठी काम करावे . हे कार्य करत असतानाच शेतक?्यांना, गोरगरीब लाभाथ्र्यांना होत असलेल्या त्रासाबाबत विचारणा करुन त्यावर तोडगा काढून द्यावा. गाव पातळीवर संघटन मजबूत करावे. या वेळी माजी विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी तालुक्यातील अनेक गावात आघाड्या स्थापन करुन जनसंपर्क वाढविण्याचे कार्य कार्यकत्र्यांना देण्यात आले. नवयुवकांच्या नावाच्या नोंदणीसह मतदार याद्या तयार करुन त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठीही कार्यक्रम तयार करण्यात आला.गाव प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली. कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजांना धक्का; ‘वैद्यनाथ’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित




बीड,दि.२५ :-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना अन्न प्रशासनाने दहा दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या तब्बल ४० हजार मेट्रिक टन उसाच्या गाळपाला फटका बसणार आहे. कारखान्याच्या तपासणीदरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींबाबत सुधारणा नोटीस देऊनही त्याकडे केलेले दुर्लक्ष कारखाना प्रशासनाच्या अंगलट आले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर झालेल्या या कारवाईने हा पंकजांना धक्का समजला जात आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये वैद्यनाथ कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून झालेल्या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. यानंतर कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागासह अन्न प्रशासनाकडूनही तपासणी करण्यात आली होती. अन्न प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या मुंबई येथील पथकाने ही तपासणी केली होती. त्या वेळी कारखान्यात असलेल्या काही त्रुटींबाबत अन्न प्रशासनाने वैद्यनाथ कारखाना प्रशासनाला सुधारणा नोटीस काढली होती. साखरेचे काही नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते. यानंतर कारखान्याने अन्न प्रशासनाला पत्र पाठवून सुचवल्याप्रमाणे सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर पुन्हा १५ मार्च रोजी गुप्तवार्ता शाखा व बीडच्या सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारखान्याची तपासणी केली. यामध्ये सुचवलेल्या त्रुटी दुरुस्त न केल्याचे आढळून आल्याने सहायक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी ११ ते २० एप्रिल २०१८ या दहा दिवसांसाठी कारखान्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

जागतिक जल दिनानिमित्त राज्यभरात जलजागृती

 अर्चना शंभरकर/मुंबई: पाणी आणि त्याचा मर्यादित असलेला साठा हा जागतिक चिंतनाचा विषय आहे. या विषयावर सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जगभरात साजरा होत असतो. सन 1993 पासून संयुक्त राष्ट्राने हा जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. याच दिनाचे औचित्य साधून राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या वर्षी ‘पर्यावरणासाठी पाणी’ ही थीम आहे. दि. 16 मार्च ते 22 मार्च या सप्ताहात राज्यस्तरावर, विभागस्तरावर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामार्फत जलजागृती उपक्रम राबविले जात आहेत.
पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जागृती आणी साक्षरता निर्माण होण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जलसंपदा विभाग,कृषी विभाग, पाणी पुरवठा विभाग, नगर विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या संयुक्त समन्वयाने राज्यभर जल जागृती कार्यक्रम साजरा केला जात आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा या तीनही स्तरावर जनजागृतीसाठी कार्यशाळा व मेळावे आयोजित केले जात आहेत. ज्यामध्ये लोक प्रतिनीधी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. शाळा महाविद्यालयांमधून रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, चित्रफीत तयार करणे या सारख्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
निसर्गातील पाण्याच्या साठ्याचे संपत्ती म्हणून जतन करावे कारण आपण जतन करून ठेवलेली ही जलसंपत्ती पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडणार आहे. ‘जल है तो कल है’ हा संदेश घराघरात पोहचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न होत आहे.राज्यात जलजागृती सप्ताह हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

Saturday 24 March 2018

80 लाखाच्या दिव्यांग स्पर्धेचा लाभ कुणाला;समाजकल्याण सभापतीचे नाव वगळले



गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.23ः- गेल्या दोन-तीन वर्षाचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यात राज्यस्तरीय स्पर्धा व समेंलन होण्याचा सपाटा सुरु झाला आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागातंर्गत हे समेंलन होत आहेत.त्या विभागाचे मंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत त्यामुळे होत आहेत.परंतु कोट्यवधी रुपये खर्च करुन जी साहित्य समेंलन किंवा स्पर्धा होत आहेत,त्यातून लाभ कुणाला होत आहे,हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.यापुर्वी व्यसनमुक्ती समेंलन झाले त्यात एक संस्था सहभागी,दुसरे संत समेंलन झाले त्यातही वारकरी परिषद ही संस्था सहभागी आत्ता तिसरी दि.व्यांग स्पर्धा होत आहे.पंरतु दिव्यांग्याच्या नावावर होणार्या खर्चाचा लाभ खरच या आमच्या दिव्यांग बंधूना मिळतो की त्यांच्या नावावर इतर कुणाचा पोट भरतो हा खरा संशोधनाचा विषय ठरला आहे.पारदर्शक प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी यावर नजर ठेवावी कारण आमचे पालकमंत्री साधेभोळे असल्याने त्यांची फसवणूक विभागाचे अधिकारी किंवा इतर व्यक्ती करु शकतात,आणि बदनामीचे खापर मात्र त्यांच्यावर फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे


त्यासाठी सुध्दा आयोजक संस्था म्हणून ज्या संस्थेच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तपासात ती संस्था दोषी आढळली,त्या संस्थेला सुमारे 80 लाखांच्या दिव्यांग स्पर्धेचे यजमान पद दिले गेले आहे.असो हा राजकारणाचा प्रश्न आहे.पालकमंत्र्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या व्यक्तीची ती संस्था असल्याने आणि सुरवातीपासूनच ते त्यांच्या सोबतीला असल्याने त्यांच्या संस्थेची निवड करण्यात आली असावी.परंतु या स्पर्धेसाठी ज्या निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आल्या.त्या पत्रिकेत ही स्पर्धा ज्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे,भलेही आर्थिक अधिकार या विभागाकडे नसले तरी त्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीचे नावच पत्रिकेतून वगळण्यात आल्याने शासनस्तरावरच समाजकल्याण विभाग आपल्याच समाजकल्याण विभागाच्या जिल्हा परिषद सभापतीला न्याय देऊ शकलेला नाही.
राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ उद्या (दि. २4) होत आहे.विशेष म्हणजे ही स्पर्धा आधी 21 ते 23 दरम्यान होणार होती.नंतर ती तारीख बदलण्यात आली.परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांना,दिव्यांग शाळांना माहितीच न मिळाल्याने 21 च्या स्पर्धा म्हणून ते काही खेळाडू व शिक्षक आधीच पोचले.त्यानंत पत्रिका व होर्डींग प्रकाशित करतांनाही दर दिवसाला बदल झाल्याचे दिसून येत आहेत.गुरुवारपर्यंत आधी ठरलेल्या पाहुण्यांच्या नावानिशी पत्रिका व नागपूरच्या विमानतळापासून देवरीपर्यंत फ्लक्स लावण्यात आले.परंतु गुरुवारला अचानक वित्त राज्यमंत्री केसरकर यांनी आपण स्पर्धेला येत असल्याचे सांगितल्याने पुन्हा नव्या पत्रिका व फ्लक्स तयार करुन लावण्याचा सपाटा सुरु करण्यात आला.
या सर्व दिव्यांग स्पर्धेमध्ये सुमारे 4 हजार लोकांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था होणार असे सांगितले जात असले तरी दिव्यांग खेळांडूची संख्या मात्र सुमारे 150 च्या जवळपासच आहे.या स्पर्धेसाठी पहिल्या टप्यात 41 लाख रुपयाचा निधी अंपग कल्याण आयुक्त व नागपूर उपायुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन विभागाकडून नाविन्यपुर्ण योजनेतून परत 20 ते 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत,असे सुमारे 80 लाख रुपये या स्पर्धेसाठी देवरीतील त्या संस्थेला देण्यात येणार आहेत.खरच या स्पर्धेवर 80 लाख रुपये खर्च होतो का याचा विचार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा गाजावाजा करणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत काय अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण यापुर्वीच्या व्यसनमुक्त समेंलनात एका मुंबईच्या संस्थेचे चांगलभल करण्यात आले.त्यानंतर संत समेलनांत नाविन्यपुर्ण योजनेच्या निधीसह सुमारे 1 कोटी 63 लाख रुपयाचा खर्च करण्यात आल्याचे सुत्र सांगतात त्या समेंलनातून जिल्ह्यातील किती संत,शाहिर,किर्तनकाराना लाभ मिळाला हे जनतेला ठाऊक आहेच.अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन विभाग पुन्हा नाविन्यपुर्णच्या नावावर दिव्यांग स्पर्धेसाठी काही पैसा देणार तो पैसा खरच त्या दिव्यांगाच्या हितासाठी खर्च होणार असे वाटत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवपायलीजवळ बिबटयाच्या मृत्यू


सडक अर्जुनी दि.24ः- गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/देवपायली गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून वन्यजीव व वनविभागाचा घनदाट जंगल आहे.या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असून त्यामुळेच डोंगरगावपासून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही थांबले आहे.त्यातच आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.माहिती मिळताच वन व वन्यजिव विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Wednesday 21 March 2018

उत्कृष्ट कार्यासाठी DIECPD व Z.P. अधिकाऱ्याचा मुंबईत सत्कार

देवरी : 21 मार्च
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावीपणे अमलबजावणी करून १००% मुले शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी , प्राचार्य डायट  आणि शिक्षणाधिकारी यांचा मुंबईत सत्कार करून गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक उपक्रम मागील ३ वर्षांपासून राबविण्यात जात आहे सदर उपक्रमांतर्गत जिल्हातील १००% मुले प्रगत होण्यासाठी डायट च्या माध्यमातून विश्तार अधिकारी , विषय साधन व्यक्ती , केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या द्वारे सांघिक शाळा भेट , अध्ययन स्तर निश्चिती  या सारखे उपक्रम राबवून  आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. जेनी करून मुले १००% प्रगत होत आहेत .
या साठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा दयानिधी डायट चे प्राचार्य राजकुमार हिवरे व शिक्षणाधिकारी उल्हास नरडं यांना राज्याचे मुख्य सचिव  सुमित मलिक , प्रधानसचिव नंदकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . 

लोकप्रिय न्युज पोर्टल बेरार टाईम्स करीता क्लिक करा-http://berartimes.com/




Add caption

Tuesday 20 March 2018

रस्ते बांधकामात श्रीमंतांना झुकते माप



देवरी,दि.20ः-देवरी नगर पंचायतीद्वारे सध्या सुरू असलेल्या रस्ते व नाली बांधकामामध्ये श्रीमंतांना झुकते माप देवून सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकाम तोडले जात असल्याचा रोष नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरात नगर पंचायतीतर्फे सध्या रस्ते व नाली बांधकाम सुरू आहे. परंतु, ही विकास कामे करताना मुख्याधिकार्‍यांकडून भेदभाव केला जात असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी जेथे सर्वसामान्य नागरिकांची घरे आहेत, त्यांचे घर, दुकान, सुरक्षाभींतीचा काही भाग तोडून रस्ते व नाल्याचे बांधकाम केले जात आहे. तर ज्या ठिकाणी श्रीमंतीची घरे आहेत व त्यांचे घरे वा सुरक्षाभींत बांधकामात आड आहेत, त्यांना अभय देवून बांधकाम केल्याचे दिसत आहे. त्यामुळे श्रीमंताना अर्थपूर्ण संबंधातूनच मुख्याधिकार्‍यांनी अभय दिले असल्याचा रोष नागरिकांमध्ये व्यक्त केला जात असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Monday 19 March 2018

"गुढीपाडवा प्रवेश वाढवा" अभिनव उपक्रमाला मुख्याध्यापक व शिक्षकांचा डच्चू


*देवरी तालुक्यातील आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील घटना*
देवरी/लोहारा: 18 मार्च

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या करिता गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम 2 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी 10हजार विध्यार्थ्यांनी एकाच वेळेस गुढीपाडवा च्या पावन पर्वावर जिप शाळेत प्रवेश घेतला असे शिक्षणाधिकारी निरनिराळ्या शालेय व्हाट्स अप ग्रुप च्या माध्यमातून सांगितले. वेळोवेळी सर्वांना माहिती देऊन सुद्धा या अभिनव उपक्रमाला  देवरी तालुक्यातील आदर्श केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा लोहारा येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी डच्चू मारल्याने  खळबळ उडाली आहे.
सदर शाळेचे मुख्याध्यापक पी.सी. ठाकरे यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सदर उपक्रम 17 मार्च ला राबविला, असे उत्तर दिले. याची शहानिशा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश राऊत यांना विचारले असता त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणतीही माहिती  दिली नसल्याचे सांगितले. परिसरातील इतर शाळेमध्ये सदर उपक्रम प्रभात फेरी, नवोदितांचे स्वागत आणि गुढीपाडवा थाटात राबविला गेला. परंतु, आदर्श केंद्रीय शाळा असून देखील या शाळेला गुढीपाडवा च्या दिवशी कुलूप लावलेले होते. सदर शाळा फक्त प्रशिक्षण घेण्या करताच आहे का? असा प्रश्न  या निमित्ताने विचारला जात आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांनी सदर मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील आळशी अधिकारी आणि संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासाठी संबंधित क्षेत्राच्या आमदार यांच्याशी भेट घेण्याचे ठरविले आहे. यावेळी देवरीचे पंस गटशिक्षणाधिकारी साकुरे यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क केला असता त्यांनी सदर केंद्रप्रमुख टेंभरे आणि मुख्याध्यापक ठाकरे यांना वेळोवेळी सूचना दिल्याचे सांगितले आणि पत्र देऊन केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई करण्याचे सांगितले.
"जिप शाळेची पटसंख्या वाढविण्याचे नवीन विक्रम करूयात इंग्रजी शाळांना धडकी भरवूयात" असे शिक्षणाधिकारी वेळोवेळी बोलायचे. परंतु, बेजबाबदार मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सदर उपक्रमाला डच्चू देत शिक्षणाधिकाऱ्यांच्या घोषणेला हरताळ फासल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 
या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर खरंच कारवाई होणार का? जिप शाळाचा  दर्जा आणि पटसंख्या वाढेल का? या कडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.

देवरीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयात निरोप समारंभ


देवरी,दि.19- स्थानिक मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवेंद्र बिसेन आणि डॉ. वर्षा गंगणे ह्या होत्या. यावेळी प्रा. झिंगरे यांच सह मान्यवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देत निरोप दिला. 
संचलन पूजा आत्राम हिने केले. तर उपस्थितांचे आभार अनमोल मेश्राम याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. चंद्रमणी गजभिये, प्रा. भास्कर डोंगरे, प्रा. प्रणय पेंदामे, प्रा, गायत्री गुप्ता, सुनील खलोदे, अंजू तावाडे,गायत्री बोरकर,टिकेश्वरी सारवा आदींनी सहकार्य केले.

Friday 16 March 2018

गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेचा सभा गोरेगावात उत्साहात


गोरेगाव,दि.१६ः-गोंदिया जिल्हा सरपंच सेवा संघटनेची सभा गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष शसेंद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारला पार पडली.यावेळी सरचिटणीस कमल येळणे,उपाध्यक्ष दिनेश कोरे,कोषाध्यक्ष डुडेश्वर भुते,संघटक डॉ.जितेंद्र रहागंडाले,सालेकसा तालुकाध्यक्ष संजू कटरे,सडक अर्जुनी तालुकाअध्यक्ष जीवन लंजे,मोरगाव अर्जुनी तालुका अध्यक्ष हेमकृष्म संग्रामे यांच्यासह सरंपच सोमेश्वर रहागंडाले,तेजेंद्र हरिणखेडे, अनंत ठाकरे,उत्तम कटरे,योगेश चौधरी,जितेंद्र डोंगरे,तिरोडा तालुका अध्यक्ष महेंद्र भेंडारकर,गोंदियातालुका अध्यक्ष मुनेंद्र रहागंडाले,राजेश पटले,राज तुरकर,दिप्ती पटले,रजनी धपाडे,शारदा उईके,दमयंता कटरे,ओविका नंदेश्वर धारा तुप्पट,मधु अग्रवाल,उषा रहागंडाले,मायादेवी चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारीणीविस्तारासह बोरवेल देखभाल दुरुस्ती चौदाव्या वित्त आयोगातून देयके मंजुर करण्यात येऊ नये,डॉटा ऑपरेटरला शासनस्तरावर मानधन देण्यात यावे.सरपंच,उपसरपंच यांना १५ व १० हजार मानधन देण्यात यावे.सदस्यांना ५०० रुपये बैठक भत्ता देण्यात यावे.सरपंचाना टोल टॅक्स व महिला सरपंचाना मोफत बस प्रवास सेवा देण्यात यावे आदी मागण्यावर चर्चा करम्यात आली.संचालन तेंजेंद्र हरिणखेडे यांनी केले आभार सोमेश रहागंडाले यांनी मानले.

पिंडकेपार पांदन रस्त्याचे भूमिपूजन

गोंदिया,दि. १५ : तालुक्यातील पिंडकेपार (इंदिरानगर) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्याचे भूमीपूजन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशू संवर्धन सभापती शैलजा सोनवाने यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचायत समिती सदस्या दिपा चंद्रिकापुरे, सरपंच सुधीर चंद्रिकापुरे, ग्रामपंचायत सदस्य शालिक रक्षे, गायत्री बेदी, रिनायत, डोमळे, बळीराम शरणागत, कमलेश सोनवाने व गावकरी उपस्थित होते. २४ लाख रुपये खर्चून पांदन रस्ता तयार केला जाणार आहे.

सीईओ दयानिधींची सेजगाव तलाव खोलीकरणाच्या कामाला भेट

गोंदिया,दि.15 : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अंदाजीत २० लक्ष रुपयाचे  हे काम आहे. या कामाला गावातील सुमारे ५०६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्या अनुसंगाने १४ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा  दयानिधी व उपमुकाअ. यांनी या कामाला भेट देऊन कामा विषयी तसेच मजुराच्या समस्या विषयी सरपंच कंठीलाल पारधी तसेच ग्राम सचिवाकडून माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने मनरेगाच्या कामाला प्राधान्य देत विविध कामांना सुरुवात केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून  ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरू करण्यात आली आहे. या कामामध्ये घरकुलांचा कामाचाही समावेश आहे. यासह पांदन व सिमेंट रस्ते, भात खाचर, नाला सरळीकरण यासारखी कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. ही कामे बरोबर सुरू आहेत. की नाही तसेच गावातील गरजू नागरिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला की नाही, याची माहिती मुकाअ. डॉ. राजा दयानिधी कामाच्या स्थळी जाऊन घेत आहेत. त्या अनुसंगाने १४ मार्च रोजी  तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावर जाऊन त्या कामाची पाहणी केली. तसेच संपुर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह नरेगा.चे उपमुकाअ. तसेच सरपंच कंठीलाल पारधी, माजी पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी,  ग्रामसेवक पी.एम. गौतम, उपसरपंच सप्नील महाजन,  ग्रामरोजगार सेवक मोहन पारधी आदी उपस्थित होते.

बिल्डरकडून 2 कोटींची खंडणी घेताना पुण्यातील शिवसेनेचा ZP सदस्य अटकेत




मुंबई,दि.१५:- मुंबईतील पवई भागातील एका नामांकित बिल्डरला 20 कोटींची खंडणी मागणा-या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यला 2 कोटींची खंडणी घेताना बुधवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज त्यांना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुलाब विठ्ठल पारखे (ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव नाव आहे. पारखे शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम 384 (खंडणी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, पवईत कार्यालय असणा-या एका नामांकित बिल्डरला पारखे यांनी 20 कोटींची रुपयांची खंडणी मागितली. त्याआधी या बिल्डरबाबत माहिती अधिकारातून काही माहिती घेतली होती. यात काही घोळ असल्याचे पारखे यांना माहित होते. त्यामुळे माहिती सार्वजनिक न करण्यासाठी पारखे यांनी बिल्डरकडे खंडणी मागितली. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी संबंधित बिल्डरने पारखेला 10 लाख रूपये दिले. मात्र, यावर त्यांचे समाधान झाले नाही.पारखे व त्याची माणसे बिल्डरला पैशांसाठी आणखी धमकावू लागली. आम्हाला पैसे नाही दिले तर माध्यमांकडे जाऊ व तुमची पोलखोल करू, अशी धमकी दिली. यानंतर बिल्डरच्या कार्यालयातून पवई पोलिस ठाण्यात धाव घेतली व याबाबतची माहिती दिली. सोबतच पुरावा म्हणून फोन कॉल रिकॉर्ड सादर केले.

Thursday 15 March 2018

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती डोॆगरेंसह एकजण एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया, दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याचे वृत्त नुकतेच हाती आहे.
लाचलुचपत खात्याने जिपमध्ये लावलेल्या सापळ्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला आपल्या कार्यालयाच एका इसमाकडून दीड लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे.

Wednesday 14 March 2018

कोरेगाव भिमा हिंसा: अखेर पुणे पोलिसांकडून मिलिंद एकबोटेंना अटक




पुणे,दि.14(विशेष प्रतिनिधी)- कोरेगाव भिमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अखेर पुणे पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. आज सकाळी सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर आज हिंसा घडल्याच्या 72 दिवसांनी अटक झाली. मिलिंद एकबोटेंवर कोरेगाव भिमा येथे हिंसा भडकवल्याचा प्रमुख आरोप आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याआधी मुंबई हायकोर्ट व पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एकबोटेंना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आज त्यावर सुनावणी झाली. मात्र, आज कोर्टाने त्यांना जामीन देता येणार नाही असे स्पष्ट बजावले.
दरम्यान, पुणे पोलिसांनी मंगळवारीच सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. यात मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात काही लोकांना कसे भडकवले याचे पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन नाकारला.20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान एकबोटेंच्या वकिलाने सरकारला तोंडावर पाडले होते. मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का केली नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला केला होता. यावर एकबोटे सापडले नाहीत, ते गायब झाले होते असे उत्तर राज्य सराकरच्या वकिलाने दिले होते. यावर एकबोटेंच्या वकिलाने सरकारचे दावे फेटाळून लावत, आम्ही सातत्याने सहकार्य करायला व पोलिसांत जायला तयार होतो, मात्र पोलिस अथवा प्रशासनाने आम्हाला बोलवले नाही असे सांगतिल्याने सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या अब्रूचे खोबरे झाले होते. यावर सुप्रीम कोर्टाने सरकारला या प्रकरणी पुन्हा तपास करा व गरज भासली तर एकबोटेंना अटक करा असे निर्देशच दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी एकबोटेंचा कोरेगाव भिमा प्रकरणी पूर्ण सहभाग असल्याचे पुरावे सुप्रीम कोर्चात सादर केले. आता एकबोटेंना अटक झाली आहे.

युपी,बिहारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले!

लखनऊ/पटणा(वृत्तसंस्था),दि.14– उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित गोरखपुर आणि फुलपुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी-बसपाच्या युतीने भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघात सपाचे दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला आहे.फुलपूर लोकसभा मतदारसंघात सपा-बसपा आघाडीचे नागेंद्र सिंह पटेल यांनी 59 हजार 613 मतांनी विजय मिळवला आहे.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे प्रवीणकुमार निषाद यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उपेंद्र दत्त शुक्ल यांच्यावर 25 हजार मतांची आघाडी घेतली आहेत. 22 व्या फेरीपर्यंत प्रवीण निषाद यांना 3 लाख 34 हजार 463 मते तर भाजपाचे उपेंद्र शुक्ला यांना 3 लाख 8 हजार 593 मते मिळाली आहेत.
पाटणा- बिहारमध्ये एक लोकसभा व दोन विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आररिया लोकसभा मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उमेदवार सर्फराज आलम यांनी मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांच्यावर आलम यांनी 62 हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, सर्फराज आलम यांना 3 लाख 33 हजार 50 मते मिळाली आहेत. तर भाजपचे प्रदीप सिंह यांना 3 लाख 9 हजार 863 मते मिळाली आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार तस्लीमुद्दीन यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

माहुरकुड्याच्या सरपंचाचा ग्रामसभेतच झिंग झिंग झिंगाट


अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१४ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आज(दि.१४) आयोजित रोजगारसेवक निवडीच्या ग्रामसभेतच येथेच्छ दारु ढोसल्याने झिंग झिंग झिंगाट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.माहुरकुड्याचे रोजगारसेवक मेघराज काळबांधे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या ठिकाणी नव्या रोजगारसेवकाची निवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरंपच असतो,त्यामुळे सरंपच राजेंद्र कोडापे हे ग्रामसभेत पोचले असता ते दारुच्या नशेत पुर्णतः झिंगाट असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली.पोलिसानीही वेळ न गमावता माहुरकुडा गाठत सरपंचाला ग्रामसभेतून उठवून नेत ग्रामपंचायत मागील आरोग्यनिवास स्थानाच्या वèहाडातच नेऊन टाकले.त्यानंर ग्रामरोजगार सेवक निवडीला सुरवात करण्यात आली.

चिचटोल्यात मनरेगात अडीच ते तीन लाखाचा भ्रष्टाचार

सडक अर्जुनी,दि.14- तालुक्यातील चिचटोला येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात सन २०१७-१८ मध्ये मनरेगाच्या कामात अडीच ते तीन लाख रुपयांचा भष्ट्राचार केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाली आहे.या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातील युवा शक्ती परिवर्तन पॅनलच्या वतीने दिलीप डोंगरवार, सदाशिव कापगते, तुमेश कापगते, हेतराम कापगते, विलास कापगते, नामदेव कापगते, कर्णवीर खोब्रागडे, रेवलाल भिमटे, इंद्रकांता गजभिये, धर्मपाल बैस, नागसेन वैद्य, पृथ्वीराज बांबोळे, हिरेंद्र मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, किशोर वैद्य, मुनेश्वर वाळवे, रामू येसनसुरे, राजेश बांबोळे आदी सर्व सदस्यांनी केली आहे.
गावातील काही व्यक्तीने माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत ३० आॅक्टोबर २०१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली. त्यात सन २०१७-१८ मध्ये मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरण करण्यात आले. त्यामध्ये कुशल काम सुरू असलेल्या ठिकाणी माहिती फलकावर दोन लाख ७४ हजार १७६ रूपये कामाची किंमत दर्शविलेली आहे. तसेच कुशल कामाची जाहिरात न काढता, निविदा न मागविता खोडशिवनी येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांना काम मंजूर करण्यात आले. त्यात त्यांच्याच नावे रक्कम उलच करण्यात आली आहे.
पण प्रत्यक्षात सदर कामात माती वाहतूक करण्यासाठी गावातील पाच ट्रक्टर्स २००० रूपये प्रति दिवस भाड्याने घेवून काम करण्यात आले. ट्रक्टर मालकांना रोजगार सेवक विलास उईके व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा सध्याचे उपसरपंच यांनी ९० हजार रूपये दिले. सदर माती वाहतूक कामात ९० हजार रूपये खर्च झाले असताना दोन लाख ७४ हजार १४६ रूपयांची उचल करून एक लाख ८४ हजार १७६ रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
याशिवाय अकुशल कामावर १५ लाख ५२ हजार ०२७ रूपयांचा खर्च दर्शविला आहे. त्यात कामावर न येणाºया व आपल्या जवळच्या काही मजुरांच्या बोगस हजेरी लावून हजारो रूपयांची उचल करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार मनरेगा अंतर्गत कामावरील प्रत्येक मजुराचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. मग प्रशासकीय अधिकाºयांनी कुशल कामावर दोन लाख ७४ हजार १७६ रूपयांची मोठी रक्कम कोणत्या आधारावर दिली. एकीकडे प्रत्येक मजुराला बँक खाते व आधार क्रमांकाची सक्ती तर दुसरीकडे लाखो रूपयांची देवाणघेवाण नगदी रक्कमेने करण्यात आली. माती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर मालकांना ९० हजार रूपये देण्यात आले.त्यामध्ये राजकुमार कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, दिलीप डोंगरवार यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, धनंजय कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, नामदेव कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये व निलेश काशिवार यांना पाच दिवसांसाठी १० हजार रूपये यांना दिल्याची नोंद आहे.

जि.प. अभियंत्यांचे १९ व २० मार्चला सामूहिक रजा आंदोलन

गोंदिया,दि.१४ : जिल्हा परिषदेत कार्यरत असणाèया अभियंता अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राजयभरातील अभियंत्यांनी १९ व २० मार्चला राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलनाचे आवाहन केले आहे. अभियंता संवर्गाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमधील बांधकाम, लघुqसचन, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व अभियंते व संघटनेचे सभासद १९ व २० मार्च २०१८ या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याची नोटीस राज्य संघटनेने शासनास दिल्याची माहिती गोंदिया जिल्हा अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि. गोवर्धन बिसेन,इंजि.वासुदेव रामटेककर यांनी दिली. या आंदोलनात जिलह्यातील सर्व अभियंत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्यावतीने मागील ५ ते ७ वर्षापासून संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्तरावर अनेक वेळा निर्दशने करण्यात आली. त्या अनुषंगाने तब्बल ९ वेळेस ग्रामविकास विभागाचे मंत्री व सचिव यांच्यासोबत संघटनेच्या बैठकाही आयोजित करण्यात आल्या. सदर बैठकांमधून मंत्री महोदयांनी प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेबाबत वारंवार सकारात्मक आश्वासने दिली. तसेच विभागाचे सचिव हे सुद्धा मागण्याच्या पूर्ततेबाबत सकारात्मक असूनही अद्याप एकही मागणीच्या पूर्तते संदर्भात आदेश निर्गमित झालेले नाहीत.
त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंत्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असून शासनाकडून होत असलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. या बाबतीत आता संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यस आंदोलनाच्य पहिल्या टपयात १५ मार्च २०१८ रोजी राज्यभरातील अभियंते काळीफित लावून कामकाज करणार असून त्यानंतर १९ व २० मार्च २०१८ रोजी राज्यातील जिल्हा परिषदेचे सर्व ३२०० अभियंते दोन दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतरही शासनाने संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे.
प्रलंबित मागण्यामध्ये जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र या आमच्या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवास भत्तायापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासिक वेतनासोबत अदा करने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संघटनेच्या याचिका क्रमांक ९१७४/२०१३ मध्ये ४ डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तात्काळ निर्माण करने, जिल्हा परिषदेकडील अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्या बाबत करावयाची वेतन निश्चिती, जलसंपदा विभागाकडील ६ डिसेंबर २०१४ च्या निर्णयाप्रमाणे करनेबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तात्काळ भरणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना दयावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुर्नविलोकीत करणे,जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गास अतांत्रिक कामे न देणे बाबत आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गासाठी जिवनदायी आरोग्य विमा योजना (कॅशलेस मेडीक्लेम) लागू करणे, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांना व्यवसायीक परीक्षेबद्दल लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करणे यांचा समावेश असल्याची माहिती बिसेन यांनी दिली.

देशपांडेना गोंदियाचा मोह आवरेना;बांधकामचा मस्करे लपामध्ये तळ ठोकून

गोंदिया,दि.१४ :-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग तसा नेहमीच चर्चेतला विभाग राहिला आहे.या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दुर्लक्षामूळेच म्हणा की स्वतःला मी भाऊ तसा नव्हे सांगण्याच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचारी अधिकार्यावर नियंत्रण राहिलेच नाही.गोंदिया लघु पाटबंधारे  उपविभागातंर्गत येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील मोहाडी,चोपा,तेढा भागातील कामे सांभाळणारे शाखा अभियंता विकास देशपांडे यांची मे २०१७ मध्ये प्रशासकीय बदली सालेकसा लघुपाटबंधारे उपविभागात झाली.परंतु त्यांनी बदलीनंतरही गोरेगाव तालुक्यातील काम करण्याचा मोह अद्यापही सोडलेला नाही.तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकाला आमगावच्या लपा उपविभागात ठेवून त्याच्याकडून साईटवरील कामे करण्यास मोकळीक दिल्याने कार्यकारी अभियंत्याच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
शाखा अभियंता देशपांडे यांना गोंदिया येथून १ जून २०१७ ला कार्यमुक्त करण्यात आले.त्यानतर सालेकसा येथे रुजूही झाले.परंतु देशपांडे यांनी रुजु झाल्यानंतर शाखा अभियंता म्हणून जे काम त्याठिकाणी करायला हवे होते,ते एकही काम अद्याप केलेले नाही.उलट उपविभागीय अभियंता सोरले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार उलट कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांनी देशपांडेना सोपवितांना त्यांनी शाखा अभियंता म्हणून त्या उपविभागात जबाबदारी स्विकारली की नाही याचा तपासच केल्याचे दिसून येत नसल्याचे उघडकीस आले आहे.उलट गोंदिया उपविभागातून बदली झाल्यानंतरही आजही ते गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयात येऊन गोरेगाव तालुक्यातील कामांचे इस्टिमेट तयार करणे आदी काम करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.एकीकडे गोंदियातून बदली झालेली असताना सालेकास येथे मुळ आस्थापनेच्या कामाला हात लावलेले नाही.परंतु गोंदिया उपविभागात येऊन देशपांडे बिनधास्त कार्यकारी अभियंत्याच्या आशिर्वादाशिवाय काम करुच शकत नसल्याची चर्चा आहे.त्याचप्रमाणे सालेकसा येथेच सुरवातीपासून कार्यरत असलेले स्थापत्य अभियात्रिकी सहाय्यक शैलेंद्र मेश्राम यांची पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता या पदावर त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.वास्तविक पदोन्नतीने इतर ठिकाणी नियुक्ती व्हायला हवी होती.परंतु तसे करण्यात आले नाही. मेश्राम यांच्या कामकाजाच्या अनेक तक्रारी असतानाही त्याच ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी का नियुक्ती केली? हा प्रश्न तालुक्यात चर्चेचा ठरला आहे
बांधकामचा मस्करे लपामध्ये तळ ठोकून
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव येथील कनिष्ठ सहायक के.एम.मस्करे यांना तत्कालीन सीईओ डी.बी.गावळे यांच्या १ फेबु्रवारी २०१६ च्या पत्रानुसार आमगाव तालुक्याचा अभ्यास असल्याने त्यांची प्रति नियुक्ती तलावाची देखरेख पानसारा वसूली संबंधाने नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून ते त्या ठिकाणी तळ ठोकून बसले असून आमगााव तालुक्याव्यतिरिक्त सडक अर्जुनी तालुक्यातील मग्रारोहयो,शेततळे,मागेल त्याला विहिर आदी कामे अभियंता म्हणून स्वतःच ठेकेदारी सुध्दा करीत असल्याची चर्चा आहे. वास्तविक मंगळवार व गुरुवार हे दोनच दिवस ठरविलेले असताना मस्करे मात्र पूर्ण आठवडा काम करीत असून तत्कालीन सीईओ गावळे यांच्या पत्राला मस्करेंनी केराची टोपली दाखवत आपली दुकान थाटल्याची चर्चा आहे. कामांचे मोजमापासह सर्वच कामे जी शाखा अभियंता करतो ती कामे करण्याचा सपाटा लावला आहे.एकीकडे जि.प.बांधकाम विभागात प्लंबर व यांत्रिकीच्या लोकांना टेंडरची कामे दिली जात आहेत.तर दुसरीकडे बांधकामचाच कर्मचारी लपा विभागात जाऊन दुसरे काम करीत असल्याचे चित्र आहे.मस्करेंना लपा मध्येच टिकवून ठेवण्यासाठी जि.प.सदस्यांचा नक्कीच पाठपुरावा असावा अशी चर्चा आहे.

…अखेर चिचगडचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी निलंबित

चौकशीत तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी वसुलीस पात्र


लेखापरीक्षक सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात

सुभाष सोनवाने
चिचगड,दि.१४ :- देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामपंचायतीमध्ये सन २०१२-२३ सालातील घरकूल आणि २०१६-१७ मध्ये झालेल्या शौचालय बांधकामात घोळ केल्याप्रकरणी तत्कालीन ग्राम विकास अधिकारी रत्नाकर घरत यांना प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) यांनी दिली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात तत्कालीन सरपंच, स्थापत्य अभियंता सहायक आणि कंत्राटी तांत्रिक अधिकारी यांना सुद्धा दोषी ठरविण्यात आले असून संबंधितांकडून अफरातफर करण्यात आलेली ८४ लाख ५२ हजार ६६ रुपये वसूल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे चिचगड ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण (ऑडिट) करणारे अधिकारी कोणत्या नशेत दप्तर तपासणी करीत होते, असा प्रश्न चिचगडवासीयांनी सरकारला केला आहे.
सविस्तर असे की, चिचगड ग्राम पंचायती मध्ये २०१२-१३ मध्ये रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम करण्यात आले. यामध्ये ३३ लाभाथ्र्यांचा समावेश होता. त्यापैकी चार लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करताच बिलाची उचल केल्याची तक्रार वरिष्ठांकडे नागरिकांनी केली होती. याशिवाय २०१६-१७ मध्ये पंतप्रधान स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आले. यामध्ये १९ लाभाथ्र्यांनी जुन्या शौचालयाची रंगरंगोटी करून बिलाची उचल केली. या घोटाळ्यासंबंधी वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नव्हती.सदर प्रकरणा शेवटी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचल्याने अखेर चौकशी करण्यात आली. यामध्ये घरकूल घोटाळ्यात ३लाख ७४ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यापैकी २ लाख ७४ हजाराची रक्कम तत्कालीन सरपंच संजय गावळ, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रत्नाकर घरत आणि तत्कालीन स्थापत्य अभियंता सहायक बी.ए. पवार यांचेकडून आणि १ लाखाची रक्कम या तिघांव्यतिरिक्त कंत्राटी कनिष्ठ अभियंता प्रदीप चोपकर यांचेकडून समप्रमाणात वसूल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची तपासणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येते. मात्र, संपूर्ण तालुक्याचा विचार केला असता असे निदर्शनात आले की, लेखापरीक्षणासाठी येणारे अधिकारी हे संबंधित कार्यालयात न बसता कोणत्या तरी बार वा ग्रामसेवकाच्या घरी बसून लेखापरीक्षणाचे कार्य करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या परीक्षणाचे वेळी संबंधित अधिकारी आंघोळीच्या साबू आणि चड्डी-टॉवेल पासून संपूर्ण सोयीसवलती ग्रामसेवकांकडून करवून घेतात. याशिवाय मोठे देवाण-घेवाण आणि ओली पार्टीची मागणी सुद्धा करीत असल्याचे अनेक ग्रामसेवक खासगीत सांगत आहेत. यामुळे चिचगड येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या ११ वर्षाच्या कालावधीत ८४ लाख ५२ हजार ६६ रुपयाचा घोटाळा झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे. परिणामी, या कालावधीत लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी,अशी मागणी आता समोर आली आहे. अशा खाबू लेखापरीक्षकांचा महालेखापरीक्षक (स्थानिक निधी) बंदोबस्त करतील काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ‘आयसीयू’मधील रूग्णावर मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू



पुणे(विशेष प्रतिनिधी),दि.13- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत एका 24 वर्षीय विवाहितेला प्राण गमवावे लागले आहेत.  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेनंतर संताप व्यक्त करताना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.संध्या सोनवणे (वय 24, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे तर, मांत्रिकाला बोलवून त्यांच्याकडून उपचार करून घेणा-या डॉक्टरचे नाव डॉ. सतीश चव्हाण असे आहे.
याबाबतची माहिती अशी की, संध्या सोनवणे यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याने स्वारगेटजवळ दवाखाना असलेल्या डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे त्या उपचारासाठी गेल्या. मात्र, या डॉक्टरने संध्या यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया केली. यामुळे संध्या या प्रकृती खालावू लागली. गडबड झाल्याचे लक्षात येताच डॉ. चव्हाण याने संध्या यांना मंगेशकर रूग्णालयात हलविण्यास सांगितले. सोबतच तो संध्या यांच्या कुटुंबियांसोबत तेथेही होता. यानंतर संध्या यांच्यावर उपचार करण्यासाठी एका मांत्रिकला बोलविण्यात आले. संबंधित मांत्रिकाने संध्या यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असताना तंत्र-मंत्र हा अघोरी उपाय केला. यावेळी संध्या यांचे कुटुंबिय व डॉ. चव्हाण हा सुद्धा उपस्थित होता.
दरम्यान, संध्या सोनवणे यांचा मृत्यू सोमवारी पहाटे झाला. शस्त्रक्रिया चुकीची केल्याने रक्तस्त्राव झाल्याने संध्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हा अघोरी प्रकार शिवसेनेचे पदाधिकारी सचिन तावरे यांना कळला. त्यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली.
मात्र, हा मांत्रिक नेमका कुणी बोलावला याची माहिती पुढे आली नाही. मात्र, हा मांत्रिक डॉ. चव्हाण यानेच बोलविल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.

ग्रामसेवक रोकडेवर गुन्हा नोंदविण्याचे सीईओचे आदेश

सालेकसा,दि.१३ तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी  दिले आहेत.
माहितीनुसार सालेकसा तालुक्याच्या ग्रामपंचायत कावराबांध येथे कार्यरत असताना ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे वर दप्तरी प्रमाणके नसताना प्रमाणकाशिवाय खर्च नोंदविणे, खरेदी केलेल्या साहित्याचा नोंद साठा रजिष्टरला न घेणे, बँकेतून धनादेशाचे शोधन स्वत: रोखीने करणे, मासिक सभा व ग्रामसभेचे कार्यवृत्त ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध न ठेवणे, ग्रामपंचायत दस्ताऐवज अद्यावत न करता वारंवार वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला होता. यासर्व प्रकरणात चौकशी केली असता रोकडे दोषी आढळले. त्याची चौकशी सुरू असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामपंचायत भरनोली येथे बदली करण्यात आली. त्या ठिकाणीही त्याने अपहार केल्यामुळे त्याच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. वारंवार पैसे हडपण्याची सवय रोकडे यांची मोडत नसल्याचे पाहून त्याला निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले आहे. अपहारीत केलेली शासकीय रक्कम त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणात योग्य व नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ती रक्कम जमा करीत नसल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून शासकीय रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.

नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

गडचिरोली,दि.१३ : तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे (४५) रा.कटेझरी असे त्या गाव पाटलाचे नाव आहे.
काही दिवसांतच तेंदूपत्ता हंगाम सुरू होणार आहे. झाडाला नवीन व चांगली पाने लागण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी खुट कटाई केली जाते. मंगळवारी गाव पाटील कोल्हे यांच्यासह कटेझरी येथील एकूण ११ जण ोलियाच्या जंगलात गेले होते. यावेळी एक सशस्त्र महिला नक्षलवादी आणि तीन साध्या वेषातील नक्षलवादी तिथे आले. त्यांनी कोल्हे यांना सोबत चलण्याचे फर्मान सोडून जंगलात नेले. तिकडेच चाकूने व दगडासारख्या जड वस्तूने मारून त्यांची हत्या केली आणि मृतदेह कटेझरी-देवसूर मार्गावर आणून टाकला.
विशेष म्हणजे नक्षल्यांनी ही हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ चिठ्ठी वगैरे सोडून हत्येचे कोणतेही कारण दर्शविलेले नाही. मात्र तेंदूपत्ता मजूर व कंत्राटदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

मुंबई,दि.13(विशेष प्रतिनिधी) : आदिवासी शेतक-यांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ म्हणणे ही अतिशय निषेधार्थ असून, यातून भाजपाचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपाच्या पोटात काय आहे, हे या निमित्ताने शेतकºयांना कळले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.
भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी किसान लाँग मार्चमधील शेतकºयांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ अशा स्वरूपाचे शब्द वापरले असल्याचे कळताच, जयंत पाटील यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महाजन यांनी जे वक्तव्य केले, ते मनुवादी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. १८० किमीचा प्रवास करून ते शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पोहोचले आहेत, परंतु महाजन यांनी या लढ्याला शहरी नक्षलवादी आणि माओवादी असे रंग देणे हे स्पष्ट करते की, भाजपाची शेतकºयांप्रती काय आस्था आहे. शेतकºयांबाबत यांच्या मनात किती द्वेषभावना आहे, हे यातून स्पष्ट होते, असे पाटील म्हणाले.

आधार लिंक करण्यास सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आधारशी संबंधित याचिका निकाली निघेपर्यंत

नवी दिल्ली,दि.13(वृत्तसंस्था) – सुप्रीम कोर्टाने विविध सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधारला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाचा समाज कल्याण विभागाच्या योजनांचा फायदा मिळण्यासाठी केल्या जाणाऱ्या आधार लिंकच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आधार विरोधातील याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे वकील अरविंद दातार यांनी कोर्टाला सांगितले की, पारपत्र (पासपोर्ट) प्राधिकरणाने पारपत्र देण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने मुदतवाढीचा हा आदेश दिला. अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी याबाबत लगेच स्पष्टीकरण देत सांगितले की, केवळ तत्काळ पासपोर्ट हवा असणाऱ्यांसाठी ही अट ठेवण्यात आली आहे.बँक अकाऊंट्स, मोबाईल आणि इतर सेवांशी आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आलेली होती. सुप्रीम कोर्टाने 15 डिसेंबरला मुदतवाढ करत 31 मार्च ही तारीख दिली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने थेट आधारच्या याचिका निकाली निघेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि.१३: वैद्यकीय रजा कालावधीतील वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडून अटक केली. डॉ.गोपाल प्रेमानंद पांढरे(३५), वैद्यकीय अधिकारी वर्ग ३(गट ‘ब’) असे जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ते हे जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते जानेवारी, फेब्रुवारी व मे २०१७ मध्ये वैद्यकीय रजेवर गेले होते. रजा कालावधीत त्यांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी रजा कालावधीत घेतलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सादर केली. परंतु तीन महिन्यांच्या वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्यास १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ८ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावरुन एसीबीने डॉ.गोपाल पांढरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये जिमलगट्टा उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील व पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, तुळशीदास नवघरे यांनी ही कारवाई केली.

हुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले

नागपूर दि.१३:- कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. येथून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कामठी मार्गावरील भीलगावजवळील एका इमारतीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सहाय्यक निरीक्षक सोपान चिटमपल्ले, गुलाब गिरडकर, राजेश पैडलवार, रूपेश कातरे, उपेंद्र आकोटकर आणि किशोर बिंबे यांनी सापळा रचून रविवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास मोहित गुप्ता याच्या मालकीच्या इमारतीच्या तिसऱ्या माळयावर छापा टाकला. त्या ठिकाणी ३८ जण हुक्का  पित होते व पूल खेळत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी तीन कार, अनेक दुचाकी असा एकूण २७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रॉनी रेमंड मायकर, पील दानेश खुशलानी, आशीष अशोककुमार बालानी, इमरान शेख  पापा शेख, रोहित नानक शुकरानी, विक्रम सरेशलाल तलरेडा, जफर कलीम मोहम्मद अब्दुल नईम, सुफीयान अनम खान मुर्तजा खान, दिपेश अशोक कटारिया, मनीष किशोर तेजवानी, आकाश मूलचंद उत्तमचंदानी, जलत सुरेश ग्यानचंदानी, हितेश मोहनलाल जेठानी, वारिस अख्तर मुमताज अहमद, जय नरेश वासवानी, प्रणय विकास रंगारी, साहिल लक्ष्मण तांबे, नेल्सन सयाम मैसी, धीरज मोहनकुमार हरचंदानी, मनीष प्रकाश वासवानी, दिलीप नानकराम कुकरेजा, मोहम्मद जुबेर कुदूश पटेल, शेख गुलाम दानिश अहमद शेख वहीद, गुफरान मोहम्मद शकील अकबानी, अरबाज अहमद अल्ताफ अहमद कुरेशी, मोहम्मद सोहेल मोहम्मद अफजल शेख, मोहम्मद फहीम मोहम्मद असलम, कुमार गंगाराम रूपवानी, कमल गिरधारी लालवानी, अनस शफी नसीमोद्दीन, मोहम्मद शाकीब अब्दुल साजीद शेख, फहीमुद्दीन इकरामुद्दीन सय्यद, हसनकाझी फजलू रहमान काझी, किशोर तोलाराम बनवानी, पंकज अनिल पंजवानी आणि हितेश वासुदेव देवानी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

विनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत

गोंदिया,दि.१३ः- गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंगपूरा मुर्रीतील इयत्ता ३ री च्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सदर मुलीला मारहाण करुन संबधित प्रकरणाला दाबण्याच्या प्रयत्न केल्याची माहिती मिळताच नागरिकांनी सोमवारला शाळेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला.दरम्यान सदर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने,शिक्षणाधिकारी उल्हास नरड, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश रहमतकर यांनी शाळेत धाव घेत प्रकरणाची सहनिशा केली.आणि सदर शिक्षकाला निलqबत करण्याचे आश्वासन दिले होते.त्या प्रकरणावर मंगळवारला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुद्दा उपस्थित करीत सदर प्रकरणात आरोपी शिक्षकासह प्रकरण दडपून ठेवणारे मुख्याध्यापक आनंद पुंजे यांच्या निलंबनाची मागणी केली.यावर सर्वच सदस्यांनी आक्रमक भुमिका घेत मुख्याध्यापकाच्या निलंबनाच्या मागणीला पाqठबा दिल्याने अखेर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी मुख्याध्यापक पुंजे यांना निलqबत करण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली.
मिळालेल्या माहितीनुसार या शाळेतील ३ रीची शिक्षिका गेल्या एक महिन्यापासून रजेवर असल्याने तो वर्ग शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे यांच्याकडे देण्यात आला.त्यादरम्यान फेबुवारी महिन्यात शाळेतील झुल्यावर सदर पिडीत मुलगी झुलत असतानाच झुला तुटला.त्यावर सदर शिक्षकांना रागावत पिडीत मुलीला वर्गखोलीत नेऊन बंद करुन मारहाण केली तसेच कपडे काढून अश्लिलप्रकार केला.सदर प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास मारण्याची धमकी दिल्याने सदर मुलीने कुणालाही माहिती दिली नाही.परंतु ९ मार्चला सदर वर्गशिक्षिका रुजु होताच मुलीने त्या शिक्षिकेला माहिती दिली.त्यानतंर पिडीत मुलीचा कुटुबियांना माहिती होताच त्यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करीत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर भादविच्यां कलम ३५४(अ),(ब) सहकलम ८,१०,१२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.याप्रकरणात मुख्याध्यापक आनंद पुंजे व केंद्रप्रमुख कटरे यांची सदर प्रकरणात हयगयकेल्याप्रकरणी तत्काळप्रभावाने स्थानातंरण करण्यात आले आहे.

BERARTIMES_14-20_MAR_2018





Tuesday 13 March 2018

सुकमा भागात नक्षली हल्ल्यात 8 जवान शहीद, सहा जखमी



सुकमा/रायपूर(वृत्तसंस्था),दि.13- नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 8 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांनुसार, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम कॅंममधून सोमवारी सकाळी साडे सात वाजता 212 बटालियनचे सीआरपीएफचे जवान पेट्रोलिंगसाठी निघाले होते. या भागात नक्षलींनी आधीच आयईडी बॉम्ब पेरुन ठेवले होते. दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक अंदाधूंद गोळीबार करत आयईडी स्फोट घडवून आणला. जवळपास 150 नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. नक्षली आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.

सुकमा येथे नक्षली हल्ल्यांमध्ये CRPFचे 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी असण्याची शक्यता आहे.  मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रात्री जगंलात गस्त घालत असताना नक्षलींनी आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं CRPFच्या 212 बटालियनजवळ आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला.  स्पेशल डीजी नक्सल ऑपरेशन डीएम अवस्थी यांनी सांगितले की, ”सीआरपीएफ  जवान एंटी लैंडमाइन वाहनाने किस्टाराम  वरुन पैलोडी ला जात होते। ”यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळावर पर रेस्क्यू  करीता लिए फोर्स  पोचल्याची माहिती दिली.

देवरी आमगाव रस्त्यावर अपघातांना आमंत्रण

देवरी:8मार्च
सध्या देवरी आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त आहे . त्यामुळे सर्वाना या समस्याला सामोरे जावे लागते. वाहनाच्या उडणाऱ्या धुळी मूळे अपघाताला आमंत्रण देणे चुकीचे ठरणार नाही. वाहनमुळे धूळ मोठ्याप्रमाणात उडते आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना 
समोरून मागून येणारे वाहन दिसत नाही आणि केव्हाही अपघात घडू शकतो. सदर काम करणाऱ्या कंपनी नी या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे .
आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आता या समस्येचा तोडगा कसा निघणार या कडे सर्वाचे लक्ष आहे

Monday 12 March 2018

जि.प.सर्वसाधारण व स्थायी सभेच्या वृत्ताकंनासाठी पत्रकारांची प्रवेश बंदी हटणार काय?


विद्यमान जि.प.अध्यक्षांसह पदाधिकाèयांकडे लक्ष

गोंदिया,दि.१२ः जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या कारवाईचे वृत्ताकंन देण्यासाठी पत्रकारांना बसण्याची परवानगी देण्यात यावी,यासाठी एकेकाळी पुढाकार घेणारे जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर व पी.जी.कटरे यांच्यासह त्यावेळच्या जि.प.सदस्य व अधिकाèयांनी पत्रकारांना या दोन बैठकांना बसण्यास परवानगी दिली होती.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संसदेपासून विधानसभेतील सर्वच कारवाईचे वृत्ताकंन करण्याची परवानगी आहे.सोबतच महानगरपालिका,जिल्हा परिषदामध्ये संभाच्या कामकाजाच्या वृत्ताकंनास समंती देण्याचे अधिकार त्या संस्थांना आहेत.त्याच आधारे गोंदिया जिल्हा परिषदेत एक दीड महिन्याआधी सत्तेत आलेल्या नव्या पदाधिकाèयाकंडून पत्रकारांना सर्वसाधारण व स्थायी समितीच्या बैठकीला बसण्याची हिरवी झेंडी मिळते की तत्कालीन जि.प.अध्यक्षांच्या निर्णयानुसारच बंदी कायम राहते याकडे लक्ष लागले आहे.
त्यानुसारच गोंदिया जिल्हा परिषदेतही परवानगी देण्यात आली होती.परंतु जुर्ले २०१५ मध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेस-भाजपच्या युतीत असलेल्या पदाधिकाèयानी मात्र पत्रकारांच्या प्रवेशावर बंदी घातली.त्यामध्ये ज्यांनी पत्रकारांना बसण्यास परवानगी द्यावी यासाठी पुढाकार घेणारे माजी सभापती पी.जी.कटरे यांचा सुध्दा समावेश होता ही बाब पत्रकारांसाठी आश्चर्यकारक राहिली.जिल्हा परिषद अध्यक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तत्कालीन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी आपल्या पदाधिकाèयांसह पत्रकारांच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या उपस्थितीवर आक्षेप घेत प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेतला.त्याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्यासह सर्वच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला.भाजपच्या काही सदस्यांनी विरोध करीत पत्रकारांना बसण्याची परवानगी देण्यावर दोन ते तीन सभामध्ये विषय धरुन लावला मात्र तत्कालीन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी आपल्या कार्यकाळापर्यंत पत्रकारांना परवानगी दिली नाही.आता नव्याने जानेवारी मध्ये सत्तेतील पदाधिकारी यांच्यात बदल झाला असून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांच्याकडून जि.प.च्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत बसण्याकरीता हिरवी झेंडी मिळेल या अपेक्षेत लोकशाहीचा चौथा स्तभांतील पत्रकार आहेत.त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पत्रकारांना बसण्याची परवानगी देतात की माजी जि.प.अध्यक्ष श्रीमती मेंढे यानी पाळलेला नियम लागू करीत लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाची अवहेलना करतात याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ प्रमाणित असल्याने पारदर्शनक व्यवहार व कामकाज असायला हवे त्यात पत्रकारांना बंदी नकोच परंतु गुप्ततेच्या नावावर पत्रकारांना प्रवेश नाकारणे कितपत योग्य आहे.वास्तविक सर्वसाधारण सभा ही सर्वासांठीच खुली असायला हवी तीचे नावच सर्वसाधारण सभा असताना त्या सभेलाही पत्रकारांना का डावलण्यात येते हे अद्यापही कळलेले नाही.परंतु नव्या अध्यक्ष,उपाध्यक्षांसह इतर पदाधिकारी यांच्याकडून यावेळी पत्रकारांना सभागृहात बसण्याची परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान यासंदर्भात जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांना विचारणा केली असता सध्या तत्कालीन जि.प.अध्यक्षानी जो निर्णय घेतला आहे,तो मात्र कायम असल्याचे सांगत सर्व पदाधिकारीसोबत चर्चा करुन सर्वसमतंीने जे पदाधिकारी निर्णय घेतील त्यानुसार बसण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.तर समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही सर्व पदाधिकारी बसून निर्णय घेऊ तो नक्कीच चांगला असणार असे सांगितले.


देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...