अमरावती,दि.08(वृत्तसंस्था) – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी चंद्राबाबू विधानसभेत म्हणाले, टीडीपीने केंद्रीय तर भाजपच्या मंत्र्यांनी राज्य सरकारमधून राजीनामा दिला आहे. भाजपच्या मंत्र्यांनी राज्यात चांगले काम केले. त्यासाठी त्यांना धन्यवाद. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर बुधवारी रात्री केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा चंद्राबाबूंनी निर्णय घेतला होता. ते म्हणाले, केंद्राने आमचा अपमान केला आहे. केंद्र सरकारकडे अनेकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. परंतू केंद्र सरकारने त्यावर कधीही सकारात्मक विचार केला नाही. गुरुवारी आमचे दोन्ही मंत्री केंद्र सरकारचा राजीनामा देतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment