बुलडाणा,दि.02 : धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार्च रोजी घडली.
या घटनेत आकांक्षा विष्णू बडगे (वय चार), सोहम विष्णू बडगे (वय दीड वर्षे) या दोन चिमुकल्या मुलांचा करून अंत झाला. दरम्यान, मेहकर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलांचे वडील विष्णू बडगे (वय २७) यास अटक केली. सुलतानपूर येथील विष्णू बडगे याचा पत्नी संगिता हीच्याशी शुक्रवारी दोन मार्च रोजी सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याने चार वर्षाची मुलगी आकांक्षा विष्णू बडगे आणि सोहम विष्णू बगडे (दीड वर्षे) यांना सोबत घेऊन सुलतानपूर कॅनाल रोडवर असलेल्या
शिवशंकर भानापुरे यांची विहीर गाठून त्यात आपल्या दोन्ही चिमुकल्यांना फेकून दिले. त्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या नंतर लगोलग त्याने पुन्हा सुलतानपूर गाव गाठून आपण आपल्या दोन्ही मुलांना विहीरीत फेकून जीवे मारल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली, असे मेहकर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुलतानपूरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनॉल रोडवरील विहीरीवर धाव घेतली. मात्र तोवरून विहीरीच्या पाण्यात बुडून दोन्ही चिमुकले मृत झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी विहीरीतून दोन्ही मृत मुलांचे पार्थिव बाहेर काढले. उत्तरिय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव मेहकर येतील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांचा ताफा लगोलगल मेहकर शहरापासून सुमारे २० ते २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर येथील कॅनॉल रोडवरील शिवार गाठले आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृत मुलांना बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली होती.
Saturday, 3 March 2018
कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment