अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१४ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आज(दि.१४) आयोजित रोजगारसेवक निवडीच्या ग्रामसभेतच येथेच्छ दारु ढोसल्याने झिंग झिंग झिंगाट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.माहुरकुड्याचे रोजगारसेवक मेघराज काळबांधे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या ठिकाणी नव्या रोजगारसेवकाची निवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरंपच असतो,त्यामुळे सरंपच राजेंद्र कोडापे हे ग्रामसभेत पोचले असता ते दारुच्या नशेत पुर्णतः झिंगाट असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली.पोलिसानीही वेळ न गमावता माहुरकुडा गाठत सरपंचाला ग्रामसभेतून उठवून नेत ग्रामपंचायत मागील आरोग्यनिवास स्थानाच्या वèहाडातच नेऊन टाकले.त्यानंर ग्रामरोजगार सेवक निवडीला सुरवात करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment