गोंदिया,दि.०३ः- गोंदिया तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंदरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील द्वेषपुर्ण कामकाजाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला असून आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.बेंदरे यांनी काँग्रेस प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा जनाधार कमी झाला असून गोंदिया तालुक्यात व शहरात त्यांना वार्ड व ग्रामस्तरीय पर्यवेक्षक नेमण्यासाठी भंडारा जिल्ह्याची गरज पडू लागल्याने गोंदिया तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती झाली असेल याबद्दल न बोललेच बरे असे म्हणत त्यांनी द्वेषपुर्ण वातावरण आणि जी हुजेरीगिरीमूळे हा पक्ष डबघाईस चालला.बाजार समितीचा सभापती या नात्याने अनेकदा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडे अनेक विषयात सहकार्य करण्यासाठी दाद मागण्यात आली परंतु नेहमीच निराशा हाती आली.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकतंत्र राहिले नसून तिथेही वारसान हक्काप्रमाणे राजकारण सुरु झाल्याची टिका त्यांनी काँग्रेस प्रवेशाच्यावेळी केली.बेंदरे यांचे काँग्रेसमध्ये आमदार गोपालदास अग्रवाल यांचे प्रतिनिधी म्हणून विशाल अग्रवाल यांनी काँग्रेसचा दुपट घालून स्वागत केले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे,संचालक अरुण दुबे,सुरेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment