Wednesday 28 June 2017

नवोदय परीक्षेत ब्लासम पब्लिकचे दोन विद्यार्थी चमकले

देवरी,दि.28-  आयएसओ मानांकन प्राप्त ब्लासम पब्लिक स्कूलच्या दिप्ताशू देवकुमार राऊत आणि तास्विक सुरेंद्र कतलाम या दोन विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले,
सदर विद्यार्थी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मुख्याध्यापक सुजीत टेटे आणि वर्ग शिक्षक विश्वप्रित निकोडे यांनी सदर  परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. या आधी गणित संबोध आणि गणित प्राविण्य या परीक्षेतही दोन्ही विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात बाजी मारली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुजीत टेटे, वर्गशिक्षक विश्वप्रित निकोडे आणि पालकांना दिले आहे.

पुन्हा सायबर हल्ला ! भारतालाही फटका, JNPTतील कामकाज ठप्प



नवी दिल्ली, दि. 28 - जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसनं गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता  पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे,  यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.  

...तर कुत्रा करेल पोलिसांना फोन



सर्वात इमानदार प्राणी म्हणून कुत्र्याची सर्वत्र ओळख आहे. त्याचाच उपयोग आता अडचणींच्या काळात करुन घेण्यासाठी जॉर्जियात प्रयत्न सुरु आहेत. येथील संशोधकांनी असा एक टॅब विकसित केला आहे जो घरातील एकट्या व्यक्तीसाठी मदतीचा ठरेल. अशा वेळेस हा कुत्रा त्वरित पोलिसांना फोन करेल. अर्थात हा टॅब कुत्र्याासाठीच तयार करण्यात आला आहे. समजा घरातील व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर हा कुत्रा टॅबवर नाक रगडून इमर्जन्सी नंबरवर कॉल करेल. ही बाब प्रत्यक्षात किती शक्य आहे याबाबत वेगवेगळी मते आहेत. संशोधकांच्या टीमचे असे मत आहे की, जर कुत्र्याला पशिक्षित केले तर ते या टॅबचा उपयोग करू शकते. संशोधक जॅक्सन यांचे मत आहे की, कुत्र्याने या टॅबला टच केल्यास काही आयकॉन समोर येतील. यापैकी ९११ नंबरवर टच केल्यास कॉल लागेल. यात जीपीएस प्रणालीही आहे. त्यामुळे लोकेशनही ट्रॅक होऊ शकते.

वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही – श्वेता शालिनी



बुलडाणा, दि. 27 – भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा नसल्याचे वक्तव्य भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, अ‍ॅड. दीपक पाटील, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे, विश्वनाथ माळी, उदय देशपांडे, अरविंद होंडे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष विजया राठी, वैशाली राठोड, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची उपस्थिती होती.
कर्जमाफी जाहीर केल्यानंतर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्यामुळे त्यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्वेता शालिनीही त्यांच्यासोबतच होत्या. सत्कार कार्यक्रमानंतर श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्वेता शालिनी म्हणाल्या, की सध्या महाराष्ट्राच्या विकासाकडे भाजप लक्ष देत आहे. भाजप सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांना समर्थन देत असते.मात्र, सध्या भाजपच्या अजेंड्यावर वेगळा विदर्भ नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने सुरूवातीपासूनच वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शविले आहे. मात्र, सत्ता आल्यावर विदर्भवासियांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

Beratimes 28JUN-4Jul_2017





Tuesday 27 June 2017

मनोहरभाई पटेल विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
   
       
 देवरी, दि.27- स्थानिक मनोहरभाई पटेल हाय.व कनिष्ठ महाविद्यालयात येथे छत्रपती शाहु महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे तहसिलदार विजय बोरुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे आमदार संजय पुराम,  देवरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुंदे,नगर उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, प्राचार्य के.सी.शहारे ,उपमुख्याध्यापक के.बी.गोंडाणे, पर्यवक्षक एस.टी.हलमारे, मुख्याध्यापक पी.जी.वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पुराम यांनी भाषणातून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.तहसिलदार बोरुडे, चिखलखुंदे, श्री रामटेके यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाचे संचालन जी.एम.मेश्राम  यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य शहारे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी टी.आर.देशमुख ,श्री. मधुकर शेंद्रे ,श्री.पी.आर.मनगटे, एस.एस.निखारे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले               

पैशावरून वाद; डॉक्टरनं तरुणीचा गाल चावला!




मुंबई-पैशावरून झालेल्या वादातून एका डॉक्टरनं २६ वर्षीय तरुणीला बेदम मारहाण करत तिचा गाल चावल्याची घटना मुंबईतील चारकोप येथे घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पीडित तरुणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरेश यादव असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. कांदिवलीत राहणाऱ्या सुरेशची पीडित तरुणीशी गेल्या एक वर्षापासून मैत्री आहे. गेल्या शुक्रवारी तो पीडित तरुणीच्या घरी गेला होता. तिथं दोघांचा पैशावरून काहीतरी वाद झाला. हा वाद इतका वाढला की सुरेश यादवनं त्या तरुणीला मारहाण केली व तिच्या गालाचा चावा घेतला.

तरुणीनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करून घेतली. त्यामुळं संतापलेल्या तरुणीनं पोलिसांवर भेदभावाचा आरोप केला आहे. या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी तिनं वरिष्ठ पोलिसांकडं केली आहे.

गौण खनिज चोरी;७० हजाराचा दंड



देवरी,दि.27 : विना रॉयल्टीने गौण खनीज चोरी करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर सोमवार (दि.२६) देवरीचे तहसीलदार विजय बोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. यातून ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल होणार असल्याचे सांगण्यात आले.या कारवाईत सोमवारला शिलापूर, मकरधोकडा, चिचेवाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व शेडेपार रस्त्यावरून विना रॉयल्टीने रेती, गिट्टी, मुरुम, विटा वाहून नेत होते. असे आठ ट्रॅक्टर पकडण्यात आले. गौण खनीज अधिनियम अंतर्गत कारवाई करुन अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचा दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार विजय बोकडे यांनी सांगितले. यामध्ये सुभाष आचले पुराडा (ट्रॅक्टरवर क्रमांक नाही), अनिल दयाराम बिसेन वडेगाव (एमएच ३५ जी ६२७२), सतिश मोतीराम झिंगरे देवरी (ट्रॅक्टर क्रमांक नाही), माधोराव मारोतराव तरोणे (एमएच ३५ जी ५३७१) सडक अर्जुनी, मनोज पंचम शाहू (एमएच ३५ जी २९५९), ब्रम्हदास सावजी बडोले सडक अर्जुनी (ट्रॅक्टर क्रमांक नाही), आनंदराव गणपत कठाणे मुरदोली (एमएच ३५ जी ४१८२) यांच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.सदर कारवाई तहसीलदार विजय बोकडे व त्यांचे सहकारी तलाठी चव्हाण, नरेश तागडे, एस.पी. तीतरे, मुंढरे, टी.आर. गजबे, यु.एफ. सिंधीमेश्राम मंडळ निरीक्षक यांनी केली.विशष म्हणजे बहुतेक ट्रॅक्टर हे नवीन असून आरटीओ द्वारे पासिंग न करताच अवैध गौण खनिज चोरी करताना आढळले.

Friday 23 June 2017

रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज


नवी दिल्ली,दि.23(वृत्तसंस्था) - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज (शुक्रवार) या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवानी, नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू हे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. एनडीएमधील इतर ज्येष्ठ नेतेही यावेळी हजर होते.
"मला पाठिंबा व्यक्त केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पदाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन,'' अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.

सीईओ पुरामांना सोडेना अन वालकेना रूजू करेना


गोंदिया,दि.23-गोंदिया जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम हे तसेही वादातीत अधिकारी राहिले आहेत.गेल्या एकवर्षापुर्वी पंचायत विभागातील एका कर्मचार्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांच्या कुटूबियांने संबधित अधिकार्याच्या त्रासामुळे झाल्याचे म्हटले होते.त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा प्रभार असताना देवरी येथे शासकीय वाहनातून त्यांनी घराच्या बांधकामाचे साहित्य ने आण केल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते.सोबतच कर्मचारी बदली व पदोन्नतीमध्ये पुराम यांनी अनेक शासननिर्णयांना डावलून आपल्यावर अन्याय केल्याची ओरड अनेक कर्मचारी आजही करीत आहेत.अशा पुराम साहेबांची बदली शासनाने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागात केली.परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे प्रमोटी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश येऊनही सोडण्याची तसदी घेतली नाही.पुराम यांना कधी सोडणार पुराम यांच्या जागेवर 15 दिवसापुर्वीच आर्डर झालेले भंडारा जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुाकअ वालके हे रुजू होण्यासाठी नियमित येत असताना त्यांना रुजू का करुन घेत नाही यासंदर्भात विचारणा करण्याकरिता शासकिय दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बैठक सुरु असल्याचे निमित्त करुन नंतर बोलतो असा निरोप पाठवून या प्रकरणावरच बोलायला टाळले.जेव्हा की वालके यांची पोस्टींग गोंदिया जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुकाअ या पदावर झालेली असताना आणि संबधित अधिकारी रूजू होण्यासाठी दररोज हेलपाट्या मारत असताना सीईओ त्यांना रूजू का करीत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.जेव्हा पुराम यांची सुध्दा बदली झाल्याने त्यांच्या जागेवर वालकेंना रूजू करुन घ्यायला हवे होते.या आधी पुराम यांचे आदेश नसल्याने रूजू करता येत नाही असे सांगणारे सीईओ ठाकरे आता मात्र पुराम यांचे बदली आदेश आल्यानंतर गप्प का बसले कुठल्या आमदारांने,मत्र्यांने त्यांना वालके यांना रूजू न करण्यास व पुराम यांना कार्यमुक्त न करण्यास सांगितले याचा खुलासा केला तर प्रशासकीय व्यवस्थतेवर लोकप्रतिनिधींचे वर्चस्व कसे आहे हे स्पष्ट होईल.

'मेरा घर, भाजप का घर': घरांवर भाजपच्या सक्तीच्या घोषणा



भोपाळ,दि.22(वृत्तसंस्था) : भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील घरांवर ‘मेरा घर, भाजपा का घर’ अशा घोषणा लिहिल्या आहेत. भोपाळवासीयांनी या प्रकाराविरोधात तक्रार केली असून, घोषणा रंगवण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना कल्पनाही दिली नाही किंवा कोणाची परवानगी घेतली नाही, असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून प्रसिद्धीसाठी काहीही करण्याचा हा प्रकार करण्यात येत असल्याची टीका होत आहे. लोंकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक घरांच्या बाहेर भिंतीवर निळ्या रंगात मेरा घर भाजपा का घर असे लिहिले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह इतका शिगेला पोचला की, त्यांनी ही घोषणा काँग्रेस नेते प्यारे खान यांच्या घरावरही रंगवली. याबाबत भाजप नेत्यांना विचारले असता, त्यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. उत्साहाच्या भरात कधी कधी असे करतात असे म्हणत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप नेते राहुल कोठारी म्हणाले, "यात काही चुकीचे नसून, या भागात आम्ही विकास केला आहे त्यामुळे अशा घोषणा कार्यकर्ते उत्साहात रंगवतात."

Thursday 22 June 2017

पीएफसाठी पॅन-यूएएन मध्ये साम्य आवश्यक



अहमदाबाद,दि.22 : पॅन, आधार आणि यूएएन (यूनिव्हर्सल अकाउंट नंबर) यांच्या माहितीत काही फरक असल्यास आॅनलाइन पीएफ काढता येणार नाही. त्यामुळेच आॅनलाइन पीएफ काढण्याची सुविधा असूनही अनेक कर्मचाऱ्यांना पीएफ आॅफिसमध्ये जावे लागेल.
आॅनलाइन पीएफ काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाइटवर केवायसी अपलोड करावे लागते. खातेधारकांना बँक अकाउंट क्रमांक, पॅन, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान कार्ड आदी माहिती वेबसाइटवर द्यावी लागते. परंतु ही माहिती देताना काही खातेधारकांच्या पॅन आणि आधार कार्ड यात नावात वा अन्य माहितीत फरक असल्यास ती माहिती स्वीकारली जात नाही. त्यामुळे आॅनलाइन पीएफही काढता येत नाही.
ईपीएफओच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे राजेश पिल्लई यांनी याचे मुख्य कारण सांगितले की, यूएएन, पॅन आणि आधार यांची माहिती एकमेकांशी मिळतीजुळती असायला हवी. अन्यथा सीस्टिम ही माहिती स्वीकारत नाही. त्यामुळे ईपीएफओच्या वेबसाइटवर केवायसी अपलोडही करता येणार नाही.
ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ईपीएफओने अहमदाबादच्या कार्यालयात आधार केंद्र उघडले आहेत. जर आधार, पॅन यावर आपले नाव एकसारखे नाही, तर आधार कार्ड घेऊन आपण एखाद्या सेंटर्सवर जाऊ शकता. आपले बायोमेट्रिक तपासून या माहितीत बदल करून दिले जातात. सध्या ईपीएफओच्या मनीनगर, नरोडा आणि आयकर कार्यालयांमध्ये ही सुविधा दिली जाते. ईपीएफओ लवकरच यासाठी शहरांमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे.
पीएफ काढण्यासाठी भरण्यात येणाऱ्या फॉर्मवर आपल्या नियोक्त्यांची सही असायला हवी, तसेच आवश्यक कागदपत्रेही जोडायला हवीत. काही प्रकरणात नियोक्ता सही करण्यास नकार देतात. अशा वेळी ईपीएफओ वेबसाइटच्या लॉग इनवर जावे आणि आपले यूएएन व पासवर्ड लॉगइन करावा. सर्व माहिती आॅनलाइन भरावी. ही माहिती अपलोड केल्यानंतरही नियोक्ता सही करण्यास नकार देत असेल, तर आपण पीएफ आॅफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता, असा सल्ला पीएफबाबतचे सल्लागार अमित पटेल यांनी दिला आहे.
आॅनलाइन केवायसी दाखल करण्यासाठी आपल्याला आधार, पॅन व यूएएन यातील त्रुटीत सुधारणा करावी लागेल. यासाठी आपण ईपीएफओच्या वेबासाइटवर जॉइंट डिक्लरेशन फॉर्म भरू शकता. तो पीएफ आॅफिसमध्ये जमा केल्यानंतर, यूएएन डेटाबेसमधील माहितीत सुधारणा करता येईल. त्यानंतर आपण आॅनलाइन केवायसी जमा करू शकता.

Wednesday 21 June 2017

छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवार



पुणे,दि.21: छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शेजलवकर यांचा दाखल देत केले.आज पुण्यात श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचे प्रकाशन झाले, त्यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात पवार बोलत होते.इतकेच नाही, तर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा मुस्लिम म्हणून नाही, तर शत्रू म्हणून काढल्याचे पवार म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्मांचे होते. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या नौदलाचा प्रमुख,अंगरक्षक मुस्लिम होता. अफझलखान त्यांच्यावर चाल करून आला तेव्हा त्याचा कोथळा काढला कारण तो स्वराज्याचा शत्रू होता ना की मुस्लिम होता म्हणून. अफझल खानाचा वकील होता – कृष्णाजी कुलकर्णी याचाही खात्मा तिथेच केला कारण तोही स्वराज्याचा शत्रू होता”, असे पवार म्हणाले.
महाराज जर मुस्लिमविरोधी असते, तर त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीला शिक्षा दिली नसती. त्यावरुन महाराज हे रयतेचे होते, ते सर्वांचे होते, असे शरद पवारांनी नमूद केले.शिवाजी महाराज गोब्राम्हण प्रतिपालक होते हे  म्हणणं अऐतिहासिक होते असे शेजवलकरांनीही सांगितले आहे, असे पवार म्हणाले.

सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

भंडारा,दि.21 : खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार कृषी केंद्र संचालकांकडून होत असतो. त्यामुळे भरारी पथकाने कृषी केंद्राची तपासणी केली असता सहा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांना विक्रीबंदचे आदेश बजावले आहे.
भंडारा येथील मे श्री साई कृषी केंद्र, बोरगाव येथील मे राधाकृषी केंद्र, बारव्हा येथील लोथे कृषी केंद्र, बारव्हा येथील कृषी साधना कृषी केंद्र, दिघोरी मोठी येथील श्रीराम कृषी केंद्र व लाखांदूर येथील पुर्ती कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी हंगामात मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील यशोदा या सिड्स कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली होती. उपवन क्षमता नसलेले बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यात एक पूर्ण वेळ व २३ अर्धवेळ गुणवत्तानियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखरेख ठेवतात. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची नियुक्ती केली असता त्यात उपवन केंद्राची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, बिल बुक साठा नोंदी व दुय्यम या तिन्हीची बेरीज न जुळणे, विक्री अहवाल सादर न करणे, विक्री अहवाल आॅनलाईनवर न टाकणे, चांगल्या ब्रांडखाली नकली निविष्टा विक्री करणे, विक्री बिल शेतकऱ्यांना न देणे व सही न घेणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रृट्या आढळून आल्यामुळे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील या सहा कृषी साहित्य विक्रेत्यांवर बंदी घातली. बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बि बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे अधिनियम १९६६ च्या कलमान्वये कारवाई करून कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.

पुराम गडचिरोली,देशमुख व मानकर नाशिक तर इस्कापे



गोंदिया,दि.21-सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आज करण्यात आलेल्या बदल्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार अधिकार्यांच्या बदल्या केल्या.त्यामधे नाशिक विभागातून आलेले राजेश देशमुख व तिरोड्याचे बीडीओ मानकर यांनी सुरुवातीपासूनच कधी गोंदिया जिल्ह्याशी जुळवून घेतले नव्हते.त्यांची परत नाशिक विभागात बदली झाली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी असलेले राजेश देशमुख यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात तपासणी सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.देशमुख गोंदियात आले तेव्हापासूनच परतीसाठी प्रयत्नात लागले होते अखेर 2017 मध्ये त्यांना यश आले आहे.त्यांच्या जागेवर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांची नियुक्ती केली आहे.सर्वाधिक गोंदिया जिल्हा परिषदेत चर्चेत राहिलेले आणि 2016 च्या बदलीमध्ये शासनाच्याविरोधात मॅटमध्ये गेलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.त्यांनी गोंदियात प्रभारी म्हणून काम केल्याने गडचिरोली जिल्ह्याला त्याचा नक्कीच लाभ मिळणार आहे.परंतु त्यांना ही डिमोशन पोस्ट असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु झाली आहे.तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस.मानकर यांची बदली गटविकास अधिकारी चांदवड येथे करण्यात आली आहे.मानकर यांनी गेल्याच महिन्यात मग्रारोहयोच्या अभियंत्यानी गैरव्यवाहर केल्याची तक्रार केली होती.ही तक्रार बदलीच्या एक महिना आधी केल्याने या तक्रारीकडे आता शंकेच्या नजरेने बघितले जात आहे.गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईस्कापे यांची बदली वाशिम जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


मुंबई, दि. 21 : तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट, सांताक्रुझ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, सहसचिव सुरज मांढरे आदींसह इतर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक केले.
द योग इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा श्रीमती हंसाजी योगेंद्र यांनी योगाचे महत्त्व सांगताना, स्वस्थ्य राहण्यासाठी चांगले भोजन, नियमित व्यायाम,
पुरेशी झोप आणि मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. चिंता करून काहीही होत नाही. मन अशांत असल्यास शरीरावर परिणाम होतो. नेहमी आपल्या दिनचर्येत सहज शक्य होतील. योगाचे विविध प्रकार सांगून ‍नियमितपणे योगा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी ऋषी योगेंद्र आणि इतर सहकाऱ्यांनी योगाच्या  विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा

बंगळूरच्या पोलिसावर कौतुकाचा वर्षाव
बंगळूर,दि.21(वृ्तसंस्था) - राजकीय नेते, मंत्री व अति महत्त्वाची व्यक्ती प्रवास करीत असेल तर त्या त्या भागातील वाहतूक थांबविली जात असतानाचे चित्र भारतीयांना नवीन नाही; पण बंगळूरमध्ये या उलट चित्र अनुभवायला मिळाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी (ता.१७) बंगळूरमध्ये होते. त्यांचा ताफा ट्रिनिटी सर्कल येथून जात असतानाच एक रुग्णवाहिका तेथे आली. तेव्हा तेथील पोलिसाने चक्क राष्ट्रपतींचा ताफा थांबवून तिला मार्ग खुला करून दिला.
पोलिस उपनिरीक्षक एम. एल. निजलिंगप्पा यांच्या या वेगळ्या प्रकारच्या धाडसाचे कौतुक शहरातून होत असून त्यांच्या प्रसंगावधानाची दखल सोशल मीडियावरही घेण्यात आली. बंगळूर पोलिसांनी निजलिंगप्पा यांची पाठ थोपटून बक्षीसही जाहीर केले. मेट्रोच्या ग्रीन लाइनचे उद्‌घाटन करण्यासाठी मुखर्जी शनिवारी बंगळूरमध्ये आले होते. राज भवनकडे जात असताना त्यांचा ताफा ट्रिनिटी सर्कल येथील वर्दळीच्या भागातून जात होता. त्या वेळी तेथून एचएएलजवळील खासगी रुग्णालयाकडे जाण्यासाठी वाट शोधणारी रुग्णवाहिका पाहून वाहतूक पोलिस उपनिरीक्षक निजलिंगप्पा यांनी तातडीने निर्णय घेत राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि रुग्णवाहिकेला रस्ता दिला. 
प्राधान्यक्रम ओळखून असा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्याला बक्षीस दिले जाणार आहे. अशा चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन.
- प्रवीण सूद, पोलिस आयुक्त, बंगळूर

Beratimes_21-27Jun_2017





Tuesday 20 June 2017

गणनेत नवेगावबांधच्या तलावात सारसाचे दर्शन



गोंदिया,दि.१९- दुर्मिळ सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. त्यामुळे दूरवरच्या पर्यटकांचे पाय गोंदियाच्या भूमीला लागतात. सारस पाहिल्याशिवाय त्यांना परतीचे वेध लागत नाही.मात्र,वन्यजीव विभाग व सेवा संस्थेच्यावतीने नुकत्याच केलेल्या गणनेत गतवर्षीपेक्षा यावर्षी सारसांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले.यावर्षी केवळ गोंदिया जिल्ह्यात ३२ ते ३५ च्या दरम्यान सारस पक्षी आढळून आले.भंडारा जिल्ह्यात २ व चंद्रपूर जिल्ह्यात १ तर शेजारील बालाघाट जिल्ह्यात ४२- ४५ च्या जवळपास सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष असला तरी सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यात यश आल्याचे समाधान सारस बचाव मोहिमेतील युवकामध्ये दिसून आले.
परिणामी, वन्यजीवप्रेमीनी qचता व्यक्त केली आहे.सारस संवर्धनासाठी सेवा ही संस्था काम करीत असून संस्थेचे अध्यक्ष मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार व सारस सवर्धंन प्रकल्प प्रमुख आय.आर.गौतम यांच्या मार्गदर्शनात आठ दिवस सारस गणना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ४५ ते ५० ठिकाणी १६ चमूंच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील तलावामध्ये यावेळच्या गणनेत सारसजोडी बघावयास मिळाल्याने या भागाचे जुने वैभव परतल्याचे बोलले जात आहे.
निसर्गसंपन्न असलेल्या गोंदियात पर्यटक नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र राखीव क्षेत्राला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा वापर पूर्वी qसचनासाठी व्हायचा. आता मात्र हे तलाव पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे,ते स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांच्या काही काळाच्या अधिवासामुळे. विशेष म्हणजे, सारस हा दुर्मिळ पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. या पक्ष्याचे संवर्धन करून त्याची वृद्धी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने सारस फेस्टिव्हलचे आयोजनही करण्यात येते. पर्यटक या फेस्टीवलमध्ये सहभागीदेखील होतात. सारस पाहिल्याशिवाय, छायाचित्र कॅमेरात कैद केल्याशिवाय त्यांना परतीचे वेध लागत नाही. झिलमिली, परसवाडा, चिरामनटोला, पांजरा, कामठा, रावणवाडी, जिरूटोला, बनाथर, बडगाव, सतोना या परिसरात सारस पक्ष्यांचा वावर आहे. पहिल्यांदा २००४- ०५ मध्ये सारस नजरेस पडले. त्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड,मध्य प्रदेश राज्यातील पर्यटकांचा लोंढा हळूहळू वाढत गेला. प्रशासनानेही दखल घेतली.मार्च २०१७ मध्ये कामठा- पांजरा मार्गावरील शेतात सारसांची दोन अंडी आढळली. त्यामुळे अंडी संर्वधनाकरिता शेतकरी आणि प्रशासनाने पुढाकार घेतला. वन्यजीव विभागाकडून सारस पक्ष्यांची गणणा होऊ लागली. गतवर्षी गणनेत ३६ सारस आढळून आले. यावर्षी १० व ११ जूनला गणना करण्यात आली. परंतु,या गणनेत केवळ ३२ सारस आढळून आले. चार सारस कमी आढळल्याने वन्यजीव प्रेमीनी qचता व्यक्त केली आहे.

Monday 19 June 2017

विवाहित महिलेवर वार करुन चिमुकल्या मुलाची हत्या


गडचिरोली, दि.१९: पती बाहेर गेल्याची संधी साधून एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात तिच्या चिमुकल्या मुलाची धारदार शस्त्राने हत्याने केल्याची घटना आज भल्या पहाटे मुलचेरा तालुक्यातील लगामनजीकच्या कांचनपूर येथे घडली. मुलाची आई गंभीर जखमी असून, आरोपी संजू विश्वनाथ सरकार(२०) फरार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हैद्राबाद येथे गेला होता. त्यामुळे ती आपल्या साहिल नामक ४ वर्षीय चिमुकल्यासह घरी झोपली होती. मध्यरात्री तिच्या घराशेजारी राहणारा संजू विश्वनाथ सरकार याने घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करताच त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे ती गंभीर जखमी झाली. आवाजामुळे ४ वर्षीय बालक जागा होऊन रडायला लागला. त्यामुळे आरोपीने त्याची हत्या केली. सकाळ होऊनही पीडित महिलेच्या घरचे कोणीच बाहेर न आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घरात डोकावून पाहिले असता महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत दिसून आली. नागरिकांनी पाणी पाजल्यानंतर काही वेळाने ती बोलायला लागली. तिने आपबिती सांगून संजू सरकार याने हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी जंगलात फरार झालेल्या आरोपी संजू सरकार यास पकडून आणून चांगलाच चोप दिला. पोलिस घटनास्थळी पोहचताच नागरिकांनी आरोपीस त्यांच्या स्वाधीन केले. जखमी महिलेस अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे घटनेचा तपास करीत आहेत.

दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण


गडचिरोली,दि.१९: : छत्तीसगडमधील जहाल नक्षलवादी पवन वेलादी यास अटक केल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला नक्षलींनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सोनी दसरु कोवासे रा.आंबेली ता.बैरमगड, जि.बिजापूर व अन्य एका बालिकेचा त्यात समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी कोवासे ही सांड्रा दलममध्ये तर दुसरी बालिका ही परसेगड दलममध्ये कार्यरत होती. नक्षल बालिकेस बालकल्याण समितीपुढे हजर केले असता बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, नक्षल संघटनेचा डीव्हीसी दिलिप, परसेगड दलम कमांडर मंगी पुनेम, डीव्हीसी पवन उर्फ सोमा वेलादी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३४ व बाल संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८३ नुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपी डीव्हीसी पवन यास अटक करण्यात आली असून, त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नक्षलवादी हे बालकांना बळजबरीने पळवून नेतात व लहान मुलांचे शोषण करुन त्यांना दलममध्ये काम करण्यास भाग पाडतात. यावरुन नक्षलवादी हे बालकांच्या मानवाधिकाराचे कशाप्रकारे उल्लंघन करतात, हे पुन्हा एकदा या घटनेने सिद्ध झाले आहे, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा लाहेरी परिसरात नक्षलवाद्यांनी शाळेतून तीन मुलींना बळजबरीने पळवून नेले होते व त्यांना नक्षल दलममध्ये भरती करुन घेतले होते.

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी



नवी दिल्ली, दि. 19 – काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवले आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची 3 जून 2009 रोजी बिनविरोध निवड झाली होती.
मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या 1973मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या. लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशानं एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, 8व्या, 11व्या, 12व्या, 14व्या आणि 15व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदही भूषवले आहे

रामनाथ कोविद एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार



नवी दिल्ली,दि.१९-राष्ट्रपतीपदासाठी भाजप प्रणित एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील.
‘रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते’. अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
‘नाव ठरण्याआधी आम्ही देशातील सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. नाव ठरल्यानंतर एनडीएतील सर्व घटकपक्षांना कळवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही नाव कळवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी नाव ठरल्यावर कळवू असे अमित शहा भेटीत सांगितले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि स्वामीनाथन यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपा नेमकी कोणाला उमेदवारी देते यावरुन अखेर अमित शहांनी पडदा उचलला. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा सुरु होती. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचंही नाव चर्चेत होते. भाजपा त्यांना उमेदवारी देईल असा अंदाज होता.
भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार असल्याचे पोस्टर्स रविवारी अचानक भाजपचे मुख्यालय असलेल्या अशोका रोडवर, संसदेकडे जाणाऱ्या रायसीना मार्गासह अनेक ठिकाणी झळकले होते. तथापि मुख्यालयाच्या भिंतीवर लागलेले हे पोस्टर्स काही तासातच फाडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली.
राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणींचे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. जोडीला मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांची नावेही चर्चिली गेली. राजधानीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी असतांना, अचानक अडवाणींच्या नावाचे समर्थन करणारे पोस्टर्स रविवारी झळकले. पोस्टर्सवरील मजकूरात‘भारतीय जनता पक्षाचे जनक, लोहपुरूष तथा भारताच्या राष्ट्रीय राजकारणातले आदरणीय नेते लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार आहेत’ असा उल्लेख होती. सुषमा स्वराज यांनीदेखील आपण स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केले होते.

Sunday 18 June 2017

Berartimes_14-20 JUN 2017





लाच घेताना मुख्य लिपिकाला अटक



भंडारा दि.18-: टीसी देण्यासाठी ८५० रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी महाविद्यालयातील मुख्य लिपिकाला आज रंगेहाथ पकडण्यात आले. शालिकराम ऊकरे असे या लिपिकाचे नाव असून तो कोंढा कोसरा येथील डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालयात मुख्य लिपीक आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार हा कोंढा कोसरा येथील रहिवासी असून सन १०-११ मध्ये सदर महाविद्यालयातून शिक्षण घेत होता. दरम्यान त्यांना कॉलेज सोडल्याचा दाखला (टी.सी.) पाहिजे होती. यासाठी मुख्य लिपीक शालिकराम ऊकरे यांनी टीसी देण्यासाठी तक्रारदाराकडे ९५० रूपयांची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. दरम्यान आज तडजोडीनंतर ८५० रूपयांची लाच स्वीकारताना ऊकरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कोरंभी तलाव खोलीकरणात कंत्राटदार अग्रवालची मनमानी,अधिकारी गप्प



अर्जुनी मोरगाव,दि.18- ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता लघुपाटबंधारे विभाग व कंत्राटदार कोरंभी येथील तलाव खोलीकरण कामात मोठा गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप कोरंभीच्या सरपंच रेखा कोडापे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कामावर ग्रामपंचायतीने आक्षेप घेतल्यावरही वरिष्ठांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यातच या कामाचे कंत्राटदार गोंदियातील अग्रवाल नामक व्यक्ती असून नरेश धरमशहारे यांच्या जेसीबी मशिन व ट्रक्टरने अवैधरित्या मुरूम विकण्याचे काम करीत असताना अधिकारी गप्प असल्याचा प्रश्नही सरपंच कोडापे यांनी उपस्थित केला आहे.
कोरंभी येथील तलावाच्या खोलीकरणाचे काम गेल्या पाच-सहा दिवसापासून सुरू आहे. या कामासंदर्भात ग्रामपंचायतीला अंदाजपत्रक किंवा साधी माहिती देखील देण्यात आली नसल्याचे श्रीमती कोडापे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, तलाव खोलीकरणाचे काम सुरू असले तरी, हे काम गाळ काढण्याचे आहे की, खोलीकरणाचे हे देखील स्पष्ट झाले नाही. सदर काम गाळमुक्त तलाव करून ते सुपिकतेच्या नावावर शिवारात टाकायचे असते तर खोलीकरणात मुरू काढण्याचे काम असते. या कामावर ग्रामपंचायतीने आक्षेप घेतल्यावरही हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे या कामात संगनमताने मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सरपंच कोडापे यांनी केला असून, याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.मनमर्जी काम करुन अधिकार्यांना खिशात ठेवणारा तो अग्रवाल कंत्राटदार कोण अशा प्रश्न अर्जुनी मोरगाव तालुक्यात विचारला जाऊ लागला आहे.

सातव्या वेतन आयोगाची फूटपट्टी शेतकऱ्यांसाठी का नाही ?



नागपूर,दि.18 : कर्मचाऱ्यांसाठी सहावा, सातवा वेतन आयोग लागू केला जात आहे. आमचा या वेतन आयोगाला विरोध नाही. परंतु ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या या वेतन आयोगाची फूटपट्टी १२ तास शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी का नाही, असा थेट प्रश्न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांनाही फूटपट्टी लावून त्यानुसार कृषीमूल्य आयोगाने भाव ठरवावे, असेही स्पष्ट केले.लोकशाही हक्क संरक्षण समितीच्यावतीने हिंदी मोरभवन येथील नटराज सभागृहात शनिवारी ‘शेतकरी आंदोलन : आव्हान आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेती विषयाचे अभ्यासक अमिताभ पावडे आणि अनंत भोयर प्रमुख अतिथी होते.
विजय जावंधिया म्हणाले, इंग्रजांनी आपल्या काळात येथील नागरिकांना गुलाम ठेवण्यासाठी असंघटित नोकरदार व असंघटित कामगार, शेतकरी यांचे वेतन निश्चित करण्यासाठी एक पद्धत अवलंबिली होती. ती पद्धत आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही कायम आहे, असे का? शेतकऱ्यांचे प्रश्न हे या देशातील चुकीच्या आर्थिक धोरणांमध्ये लपलेले आहे. १९९० नंतर राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या चुकीच्या धोरणांविरुद्ध आपण आवाज उठवणार की नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे असतील तर त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अमिताभ पावडे म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण कसे होते, हे येथील राजकारण्यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांना कधी समजावून सांगितलेलेच नाही. शाळांमधून शेती शिकवली जात नाही. शेतीचे अर्थशास्त्र सांगितले जात नाही. असे का? कारण ज्या क्षेत्रातील लोकांना गुलाम करायचे असते, त्या क्षेत्राबाबत लोकांना अज्ञानी ठेवले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.अनंत भोयर यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांदा हा २० रुपये किलोने विकला जातो. तेव्हा आयात करून त्याचे भाव पाडले जातात. परंतु तोच कांदा जेव्हा ५ रुपयाला विकला जातो तेव्हा निर्यात का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.प्रास्ताविक व संचालन प्रज्ज्वला तट्टे यांनी केले. सुनील दुधे यांनी आभार मानले.

आर्थिक बचतीसाठी सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन



देवरी,दि.18-नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अल्पसंख्याक सुद्धा आहे. यासमाजातील लग्नकार्य आदीतून आर्थिक बचत व समाज एकता निर्माण व्हावी, या अनुषंगाने मागील तीन वर्षाची परपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा नाभिक समाज संघटनेच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांच्या अध्यक्षतेखाली १0 जून रोजी समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चुडामन लांजेवार, जिल्हा सचिव सुरेश चóो, जिल्हा युवाध्यक्ष संजय चóो, प्रचार प्रसार प्रमुख विजय चन्ने, रणधीर सूर्यवंशी, अमोल लांजेवार,दादाजी कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मुख्य म्हणजे, नाभिक समाजातर्फे गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन देवरी ऐवजी सौंदड येथे येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात तर देवरी येथे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेउपक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र फुलबांधे, मारोती उरकुडे, राहूल लांजेवार, अमोल लांजेवार, वामन सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, विजय शेंडे, हटवार यांनी शपथ घेतली. तसेच समाज बांधवांनी सोहळे यशस्वी करण्याचे आश्‍वासन दिले. प्रास्ताविक रणधिर मेर्शाम यांनी केले. संचालन अमोल लांजेवार यांनी तर आभार योगेश सूर्यवंशी यांनी मानले.

Saturday 17 June 2017

16 लाखाचे इनाम डोक्यावर असलेल्या नक्षलवाद्याला अटक

गडचिरोली, दि. 17 - धोकादायक नक्षलवादी पवन वेलाडीला गडचिरोली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या डोक्यावर 16 लाखाचे इनाम होते http://berartimes.com/?p=33681

आता सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर


sushma swaraj marathi news maharashtra news president

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था) - देशाच्या प्रथम नागरिकाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी संघासह सर्वपक्षीय सहमती घडविण्यासाठी आटापिटा दाखविणाऱ्या भाजपतर्फे या पदासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आजच्या घडीला सर्वांत आघाडीवर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून खकळते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी; म्हणजे 23 तारखेला व अमावस्या टाळायची असेल तर 22 तारखेला भाजप उमेदवारची घोषणा होणे अपेक्षित आहे. स्वतः सुषमा यांनी ठाम नकार दिला तर मोदी आपल्या मनातील व अतिशय नवख्या उमेदावारचे नाव ऐनवेळी पुढे करून धक्का देऊ शकतात असे समजते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. राष्ट्रपती भवनात उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. ही फेअरवेल भेट असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीच्या वेगवान घडामोडी राजधानीत घडत आहेत. या पदासाठी भागवतांसह द्रौपदी मुर्मू, मेट्रो-मॅन श्रीधरन, एम. एस. स्वामिनाथन, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आदी नावांच्या चर्चा अखंड सुरू होत्या. गृहमंत्री राजनाथसिंह व ज्येष्ठ मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज तिन्ही त्रिकाळ भेटीगाठींचा धडाका उडवून दिला होता. या दोघांनी सायंकाळी भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. विशेषतः अडवानी यांना भेटून दोन्ही नेत्यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडल्यावर सुषमा स्वराज यांच्या नावाची चर्चा अतिशय गंभीरपणे सुरू झाली. अडवानी यांनी चार वर्षांपूर्वीच सुषमा स्वराज यांच्या नावास पहिली पसंती दिली होती. राजनाथसिंह व नायडू यांच्याशी भेटीतही अडवानी यांनी आपल्या मताचा पुनरुच्चार केल्याचे समजते.
उत्कृष्ट वक्‍त्या व उत्तम प्रशासक असलेल्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपली छाप पाडली आहे. जयप्रकाश आंदोलनाची देणगी असलेल्या सुषमा स्वराज यांचे सोनियांसह सर्व पक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत.
अडवानी म्हणाले तर...
अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच सर्वसहमतीनेच राष्ट्रपती निवडण्याचा मोदींचा अट्टाहास असेल तर आजच्या घडीला सुषमा स्वराज यांच्याशिवाय दुसरे नावच त्यांच्यासमोर नाही असे भाजप सूत्रांनी नमूद केले. मात्र शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज राष्ट्रपतिपदाचा फुलस्टॉप लावून घेण्यास तयार आहेत का, हा खरा प्रश्‍न आहे. अडवानींची इच्छा म्हटल्यावर त्या नकार देऊ शकणार नाहीत असा भाजपचा होरा आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसह प्रधानमंत्री आवास योजनेतही महाराष्ट्रला राष्ट्रीय पुरस्कार - पंकजा मुंडे


१९ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा
           मुंबई, दि. १७ : सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी सन १६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत

संवर्गनिहाय उद्दिष्टाएवढी ५ हजार १२९ प्रकरणे मंजूर करुन त्यापैकी १ हजार ४१ घरे सहा महिन्याच्या आत पूर्ण केली आहेत. यामध्ये कोयना धरण परिसर व डोंगराळ भागात, ज्या ठिकाणी घरकुल बांधकामाचे साहित्य बोटीद्वारे अथवा बैलगाडीद्वारे घेऊन जावे लागते अशा ठिकाणी घरकुले २ ते ३ महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेली आहेत. या उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र राज्याचा व जिल्हा विकास यंत्रणा यांचा भारत सरकारच्या वतीने दि.१९ जून रोजी नवी दिल्ली येथे गौरव करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
            मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर
असायला हवे यासाठी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेस नवीन मंजूर घरकुलांकरिता १ लाख २० हजार रुपये व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता १ लाख ३० हजार रुपये इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे. लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण २०११ मधील माहितीच्या आधारे करण्यात येत आहे.
            राज्याने सन २०१६-१७ ह्या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या योजनेंतर्गत एकूण २ लाख २० हजार ९८९ एवढी घरकुले मंजूर केली आहेत. राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी ३ लाख १८ हजार ८१४ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच २ लाख ४७ हजार ९४५ लाभार्थ्यांच्या जागेवर जाऊन घर बांधणेसाठी निवडण्यात आलेल्या जागांचे फोटो, बांधकाम फोटो काढण्यात आले आहेत. अशा प्रकारे लाभार्थींच्या Online नोंदी व mobile app  द्वारे फोटो काढणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
             राज्याने प्रायोगिक तत्त्वावरील गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम बिलोणी, ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे गुणात्मक व वैशिष्ट्यपूर्णरित्या राबविला आहे. या ठिकाणी एकत्रित २७ घरे बांधण्यात आली आहेत.  घरकुलांचे बांधकाम चालू असताना बांधकामाचे जागेवरती ५८ लाभार्थींना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे गवंडी प्रशिक्षण दिलेले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींची परीक्षा केंद्र
शासनाद्वारे घेण्यात आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये एकमेव ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण रितीने राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅग्निज चोरीप्रकरणी सात आरोपींना अटक

देवरी,दि.16- पोलीस ठाण्याअंतर्गत भागी येथे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून टिप्परमध्ये भरलेला मॅग्निज बाहेर काढून भेसळ करणार्‍या सात आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सोमवारी १२ जून रोजी करण्यात आली.
आरोपी अंशूल अग्रवाल, शिव परिहार, राजू सरदार, रत्नपाल, शेरू पठाण, टिप्परचालक गोठारा सालीकराम डोंगरे व काशीराम हे सर्व टिप्परने शासकीय मॅग्निजची चोरी करताना आढळून आले. उपरौक्त आरोपी हे कंपनीच्या टिप्परमध्ये भरलेली शुद्ध मॅग्निज काढून तेवढय़ाच प्रमाणात बनावटी मॅग्जिन घालून शासकीय मालमत्तेचे नुकसान करीत होते.
देवरी पोलिसांनी त्यांच्याकडून आठ प्लास्टिक पोत्यात काढून ठेवलेले २४0 किलो मॅग्निज (किंमत ९ हजार ६00 रूपये), २२ प्लास्टिक घमेले, दोन टिकास, दोन फावडे, वजन काटे असा एकूण १४ हजार ४५0 रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अग्निहोत्री करीत आहेत.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...