Monday 5 June 2017

गोळीबारात युवक ठार



नागपूर ,दि.05-लष्करीबाग परिसरातील नवा नकाशामधील किदवाई मैदानाजवळ रविवारी दोन गटात वर्चस्वावरून झालेल्या वादात एकमेकांवर शस्त्रहल्ले झाले. यावेळी एका गटातील आरोपींनी दुसर्‍या टोळीतील युवकांवर गोळीबार केल्याची घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेत मो. आबिद शेख (२४, रा. मोमीनपुरा) या युवकाच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
आसिफ शेख आणि आसिफ कोयला असे अटकेतील आरोपींचे, तर बॉबी व स्वामी हे पसार आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, मो. आबिद व आसिफ ऊर्फ गड्डू शेख या दोघात काही महिन्यांपासून वर्चस्वातून वाद सरू आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान या दोघांची चारचाकी वाहने कामठी मार्गावरील १0 नंबर पुलाजवळ समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्या वादही झाला. सायंकाळी ६ वाजता दोन्ही गट पुन्हा नवा नकाशामधील किदवाई मैदानाजवळ आमने-सामने आले. आसिफ शेख, बॉबी, आसिफ कोयला आणि स्वामी या आरोपींनी दुसर्‍या टोळीतील आबिद शेख याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आसिफ व आबिदच्या टोळीत बाचाबाची झाली. आसिफने त्याचेवर अंधाधुंद गोळीबार केला. तीन गोळय़ांपैकी एक त्याच्या डोक्याला लागली. त्यामुळे गंभीर जखमी आबिदला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत नवा नकाशा परिसरात तणाव होता. दोन्ही गटात झालेल्या संघर्षात आबिदसह अजून एकाला गोळी लागल्याची चर्चा होती. वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...