Wednesday 7 June 2017

सडकअर्जूनीचे नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

 
गोंदिया,दि.०७- निवासी प्रयोजनाच्या जागेचे वाणिज्यिक प्रयोजनाकरीता भूखंडाच्या प्रवर्गात बदल करण्यासाठी अर्जदाराला ४० हजाराची लाच मागणाèया सडक अर्जूनी तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडून लाचलुचपत विभागाने आरोपीविरुद्ध डुग्गीपर पोलिसात गुन्ह्याची नोंद केली आहे.
त्या लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव  चंद्रशेखर शंकर गजभिये (वय-४७) असे आहे.
प्रकरण असे की, तक्रारदार हे  सडकअर्जूनी येथील कृषी केंद्र संचालक असून त्यांचे आईवडिलांचे नावे मौजा कोहमारा येथे निवासी भूखंड आहे. या भूखंडाला वाणिज्यिक स्वरूपात बदल करण्यासाठी तक्रारदाराने आपल्या वडिलांसह सडक अर्जूनीच्या तहसील कार्यालयात अर्ज केला. परंतु, या कार्यालयात कार्यरत गजभिये नामक नायब तहसीलदाराने सदर प्रकरण ४० हजार रुपये मोबदला घेतल्याशिवाय निकाली काढण्यास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या अर्जदाराने २० हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम काम झाल्यावर देतो, असे संबंधित अधिकाèयाला सांगितले. या प्रकरणी अर्जदाराने गोंदिया येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.
त्यावरून लाचलुचपत विभागाने सडक अर्जूनीच्या तहसील कार्यालयात सापळा लावून लावला. जमिनीची वर्गवारी बदलून देण्याचा मोबदला म्हणून आरोपीने अर्जदारास २० हजाराची मागणी केली. तडजोडी अंती १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोपी चंद्रशेखर शंकर गजभिये (वय-४७), नायब तहसीलदार, तहसील कार्यालय सडक अर्जूनी याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपीवर डुग्गीपार पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलिस उपायुक्त संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांचे मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलिस निरीक्षक  प्रमोद चौधरी, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, दिलीप वाढणकर,  राजेश शेंद्रे, रणजित बिसेन, नितीन रहांगडाले, गीता खोब्रागडे, वाहन चालक पंकज मिश्रा यांनी केली.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...