Wednesday 21 June 2017

छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवार



पुणे,दि.21: छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शेजलवकर यांचा दाखल देत केले.आज पुण्यात श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचे प्रकाशन झाले, त्यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात पवार बोलत होते.इतकेच नाही, तर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा मुस्लिम म्हणून नाही, तर शत्रू म्हणून काढल्याचे पवार म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्मांचे होते. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या नौदलाचा प्रमुख,अंगरक्षक मुस्लिम होता. अफझलखान त्यांच्यावर चाल करून आला तेव्हा त्याचा कोथळा काढला कारण तो स्वराज्याचा शत्रू होता ना की मुस्लिम होता म्हणून. अफझल खानाचा वकील होता – कृष्णाजी कुलकर्णी याचाही खात्मा तिथेच केला कारण तोही स्वराज्याचा शत्रू होता”, असे पवार म्हणाले.
महाराज जर मुस्लिमविरोधी असते, तर त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीला शिक्षा दिली नसती. त्यावरुन महाराज हे रयतेचे होते, ते सर्वांचे होते, असे शरद पवारांनी नमूद केले.शिवाजी महाराज गोब्राम्हण प्रतिपालक होते हे  म्हणणं अऐतिहासिक होते असे शेजवलकरांनीही सांगितले आहे, असे पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...