Tuesday 6 June 2017

प्रधानमंत्र्यांना लाइव्ह इंटरव्ह्यूचं रविश कुमारांचे खुले आव्हान

नवी दिल्ली, दि. 6 - सोमवारी (दि.5) सकाळी सीबीआयने एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरी छापा मारला. यानंतर मोदी सरकारवर टीकेची झोड उठली. सोशल मीडिया, राजकीय पक्षांपासून सर्वच सामाजिकस्तरावरून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.  
प्रणय रॉय यांनी निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा त्यांचेवर आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, दिल्ली आणि देहाराडूनमध्ये छापा टाकण्यात आला आहे. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.  
या दरम्यान एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांनी आपल्या रोखठोक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट पंतप्रधानांना आमने-सामने येण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. ''संपवण्याची इतकीच हौस असेल तर कधी समोरासमोर खुर्चीवर बसा मग होऊन जाऊद्या'' असं मोदींचं नाव न घेता रविश यांनी खुलं आव्हान दिलं आहे. फेसबुकवर एक पोस्ट करून रविश यांनी हे आव्हान दिलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख थेट पंतप्रदान आणि केंद्र सरकारकडे असल्याचं समजतं. या पोस्टमध्ये त्यांनी मीडियावरही टीका केली आहे. सर्व मीडिया केंद्र सरकारच्या इशा-यावर काम करते असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.   
रविश कुमार यांच्या आव्हानानंतर सोशल मीडियावरून मोदींनी आव्हान स्वीकारण्याचा सूर पाहायला मिळत आहे. तर काहींनी मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पत्रकार करण थापर यांना दिलेल्या इंटरव्ह्यूची आठवण करून देत  हे आव्हान मोदी स्वीकारणार नाहीत असं म्हटलं आहे.   
रविश कुमार यांनी दिलेलं आव्हान पंतप्रधान मोदी स्वीकारणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...