Saturday 17 June 2017

पेंच व्याघ्र प्रकल्पात घोरपडीची शिकार


नागपूर,दि.१७ :पेंच व्याघ्र प्रकल्पात १0 जून रोजी ४ घोरपडी, एक मुंगूस व रानडुकराची शिकार करण्यात आली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये ८ आरोपींना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यता आले होते. ५ आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. तर ३ आरोपींना वनकोठडीत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पात काम करणारे गाईड, वनमजूर व पिपरीयाचे उपसरपंच यांचाही समावेश आहे.
व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी जनावरांच्या शिकार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. याआधारे प्रकल्प क्षेत्राजवळच्या वाघोली, सिल्लारी व पिपरीया या तीन गावांमध्ये आरोपींना शिकार केलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवून रामटेकचे प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.
शिकार केलेल्या घोरपडी या मोनिटर रिझ्ॉर्ट या शास्त्रीय नावाने ओळखल्या जातात व वाघा इतक्याच महत्त्वाची ही प्रजाती असून वन्यजीव विभागांतर्गत शेड्युल-१ या श्रेणीत मोडल्या जाते. या प्राण्याची शिकार करणार्‍या ३ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद काद्यामध्ये आहे. या प्रकरणात सहाय्यक वनसंरक्षक एस.एन. भागवत याचे मार्गदर्शनाखाली पांडुरंग पखाले तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...