Sunday 4 June 2017

उघड्य़ावर शौचास बसलेल्या तिघांवर दंड



देवरी,दि.04-सरकारच्यावतीने हागंणदारीमुक्त गावच नव्हे तर शहर सुध्दा करण्यावर भर दिला जात आहे.त्यानुसारच गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायतीने 100 टक्के शौचालयाचा वापर करावा यासाठी मोहिम सुरु केली.त्यातच उघड्यावर शौचास जाणार्यांंना दंड भरावा लागेल याची सुचना दिल्यानंतरही 2 जून रोजी सकाळच्यावेळी उघड्यावर शौचास बसलेल्या तिघांना गुडमार्निंग पथकाने पकडले.त्या तिघांना पकडून पोलिस ठाण्यात नेऊन 500 रुपये दंड भरुन त्यांना सुचना देत सोडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिली आहे.
ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी शासनाच्या निधीतून शौचालय तयार करुन घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क करावे असे आवाहन करीत उघड्यावर शौचास बसणार्याची छायाचित्र व्हाटसअप पाठविण्याचे आवाहनही केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...