Tuesday 6 June 2017

७ जून रोजी देवरीत प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा



गोंदिया,दि.६ : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय देवरी यांच्या संयुक्त वतीने आज ७ जून रोजी सकाळी ११ वाजता माँ धुकेश्वरी मंदीर देवरी येथे नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्र देवरीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व प्रधानमंत्री मुद्रा योजना, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया राहणार आहेत. उदघाटन आमदार संजय पुराम हे करतील. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, देवरी उपविभागीय अधिकारी मुकूंद टोणगावकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पं.स.सभापती देवकी मरई, देवरी नगराध्यक्ष सुमन बिसेन, माजी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्र देवरीच्या अध्यक्ष साजीदा बेगम सिध्दीकी, नागपूरचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांची विशेष उपस्थिती तर जि.प. सदस्य सर्वश्री हमीद हल्ताफ अकबर अली, श्रीमती उषा शहारे, दिपकसिंह पवार, श्रीमती सरीता बडोले, श्रीमती माधुरी कुंभरे, पं.स.उपसभापती श्रीमती संगीता भलावे, पं.स.सदस्य सर्वश्री नरेंद्र मडावी, श्रीमती अर्चना ताराम, सुनंदा बहेकार, महेंद्र मेश्राम, गणेश तोपे, मेहतर कोराम, श्रीमती लखनी सलामे, गणेशदास सोनबाईर व गटविकास अधिकारी व्ही.पी.कोडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी एस.डी.गणराज, स्टार स्वरोजगार मार्गदर्शन केंद्राचे व्यवस्थापक सतीश झाडे हे प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यास देवरी तालुक्यातील बचतगटातील महिला, युवक, युवती यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, तहसिलदार विजय बोरुडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...