गोंदिया,(berartimes.com)दि.1- गोंदिया जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या एका कर्मचार्याची याच विभागातील एका पोलीस ठाण्यात असलेल्या कांस्टेबलने कार्यालयात जाऊन आज गुुरुवारला चांगलीच धुलाई केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात पसरली आहे.पोलिस अधिक्षक कार्यालयात बाबू असलेल्या कर्मचार्याने एका त्याच कार्यालयातील सहयोगी महिला कर्मचार्याच्या मोबाईलवर संदेश पाठविला.त्या संदेशाची माहिती सदर महिला कर्मचारीने आपल्या पोलिस असलेल्या पतीला दिली असावी आणि त्या संदेशावरुनच त्या काँस्टेंबलपतीने कार्यालयीन वेळेतच पोलिस अधिक्षक कार्यालयात जाऊन येथेच्छ धुलाई केली.यांसबधी गोंदिया ग्रामीण पोलिसात विचारणा केली असता अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही.परंतु घटना सत्य असल्याची माहिती देण्यात आली असून एका पोलिस उपनिरिक्षकाकड़े या घटनेची चौकशी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.या घटनेने पुन्हा शासकीय कार्यालयामध्ये सहयोगी पुरुष कर्मचारी महिला कर्मचारी सोबत कसे व्यवहार करतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याची प्रचिती अाली असून शासनाने प्रत्येक कार्यालयात महिलावर कार्यालयात अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी एक समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत.परंतु गोंदिया जिल्ह्यात या समितीचे गठण झाले की नाही कुणास ठाऊक कारण जिल्हा परिषदेतही असे अनेक प्रकार घडून आले परंतु नंतर त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचेच काम होत असल्याचे दिसून आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
Barobar nahi he pan yat 100% chuki babuchi ka?
ReplyDelete