Friday 16 June 2017

जर्मन-जपान टोळीचे चार गुंड गजाआड


नागपूर,दि.16 : ५० लाख रुपयांची खंडणी मिळावी म्हणून एक चांगली चालणारी शाळा बंद पाडणाऱ्या आणि त्या शाळेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या कुख्यात जर्मन जपान टोळीतील चार गुंडांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. अजहर खान रशीद खान (वय ३३), अमजद खान रशीद खान (वय ३५), राजा खान रशीद खान (वय ३२) आणि जावेद अन्सारी अब्दुल वहाब अन्सारी (वय ४८) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
शमसुन्निसा पठाण (वय ६२) यांचे पती मोहम्मद ईस्माईल पठाण यांनी जाफरनगरात रसूल प्राथमिक शाळा सुरू केली होती. ईस्माईल यांचे निधन झाल्यानंतर आरोपी जर्मन जपान टोळीने जानेवारी २०११ मध्ये या शाळेच्या काही जागेवर अनधिकृत कब्जा केला. वर्षभरानंतर ही शाळा बंद पाडून या टोळीने संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतली. शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही जर्मन जपान टोळीचे गुंड धमकावू लागले.
याबाबत निराधार शमसुन्निसा यांनी या गुंडांकडे आर्जव विनंत्या केल्या असता गुंडांनी त्यांना ५० लाखाची खंडणी मागितली. ती दिली नाही म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी शमसुन्निसा यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार केली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...